द स्टार्क स्टोरी-२

क्षमस्व's picture
क्षमस्व in जनातलं, मनातलं
16 Aug 2016 - 8:59 pm

"जाणं जरूरी आहे?"
"जावं लागेल."
"थांब."
त्याने आजूबाजूला बघितलं आणि हाक मारली.
कॅप्टन.....
शेजारच्या दगडावर कॅप्टन आराम करत बसला होता. प्रत्येक वेळी मीच असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता.
"शीपवर जा"
"मला ऑर्डर देऊ नकोस."
"मग ही माझी विनंती समज."
"डॉ. बॅनर मला विनंती करतांना बघून आज माझ्या जन्माचं सार्थक झालं..."
डॉ बॅनरने एक तुच्छ कटाक्ष कॅप्टनकडे टाकला!
"अरे तुझ्या नजरेने घायाळ केलं रे मला..." आणि बॅनरने हातातील ग्लास त्याच्याकडे मारून फेकला.
"राग येऊ देऊ नका डॉक्टर, तुम्हाला राग आला आणि मग 'तो' आला, नाही का?"
"मग प्रयत्न कर कि तो येऊ नये..."
अर्मोरा शिप...
रेबेल सेनेतील एक महत्वाची स्पेस शिप...
शेवटचा जेडी लूक स्कायवॉकरचा मृत्यू होऊन साठ वर्षे उलटली होती...
सुप्रीम लीडर स्नोकही मेला होता...
मात्र आता पूर्ण गॅलॅक्सीत एक नवीन शक्ती आकार घेत होती...
कमांडर रक...!!!!
*
पहिल्यांदा नाबूवर तीन पृथ्वीवासी उतरले होते...
डॉ बॅनर कॅप्टन अमेरिका आणि ब्लॅक विडोव आणि थोर!
पृथ्वीवरील अत्यन्त ताकदवान सुपरहिरो...
"हॅलो मी प्रिन्सेस लिया."
डॉ बॅनर पुढे होत तिच्याशी हॅन्डशेक करत म्हणाले,
"अवेंजर्स फ्रॅक्शन बी!"
"हो मात्र तुम्हीही पावरफुल आहातच."
"हो जर आमच्यापैकी एकाला राग आला तर तो पूर्ण ग्रह उध्वस्त करून दाखवू शकेन," कॅप्टन मधेच बोलला.
"मग त्या रागाची गरज लागेल."
"तुम्ही निश्चित असा, आम्ही आमचं सर्वात जास्त योगदान या मोहिमेत देऊ." थोर म्हणाला
**
"इथे सर्व जमलेल्या रेबेल सेनेचं मी अभिवादन करतो. मी गेली अनेक वर्षे या सेनेबरोबर आहे.किंबहुना मी मोठा काळ या सेनेबरोबर घालवलाय. अनेक पिढ्या बघितल्यात या सेनेत. क्वाई गोन, ओबी वॅन केनोबी आणि लूक स्कायवॉकरसुद्धा..."
लुकचं नाव घेताच लिया हळवी झाली
"रक एक अगम्य शक्ती... जेव्हा मला सुप्रीम लीडर स्नोकची डेड बॉडी सापडली तेव्हासुद्धा इतकी डार्क फोर्स मी अनुभवली नव्हती... थोडक्यात सांगायचं तर रक हाच डार्क फोर्स आहे....!"
बधिरता.....!!!
सुन्नपणा....!!!
स्नोकपेक्षा डार्क????
कसं शक्य आहे????
याचा अर्थ म्हणजे चांगल्या बाजूचं अस्तित्वच नाकारणं.....!!!
याचा सरळ अर्थ होता,
ग्लॅक्सीचा विनाश.....
विनाश आणि फक्त विनाश....!!!!!
***
"डॉ स्ट्रेंज,"
"येस."
"भीती माणसाला दुबळा बनवते."
"टोनी माझ्याकडे बघ... माझ्या डोळ्यात बघ..."
शून्य....
जागीच थिजलेले....
निर्जीव....
"भीती नावाची काही वस्तू जगात असेल तर ती मी बघितली आहे टोनी..."
भीती....
मूर्तिमंत भीती....
डॉ. ने टेबलाकडे इशारा केला.
लाल कापडात काहीतरी बांधलेलं होतं.
आणि चिट्ठी होती....
भीतीच्या जगात....
टोनीने चिठी चुरगळून फेकलीआणि लाल कापड उघडलं!
विजेचा झटका....
रक्त गोठलेलं....
डोळे थिजलेले...
आणि कानात जार्वीसचा आवाज!
"सर यू गॉट हायेस्ट डिग्री स्ट्राईक ऑफ अँक्सिएटी!"
काय होतं कापडात????
****
साठ वर्षांपूर्वी.....
"लूक, ओमॉ प्लॅनेटवर काही जिवंत हालचाली सुरू आहेत असं वाटतंय."
"अशक्य! त्या प्लॅनेटवर मिडी क्लोरियन्स अस्तित्वातच राहू शकत नाहीत."
"नाही लूक! तिथे वेगाने मिडी क्लोरियन्स वाढत आहेत"
"कसं शक्य आहे," लूक मनाशीच विचार करू लागला.
आर टू डी टूने लाल रंग बदलला.
नवीन संदेश!
लूकने संदेश बघितला.
आणि पुढच्याच क्षणी तो वेगाने बाहेर पडला.
मात्र लुकच्या चेहरा पूर्णपणे बदलला होता....
अशक्य ते शक्य झालं होतं....
एक जुना डार्थ परत आला होता....!!!!!
क्रमशः

द स्टार्क स्टोरी-१

कथा

प्रतिक्रिया

लालगरूड's picture

17 Aug 2016 - 12:34 am | लालगरूड

अरे वा मिसळ

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 2:40 am | क्षमस्व

मिसळपाववर माझीही मिसळ ;)

साधा मुलगा's picture

18 Aug 2016 - 11:19 am | साधा मुलगा

अव्हेंजर : इन्फिनिटी वॉर ची स्टोरी ?

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 2:16 pm | क्षमस्व

नाही
त्याच्या जवळपासही फिरकणार नाही कथानक।।।

जव्हेरगंज's picture

18 Aug 2016 - 9:15 pm | जव्हेरगंज

DEADPOOL?

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 11:19 pm | क्षमस्व

DEADPOOL?

जव्हेरगंज's picture

18 Aug 2016 - 11:25 pm | जव्हेरगंज

DEADPOOL नावाचे एक सदस्य याच शैलीत लिखाण करत. मला वाटलं तेच आहात तुम्ही.

बाकी कथा छान चालू आहे!

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 11:29 pm | क्षमस्व

धन्यवाद।
आणि बहुतेक त्यांचं लेखन वाचलं नसेल मी।
मात्र तुमचं लेखन वाचून रामदास यांची आठवण होते।
खाताच अतिविस्तृत आवाका आहे तुमच्या लेखनाचा।

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 11:32 pm | क्षमस्व

खाताच-खासाच