अंजली अंजली तूच माझी रागिणी

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जे न देखे रवी...
24 Sep 2008 - 9:49 pm

(अनुवादीत. कवी--मिश्रा)

अंजली अंजली पुष्पांजली
फुले देवून देतो ही पुष्पांजली
पायी तुझ्या ही स्वरांजली
गीतात गातो ही गीतांजली
प्रिय वाटे ही कवितांजली

प्रीतीने भरलेले तुझे भोळे मन
तुला पाहूनी सजणी धडके हे मन
जेव्हां मनी माझ्या वाजे प्रीतीची बांसुरी
तेव्हां स्वप्नी माझ्या खुलते एक चांदणी

जीवनाची बहार मिळे मला
प्रीतिचे शिखर मिळे मला
अंजली अंजली तूच माझी रागिणी
संगीतलहरीने डोले माझे मन
प्रीतिरागिणीने डोले माझे तन

भासे मला कशी जादू जाहली
दिसे मला गोड स्वप्ने मनी छपली
गोड गोड धुने सरगमची
धुंद धुंद लहरी सुरांची

प्रीतिच्या पुजनी सुरांच्या जीवनी
फुलानी भरलेली ही पुष्पांजली
लहरीची तुला नृत्यांजली
गीताने भरलेली ही गीतांजली
कवीना माझी ही कवितांजली

पाहिले तुला तेव्हां झालो तुझा
प्रीति कशी होईल तुजविणा
कविता कशी होईल तुजविणा
चंद्रमाच्या चांदणीसम तू सजणी
फुलांच्या फुलदाणीसम तू सजणी
अंजली अंजली तूच माझी रागिणी

श्रीकृष्ण सामंत

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 4:40 am | विसोबा खेचर

चांगली आहे कविता...!

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Sep 2008 - 6:15 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

अंजली अंजली पुष्पांजली
फूलों से देता हूं पुष्पांजली
कदमों में तेरे है स्वरांजली
गीतों में गाता हूं गीतांजली
चाहत यह तेरी है कवितांजली

मूळ गायकः एस् पी बालासुब्रमणियम्

(माहीतगार)बेसनलाडू

टग्या's picture

25 Sep 2008 - 5:07 am | टग्या (not verified)

...बहुधा तमिळमध्ये होते.

बेसनलाडू's picture

25 Sep 2008 - 5:11 am | बेसनलाडू

बहुतांश चांगल्या तमिळ चित्रपटांचे/गाण्यांचे हिंदीत होत असलेले पुनरुज्जीवन म्हणून हिंदी वर्जन लक्षात आहे.
आणि गाण्यात - हिंदी व तमिळ दोन्ही - मीनाक्षी शेषाद्री सोडून बाकीचे ठोंबे कोण हेही आठवत नाही :)
(मराठी)बेसनलाडू

टग्या's picture

25 Sep 2008 - 5:24 am | टग्या (not verified)

...पण ठोंबीच!

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Sep 2008 - 6:16 am | श्रीकृष्ण सामंत

माझं काम केलंत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 5:19 am | विसोबा खेचर

सामंतकाका,

आपलं आडनाव बदलून "गोळे" असं ठेवा! :)

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Sep 2008 - 8:32 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
अहो! श्री.गोळे कुठे? आणि मी कुठे?.त्यांच्या कविता मी वाचल्या.त्यांच्या अनुवादीत कवितेवर खूप टिका झालेली पण मला वाचायला मिळाली. त्यावर त्यानी ही खूप समर्थन केलेलं त्यांचं लेखनही मी वाचलं.आणि त्यांच्या समर्थनावर अनेक प्रतिक्रिया पण मला वाचायला मिळाल्या.
श्री.गोळे हल्ली मिसळपाववर लिहित नसावेत.कारण मी तरी त्यांचं लेखन पाहिलं नाही.
बिचारे गोळेकाका!
मिसळपावर लेखन स्वातंत्र्य आहे,टिका स्वातंत्र्य आहे ही एक जमेची बाजू आहे.आणि मला लिहायला त्याबद्दल अभिमान वाटतो.
आता १०० वाचना मधे १/२ त्याच त्याच वाचकाना प्रक्रिया द्दावीशी वाटते हे समजण्या सारखं आहे.नव्हे तर ती लेखन आणि टिका ह्या प्रक्रियेची निरोगी बाब आहे.
मी कविता वाचत असतो.एखाद्दा कवितेचा अनुवाद करायला मला "हुक्की" येते.आणि तसं मी करतो.
आणि माझ्या वाचकांचा टिकापात्र होतो.
पण मी काही गोळेकाकांसारखं इथे लिहायचं बंद करणार नाही.अर्थात "जनरल डायरची" कृपादृष्टी असायला हवी.एव्हडंच.
कविता लिहिणार्‍यालाच दुसर्‍याच्या कवितेवर टिका करायला हक्क आहे असं मुळीच नाही.उलट कविता वाचकाला पण तेव्हडाच अधिकार असावा अशी माझी समजूत आहे.नव्हे तर तो त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे असं मला वाटतं.
"आधी केले,मग सांगतले" हे कवितेच्या बाबतीत खरं नाही असं मला वाटतं.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 9:02 am | विसोबा खेचर

आणि मला लिहायला त्याबद्दल अभिमान वाटतो.

धन्यवाद सामंतसाहेब,

पण मी काही गोळेकाकांसारखं इथे लिहायचं बंद करणार नाही.अर्थात "जनरल डायरची" कृपादृष्टी असायला हवी.

जनरल डायरची कृपादृष्टी नक्कीच आहे आणि राहील! मिपावर जळणारे कोण आणि प्रेम करणारे कोण, हे जनरल डायर बरोब्बर जाणतो! :)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व. गरज वाटल्यास पुढील चर्चा एकमेकांच्या खरडवह्यात करू..

तात्या.