एक्सेल एक्सेल - भाग १ - रकान्यांचं जाळं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in तंत्रजगत
25 May 2016 - 10:54 am

नमस्कार,
एक्सेल हे सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर या दोघांची नाळ इतकी घट्ट आहे की एक्सेलशिवाय कॉम्प्युटरचा विचारही करता येत नाही. विशेषतः आमच्यासारख्या आकडेमोड करणार्‍यांना तर कॉम्प्युटरची प्रत्येक गोष्ट एक्सेलशीच खातात असं वाटतं. पण या सॉफ्टवेअरबद्दल बहुतेकवेळा प्रचंड बाऊ असतो अनेकांच्या मनात. मोठाले डेटा, लांबचलांब फॉर्म्युले हे सगळं काहीतरी अगम्य आहे असं मानून 'ते एक्सेल वगैरे मला जमत नाही' असं डिस्क्लेमर देऊन टाकतात बरीच मंडळी.

हे एक्सेल माझ्या कुवतीनुसार, माहितीनुसार सोपं करण्याचा हा प्रयत्न जानेवारीपासून मी लोकमत वृत्तपत्रातून करतोय. दर सोमवारी ठाणे पुरवणीत मी एक्सेलबद्दल लिहितो. मिपाकरांपुढेही हे मांडावं, म्हणून ही लेखशृंखला सुरू करतोय. सल्ले, सुधारणांचं स्वागत आहे.

1
2

धन्यवाद.

प्रतिक्रिया

अगदी कोबोल ,बेसिक,डिबेस ,इक्सेल सगळ्याची पुस्तके आणून लायब्ररी कमांडस वापरून सर्व केलंय पण आमच्या लाइनिला उपयोग नव्हता.

शाम भागवत's picture

25 May 2016 - 4:28 pm | शाम भागवत

यात फॉक्सप्रो कसे नाही?
ते तर या सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे.

चौकटराजा's picture

25 May 2016 - 6:05 pm | चौकटराजा

कोबोल ,बेसिक,डिबेस हे सगळे शब्द ऐकून अगदी जुने राजकपूरचे दिलिप्कुमारचे सिनेमे डोळ्यापुढे आल्याचा आनंद झाला. दुसर्‍याना लोटस १२३ शिकविताना जरा भाव पण खाउन घेतला होता.

शाम भागवत's picture

25 May 2016 - 5:09 pm | शाम भागवत

हा पहिला भागच त्रिशतकी मजल मारणार असे दिसतेय.
:-))

चांदणे संदीप's picture

25 May 2016 - 5:19 pm | चांदणे संदीप

करण या एक्सेलमुळे रंजलेले गांजलेले लोक्स बरेच असणार! :)

Sandy

ट्रेड मार्क's picture

25 May 2016 - 5:57 pm | ट्रेड मार्क

ज्ञानात भर टाकणारी मालिका. पूर्ण करावी करावी ही विनंती.

एक्सेल वापरताना प्रत्येक वेळेला ते सोफ्टवेअर बनवणार्याचं आणि टेस्ट करणाऱ्यांचं कौतुक वाटतं.

शाम भागवत's picture

25 May 2016 - 6:11 pm | शाम भागवत

एक‍ शंका आहे.

शाळेत आम्ही टेबलला तक्ता म्हणायचो. ओळींना ओळी म्हणायचो व कॉलमना रकाने म्हणायचो. या रकाने व कॉलमच्या रेघांमुळे जे चौकोन तयार होतात त्यांना सेल म्हणणे योग्य वाटतयं. तुम्ही म्हणताय तसे रकाने म्हणजे सेल, असे नसावे.

वेल्लाभट's picture

26 May 2016 - 10:41 am | वेल्लाभट

टेबल तक्ता बरोबर आहे..
रकाना....सेल .. मला बरोबर वाटलं, तरी विचार करतो. अर्थात पुढे मी सेल, कॉलम असे इंग्रजी शब्दच वापरलेत. समजायला तेच सोयीचे होतील या विचाराने.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 May 2016 - 6:09 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर उपयोगी विषय !

मायक्रोसॉफ्ट्चे सर्वोत्तम सॉफ्टवेअर म्हणजे एमएस एक्सेल ! पूर्णविराम !! :)

सुमीत भातखंडे's picture

26 May 2016 - 12:09 pm | सुमीत भातखंडे

आणि उपयुक्त विषय.
मला पण शिकयचंय एक्सेल.

वा उपयुक्त लेख. धन्यवाद.

मी-सौरभ's picture

27 May 2016 - 4:40 pm | मी-सौरभ

तुम्ही तुमच्या लेखाचे फोटो टाकण्या ऐवजी लेख टाकू शकाल का?
आम्हाला फोटो दिसत नाहीत

"गणेशा"ग्रस्त
सौरभ