आम्ही बाजींच्या लेकी

दिपाली पोटे's picture
दिपाली पोटे in जनातलं, मनातलं
29 Aug 2016 - 4:32 pm

हुश्श. दररोजची माझी सीट पकडली आजपण. समोरची ओळखीचे हसली. तसे तिचे तिरकस हसणे सोडून तिच्या बद्दल मला काहीच माहित नाही मात्र सकाळी तिचे दर्शन नाही झाले तर दिवसाची चांगली सुरुवात होत नाही असा माझा वेडा समज आहे. नवरा, सासू, आई आणि दररोजची ट्रेन मधली सखी साऱ्यांना फोन लावून सगळे ठीक आहे तपासून घेतले. शांत होते कुठे ते पुढचे स्टेशन आले. आणि दुसरी फौज चढली ट्रेन मध्ये. कोण कुठे उतरणार चौकशी करून आपापल्या सीट राखून ठेवल्या. मग पुढचे स्टेशन आणि तिसरी फौज, आणि अशा ट्रेन मध्ये फौजा चढू लागल्या आणि उतरू हि लागल्या. खारघर ला एक हिरकणी चढते, आणि फर्मान सोडते खारघर, नेरूळ, कोपर्रखैराने...मग जी मावळण उतरणार असेल ती इशारा करते आणि ही शांत होते. आणि मग सुरुवात होते सगळ्याचे किस्से ऐकायला.
माझा ट्रेन मध्ये ग्रुप नाही. मुद्दामून नाही केला. मला आवडत नाही म्हणून नाही तर ट्रेन मधला वेळ हा फक्त माझा असावा म्हणून. कारण सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो. सकाळी सगळे करा, ऑफिस मध्ये पण अप टू डेट रहा आणि संध्याकाळी पण घरच्यांचे करा यात मी कुठेच नसते. दररोज प्रश्न पडतो का करायचे हे सारे मी. का नाही स्वतःला वेळ द्यायचा. मला आवडते मस्त बिछान्यावर पडून तास न तास पुस्तक वाचायला, एखादा मस्त 80 तला सिनेमा पाहताना क्रोचे करायला, मस्त गरमागरम भजी खाताना गाणी ऐकायला.....पण असे काही करायला मिळतच नाही. मग चिडचिड होते, माझेच नशीब वाईट म्हणून बोलणे होते..
मग हळूहळू ट्रेन मधल्या गप्पा कानावर येऊ लागतात..घरोघरी च्या मातीच्या चुली जाणवू लागतात.. ट्रेन मधल्या आम्हा प्रत्येकीला वाटत राहते की मीच फक्त एवढा त्रास सहन करून या आयुष्यातल्या धावण्याच्या शर्यतीत उतरलं आहेे. पण मग पटते की इथे प्रत्येक जणीला एक इतिहास आणि भूगोल आहे. इतिहासात बाजी नी घोडखिंड अडवली आणि महाराज विशाळगडावर पोहोचले मात्र इथे दररोज आम्ही आपापली घोडखिंड लढवत असतो आणि इथे एक नाही घरातल्या प्रत्येक शिवाजी च्या विशाळगडावर पोहोचण्याची वाट पाहत असतो. तिथून फोन ची इशारत आली की आम्ही बाजींच्या लेकी निश्वास सोडतो पुन्हा संध्याकाळची घोडखिंड लढायला...

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

जब्बरदस्त पोटेंशिअल असणारा धागा...

वाचतो आहे..

फार छान लिहिलंय. पहिलं स्टेशन पनवेल की काय!

बोका-ए-आझम's picture

29 Aug 2016 - 5:56 pm | बोका-ए-आझम

कुठलंही असू शकतं. सगळ्याच लोकल गाड्यांचे पीक अवरचे प्रवास म्हणजे हाल आहेत. लेख उत्तम. अजून वाचायला आवडेल.

खारघर ला एक हिरकणी चढते, आणि फर्मान सोडते खारघर, नेरूळ, कोपर्रखैराने..

यावरून हो!
शिवाय रोज बसायला मिळतंय!

एस's picture

29 Aug 2016 - 5:00 pm | एस

बायकोला विचारून प्रतिसाद देतो.

सस्नेह's picture

29 Aug 2016 - 5:25 pm | सस्नेह

छान लिहिले आहे. आणखी लिहा.

जव्हेरगंज's picture

29 Aug 2016 - 6:18 pm | जव्हेरगंज

हेच म्हणतो . मस्त लिहीलंय!

कपिलमुनी's picture

29 Aug 2016 - 6:23 pm | कपिलमुनी

बाजीप्रभूच्या प्रतीक्षेत !
काही स्पेसीज ना स्वतःचा काम ग्लोरीफाय करायला आवडता .
त्यातला लेख आहे.

गणामास्तर's picture

29 Aug 2016 - 7:56 pm | गणामास्तर

काही स्पेसीज ना स्वतःचा काम ग्लोरीफाय करायला आवडता
एकदम बरोबर मुनिवर ! आता मोदींचच बघा की. .

संदीप डांगे's picture

29 Aug 2016 - 8:59 pm | संदीप डांगे

आणि काही स्पीसीज ना गुपचूप तंगड्या पसरुन आरडरी सोडायला आवडतं.. =))

पक्षी's picture

29 Aug 2016 - 6:36 pm | पक्षी

वाह, खुपच छान लिहिलं आहे...

अमितसांगली's picture

29 Aug 2016 - 8:46 pm | अमितसांगली

खुप छान......

अभिदेश's picture

29 Aug 2016 - 8:51 pm | अभिदेश

की 'बाजी' चित्रपटातल्या बाजीच्या मुली .... वाटलं बापरे बाजीचा पुढचा भाग येतीय की काय...हुश्श्य ... तास काही नाहीये..

साधा मुलगा's picture

29 Aug 2016 - 9:22 pm | साधा मुलगा

मला आवडत नाही म्हणून नाही तर ट्रेन मधला वेळ हा फक्त माझा असावा म्हणून. कारण सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो.

असा वेळ परत येताना जास्त चांगल्या पद्धतीने वापरता येतो. अर्थात घरी लवकर यायची घाई नसेल तर.
मी कित्येकदा असा एख्याद्या दादर लोकल मध्ये बसून मिपावरचे कित्येक लेख वाचले आहेत. दिवसभर काम करून संध्याकाळी एखादी अशी मोकळी लोकल पकडायची, पटकन जाऊन खिडकीची जागा पकडायची, मग चणे-शेंगदाणे किंवा भेळवाला येतो, आणि मग मस्तपैकी एखादा 'मोसाद'चा नवीन भाग वाचायचा, सुख म्हणजे वेगळे काय असतं!!
अवांतर : बोका भाऊ 'मोसाद' चा पुढील भाग कधी?

अभिजीत अवलिया's picture

30 Aug 2016 - 6:59 am | अभिजीत अवलिया

सकाळ संध्याकाळ घरच्यांचे करताना मला माझा असा वेळच नसतो.

-- कधी तरी ऑफिसला जायला म्हणून घरातून बाहेर पडा आणी ऑफिस मध्ये फोन करून 'आजारी आहे येऊ शकत नाही' असे सांगा. आणी तो दिवस तुम्हाला हवा तसा घालवा.

चंपाबाई's picture

30 Aug 2016 - 7:58 am | चंपाबाई

पनवेल ते दादर बसचा मार्ग सुंदर आहे.... ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो

ट्रेनपेक्षा बस प्रेफर करतो

मग नाव का बाई माणसांच घेतलं बुवा तुम्ही?

अखिल मिपा डु आय्डीचा उगम आणि वंशावळी निरिक्षण संघ

चंपाबाई's picture

30 Aug 2016 - 9:06 am | चंपाबाई

तुकाई , ज्ञानाई , हातिमताई या सगळ्या स्त्रीया होत्या का ?

पक्षी's picture

30 Aug 2016 - 3:46 pm | पक्षी

अगदी बरोबर चंपाबाई

बोका-ए-आझम's picture

30 Aug 2016 - 4:37 pm | बोका-ए-आझम

पाहा - माझे खाद्यजीवन - पु.ल.देशपांडे.
मुगभाटात एकेकाळी चंपाचे हाटेल होते. चंपा हे पुरूषाचे नाव आहे. इथल्यसारखी बटर बिस्किटे त्रिभुवनात मिळत नसावीत. हे बिस्किट चहाच्या कपात असे फुगून येत असे की हंटलेपामरने चंपाच्या पायाशी बसून ते शिकावे.
-(पुराव्याने शाबीत करणारा हरितात्या) बोका-ए-आझम.

नाखु's picture

31 Aug 2016 - 8:54 am | नाखु

इथे सुनो चंपा सुनो तारा हा प्रश्न नाहीच्च है मुळी, पुढे बाई का लावावे लागले त्याचा उल्गडा त्यांनी..

तुकाई = तुका-आई यांचा संयोग होऊन तुकाई

ज्ञानेश्वारांनाही माऊली असे संबोधले जातेच आणि वरील सर्व उदाहरणातील @@ई हा आई या अर्थछटा दाखवणारा आहे इअतकाच माझा बापड्याचा समज आहे.

बिरूटे सरांचा,आणि रंगाण्णांचा भाषेविषयक अभ्यास असल्याने त्यांनी निराकरण करावे हि विनंती..

(सध्या मिपावर शंकासमाधानाचे वारे वाहत आहे,तेव्हा संधीचा फाय्दा घेणे हा मिपा वाचकाचे कर्तव्य्च आहे)

मिपा वाचक नाखु

सिरुसेरि's picture

31 Aug 2016 - 10:05 pm | सिरुसेरि

पोटात चिकटा धरणारी बटर बिस्किटे आठवली .

नोकरदार स्त्रियांचे रोजचे जीवन दाखवणारा छान लेख .

अजया's picture

30 Aug 2016 - 4:37 pm | अजया

चंपाई=)))

चंपाई पनवेलीत असतात की काय! माझ्या माहितीत निघायच्यात हां!

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 6:17 pm | संदीप डांगे

व फोटो नाही बघितला का त्यांचा, अमिताभ बच्चन सोबत, चंपाबाई म्होटी हस्ती बाबा!

मुक्त's picture

31 Aug 2016 - 8:39 am | मुक्त

म्होटी हस्ती

द्विरुक्ती झाली.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 10:33 am | संदीप डांगे

=))

नाखु,

आमच्या ठाण्याच्या घरी शकू कोळीण यायची. ती 'मी आलो, मी जातो, आता बसलो होतो' वगैरे भाषा बोलायची. चंपाबाई तशीच दिसतेय.

आ.न.,
-गा.पै.

नीलमोहर's picture

30 Aug 2016 - 6:25 pm | नीलमोहर

छान लिहिलेय,
पुलेशु

पैसा's picture

30 Aug 2016 - 6:26 pm | पैसा

तुम्ही छान लिहिता आहात. जरा मोठा लेख येऊ दे.

निओ's picture

30 Aug 2016 - 10:40 pm | निओ

बाजीच्या लेकींना एक कडक सॅल्यूट !

रुपी's picture

31 Aug 2016 - 12:05 am | रुपी

छान लिहिले आहे.. बाकी प्रतिसादांशी सहमत.. अजून मोठे लेख येऊ द्या :)

म्हणजे पनवेल ठाणे फास्ट ट्रेन का?

निखिल निरगुडे's picture

5 Sep 2016 - 6:13 am | निखिल निरगुडे

बाजींच्या लेकींना मुजरा.... तुम्ही आहात म्हणून अनेक शिवाजी आहेत आणि स्वराज्य शाबूत आहे!