बैलांच्या जातीत

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
22 Aug 2016 - 9:07 am

वादळात सापडलेल्या गायी
भरकटल्या नि पोचल्या स्वर्गात
आळ घेतला गेला इंद्रावर
जीवानिशी गेला ना तो!

रानात उड्या मारत हुंदडणारी वासरे
पोचली पडोसी मुल्क में
मंग काय, झालं न बाप्पा युद्ध!
पडोसी मुल्क तबाह!

कासरे तोडून पळायचा
प्रयत्न करते काळी कपिला
वस्तीवरच्या वळूवर
जडलाय तिचा जीव!

जू फेकून पळून गेला चित्र्या
हिरवाईने भूल पडून
त्याला परत आणायचे
उच्चस्तरीय प्रयत्न सुरु आहेत!

बैलांच्या जातीत सध्या
काहीच नाही आलबेल.

- स्वामी संकेतानंद

कविता

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

22 Aug 2016 - 10:46 am | आदूबाळ

स्वामीजी, जबरदस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Aug 2016 - 11:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तय कविता. आवडली.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

22 Aug 2016 - 11:33 am | नाखु

मस्त स्वामीजी,

ऑल एम पिंक

व्यवस्थेचा चोळामोळा,सचिवांचा गोतावळा !
हुच्च्भ्रूंचा जमवा मेळा,ट्वीटरबाजी झिम्मड खेळा!!

मनपा नि वडनूक

पालिकेचा बैलपोळा ! फलकावर सारे(च) भोळा !
लोण्याचा दिसता गोळा !भाई-दादा गळा-गळा!

नितवाचक नाखु

ज्योति अळवणी's picture

2 Sep 2016 - 8:11 pm | ज्योति अळवणी

नाही आवडली