भारतरत्न सचिन....

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
20 Jul 2016 - 4:14 pm

मी लिहिणार नव्हतोच खरतरं....हा माझा विषयसुद्धा नाही पण तरीही लिहितोय..मी एक टिपिकल मध्यमवर्गिय घरातुन वाढलेला मुलगा...'लोक काय म्हणतील' या अमुल्य संस्काराबरोबर अजुन एक संस्कार 'आपल्याला काय करायच आहे? त्याचे तो बघेल ना...' हा सुद्धा पिढिजातपणे मला देण्यात आला. आता ही दोन्ही रत्न आमच्यात आली नाहीत हे दुर्दैवच (कुणाचं हे विचारु नये...)! पण वरील दोन्ही गोष्टींना काही ना काही मर्यादा आहेत याला कुणाचे दुमत नसावे. हे ही प्रकरण असच.. पाणी छातीपर्यंत आलं, आम्ही ढम्म....गळ्यापर्यंत आलं तरीही आम्ही ढम्म...आता नाकातोंडात जाइल अशी वेळ ठेपली आता मात्र व्यक्त झालचं पाहिजे...बास्स झालं आता...भावना उफाळल्या नि मी लिहिता झालो...!!
काल अगदी नेहमीसारखच मी कार्यालायातुन आंतरजालावरुन बातम्या वाचत होतो...(मला कार्यालयात काही काम नसतं हे मान्य आहे, उगाच प्रश्न उपस्थित करु नयेत..) चाळता चाळता एक बातमी नजरेसमोर आली...
पर्रिकरांनी सचिनला फटकारलं...
फटकारलं??? काय प्रकार असेल बाबा हा? उगाच आपली उत्सुकता.....पान उघडल्यावर सगळा प्रकार समोर आला..
तर आदरणीय सचिन तेंडुलकर साहेब यांचा एक जिवश्च-कंठश्च मित्र श्री. संजय नारंग यांनी कुठेतरी लश्कराच्या जागेवर आपला रेसॉर्ट बांधला. त्याला परवाणगी होतीच पण एका मर्यादेपर्यंतच... तरीही साहेबांनी त्याजागी मोठाले इमले उभे केले..मग काय लागलं लष्कर मागं. बहुदा या मित्रवर्यांच्या लक्षात आलं, अरेच्च्या आपला मित्र तर भारतरत्न आहे..तो कहीतरी करु शकेल...भारतरत्न आहे ना सरकार ऐकेल की त्याचं...मग हे साहेब गेले भारतरत्नांकडे आणि ते गेले पर्रिकर साहेबांकडे....पर्रिकर साहेब मोठा माणुस(कसले मोठे ते ज्यानं त्यानं ठरवाव) .... त्यानीं साहेबांच ऐकुन घेतलं नि निक्षुण सांगितल मी हस्तक्षेप करणार नाही...मनात म्हटलं असा प्रकार आहे होय....सगळा प्रकार कळाला नि संताप येउ लागला..
संताप कोणाचा? आपण भारतरत्न आहोत हे विसरुन एका मित्राच्या अनैतिक कामासाठी थेट सरकारपर्यंत जाणार्‍या सचिनचा, फक्त आणि फक्त खेळाडु म्हणुन असलेल्या लोकप्रियतेच्या निकषवरुन त्याला भारतरत्न देणार्‍याचा कि एवढ सगळं निमुटपणे सहन करणार्‍या तुमच्या-माझ्यासारख्यांचा??
प्रकरण साधं नेहमिच आहे निदान आपल्या देशात तरी पण विचार करण्यासारखा नक्की आहे..

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

मितभाषी's picture

22 Jul 2016 - 7:48 pm | मितभाषी

पत्ता चुकला कायनू

हकु's picture

23 Jul 2016 - 8:05 am | हकु

मागे एकदा भारतरत्न लताबाईंनीही 'आमच्या खिडकीसमोर येतो म्हणून उड्डाणपूल बनवू नका' असा काहीसा शब्द टाकला होता म्हणे सरकारकडे . त्याची आठवण झाली.