मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आंब्याचा बदामी हलवा

गणपा · · पाककृती
नमस्कार मंडळी, मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे. साहित्यः  २ वाट्या आमरस, १ वाटी कॉर्न स्टार्च, २ वाट्या साखर (आमरसाच्या गोडीनुसार कमी जास्त)  सुका मेवा (काजू, बदाम) , केसर, वेलची पूड, साजुक तूप कृती :   एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूपात आमरस घालून परतावा.   एक उकळी आली की कॉर्नस्टार्च पाण्यात घोळून टाकावं व गुठळ्या न होऊ देता ढवळत राहावं. रस थोडा दाटसर झाला की त्यात साखर टाकावी.   मधे मधे चमचाभर तूप सोडत रहावं. आणि मिश्रण उलथण्याने हलतं ठेवावं. यामुळे त्यात हवेचे बुडबूडे तयार होत राहतील. ही प्रक्रिया किमान ४०-५० मिनिटे चालू ठेवावी.   जेव्हा कडेने तूप सुटू लागेल तेव्हा त्यात सुक्यामेव्याचे काप, वेलचीपूड, केशर टाकावे.  जेव्हा मिश्रण एकजीव गोळा होईल तेव्हा हलवा शिजत आला असे समजावे. जितका जास्त वेळ शिजवू तेवढा तो चिवट होत जाईल.  एका पसरट भांड्याला तुपाचं बोट लावून त्यात मिश्रण किमान २-४ तास थंड करत ठेवावं. लवकर थंड करण्यासाठी फ्री़जचा वापर टाळावा. थंड झाल्यावर सुरीने काप करावे.

वाचन 38412 प्रतिक्रिया 69

इरसाल गुरुवार, 06/09/2016 - 14:00
काय फोटो आहेत एक एक. शेवटचा तर भव्य आणी खत्तर्नाक. चविष्ट्पणाबद्द्ल आपण बोलणार नाही

मृत्युन्जय गुरुवार, 06/09/2016 - 14:40
पुनरागमनाबद्दल आद्य मिपाशेफ गणपाशेठ चा एक आंबा, दोन काजु, तीन बदाम आणि चार तोळे केशर देउन सत्कार करण्यात येत आहे (अर्थात सगळे व्हर्चुअल च) ;) बाकी पाकृ एकम शोल्लेट. करुन बघायलाच हवी अशी.

उल्का गुरुवार, 06/09/2016 - 15:05
फोटो इतके बोलके आहेत की शब्दाविना कृती समजली. मी मिपावर आल्यापसुन ही तुमची पहिलीच पाकृ. माझ्या मागच्या दोन्ही पाकृवर तुमचा उल्लेख झाला होता. (भुजण्याचं तर भुजिंग झालं. :ड) का ते कळलं बर्र का! असेच लिहित राहा. :) वाखुसा!

रमेश भिडे गुरुवार, 06/09/2016 - 16:11
गणपा, डोळे निवले. बेष्ट! और अब रुकने का नै रे बाबा. अलग अलग रेसिपी डालने का. उसमे अंडा मिपाकर डालते बाद में.

रमेश भिडे गुरुवार, 06/09/2016 - 16:11
गणपा, डोळे निवले. बेष्ट! और अब रुकने का नै रे बाबा. अलग अलग रेसिपी डालने का. उसमे अंडा मिपाकर डालते बाद में.

अनन्न्या गुरुवार, 06/09/2016 - 17:38
आधी वाटले जुनी पोस्ट उत्खननात वर आली की काय? पण नाही! फ्रेश रेसिपीसह आपले स्वागत!!!!!!!!१ आता नविन शिकण्याची संधी मिळणार.

In reply to by कंजूस

गणपा गुरुवार, 06/09/2016 - 18:16
बाजारात बरेच ठिकाणी काॅर्नस्टार्चच वापरतात. माझ्या सासुबाई मात्र तुम्ही म्हणता तसे गव्हाचे सत्वच वापरायची.

सखी गुरुवार, 06/09/2016 - 18:17
शेवटच्या फोटोतला रंग फारच सुरेख आलाय. पाकृ सोपी करून सांगितल्याबद्दल मंडळ आभारी आहे. फक्त पहील्या फोटोत साखरेच्या दोन वाट्या आहेत मग आमरसाची एकच का? ये बहोत नाईन्साफी हैय आंबेके साथ.

प्रियान गुरुवार, 06/09/2016 - 18:27
गणपा, मी तुमच्या रेसिपीस मिपा सदस्य व्हायच्या फार फार आधी पासून वाचते आहे आणि बनवते आहे ! आज थांक्यू म्हणायचा चान्स मिळाला :) बाकी पाक्रु बद्दल काय बोलावे ?!?! एकदम यम्मी आणि उत्तम सादरीकरण ! _/\_

In reply to by त्रिवेणी

रमेश भिडे गुरुवार, 06/09/2016 - 19:34
ब्रह्मांड भरुन शिरा (हलकं घ्या, उगाच कढई हाणायचात) केला तरी बालवाडीत च का अजून??? विनय विनय तो हाच काय?

In reply to by रमेश भिडे

त्रिवेणी गुरुवार, 06/09/2016 - 21:27
काहीही ह. ठोक(भाजी भाकरी बदड़ने)स्वयंपाक येतो.नजकतीचे प्रकार हमखास चुकतात. बाक़ी तुम्ही कढ़ी नको म्हंटले म्हणून केलीच नै आता सूड दादा रागवतील आपल्या दोघावर.

चतुरंग गुरुवार, 06/09/2016 - 21:43
काय तो शेवटला फोटू, अगागागा! खल्लास!! दणक्यात पुनरागमन!! __/\__ (गणपाभौंचा फ्यान)रंगांबा (खुद के साथ बातां - रंगा, पुढल्या भारतवारीला गंपाभौंना किमान आठवडाभर किडन्याप करावे काय?)

नंदन Fri, 06/10/2016 - 01:51
वेलकम बॅक, गणपाशेठ! दणदणीत पुनरागमन. पाकृ आणि फोटू - दोन्ही कातिलाना!

कवितानागेश Fri, 06/10/2016 - 13:44
मस्त पाकृ. मला वाटते इतर फळांचाही हलवा असाच करता येईल. फक्त जास्त वेळ आटवावे लागेल मिश्रण.

स्वाती दिनेश Mon, 06/20/2016 - 23:09
यू आर बॅक विथ अ बँग... पाकृ,फोटो सगळेच मस्त! स्वाती (मन से बाते- हा परत मायभूतून अफ्रिकेच्या जंगलात गेलेला दिसतोय..:) )