झाकलेले सत्य

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
24 Jul 2016 - 10:26 pm

निर्दयी रुपे दिसती निर्दोष वासरेे
सत्य सारे झाकलेले सारेच भास रे
पाप सारे झाकुनी दर्शनी साधुच सारे
झाकल्या चेहर्यावरती मुखवटे हासरे ।।

गोर्या वस्ञांमागे काळीच कारस्थाने
शेंदुर थापुनी देती धोकेच प्रामुख्याने
सार्यांचा विश्वास आंधळा,
                 आंधळीच भक्ती
येथेच विस्तारते क्रुर अंधकार शक्ती ।।

श्रद्धा असावी परी अंधश्रद्धा नसावी
परमेश्वराची वस्ती माणसात असावी
माणसाला माणुसकी हिच जात दिसावी
चांडाळ ढोंगीपणाला कधी न फसावी..।।

तेहत्तिस कोटी देव रुपे असे या भुवरी
तरी खोट्या मुर्खांची का जादु सर्वांवरी
सोडा तो अट्टाहास, विसरा भोळेपणा
आणि
अंधश्रद्धा नष्ट करण्याची शपत घ्या उरी...।।

कविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

24 Jul 2016 - 11:05 pm | चांदणे संदीप

पहिले कडवे लैच्च भारी!

Sandy

माहीराज's picture

28 Jul 2016 - 11:53 pm | माहीराज

धन्यवाद

राधी's picture

29 Jul 2016 - 12:12 am | राधी

सुरूवातीचे कडवे आवडले