बारा-तेरा वर्षांची ती..

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
24 Sep 2008 - 6:58 pm

बारा-तेरा वर्षांची ती..
============================

लयदार वळणाची, उफाड्या देहाची
यौवनानं मुसमुसलेली
तारुण्यानं सळसळणारी
बारा-तेरा वर्षांची ती..

बाल्य आणि तारुण्यामधल्या
अवघड झुल्यात हेंदकळत
पाय पोटाशीधरून बसलेली
अवखळ, निरागस भावली..!

हस म्हटलं की हसायची
नाच म्हटलं की नाचायची..
खुलवलं की फुलायची
चिडवलं की रुसायची..

नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी
हसता-बोलता मध्येच थांबायची
मोजून मापून वागणारी ती
जरा प्रौढाचं वाटायची..!

तिच्यावर रोखलेल्या नजरांची
अगोचारी भोसकता झेलत
टस्स का मस्स न होता
मुर्दाडासारखी ढिम्म राहायची..

इथे कधी कशी आलीस विचारताच
चरचरत मुकीच व्हायची..जणू
चामडी रोज सोलली जाते
जीव सोलू नका! असच म्हणायची..

दुखऱ्या नजरेनं गळतागळता
दोन मोकळे श्वास मागायची..
मदत देऊ करणारी नजर मात्र
तिला तेवढंच नाकारायची.

============================
स्वाती फडणीस........................... २३-०९-२००८

कविताअनुभव

प्रतिक्रिया

मनीषा's picture

24 Sep 2008 - 7:14 pm | मनीषा

वेगळी ... आणि छान आहे !

धनंजय's picture

24 Sep 2008 - 8:59 pm | धनंजय

कविता आवडली.

एक शंका : दुसर्‍या कडव्यातला "भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली) आणि आवडली=भावली यांच्यावर श्लेष आहे का?

स्वाती फडणीस's picture

24 Sep 2008 - 10:23 pm | स्वाती फडणीस

"भावली" शब्द - बाहुली (सामान्य उच्चारात भावली)
भावली=आवडली..म्हणू का?(तस मुद्दऊन लिहिलेल नाहीये) पण गेली १२ वर्ष लक्षात मात्र राहिलीये.

संदीप चित्रे's picture

25 Sep 2008 - 2:01 am | संदीप चित्रे

इथे कधी कशी आलीस विचारताच
चरचरत मुकीच व्हायची..जणू
चामडी रोज सोलली जाते
जीव सोलू नका! असच म्हणायची..

दुखऱ्या नजरेनं गळतागळता
दोन मोकळे श्वास मागायची..
मदत देऊ करणारी नजर मात्र
तिला तेवढंच नाकारायची.

स्वाती फडणीस's picture

25 Sep 2008 - 9:33 am | स्वाती फडणीस

:)

ऋषिकेश's picture

25 Sep 2008 - 9:35 am | ऋषिकेश

सुंदर!

लयदार वळणाची, उफाड्या देहाची
यौवनानं मुसमुसलेली
तारुण्यानं सळसळणारी

हे वाचल्यानंतर
बारा-तेरा वर्षांची ती..
अंगावर काटा आणतं

नजरेत दुखरी ,शब्दात बोचरी किंवा जीव नका सोलु म्हणणारी कविता अतिशय "भावली"

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती फडणीस's picture

25 Sep 2008 - 11:41 am | स्वाती फडणीस

:)

सुनील's picture

25 Sep 2008 - 1:20 pm | सुनील

अत्यंत दाहक आणि वास्तववादी कविता -

तिच्यावर रोखलेल्या नजरांची
अगोचारी भोसकता झेलत
टस्स का मस्स न होता
मुर्दाडासारखी ढिम्म राहायची..
अगदी बारा नव्हे पण तेरा-चौदा वर्षांच्या मुलींवर रोखल्या गेलेल्या अशा वखवखत्या नजरा पाहिल्या आहेत...

इथे कधी कशी आलीस विचारताच
चरचरत मुकीच व्हायची..जणू
चामडी रोज सोलली जाते
जीव सोलू नका! असच म्हणायची..
हंम्म.. हे विचारायचा अगोचरपणादेखिल करतात काही लोक...

मदत देऊ करणारी नजर मात्र
तिला तेवढंच नाकारायची.

अपवादानेच नियम सिद्ध होतो म्हणतात...

असो, तुमची ही कविता कुठच्या कुठे भरकटत घेऊन गेली...

(निशब्द) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मुक्तसुनीत's picture

25 Sep 2008 - 11:11 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. दु:खाचा चरचरता आलेख.

स्वाती फडणीस's picture

25 Sep 2008 - 3:11 pm | स्वाती फडणीस

:)

चतुरंग's picture

25 Sep 2008 - 7:45 pm | चतुरंग

अस्वस्थ करुन गेली!

चतुरंग

स्वाती फडणीस's picture

26 Sep 2008 - 10:00 am | स्वाती फडणीस

:)

स्वाती फडणीस's picture

26 Sep 2008 - 10:00 am | स्वाती फडणीस

:)