इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in भटकंती
2 Jul 2016 - 6:27 pm

पहिल्या भागात डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोवची माहिती दिली होती.
त्याची लिंक इथे -
इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव

ह्या भागाची सुरवात एका फोटोने.

ह्या वर्तुळाकार पद्धतीने ठेवलेल्या घोड्याच्या नालेसारखी रचना असलेल्या दगडांच्या ठिकाणाचे नाव आहे 'स्टोनहेंज' आणि ते आहे इंग्लंडच्या 'Wiltshire' इथे. ह्याची गणना 'वन ऑफ द सेव्हन वंडर्स ऑफ मेडिएवल वर्ल्ड' मध्ये होते. हे prehistoric monument आहे. Archaeologists च्या म्हणण्यानुसार व कार्बन डेटिंग नुसार प्राप्त माहिती प्रमाणे हे ठिकाण ख्रिस्तपूर्व 3000 ते ख्रिस्तपूर्व 2000 दरम्यान बांधले गेले असावे. म्हणजे आधुनिक माणसाच्या खुणा दिसायच्या अगोदरपासून. ही जागा नक्की काय असावी आणि कशी उभारली असावी ह्या बद्दल बरेच तर्क वितर्क आहेत. कारण हे दगड इतके मोठे आहेत की ते त्या काळातल्या माणसाला तिथे घेऊन जाणे (त्या वेळी चाकाचा शोध लागला न्हवता) आणी असे उभे करणे, एकमेकांवर ठेवणे कसे शक्य झाले असेल हे एक कोडेच आहे. काहींच्या मते ही जागा म्हणजे मृत लोकांना पुरण्याची जागा होती. कारण ह्या जागेच्या आजूबाजूला केलेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व 3000 काळातील माणसाच्या हाडाचे अवशेष सापडले होते. युनेस्कोने ह्या जागेला 1986 मध्ये वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा दिला.
स्वतःची गाडी नसल्यानी आम्ही एका टूर कंपनी बरोबर जायचे ठरवले. ती टूर कंपनी सॅलिसबरी वरून स्टोनहेंजला घेऊन जाणार आणि परत सॅलिसबरीला आणून सोडणार असा प्लॅन होता. इंग्लंड मध्ये वेगवेगळ्या रूट वर वेगवेगळ्या खाजगी कंपन्या रेल्वे सेवा देतात. मग आम्ही पूल वरून Southampton ला साऊथ वेस्ट ट्रेन ने गेलो. तिथे गाडी बदलली आणि तिथून सॅलिसबरी स्टेशनला ग्रेट वेस्टर्न रेल्वेने गेलो. हा जवळपास दीड तासाचा प्रवास आहे. टूर ऑपरेटरची गाडी स्टेशनच्या बाहेर उभीच होती. सॅलिसबरी वरून अंदाजे 20 ते 25 मिनिटे लागली बस ने तिथे जायला. बसने एका रिसेप्शन सेंटरला सोडले. तिथे स्टोनहेंजचे तिकिट घ्यावे लागते. आम्ही टूर वाल्याकडून आलेलो असल्याने त्याने अगोदरच तिकिटाची सोय केलेली होती. ते तिकिट घेऊन एका दुसर्या बस मध्ये बसलो आणि त्या गाडीने स्टोनहेंज जवळ नेऊन सोडले.
लोकांनी जवळ जाऊन नासधूस करू नये म्हणून स्टोनहेंजच्या बाजूने दोरी लावून आत जायला मनाई केलेली आहे. पण वर्षातील एक दिवस असा असतो जेव्हा तुम्हाला ह्या वास्तूला हात लावायची परवानगी असते. तो म्हणजे 21 जून; उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.
बऱ्यापैकी गर्दी असल्याने जास्त फोटो काढता आले नाहीत. कारण प्रत्येक वेळी फोटो काढतां कुणीतरी आडवे यायचेच. तरी पण जमतील तसे काढलेले अजून काही फोटो खाली देत आहे.

तिथे जवळपास दीड तास थांबून परत यायला निघालो. वाटेत 'ओल्ड सेरम' नावाच्या एक जागी २ तासा साठी सोडले बसने.
ओल्ड सेरमची रचना एखाद्या पडक्या किल्यासारखी आहे. आपल्याकडे एक सो एक किल्ले असल्याने एवढे काही विशेष वाटले नाही ओल्ड सेरमचे. (पण मुख्य फरक हा होता की आपल्या इकडे असते तसे कुणीही भिंतीवर प्रियकर प्रेयसीचे नाव खडूने लिहिले न्हवते किंवा आजूबाजूला कचरा केला न्हवता.) स्वतः:चा भूतकाळ जतन करण्याबाबत असलेली काळजी कौतुकास्पद.

मग शेवटी बसने सॅलिसबरी स्टेशनला सोडले. सॅलिसबरी मध्ये एक कॅथेड्रल आहे.इंग्लंड मधील अन्य शहरांप्रमाणेच हे अतिशय सुंदर शहर आहे. तिथे थोडा वेळ फिरून परतीची ट्रेन पकडली.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

3 Jul 2016 - 12:13 am | प्रचेतस

भारी फोटो.
माझ्या मते स्टोन हेंज मृत व्यक्तींना पुरण्याचीच जागा असावी. प्रागैतिहासिक काळात अशी शिळावर्तुळं जगात ठिकठिकाणी आढळतात. अगदी खुद्द पुणे जिल्ह्यातही २/३ ठिकाणी मी शिळावर्तुळं पाहिलेली आहेत. डेक्कन कॉलेजमध्ये तर उत्खनन केलेले शिळावर्तुळ जसेच्या तसे जतन केलेले आहे.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

3 Jul 2016 - 1:44 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

छान, प्रचि आणि वृत्तांत.पुभाप्र