॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
17 Jul 2016 - 8:18 pm

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

                                   - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

अभंगअभय-काव्यअभय-लेखनवाङ्मयशेतीकविता

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Jul 2016 - 2:30 pm | चांदणे संदीप

पण मूळ अभंगप्रकाराची पाऊलवाट सोडून हे काव्य आधुनिक काव्यरस्त्यावर चालू लागल्यासारखे वाटते!

जित्रुप = जित्राब??

बाकी देवाऐवजी सर्व अभंगात तुकारामांना केंद्रात बसवलय ते खूपच आवडल्या गेले आहे!

Sandy