फॉकलंड युद्ध- अर्जेन्टिनाचे आक्रमण (१)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
5 Sep 2016 - 12:00 am

दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा सहजासहजी विजय झाला नव्हता. त्यातच ब्रिटन ची अर्थव्यवस्था हि भारत गमवावा लागल्यामुळे कमालीची ढासळली होती. दुसरी कडे दक्षिण अमेरिका खंडात एक वेगळाच कट शिजत होता. २ एप्रिल १९८२ ,कुठलाही संदेश न पाठवता अर्जेन्टिना ने आपल्या फौज फॉकलंड बेटांवर घुसवल्या. आणि सुरवात झाली एका युद्धाची.

फॉकलंड बेटे हि ब्रिटिश स्वयंशासित समूह चा भाग आहेत. गव्हर्नर रेक्स हंट तिथे कार्यरत होता. पण ५७ मारिन आणि ११ सिविल गार्ड अशी आणि एव्हडीच ब्रिटिश फौज बेटावर होती. वात्स्तविक अर्जेन्टिना फॉकलंड बेटांवर हल्ला करू शकतो ह्याची ब्रिटनला कल्पनाच नव्हती. कारण प्रश्न चर्चेने सोडवावा अशी ब्रिटन आणि अर्जेन्टिना ची भूमिका होती. पण अर्जेन्टिना मध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर सुद्धा ब्रिटिश सरकार झोपलेलाच होते. पंतप्रधान होत्या मार्गारेट थॅचर. आयर्न लेडी ऑफ ब्रिटन.

आणि अशातच अर्जेन्टिना च्या नाविक दलाने ऑप्रेशन रोसारिओ म्हणजे फॉकलंड युद्धाची सुरुवात केली.
ह्या मोहिमेत पहिली चाल होती ती अर्जेन्टिना ची पाणबुडी संत फे ची. १४ तांत्रिक युनिट बरोबर ह्या पाणबुडीला विल्यम बंदरातल्या ब्रिटिश फौजांची आणि हालचालींची माहिती मिळवायची होती. म्हणून त्यांनी ३१ मार्च लाच हि माहिती मिळवायला सुरुवात केली. ह्यात त्यांना अशी माहिती मिळाली कि विलियम बंदरात उतरण्यास धोका आहे. म्हणून त्यांनी दक्षिण किडनी बेट आणि पेम्ब्रोके जवळ उतरण्याचे ठरवले. आणि १/२ एप्रिल च्या सकाळी ४.२० वाजता अर्जेन्टिना फौजेच्या ६०० जणांच्या तुकडीने फॉकलंड बेटावरती पाय ठेवला. पेम्ब्रोके जवळ असलेली धावपट्टी आणि दीपगृह अर्जेन्टिना फौजांनी लगेच ताब्यात घेतला. फॉकलंड बेताची राजधानी असलेल्या स्टॅन्ले शहरावर्ती हल्या साठी ह्या धावपट्टी चा अर्जेन्टिना वायुदलाला खूप उपयोग होणार होता. दुर्दैवाची गोष्ट हि कि त्यावेळी रॉयल एअर फोर्सचे एकही विमान फॉकलंड बेटावर नव्हते.

ह्याच वेळी योरके बे मध्ये अर्जेन्टिना च्या दुसऱ्या मारिन तोफखाना दलाने आपले रणगाडे आणि चिलखती गाड्या उतरवल्या . आणि राजधानी कडे कूच केले. अमेरिकी बनावटीच्या चिलखती गाड्यांमधून अर्जेन्टिना ची सुसज्ज फौज राजधानी च्या रोखाने निघाली पण त्यांना रोखण्यासाठी फॉकलंड बेटांवर सैन्यच नव्हत. कसे बसे १०० जण ब्रिटन कडे होते. अर्जेन्टिना चिलखती गाड्यांनी स्टॅन्ले सिटीचा एअरपोर्ट रास्ता ताब्यात घेऊन बाहेरील जगाशी तोडून टाकला आणि फॉकलंड बेटाच्या उरल्या सुरल्या अशा हि धुळीस मिळाल्या.

स्टॅन्ले चे गव्हर्नर हौस हे एका छोट्या टेकडी वर वसले आहे. गव्हर्नर नि उरली सुरली ब्रिटिश फौज तिथे एकत्र केली आणि लढण्याचा आदेश दिला. परंतु फार उशीर झालेला होता स्टॅन्ले शहर अर्जेन्टिनाच्या ताब्यात गेलेले होते. फॉकलंड बेटाच्या उरलेल्या भागात अर्जेन्टिना फौजेचा मुक्त वावर सुरु होता. ब्रिटन ची स्थिती अत्यंत वाईट होती. २ एप्रिल लाच सकाळी अर्जेन्टिना लष्करी दलांनी गव्हर्नर बंगल्या वर हल्ला चढवला. अर्जेन्टिना नौदल आणि काही सैन्याचा डोळा चुकवून काही ब्रिटिश फौज समुद्रात उतरण्याचा यशस्वी झाली पण शत्रूच्या नाविक दलापैकी ग्रॅन्व्हिले बोटीने त्यांचा पाठलाग सुरु केला. मग पोलिश(पोलंड) देशाच्या मासेमारी बोटीच्या आधारे हे सांगळे मारिन गव्हर्नर बंगल्यात परत आले. ह्या वेळे पर्यंत गव्हर्नर बंगलो च्या भोवती सशत्र अर्जेन्टिनन फौजेचा वेढा पडला होता. शेवटी सकाळी ८ वाजता गव्हर्नर ने अर्जेन्टिना समोर गुढगे टेकले. सर्व सैनिकांना एअरपोर्ट वर नेले गेले आणि सी-१३० विमानातून ब्रिटन ला पाठवून देण्यात आले. ब्रिटनच्या बेटाचा अर्जेन्टिना नि घास खेटला होता. पुढे काय घडले? बेट कधी परत मिळवता आले का? ते आपण पुढच्या भागात बघू
----------------------------------------------------------------------------------------

इतिहासलेख

प्रतिक्रिया

अलका सुहास जोशी's picture

5 Sep 2016 - 12:08 am | अलका सुहास जोशी

आवडला बुवा.

सुबोध खरे's picture

5 Sep 2016 - 12:13 am | सुबोध खरे

मूळ हि बेटे कुणाची आणि त्या ब्रिटिश लोकांनी कब्जा कसा केला हा इतिहास लिहील्यास संदर्भ समजण्यास सोपे होईल असे वाटते.

अमितदादा's picture

5 Sep 2016 - 12:30 am | अमितदादा

दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा सहजासहजी विजय झाला नव्हता. त्यातच ब्रिटन ची अर्थव्यवस्था हि भारत गमवावा लागल्यामुळे कमालीची ढासळली होती.

मला वाटतय तुम्ही १९८२ ह्या वर्षासंधर्भात बोलत आहात. ८० च्या दशकात ब्रिटन ची अर्थव्यवस्था धासालण्याची वेगळी कारणे आहेत, १९८० ची जागतिक मंदी हे हि एक कारण होत. दुसरे जागतिक युद्ध आणि भारतसारखी बाजारपेठ गमवाय चे दुष्परिणाम ब्रिटन वर झाले;, पण तो काळ होता १९४५-१९५१, त्या काळाला Age of Austerity संबोधले जाते. असो तो लेखाचा विषय नाही.
चांगली सुरुवात केलीय येवूद्या पुढचे लेख. युद्धातील माहितीबरोबर मार्गारेट बाई बद्दल पण लिहा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2016 - 7:19 am | कैलासवासी सोन्याबापु

Post oil shock का अमितदादा?

अमितदादा's picture

5 Sep 2016 - 9:52 pm | अमितदादा

होय !

वा, छान विषय. याबद्दल आधी पार्श्वभूमी अजून विस्ताराने सांगितल्यास वाचायला जास्त मजा येईल. पुभाप्र.

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2016 - 7:20 am | कैलासवासी सोन्याबापु

असेच म्हणतो! लेख लांब झाला तरी चालेल, प्रकाशनाची घाई करू नका. सावकाश लिहून एकदा प्रूफ रिडींग करून मग घाला, विषय उत्तम आहे लेख विस्कळीत होऊ देऊ नका, पुढील लेखनास शुभेच्छा :)

यशोधरा's picture

5 Sep 2016 - 8:36 am | यशोधरा

लेखाचा विषय आवडला, एका चांगल्या लेखमालिकेच्या प्रतीक्षेत.

बाबा योगिराज's picture

5 Sep 2016 - 9:40 am | बाबा योगिराज

लेख आवडला.
पण, थोडा छोटा झालाय. सोन्याबापू म्हणत्येत तस करा. पुढील लेखणास शुभेच्छा.

बाबा योगीराज.

जेच्या नावाने आम्ही बर्‍याच नमुन्यांचा उध्दार करतो तो हा फॉकलंड व्हय? येऊ द्या येऊ द्या.

पगला गजोधर's picture

5 Sep 2016 - 10:41 pm | पगला गजोधर

ते लॉर्ड फॉकलंड, अभ्याभौ
ही फॉकलंड बेटं. तो हिंदुस्थानातील गव्हर्नर होता.
ही

ज्याच्या नावाने उद्धार करता तो मुंबैचा गवर्नर लॉर्ड फॉकलंड हा या फॉकलंडचा वारस. बाकी त्या लॉर्ड फॉकलंडला इंग्रज विसरले असतील, पण आपण अजून त्याची आठवण काढतो :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2016 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर प्रयत्न.

अजून थोडे संशोधन करून विस्ताराने लिहीले तर या चांगल्या अधिक विषयाला न्याय मिळेल.

वर इतरांनी म्हटल्याप्रमाणे, "दुसरे महायुद्ध व ब्रिटनने भारत गमावणे" आणि "इ स १९८२" यांच्यामध्ये अनेक दशकांची तफावत आहे.

अभिजीत अवलिया's picture

5 Sep 2016 - 9:59 pm | अभिजीत अवलिया

औरंगजेब साहेब,
लेख फारच विस्कळीत व त्रोटक वाटला.
पूर्ण माहिती द्यावी ही विनंती. लेख मोठा होत असेल तर 2-3 भाग करून टाकावेत. वाचायला भरपूर वेळ असतो मिपाकरांकडे. :)

निशाचर's picture

6 Sep 2016 - 2:58 am | निशाचर

विषय रोचक आहे. परंतु बाकीच्यांनी म्हटल्याप्रमाणे बेटांचे भौगोलिक स्थान आणि थोडा पूर्वेतिहास दिल्यास उत्तम!
पुभाप्र.

प्रमोद देर्देकर's picture

6 Sep 2016 - 10:35 am | प्रमोद देर्देकर

पुलेप्र.

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 11:20 am | बोका-ए-आझम

ही आपला भाग आहेत असा अर्जेंटिनाचा दावा होता. अजूनही आहे. ते त्यांना मालव्हिनास (Malvinas) असं म्हणतात. अर्जेंटिनाने फाॅकलंड बेटांवर आक्रमण करण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे तेव्हा अर्जेंटिनाचा हुकूमशहा असलेल्या जनरल लिओपोल्डो गाल्तिएरीच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. त्यामुळे मालव्हिनास नोसोत्रोस (मालव्हिनास आमचीच) ही घोषणा देऊन अर्जेंटिनाने त्यावर आक्रमण केलं. जवळपास जगाच्या दुस-या टोकाहून येऊन ब्रिटिश सैन्य त्याचा प्रतिकार करेल असं गाल्तिएरीला वाटलं नाही. पण ब्रिटनच्या SAS (Special Air Service) या विशेष कृती दलाने धडक कारवाई केली. ब्रिटिश नौदलाने एक्झोसेत ही त्यावेळची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे वापरून जनरल बेलग्रानो ही अवाढव्य अर्जेंटिनी युद्धनौका बुडवली आणि अर्जेंटिनी लष्कराचं आणि नौदलाचं कंबरडं मोडलं.
दोन मजेशीर गोष्टी -
१. एक्झोसेत क्षेपणास्त्रे फ्रान्सने विकसित केली होती आणि ब्रिटन आणि अर्जेंटिना या दोघांनाही विकली होती.
२. फाॅकलंड बेटं ही अटलांटिक महासागरातल्या अत्यंत वादळी भागात येतात. तिथली हवा अतिशय खराब आहे. त्याचा राष्ट्रवाद सोडला तर अर्जेंटिना आणि ब्रिटन या दोघांनाही काही फायदा नव्हता. त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या विनोदी साप्ताहिकाने या युद्धाचं ' एका कंगव्यासाठी दोन टकल्यांमध्ये लागलेलं भांडण ' असं वर्णन केलं होतं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यामुळे ब्रिटनमधल्या पंच या विनोदी साप्ताहिकाने या युद्धाचं ' एका कंगव्यासाठी दोन टकल्यांमध्ये लागलेलं भांडण ' असं वर्णन केलं होतं.

'पंच'चे हे विधान एक विनोद म्हणुन ठीक आहे. पण, ते त्याच्या लेखकाचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे घोर अज्ञान उघडे करणारे विधान आहे.

अंटार्क्टिका खंडाचे क्षेत्रफळ १ कोटी ४० लाख चौ किमी आहे (तुलनेसाठी, युरोपचे क्षेत्रफळ १ कोटी चौ किमी आहे, हे ध्यानात घ्यावे.) व ते अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्याशिवाय त्याच्या आजूबाजूच्या सागरातील मासे व इतर साधनसंपत्तीचा हिशेब अजून लागलेला नाही.

अंटार्क्टिका खंड हे काहीसे ५०० वर्षांपूर्वीच्या अमेरिका खंडासारखे आहे. फरक इतकाच की तेथे त्यावर माल्की हक्क सांगायला कोणी मूलनिवासी नाहीत. पण, याचाच अर्थ असा की जो त्याच्या भूभागांवर प्रथम हक्क प्रस्थापित करेल त्याची ती मालकी होऊ शकेल ! तशा मालकीचे दावे अगोदरच अनेक देशांनी केलेले आहेत. त्या देशांत झगडे / युद्धे होऊ नयेत यासाठी ५३ देशांत, Antarctic Treaty System या कराराअन्वये, सद्या अंटार्क्टिकावर शास्त्रिय संशोधन सोडून इतर कोणत्या कारवाया करू नये असे ठरलेले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, फॉकलंडसारख्या दूरदराजावरच्या पण अंटार्क्टिका खंडाजवळ असणार्‍या बेटांवर, ती कितीही दूर आणि कितीही चिमुकली असली तरी, सार्वभौम सत्ता असणे वाटते तेवढे बिनमहत्वाचे खचितच नाही. या बेटांचे महत्व मुख्यतः खालील गोष्टींमुळे आहे...

१. बेटांच्या स्वामित्वामुळे त्या भूभागावरचे आणि त्याच्याबाजूच्या आर्थिक अधिकार असलेल्या समुद्रावरचे स्वामित्व : यामुळे तेथिल खनीजसंपत्तीवर (तेल, धातू, इ) हक्क स्थापित होतो. अंटार्क्टिक खंड व त्याच्याबाजूचा समुद्र यांच्यात बरेच तेल असल्याचे अंदाज आहेत. अजून काही वर्षांनी ती खनीजसंपत्ती वापरण्यावर असलेले निर्बंध मोडीत निघाले तर ब्रिटनसाठी फॉकलंड बेटाचे महत्व अनन्यसाधारण असेल.

२. बेटाच्या आजूबाजूच्या समुद्रातल्या मासेमारीचे हक्क.

३. राजकिय वर्चस्वाचे प्रतिक.

४. हे तुलनेने कमी थंड हवा असलेले बेट, अंटार्क्टिक खंडातल्या कारवायांसाठी रसद साठवायला व व्यक्तींना रहायला उपलब्ध असणे ही फार मोठी सोय आहे.

अजून काही...

१. भारताचे ग्रेट निकोबार हे बेट इंडोनेशियाच्या ब्र्युएह (Breueh) बेटापासून जेमतेम १०० किमी दूर आहे. ते ताब्यात असल्याने जवळ जवळ संपूर्ण बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रावर भारताची सरहद्द आणि हुकुमत आहे. अंदमान निकोबार द्वीपसमुह भारताच्या ताब्यात नसता तर आपली सागरी सरहद्द ६०० ते ८०० किलोमीटर पश्चिमेस (आपल्या पूर्वकिनार्‍याजवळ) आली असती आणि बंगालचा उपसागर व अंदमान समुद्रावरचा ८०% हिस्सा आंतरराष्ट्रिय पाणी झाले असते आणि त्यात चीनला खुलेआम कारवाया करता आल्या असत्या. अर्थातच, याचा भारतीय महासागरावरच्या भारताच्या हक्क व वर्चस्वावर लक्षणीय परिणाम झाला असता.

२. चीन आणि त्याच्या शेजारी देशांचे दक्षिण चीन समुद्रात चाललेल्या बेटांच्या मालकीच्या वादांमागे वरचीच कारणे आहेत.

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 7:01 pm | बोका-ए-आझम

+१. म्हणूनच अमेरिकेनेही प्युएर्तो रिको, ग्वाम अाणि दिएगो गार्सियावरचा हक्क सोडलेला नाही.

अमितदादा's picture

6 Sep 2016 - 9:53 pm | अमितदादा

अगदी. बेटांचे असलेले सामरिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्व, बेटाभोवती मिळणारे इकॉनॉमिक एक्सकलुझीव झोन, साधनसंपत्ती यांचं महत्व खूप आहे. अन्यथा चीन ने दक्षिण चीन समुद्रात अब्जावधी डॉलर ओतून, अमेरिका आणि ASEAN देशाचं वैर घेऊन कृत्रिम बेट उभारली नसती. असो अंदमान आणि निकोबार बेटांचा विषय निघाला आहे तर आणखी थोडी माहिती.

अंदमान आणि निकोबार बेटांचे दक्षिण टोक हे मलाक्का सामुद्रधुनी पासून खूप जवळ आहे. मलाक्का सामुद्रधुनी हि जगातील व्यस्त सागरी व्यापाराचा मार्गांपैकी एक आहे. याच सामुद्रधुनी मधून चीन चा 30-35 टक्के व्यापार आणि 70-75 टक्के खनिज तेलाची आयात होते. त्यामुळं युद्धकाळात भारत चीन ची नाकेबंदी करू शकतो. हेच लक्षात घेऊन भारताने अंदमान आणि निकोबार बेटावर भारताचं पहिलं आणि एकमेव tri-service center (आर्मी, नौदल आणि वायुदल यांचे एकत्रित कमांड) स्थापन केलं आहे. अर्थात इथे पण भारत कासवगतीने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. तसेच भारताच्या एकूण इकॉनॉमिक एक्सकलुझिव झोन पैकी 30 टक्के झोन अंदमान आणि निकोबार बेटामुळे मिळतो.

अर्थात भारताकडून भविष्यात होणाऱ्या नाकेबंदी विरोधात चीन ने आतापासून पाऊले उचलली आहेत. त्यातील चीन चे काही उपाय
1. चीन ने CPEC प्रोजेक्ट यासाठी विकसित केला आहे. जेणेकरून जर मलाक्का समुद्रधुनीत भारताकडून व्यत्यय आला किंवा दक्षिण चीन समुद्रात अमेरिका किंवा ASEAN देशाकडून व्यत्यय आला तर ग्वादार मार्गे पाकिस्तान मधून चीन चा व्यापार आणि तेल आयात चालू राहील. ह्या सुरक्षे च्या कारणव्यातरिक्त CPEC प्रोजेक्ट ची इतर आर्थिक आणि स्ट्रॅटेगिक करणे आहेत.
2. चीन ची स्ट्रिंग ऑफ पर्ल स्ट्रॅटेगी. जेणेकरून भारताभोवती व्यापारी कम मिलिटरी नाविक तळ उभारणे.
3. अंदमान आणि निकोबार बेटाशेजारी चीन ने म्यानमार ची कोको बेटे भाडेतत्वावर घेतली आहेत जेथे सिव्हिलिण पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत ज्याचा वापर मिलिटरी कारणासाठी केला जातो.

अभिजीत अवलिया's picture

6 Sep 2016 - 10:39 pm | अभिजीत अवलिया

चांगलीं माहिती म्हात्रे साहेब आणी अमितदादा

शाम भागवत's picture

6 Sep 2016 - 10:17 pm | शाम भागवत

अर्जेंटिनानेही एक मोठी ब्रिटीश बोट बुडवली होती. क्षेपणास्त्र सोडून ही बोट बुडवली गेलेली असल्याने या बोटीचा ठावठिकाणा अमेरिकेने अर्जेटिनाला दिला असावा असा संशय व्यक्त झाला होता. उपग्रहाच्या मदतीशिवाय हा अचूक ठावठिकाणा मिळणे शक्यच नाही असे काहीतरी त्यावेळी वाचल्याचे आठवते.

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2016 - 7:54 am | बोका-ए-आझम

अर्जेंटिनी नौदलाने बुडवली. मे १९८२ मध्ये काँकरर या ब्रिटिश युद्धनौकेने अर्जेंटिनाच्या जनरल बेलग्रानोला जलसमाधी दिल्यानंतर शेफील्ड बुडवली गेली. पण अमेरिकेचा त्यात संबंध असावा असं वाटत नाही कारण - १. अर्जेंटिनाला सोविएत युनियनने पाठिंबा दिला होता. अगदी संयुक्त राष्ट्र परिषदेतही. त्यामुळे अमेरिकेने अर्जेंटिनावर आर्थिक निर्बंध घातले होते.
२. त्यावेळचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन आणि ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे संबंध अत्यंत सौहार्दाचे होते. ब्रिटन आणि अमेरिका हे रीगन-थॅचर यांच्या काळात (१९८०-८८) जेवढे जवळ आले, तेवढे कधीच नव्हते. अमेरिकेचे ब्रिटनमधले राजदूत चार्लस प्राईस हे ब्रिटनमध्ये प्रचंड लोकप्रिय होते. अमेरिकेने सी हॅरियर हेलिकाॅप्टर्स आणि क्षेपणास्त्रे अशी मदत ब्रिटनला केली होती. त्याउलट अर्जेंटिनाला पेरू, व्हेनेझुएला, कोलंबिया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लिबिया यांनी मदत केली होती आणि हे सगळे देश कडवे अमेरिकाविरोधी होते.

diggi12's picture

25 Jul 2017 - 9:11 am | diggi12

पुढचा भाग केव्हा ??

diggi12's picture

24 Sep 2021 - 12:06 pm | diggi12

पुढचा भाग केव्हा

नीलस्वप्निल's picture

2 Oct 2021 - 2:10 pm | नीलस्वप्निल

पुढचा भाग केव्हा?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Oct 2021 - 3:00 pm | अमरेंद्र बाहुबली

पुढचा भाग केव्हा?