वस्त्रोद्योग : २.१ - सूतापासून कापडापर्यंत

प्रदीप साळुंखे's picture
प्रदीप साळुंखे in तंत्रजगत
19 Jun 2016 - 2:43 pm

वस्त्रोद्योग : १ - कापसापासून सूतापर्यंत

नमस्कार,

मागच्या भागात आपण कापसापासून सूत कसे तयार होते ते पाहिले.आता या भागात आपण त्या सुतापासून कापड कसे तयार होते ते पाहूया.
तर सूतापासून कापड विणण्यासाठी जी मशीन वापरली जाते त्याला मराठीमध्ये 'माग' असे म्हणतात,आणि इंग्लिशमध्ये loom.
पण त्याआधी काही कंसेप्ट क्लिअर होणे गरजेचे आहे,
आपण जर साधा शर्ट पीस घेतला किंवा धोतीचे विणकाम स्ट्रक्चर जर हाय ग्लास/पिक ग्लास(एक प्रकारची दुर्बीण) घेवून पाहिले तर धाग्यांची रचना खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे आढळेल.
^
इथे धाग्यांचे दोन सेट्स दिसत आहेत आणि ते एकमेकांतून वर-खाली(जाळी पद्धत) अशा पद्धतीने विणलेले आहेत, या रचनेला 'plain weave' असे म्हणतात.सर्वसाधारण कापड याच weave ने तयार होत असते.

आता इथे कापडातील उभ्या धाग्यांना "warp" असे म्हणतात व जे आडवे धागे त्यातून वर-खाली(वन अप-वन डाऊन) plain weave पद्धतीने विणले जातात त्याला "weft" असे म्हणतात.हे समजण्यासाठी खालील चित्र पहा.
^

आता मुख्य प्रक्रिया पाहूया-

मागच्या स्पिनिंग प्रोसेसमध्ये तयार झालेल्या सूताच्या गुंडाळ्या ज्या असतात त्या इथे 'weft' म्हणून वापरल्या जातात, weft ला आपण 'विणणारा धागा' असे म्हणूया.
आणि उभे धागे म्हणजे ' warp' हे मशिनच्या मागून आलेले असतात त्यासाठी मागे मोठे beams असतात.त्याला 'मोठी सूताची गुंडाळी' असे म्हणूया,
/
आता हे beams कसे तयार होतात?

तर beams तयार करण्याच्या पद्धतीला 'warping' असे म्हणतात, सर्वसाधारण किती धाग्यांचे beam तयार करायचे आहे ते ठरवून तितक्याच सूताच्या गुंडाळ्या(cone) वापरल्या जातात आणि ते सर्व सूत मोठ्या beam वर गुंडाळले जाते.ही झाली 'warping process'.
^
वरील प्रोसेस झाल्यावर आणखी एक प्रक्रिया करणे गरजेचे आहे, ते म्हणजे सायझिंग(sizing)
सायझिंगमध्ये हे सगळे warping beam वरचे धागे size paste (एक प्रकारची चिकट खळ) मधून पास केले जातात.ते अशासाठी कि धाग्याला मजबूतपणा प्राप्त व्हावा.त्यामुळे धाग्यांची strength वाढते तसेच hairyness कमी होतो, धाग्याच्या elasticity,rigidity या properties मध्ये सुधारणा होते.सायझिंग प्रक्रिया समजून घेण्यासाठी खालील चित्र पहा,
/
लाल रंग म्हणजे warp चे धागे असे गृहित धरा ते sqeezing roller वरून पास होतात,आणि पेस्टमध्ये बुडून वर येतात,पुढे ते वाळण्यासाठी drying rolls असतात जे कि गरम असतात.
आता हे सायझिंग झालेले धाग्यांचे beam मागाच्या(loom) मागे जोडले जाते.खालील आकृतीवरून ते आपल्यास कळेल,
^
1-beam (सूताची मोठी गुंडाळी)
2-warp चे धागे
5-sley (सलई)
7-shuttle(धावता धोटा)
11-कापडाची गुंडाळी
एवढी माहिती पुरेशी आहे.

आता आपण old model पासून ते latest आधुनिक मशीन्स आणि त्यातून कापड कसे बनते ते पाहूयात.

१)Hand Loom/हात माग -
^
हा एक जुन्या काळातला loom आहे,सद्या कालबाह्य असला तरी काही ठिकाणी वापरात आहे.हे यंत्र चालवण्यासाठी हाता-पायांचा वापर करावा लागतो आणी मग त्यातूनच कापड विणले जाते, यासाठी विजेची गरज नाही.
आडवा धागा(weft) विणण्यासाठी 'धावता धोटा'(shuttle) वापरला जातो,त्यामध्ये सुताची छोटी गुंडाळी बसवलेली असते त्याला pirn असे म्हणतात.खालील चित्र पाहिल्यास आपल्या लक्षात येईल.
/
सुताच्या छोट्या गुंडाळ्या बनवण्यासाठी 'pirn winding machine' असते

इथे warp च्या धाग्यांचे जे कि beam वरून आलेले असतात त्याचे दोन सेट्स मध्ये विभाजन होते त्याला 'shedding' असे म्हणतात,व त्यामधून weft चा धागा पास केला जातो आणि
त्या warp सेट्समधील वरचा सेट खाली जातो आणि खालचा सेट वर येतो जेणेकरून मधून पास झालेला आडवा धागा दोहोंच्या मध्ये चिंबावा.
समजण्यासाठी खालील चित्र पाहा.
^
●shedding होण्यासाठी यंत्रामध्ये स्वतंत्र मॅकॅनिझम असते.
●Picking-आडव्या धाग्याला weft म्हणतात तसचं त्याचं दुसरं नाव म्हणजे 'pick'.
कारण त्या धाग्यामुळेच कापड विणलं जातं, या छोट्याश्या प्रोसेसला picking म्हणतात
●Beat Up - आता beat up म्हणजे विणलेले कापड पुढे सरकण्यासाठी असलेली यंत्रणा.जेणेकरून पुढचे नवीन धागे shedding मध्ये insert व्हावेत.
पुढे सरकलेले कापड खाली एका राॅडला गुंडाळले जाते.

या loom वर धोती/सोवळे,उपरणे, आणि साडी विणता येते.
कलरफुल कापड विणण्यासाठी कलरफुल धागे वापरतात.

२) Power Loom/यंत्रमाग
^
हा माग चालवण्यासाठी स्वतंत्र मोटर वापरली जाते आणि साहजिकच विद्युत प्रवाहाची आवश्यकता भासते.याची efficiency अर्थातच हातमागापेक्षा कैक पटीने जास्त आहे.
इथेही धावत्या धोट्याचाच वापर weft insertion साठी होतो.weft beat up होण्यासाठी एक लाकडी राॅड असतो त्याला सलई असे म्हणतात ती सलई मोटरच्या ड्राईवमुळे वेगाने मागे-पुढे होते आणि कापड विणले जाते. इथेही shedding,pick up,beat up हे सर्व होतेच,
पाॅवरलूम वर सुद्धा काॅटन धोती,साडी,पाॅपलिनचे कापड,कँब्रिक तसेच पाॅलिस्टरचे कापड सुद्धा बनवले जाते.
कापडाच्या किनारला असणारी जी नक्षी असते त्यासाठी मशिनवर स्वतंत्र असे dobby mechanism असते.तो प्रकार किचकट आहे

^

क्रमशः
(टायपिंग फास्ट नाहीये,त्यामुळे हात आवरता घेतला आहे,भाग लहान झाला असेल तर क्षमस्व)

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

19 Jun 2016 - 4:07 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

भारीये,
जीन्स वगैरे कसे बनतात ते पण लिहा

अभ्या..'s picture

19 Jun 2016 - 4:15 pm | अभ्या..

मस्तच धागा (सूताचा) साळुंखेसाहेब.
आता शटल, वार्प वगैरे ओळखीचे शब्द दिसायलेत, फोटो पण ओळखीचे वाटताहेत.
मस्त मस्त. येउ द्या. पंचकार्ड, जेकार्ड वगैरे अगदी डिट्टेलमधे येउ द्या.

प्रदीप साळुंखे's picture

19 Jun 2016 - 4:27 pm | प्रदीप साळुंखे

पंचकार्ड, जेकार्ड वगैरे अगदी डिट्टेलमधे येउ द्या.

अहो तुम्हाला तर याची माहिती आहे असं वाटतयं,तुम्ही पण याच क्षेत्रात आहात का?

अभ्या..'s picture

19 Jun 2016 - 4:37 pm | अभ्या..

नाही ओ साळूंखे साहेब. मी सोलापूरचा. मूळ गाव बार्शी. दोन्हीकडे सूत मिल. बार्शीचे सूतगिरणीविश्व उध्वस्त झाले. सोलापूरचे टिकून आहे चादरी आणि हँडलूममुळे थोडेफार. सो.. माहीत असतेच. थोडेसे टेक्स्टाइल डिझायनिंगचे पण काम केलेय हौसेखातर.

इचलकरंजीला जाउन आल्यासारखं वाटतंय....
चित्रांच्यामुळे नीट समजलं. अनेक धन्यवाद...

शटललेस बद्दल पण लिहिणार ना साहेब?

पुभाप्र...

साधा मुलगा's picture

19 Jun 2016 - 7:14 pm | साधा मुलगा

छान माहिती मिळते आहे, असेच चालुद्या!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

यापुढे धाग्यांच्या मालिकेला सुत म्हणावे का ? =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2016 - 8:45 am | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण मालिका !

पाचवी ते सातवी सूतकताई (कापसापासून सूत तयार करणे आणि त्याचे हातमागावर कापड विणणे) हा एक विषय होता. त्यामुळे आतापर्यंत बर्‍याच जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आहे.

बाबा योगिराज's picture

20 Jun 2016 - 8:57 am | बाबा योगिराज

पॉपलीन,कँब्रिक, पाॅलिस्टरचे कापड.
हा आमच्या रोजच्या वापरातला प्रकार. बोला कुठे भेटताय. कपड्याच्या ह्या प्रकारा बाबत अजून माहिती घ्यायला आवडेल.

नाखु's picture

20 Jun 2016 - 9:59 am | नाखु

धागा विणणे...

बाकीचे धागा की @@@@ टाकतात. (सुश्रीश्रीके,निसो,मंका,सुदो आदी "डायरी प्रधान") लेखकांनी तरी याचा नक्की अभ्यास करावा.

अखिल मिपा वाचक वाचला तर वाचाल चळवळीच्या "इतरांचे जरा वाचत जा" या खफ भित्ती पत्रकातून साभार.

पोष्टर लावलेला बॉय नाखु

नीलमोहर's picture

20 Jun 2016 - 11:04 am | नीलमोहर

ह्याला म्हणतात धागा विणणे...

सस्नेह's picture

20 Jun 2016 - 11:09 am | सस्नेह

वाचतेय...

छान माहिती मिळतेय. पुभाप्र.

प्रदीप साळुंखे's picture

20 Jun 2016 - 7:54 pm | प्रदीप साळुंखे

प्रतिसादकांचे आभार_/\_

शटललेस बद्दल पण लिहिणार ना साहेब?

अवश्य,

मारवा's picture

20 Jun 2016 - 8:16 pm | मारवा

मागे एकदा औद्योगिक क्रांती समजुन घेत होतो तेव्हा जेम्स हारग्रीव्ह्ज ने इंग्लंडमध्ये १७६५ मध्ये लावलेल्या "स्पीनीगं जेनी" विषयीचा रोचक भाग वाचण्यात आला होता. त्याच्या जेनी ने तेव्हा आठ धागे एकाच वेळेस ते ८० धागे एकाच वेळेस विणण्या पर्यंत क्षमता वाढवलेली होती. त्याहुन गंमत म्हणजे तेव्हाच्या हॅन्ड स्पीनर्स ने ही मशीन आपल्याला बेकार करेल म्हणुन त्याच्या मशीन्स तोडुन टाकलेल्या आणि त्याला जीव वाचवुन पळावे लागले होते. पुढे कामगारांच्या तुटवड्यामुळे हळुहळु त्याच्या जेनीज इंग्लंडमध्ये वापरण्यात येऊ लागल्या. १७८८ मध्ये इंग्लंडमध्ये २०००० च्या वर स्पीनींग जेनीज वापरात होत्या.
तुमच्या लेखामुळे आता एकेक धागा जुळुन येतोय व आकलन होत आहे तर मजा येतेय.
1

नरेश माने's picture

21 Jun 2016 - 11:43 am | नरेश माने

छान माहितीपुर्ण लेखमाला आणि तुम्ही दिलेल्या चित्रांमुळे समजण्यास मदत होते.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2016 - 2:17 pm | मुक्त विहारि

(टायपिंग फास्ट नाहीये,त्यामुळे हात आवरता घेतला आहे,भाग लहान झाला असेल तर क्षमस्व)...

भाग लहान झाला तरी हरकत नाही, पण ह्या विषयातील जमेल तितकी माहिती दिली तर उत्तम, असे माझे मत.

(अज्ञानी) मुवि