आंब्याचा बदामी हलवा

गणपा's picture
गणपा in पाककृती
9 Jun 2016 - 1:50 pm

नमस्कार मंडळी,
मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.

साहित्यः

२ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)

सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप

कृती :

एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.

एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर
झाला की त्यात साखर टाकावी.

मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.

जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.

जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.

एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.

प्रतिक्रिया

इरसाल's picture

9 Jun 2016 - 2:00 pm | इरसाल

काय फोटो आहेत एक एक. शेवटचा तर भव्य आणी खत्तर्नाक.
चविष्ट्पणाबद्द्ल आपण बोलणार नाही

पद्मावति's picture

9 Jun 2016 - 2:04 pm | पद्मावति

वाह, मस्तं!

किसन शिंदे's picture

9 Jun 2016 - 2:21 pm | किसन शिंदे

जबरदस्त पुनरागमन!!

ज्ञानराम's picture

9 Jun 2016 - 2:24 pm | ज्ञानराम

तो पा सु

प्रीत-मोहर's picture

9 Jun 2016 - 2:33 pm | प्रीत-मोहर

__/\__
गंपा इज बॅकविथ जिभेवरचे अत्याचार!!

मृत्युन्जय's picture

9 Jun 2016 - 2:40 pm | मृत्युन्जय

पुनरागमनाबद्दल आद्य मिपाशेफ गणपाशेठ चा एक आंबा, दोन काजु, तीन बदाम आणि चार तोळे केशर देउन सत्कार करण्यात येत आहे (अर्थात सगळे व्हर्चुअल च) ;)

बाकी पाकृ एकम शोल्लेट. करुन बघायलाच हवी अशी.

तुषार काळभोर's picture

9 Jun 2016 - 2:57 pm | तुषार काळभोर

गणपाभौंनी बिनादुधा-साखरेचा चहा अशी जरी पाकृ टाकली, तरी आमच्या मिपाकार बनण्याचं सार्थक झालं, असं आम्ही मानतो.

प्रचेतस's picture

9 Jun 2016 - 3:00 pm | प्रचेतस

गणपा रायझेस. :)

उल्का's picture

9 Jun 2016 - 3:05 pm | उल्का

फोटो इतके बोलके आहेत की शब्दाविना कृती समजली.
मी मिपावर आल्यापसुन ही तुमची पहिलीच पाकृ.
माझ्या मागच्या दोन्ही पाकृवर तुमचा उल्लेख झाला होता. (भुजण्याचं तर भुजिंग झालं. :ड)
का ते कळलं बर्र का! असेच लिहित राहा. :)
वाखुसा!

वाह!! ते कॉर्नस्टार्च किती पाण्यात घोळवावं ?

१ वाटी स्टार्चसाठी १ वाटी पाणी पुरेसं आहे.

विशाखा राऊत's picture

9 Jun 2016 - 3:17 pm | विशाखा राऊत

जबरदस्त... मस्त रेसेपी. :)

रेवती's picture

9 Jun 2016 - 3:26 pm | रेवती

भारी आम्ररेशिपी व फोटू.

स्पा's picture

9 Jun 2016 - 3:44 pm | स्पा

क आणि ड आणि क

वाह, क्या बात है गणपाशेठ..

मस्त पाकृ.

पूर्वाविवेक's picture

9 Jun 2016 - 4:00 pm | पूर्वाविवेक

बदाम हलवा माझा अतिशय आवडता पदार्थ, आणि त्यात हा आंब्याचा.......... मार डाला !

प्रशांत's picture

9 Jun 2016 - 4:00 pm | प्रशांत

तो पा सु

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 4:11 pm | रमेश भिडे

गणपा,
डोळे निवले.
बेष्ट!
और अब रुकने का नै रे बाबा. अलग अलग रेसिपी डालने का. उसमे अंडा मिपाकर डालते बाद में.

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 4:11 pm | रमेश भिडे

गणपा,
डोळे निवले.
बेष्ट!
और अब रुकने का नै रे बाबा. अलग अलग रेसिपी डालने का. उसमे अंडा मिपाकर डालते बाद में.

प्रभास's picture

22 Jun 2016 - 2:41 pm | प्रभास

=))
भन्नाट कमेंट

काय ते फोटो... अर्र् मार दिया आपने...

वपाडाव's picture

9 Jun 2016 - 4:47 pm | वपाडाव

बाब्बौ...
झेंगाट...

अजया's picture

9 Jun 2016 - 4:50 pm | अजया

_/\_ जबरदस्त

इशा१२३'s picture

9 Jun 2016 - 5:21 pm | इशा१२३

मस्त आणि मस्तच!

इशा१२३'s picture

9 Jun 2016 - 5:21 pm | इशा१२३

मस्त आणि मस्तच!

इशा१२३'s picture

9 Jun 2016 - 5:21 pm | इशा१२३

मस्त आणि मस्तच!

पैसा's picture

9 Jun 2016 - 5:22 pm | पैसा

सॉलिड! कधी येऊ खायला?

नीलमोहर's picture

9 Jun 2016 - 5:33 pm | नीलमोहर

भारी !!!!

आधी वाटले जुनी पोस्ट उत्खननात वर आली की काय? पण नाही! फ्रेश रेसिपीसह आपले स्वागत!!!!!!!!१
आता नविन शिकण्याची संधी मिळणार.

एक सांगा कॅा्न स्टार्चऐवजी गव्हाचं सत्व वापरतात का खय्रा बदामी हलव्यात?
हा हलवा अप्रतिम!

गणपा's picture

9 Jun 2016 - 6:16 pm | गणपा

बाजारात बरेच ठिकाणी काॅर्नस्टार्चच वापरतात.
माझ्या सासुबाई मात्र तुम्ही म्हणता तसे गव्हाचे सत्वच वापरायची.

अनन्न्या's picture

9 Jun 2016 - 6:14 pm | अनन्न्या

ते राहिलेच विचारायचे, म्हणजे वरून सोडायचे ते किती लागते?

सुरवातीला मी दोन मोठे चमचे तुप वापरलं. मग ३-४ वेळा चमचा चमचा तूप सोडलं.

शेवटच्या फोटोतला रंग फारच सुरेख आलाय. पाकृ सोपी करून सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे.
फक्त पहील्या फोटोत साखरेच्या दोन वाट्या आहेत मग आमरसाची एकच का? ये बहोत नाईन्साफी हैय आंबेके साथ.

प्रियान's picture

9 Jun 2016 - 6:27 pm | प्रियान

गणपा,
मी तुमच्या रेसिपीस मिपा सदस्य व्हायच्या फार फार आधी पासून वाचते आहे आणि बनवते आहे !
आज थांक्यू म्हणायचा चान्स मिळाला :)
बाकी पाक्रु बद्दल काय बोलावे ?!?! एकदम यम्मी आणि उत्तम सादरीकरण ! _/\_

त्रिवेणी's picture

9 Jun 2016 - 7:27 pm | त्रिवेणी

जबरी पाककृती.
पण स्वयंपाकात अजुन्तरी जरा बालवाडीत असल्याने फ़क्त बघून समाधान मानणार.

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 7:34 pm | रमेश भिडे

ब्रह्मांड भरुन शिरा (हलकं घ्या, उगाच कढई हाणायचात) केला तरी बालवाडीत च का अजून???

विनय विनय तो हाच काय?

त्रिवेणी's picture

9 Jun 2016 - 9:27 pm | त्रिवेणी

काहीही ह.
ठोक(भाजी भाकरी बदड़ने)स्वयंपाक येतो.नजकतीचे प्रकार हमखास चुकतात.
बाक़ी तुम्ही कढ़ी नको म्हंटले म्हणून केलीच नै आता सूड दादा रागवतील आपल्या दोघावर.

आनन्दिता's picture

9 Jun 2016 - 7:39 pm | आनन्दिता

शेवटचा फोटो पाहुन जीवच गेला !!

विजुभाऊ's picture

9 Jun 2016 - 8:34 pm | विजुभाऊ

गणपा भौ........
लै झ्याक.
पुनरागमन झालंय. आता थांबायचं नाही

पिलीयन रायडर's picture

9 Jun 2016 - 8:34 pm | पिलीयन रायडर

अ हा हा हा आणि हा च!!!

विजुभाऊ's picture

9 Jun 2016 - 8:35 pm | विजुभाऊ

काही ब्याचलर्स पाककृती ल्ह्या की.
ब्याचलर्स म्हणजे कमीतकमी साहित्यात पट्टकन करता येतील अशा.

यशोधरा's picture

9 Jun 2016 - 9:17 pm | यशोधरा

लागली का अजून एक दुष्ट व्यक्ती मिपावर पाकृ टाकायला!!
कलियुग आहे नुस्तं!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2016 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रेट. _/\_ जियो.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

9 Jun 2016 - 9:43 pm | चतुरंग

काय तो शेवटला फोटू, अगागागा! खल्लास!!
दणक्यात पुनरागमन!! __/\__

(गणपाभौंचा फ्यान)रंगांबा
(खुद के साथ बातां - रंगा, पुढल्या भारतवारीला गंपाभौंना किमान आठवडाभर किडन्याप करावे काय?)

अभ्या..'s picture

10 Jun 2016 - 12:34 am | अभ्या..

गणप्या आलास का लेका जीभ खवळायला.
बाकी हळव्याचा कलर का कलर जमलाय राव. आपला लै फेवरिट कलर ह्यो.

नंदन's picture

10 Jun 2016 - 1:51 am | नंदन

वेलकम बॅक, गणपाशेठ! दणदणीत पुनरागमन. पाकृ आणि फोटू - दोन्ही कातिलाना!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2016 - 8:03 am | डॉ सुहास म्हात्रे

खत्रा पाकृसह कडक पुनरागमन ! वडक्कम !!

सविता००१'s picture

10 Jun 2016 - 10:19 am | सविता००१

खल्लास इतके सुरेख फोटो पाहून

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2016 - 10:39 am | अत्रुप्त आत्मा

आले गंपाच्या मना, तिथे पाकक्रुतिंचे कैच चाले ना!

सस्नेह's picture

10 Jun 2016 - 10:52 am | सस्नेह

हलवा जास्त सुंदर की फोटो हे ठरवता येईना.

संजय पाटिल's picture

10 Jun 2016 - 11:02 am | संजय पाटिल

आई शप्पत!!
पाक्रू आणी फोटो जबराट्च..

पियुशा's picture

10 Jun 2016 - 11:28 am | पियुशा

वाह ! लाजवाब , सुभान अल्ला ! क्या करते हो मिया ? जाओ ताज महाल दे दिया तुमको तोहफे मे ;)

वेदांत's picture

10 Jun 2016 - 11:31 am | वेदांत

एकदम झकास...

कवितानागेश's picture

10 Jun 2016 - 1:44 pm | कवितानागेश

मस्त पाकृ.
मला वाटते इतर फळांचाही हलवा असाच करता येईल. फक्त जास्त वेळ आटवावे लागेल मिश्रण.

कौशी's picture

10 Jun 2016 - 3:56 pm | कौशी

कुठे होतास गणपा भाउ इतके दिवस...

नूतन सावंत's picture

10 Jun 2016 - 6:33 pm | नूतन सावंत

गणपा,जबरदस्त पाककृती.पुनरागमनाबद्दल आभार.
आ गया आ गया हलवावाला आ गया.आठवलं जाता जाता.

सूड's picture

20 Jun 2016 - 6:41 pm | सूड

हा अस्मादिकांनी करुन पाह्यला!!

BH

अभ्या..'s picture

20 Jun 2016 - 11:38 pm | अभ्या..

सुडक्या जमेष रे,
कलर पण जमेश. ती ट्रान्सपरनशी साधलीय. बाकी चव घ्यायला डबा दे ना भरून. कुरियर कर.

धन्याकडे आलास की कळव, आणून देतो..

गणपापेक्षा टेंप्टिंग आलाय फोटो ! हिकडेबी जरा पार्सल करच.

प्रतिभान's picture

20 Jun 2016 - 7:33 pm | प्रतिभान

आमरस च्य ऐवजी मन्गो प्ल्प चलेल का? करुन बघवासा वाट्तोय

मी मॅन्गो प्लप वापरुनच केला आहे.

स्वाती दिनेश's picture

20 Jun 2016 - 11:09 pm | स्वाती दिनेश

यू आर बॅक विथ अ बँग...
पाकृ,फोटो सगळेच मस्त!
स्वाती
(मन से बाते- हा परत मायभूतून अफ्रिकेच्या जंगलात गेलेला दिसतोय..:) )

साती's picture

22 Jun 2016 - 6:56 am | साती

हलवा एकदम भारी दिसतोय.

कैलासवासी सोन्याबापु's picture

22 Jun 2016 - 7:46 am | कैलासवासी सोन्याबापु

भाऊ एकनंबर!!!! भाऊ इज बॅक विथ अ बँग

मुक्त विहारि's picture

22 Jun 2016 - 7:07 pm | मुक्त विहारि

१ नंबर

संदीप चित्रे's picture

24 Jun 2016 - 6:19 pm | संदीप चित्रे

अजून काही बोलायला पाहिजे का मित्रा? :)

संदीप चित्रे's picture

24 Jun 2016 - 6:21 pm | संदीप चित्रे

इजऐवजी इस झालं!