रातकिड्यांची किरकिर ,पानांची सळसळ ,बेडकांचे रोमांटिक ड्रांव ड्रांव,दुरून गाजही येतेय कानी , तो मुसळधार बरसून शांत झाल्यावर ही काळी रात्र...विजेचा लपंडाव माझ्या खिजगणतीत नाही...दुपारी झोपल की रात्र जागते.विषयासक्ती कमी झाल्यावर रात्री रिकाम्या भासतात .आधी जागायचो F टीव्ही पहायला.विषय संपला ...पुढे काय?
आता उरत काय ? रिपीटेशन....
खाणं,पिणं,हगण,मुतण,मेैथून ....बस ....
कसल आकर्षण वाटेल तर ती शक्यता नाही...अजुनही किरकिरतोय तो...काय मिळत असेल रातकिड्यांना किरकिर करून ?? मादी???
शरिरधर्मा नंतरची पहीली प्रेरणा ही मादी गटवणे ...सुसुत्र विचार करणारे एकसंध ,समाजमान्य लिहू ,बोलू शकतात.विचारांची साखळी जोडत सुसह्य लिहण कृत्रिम म्हणाव की नैसर्गिक....हाच माझा वांदा आहे..विचारांची अबोर्शन होतात माझ्याकडून....विचार कुठून येतात? का येतात? विचारांच खोदकाम सुरू केल की साखळी तुटू लागते.क्षण न क्षण अलग होतो आणि असंबद्ध अस बाहेर येत...वर्णनं अनेकांनी करून ठेवली आहेत..भूमिका ,विचारसरण्या अनेक आहेत.त्यांचे फाँलैअर्स अनेक आहेत.या सगळ्यांनी मिळून हे जग बनलय.यात मी कुठे आहे? कुठल्याही प्रवाहात मी नाही. मी दारू पित नाही म्हणून गटारीला कुणी बोलवत नाही.माझी गँग नाही.रातकिड्यांची सेटिंग अजून झाली नाही...माझी 12 वर्षे नाही झाली....किरकिरून सुद्धा ....या जगाचे नियम आहेत. कमेंटमधे टिंब टाकून लाईक वाढविण्यासाठी पोस्ट वरती आणावी लागते ...माणस वाचायचा वैताग आला ...रातकिडेच सारे.... मलापण फेमस व्हायचय ..ज्ञानपीठ वगैरे मिळाव अस सगळ्या लेखकांना वाटत पण कुणी बोलत नाही...सध्या नम्रतेची फ्याशन आहे...विद्या विनयेन शोभते वगैरे...एवढी लोकसंख्या असताना मी का जन्मलो??? विचारचक्र फिरण म्हणजे भिकेचे धंदे आहेत...चक्र फिरत राहत ...डोक्यात एकेक क्षण सुटा होतो ...असो....
प्रतिक्रिया
2 Aug 2016 - 12:11 am | अभ्या..
च्यायला, डोसक्याची मंडईच की.
2 Aug 2016 - 12:15 am | फुंटी
तुमच डोक म्हणजे २१ व्या माळ्यावरचा सी फेसिंग फ्लॅट आहे असं म्हणताय का
3 Aug 2016 - 5:46 pm | अभ्या..
बहुतेक असावा.
जौदेकी. झाली ना मंडई आता. :(
2 Aug 2016 - 5:35 pm | ज्योति अळवणी
नाही आवडल
2 Aug 2016 - 10:29 pm | फुंटी
धन्यवाद
2 Aug 2016 - 8:43 pm | जव्हेरगंज
च्यामारी..
2 Aug 2016 - 11:14 pm | नीलमोहर
आता आहे हे असं आहे,
काय करता
2 Aug 2016 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
असा झाला तर प्रकार तो सगळा!
4 Aug 2016 - 4:07 pm | नाखु
नाही तर इथे गुंत्ता आणलाय सोडा(व्)यला !!!!
7 Aug 2016 - 11:23 pm | ज्योति अळवणी
इतका गोंधळ का बर तुमच्या मनात, मेंदूत आणि ................ एकूणच!
7 Aug 2016 - 11:39 pm | फुंटी
मनात ,मेंदूत गोंधळ आहे म्हणता?? :-) असो बरं ..........म्हणजे??
7 Aug 2016 - 11:31 pm | लालगरूड
हे गद्य प्रमाणे वाचा.छान आहे