तृप्ती

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
23 Jul 2016 - 12:30 am

कंच हिरव्या ओल्या गाली
मधुमती फुलांचा बहर फुलवि
मोहक धरती आर्जवि हसती
घननिळा बरस..मी एक प्यासी

क्षितिजावर मग तो ही झुकला
शामल देहि कवळुनि तिजला
चुंबुन म्हणे त्या गौरीला
तुज ओटी माझा अंकुर रुजला

नव यौवना ती धरा बहरली
अंग अंग कांतिही भरली
पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी 
नव जन्माने तृप्त जाहली

कविता माझीसंस्कृती

प्रतिक्रिया

रविकिरण मंडळाची आठवण आली.

आदूबाळ's picture

23 Jul 2016 - 11:21 am | आदूबाळ

+१

अगदी. मध्येच एखादा उर्दू / फारसी शब्द घालणे वगैरे तर एकदम फिट्ट. कविता आवडली.

नाखु's picture

23 Jul 2016 - 9:00 am | नाखु

पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी

ही कल्पना फार फार आवडली

खेडूत's picture

23 Jul 2016 - 9:00 am | खेडूत

छान झालीय कविता..!

जव्हेरगंज's picture

23 Jul 2016 - 9:02 am | जव्हेरगंज

sunder

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2016 - 9:04 am | अत्रुप्त आत्मा

का बात! बहुतै खुबै रचायी है जी ये कविता!