इजिप्त एयरलाइन्सचे विमान

स्मिता.'s picture
स्मिता. in काथ्याकूट
20 May 2016 - 1:26 pm
गाभा: 

माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं!

लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं. पण विमान मात्र संशयास्पद पद्धतीने जणू हवेत विरून गेलं.

इजिप्तच्या सैन्याने आधी सांगितलं की त्यांना या विमानाकडून 'डिस्ट्रेस सिग्नल' मिळाला होता परंतु काही वेळानंतर त्यांनी असा काही सिग्नल मिळाल्याचं नाकारलं. हे तर त्याहूनही चमत्कारीक वाटतं. BBC सारख्या वृत्तवाहिन्या सध्या या घटनेला तांत्रिक बिघाडाने झालेल्या अपघाताचीच शक्यता धरत आहेत. अगदी सावधपणे हा दहशतवादी हल्ला असावा अशी शक्यताही बोलण्याचं टाळत आहेत. फ्रान्समधे ही शक्यता गृहीत धरलेली असली तरी कोणी ती अधिकृतरित्या जाहीर करत नाहीये. दुसरीकडे इजिप्त, फ्रान्स आणि ग्रीस देशांची विमानं आणि जहाजं कालपसून भूमध्य समुद्रात विमानाच्या अवशेषांचा शोध घेत आहेत, पण कोणालाही काहिही सापडलेले नाही. हा लेख टंकत असेपर्यंत तरी या दुर्घटनेबद्दल किंवा अवशेषांच्या शोधाबद्दल कोणतीही नवी बातमी नाही.

या बातमीच्या अनुशंगाने मलेशियन एयरलाइन्सच्या हिंदी महासागरात गायब झालेल्या विमानाची आठवण झाली. तेव्हाही अनेक देशांनी खूप शोध घेवूनही काही सापडले नव्हते. या बातम्यांमुळे प्रश्न पडतो की आज तंत्रज्ञान एवढे प्रगत आहेत की सागरतळावरच्या हालचाली टिपता येतात, अमेरिकेचे उपग्रह रशिया, चीन यांच्या गुप्त सामरिक हालचाली टिपतं आणि बरंच काही; तर विमानासारखी अवाढव्य वस्तू समुद्रात पडल्यावर ती शोधणं का शक्य होत नाही? मलेशियाचं विमान हिंदी महासागरात पडले असे गृहीत धरले तर एक वेळ समजून घेता येईल की संपूर्ण महासागराचा शोध घेणं अशक्य आहे पण भूमध्य समुद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही विमानाएवढी मोठी गोष्ट शोधणं खरंच एवढं अवघड आहे का? अर्थात कालपासून सुरू झालेल्या शोधकार्याला फार जास्त वेळ मिळालेला नसल्याने त्याबाबतीत अशी टिप्पणी करणं हा माझा आततायीपणा आहे हे सुद्धा कळतंय.

गविंच्या विमानापघात संबंधी लेखमाला वाचून एवढं तर कळलंय की विमान अपघात असा अचानक 'एकाच' चूकीने होत नसतो. विमान अपघात म्हणजे चुकांची साखळी असते. या गायब झालेल्या विमानांच्या बाबतीत कोणत्याही चुका आढळून आलेल्या नव्हत्या (असतील तर ते माझे अज्ञान). त्यामुळे ही विमानं अपघातग्रस्त असावीत हे मनाला अजिबात पटत नाही. राहून राहून असंच वाटतं की ही विमानं ठरवून गायब केली जात असावीत आणि त्यांना बरीच आंतरराष्ट्रिय मदत मिळत असावी. माझं ज्ञान तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रिय राजकारण या दोन्ही बाबतीत अत्यंत तोकडं असल्याने हा विषय चर्चेला ठेवला आहे.

(बातम्या बघतांना मनात विचार आल्याबरोबर टंकल्याने चर्चाप्रस्ताव विस्कळीतपणे मांडला गेलाय.)

प्रतिक्रिया

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

20 May 2016 - 1:31 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

Air crash investigations हा nat geo वरचा कार्यक्रम फार मस्त असतो.

विषय फॉलो करण्यासाठी धागा काढल्याबद्दल आभार. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या तुकड्यांवरुन विमानातला तांत्रिक बिघाड ही शक्यता दिसत नाहीये. दोन मुख्य शक्यता खालील क्रमाने:

१. पायलटला संपर्कही साधण्याची संधी उरणार नाही इतक्या तातडीने झालेलं मोठं फेल्युअर. (स्फोट, हल्ला, घातपात)
२. पायलटने हेतुपुरस्सर केलेला घात.

या निव्वळ तात्विक शक्यता आहेत. माहिती पुढे येत जाईल तसं आणखी स्पष्ट होईल.

विमानाने पडण्यापूर्वी अचानक नव्वद डिग्री टर्न घेतला होता आणि पुन्हा विरुद्ध दिशेत पूर्ण वर्तुळाकार टर्न घेतला होता. अशी विचित्र वळणं घेतानाच ते सदतीस हजार फुटांवरुन दहा हजार फुटांपर्यंत खाली आलं. त्यानंतर ते रडारवरुन अदृश्य झालं.

हे सर्व पाहता हवेतच आधी ताबा सुटण्याइतकी इजा, डाईव्ह किंवा स्पिन आणि ठराविक उंचीपर्यंत खाली आल्यावर बहुधा हवेतच डिसइंटिग्रेट असा क्रम वाटतोय.

संशयित क्षेत्रामधे दोन किलोमीटर इतकी पाण्याची खोली आहे. तिथे शोध घेणं सोपं नाही.

सहज वाटलं म्हणून. धाग्याचं नाव बदलता येईल का?

स्मिता.'s picture

20 May 2016 - 1:50 pm | स्मिता.

दुसरं समर्पक नाव सुचत असेल तर माझी काही हरकत नाही :)
वरच्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरता धन्यवाद!

आदूबाळ's picture

20 May 2016 - 3:29 pm | आदूबाळ

+१ हेच लिहायला आलो होतो. अतिशय इन्सेन्सेटिव्ह शीर्षक वाचून डोक्यात संतापाची कळ गेली.

पैसा's picture

20 May 2016 - 1:46 pm | पैसा

दुर्दैवी प्रवासी

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 2:38 pm | रमेश भिडे

गविंशी सहमत. नाव बदलणं योग्य. गांभीर्य पोचत नाही. लोकांचा जीव जातोय आणि यांना खेळ सुचत आहेत असं (लेखिकेला म्हणायचं नसलं तरी)प्रतीत होत आहे.

Something terribly wrong is happening and worse yet to come.

स्मिता.'s picture

20 May 2016 - 6:27 pm | स्मिता.

संपादक मंडळाला विनंती आहे की धाग्याचे शीर्षक बदलावे. सर्कास्टिक लिहिण्याच्या नादात अनुचित लिहिले गेले आहे. साधे सरळ 'इजिप्त एयरलाइन्सचे विमान' असेही चालेल.

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 6:32 pm | रमेश भिडे

Sarcasm सुचण्याचं काही खास कारण होतं?
A plain question. Don't see any such thing prima facie. Just curious.

स्मिता.'s picture

20 May 2016 - 6:43 pm | स्मिता.

कारण विचारताय म्हणून सांगते.
कालपासून ही बातमी बघत आहे. विमानातल्या प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या परिवाराची मानसिक स्थिती कल्पनेपलिकडची आहे. मलेशियन एयरलाइन्सच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. कोणी काहिच हालचाल करत नाही असं नाही पण कुठंतरी असं वाटतं की जे 'दाखवलं' जातंय ते पुरेसं नाहीये.
शिवाय मी 'मला काय वाटतं' हे मूळ चर्चाप्रस्तावातही लिहिलंयः

ही विमानं अपघातग्रस्त असावीत हे मनाला अजिबात पटत नाही. राहून राहून असंच वाटतं की ही विमानं ठरवून गायब केली जात असावीत आणि त्यांना बरीच आंतरराष्ट्रिय मदत मिळत असावी.

या कारणांमुळे हा Sarcasm सुचला.

शीर्षक बदलून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार!

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 7:00 pm | रमेश भिडे

असो.

एकुलता एक डॉन's picture

21 May 2016 - 1:33 am | एकुलता एक डॉन

june shirshak kay hote ?

नाईकांचा बहिर्जी's picture

20 May 2016 - 9:34 pm | नाईकांचा बहिर्जी

उगाच कश्यात काय नाय अन कांस्पीरेसी थ्योरी कश्याला उगाळाव्यात म्हणतो मी! एकदा का काय झालं होतं नेमकं ते कळलं की मग उद्वेग सर्कासम वगैरे सगळे मांडता येईल की. तोवर lets rein our horses for good असं वाटतं बुआ

फेरफटका's picture

20 May 2016 - 9:39 pm | फेरफटका

गविंना ह्याच विषयावर थोडं लिहायची विनंती करायला आलो होतो आणी हा धागा आणी त्यावर गविंचा प्रतिसाद वाचला. आज सकाळी ऐकलेल्या बातम्यांनुसार, विमानाचे अवशेष (थोडे) सापडले आहेत.

कोणालाच काहीही पडलेली नाही...विमान पडूदे किंवा लँड होउदे कोणालाच काहीही फरक पडत नाही...आतील प्रवासी, पायलट आणि इतर क्रू मेंबर्स आणि त्यांचे परिवार वाले सोडले तर,...इतकी टेक्नॉंलॉजी पुढे गेलीये...तो ओसामा पण सापडला होताच कि अत्याधुनिक उपकरणे वापरून... प्रत्येक देशाने आपापल्या विमानांवर देखरेखीसाठी एक एक कृत्रिम उपग्रह ठेवता येत नाही???.. किंवा त्या रूट ला जाणाऱ्या सगळ्या विमानांवर लक्ष ठेवायला एका उपग्रहाला ठेवता येत नाही???...एक सामाईक ठेवा ना...सगळ्यांचा मिळून एक किंवा 2...इतकं अवाढव्य प्रचंड अख्ख विमान च्या विमान बोईंग असेल किंवा एअरबस असेल गायब होतं म्हणजे काय??.. एवढ्या हजारो उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सी चा काहीच उपयोग होत नाही???...एकपण फ्रिक्वेन्सी काम करत नाही???...मायक्रोवेव्ह, रडार, इलेकट्रॉमॅग्नेटिक???? शून्य???? .पटायला नाही तर वाचयला पण चुकीचं वाटतंय.. अवघड आहेच... विषयातील इंजिनीअर तसेच जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा...

स्मिता.'s picture

23 May 2016 - 1:45 pm | स्मिता.

माझाही हाच प्रश्न आहे. अपघातात अनेक जीव गेलेत याचं दु:ख तर आहेच पण मी ते दु:ख इथे व्यक्त करण्यापेक्षा मनात जे प्रश्न आलेत त्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने धागा काढला होता.
गविंचा प्रतिसाद आहेच, आणखी माहितीपूर्ण प्रतिसाद मिळालेत तर उत्तमच!

आणखी माहिती बाहेर येतेय त्याची नोंदः

अकार्स (Aircraft Communications Addressing and Reportin) या विमानातल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमकडून आलेले काही संदेश उघड झाले आहेत. त्यात विमानाच्या पुढच्या भागात धूर डिटेक्ट झाल्याचं आणि आतून बाहेरच्या दिशेने इम्पॅक्ट झाल्याच्या खुणा दिसताहेत. (उजव्या बाजूच्या खिडक्यांचे सेन्सर्स, स्मोक डिटेक्टर्स या साधनांचे इनपुट्स) कॉकपिटच्या / विमानाच्या उजव्या बाजूच्या खिडक्या आतून बाहेर अशा रितीने स्फोटात फुटल्या असल्याप्रमाणे सिग्नल आहेत.

जनरल फेल्युअरमुळे विमान खाली आलं असेल तर आकार्स ही सिस्टीम वास्तविक आणखी जास्त काळ शेकडो एरर मेसेजेस पाठवत राहायला हवी होती. पण साधारण सात मेसेजेस पाठवून एकदम ती बंदच झाली. हे अ‍ॅबनॉर्मल वाटतं. यामुळे संपूर्ण सिस्टीम अचानक फेल होणं (स्फोटसदृश घटना) हा सिनारिओ वाटतो.

पायलटकडून काहीच निगेटिव्ह संदेश आला नव्हता असं आधी जाहीर झालं असलं तरी आता अश्या बातम्या येताहेत की पायलटने अगदी शेवटी धुराचा उल्लेख केला होता. त्याने कोसळण्यापूर्वी डिस्ट्रेस कॉल केला होता. ही माहिती आगोदर बाहेर का आली नाही हे अजून स्पष्ट नाही. पण आग, धूर यांचा उल्लेख करुन आम्ही विमानाची आल्टिट्यूड (उंची) कमी करण्यासाठी खाली उतरवत आहोत (इमर्जन्सी डिसेंट) असा उल्लेख पायलटने केला होता अशी माहिती पुढे आली आहे. पण त्यानंतर पुढे काहीही बोलण्याचा किंवा परिस्थिती सुधारण्याचा मोका न मिळता तातडीने विमान क्रॅश झालं असल्याने अत्यंत वेगाने नष्ट होण्यासारखी घटना विमानात घडली आहे हे स्पष्ट होतंय.

विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळेपर्यंत अकार्सकडून आलेले ते थोडेसे संदेश हाच तर्काचा आधार आहे.

अत्रन्गि पाउस's picture

24 May 2016 - 5:28 pm | अत्रन्गि पाउस
स्मिता.'s picture

26 May 2016 - 2:13 pm | स्मिता.

असे झाले असल्यास ते फारच दुर्दैवी म्हणावे लागेल. विमानातल्या इंधनाचा स्फोट की घातपात हे मात्र समोर येण्याकरता बरीच वाट बघावी लागेल.

अर्धवटराव's picture

24 May 2016 - 10:34 pm | अर्धवटराव

तंत्रज्ञान कितीही विकसीत झालं, सुरक्षा यंत्रणा कितीही कार्यक्षम झाल्या तरी अशा घटना होतच राहाणार का ? :(

आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात. तेंव्हा वाटलं हा असच अंदाज लावत असेल... कदाचीत तो इस्रायली वर्तमानपत्र वाचत असावा व त्यात अशी शंका घेतली असावी... कोण जाणे

नाईकांचा बहिर्जी's picture

25 May 2016 - 5:40 am | नाईकांचा बहिर्जी

आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात.

इसरायली म्हणले की विषय संपला ! एखाद्या इसरायलीला तर स्वतःच लग्न म्हणजे सुद्धा रब्बाय न केलेला घातपात वाटत असेल! एखाद्याने गॅस सोडला तरी हमास ने माझ्या पोटात हुमुस प्लांट केल्यामुळे सदर घातपात घडला असंही एखादा इसरायली म्हणेल काय खरं आहे ! एकेकाळी त्यांची चिकाटी मेहनत वगैरे चा परम आदर वाटत असे आताश्या ते लोकं मला फ़क्त पॅरानॉइड वाटतात मिळेल तिथे साप समजून भुई धोपटणारे , त्यातही गोवा ते हिमाचल इसरायली पर्यटक जी काही प्रतिमा त्यांच्या देशाची उभी करतात ती सुद्धा काही खास चांगली नसते. असो!

ईश्वरसर्वसाक्षी's picture

25 May 2016 - 7:34 pm | ईश्वरसर्वसाक्षी

मला तर कायम इस्त्रायल आणि इस्त्रायली ह्यांच्याबद्दल आदर वाटत आला आहे. चारी कडुन शत्रु असुन देखिल टेचात उभा आहे, ईट का जवाब पत्थर से नाहि तर लोखंडाने देतात आणि बरेच कारण आहेत. गाझा वाल्यानी एक बॉम्ब टाकला कि त्याबदल्यात त्यांचे पुर्ण गावच उध्वस्त करतात. स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात.
@बोका भौ नेक्श्ट भाग कवा टाकता मोसाद चा :)

नाईकांचा बहिर्जी's picture

25 May 2016 - 9:41 pm | नाईकांचा बहिर्जी

स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात.

फ़क्त दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत इतकी जाणत नाहीत ते अजिबात, नाही मला पलेस्टाइन झाले काय अन नष्ट झाले काय ह्याच्याशी घेणेदेणे नाही अन इजराइल कितीही स्वाभिमानी असू दे त्याने शष्प फरकही पडत नाही, शिवाय मी xenophobic सुद्धा अजिबात नाही, आपल्या मताचा आदर ठेऊन विचारावे वाटते की आपल्याला कुठल्यातरी तिसऱ्याच देशाचा पुळका का येतो आहे सर??

आपण कधी हिमाचल प्रदेशाच्या अंतर्गत भागात हिंडले आहात का? काम/पर्यटना निमित्त? नसाल तर अवश्य फिरा(च) एकदा ही विनंती आहे , तिथे मी ह्या तुमच्या स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रेमी मित्रमंडळीला जे जे काही "स्वातंत्र्य" "उपभोगताना" पाहिले आहे ते पाहुन मला निव्वळ किळस आली ह्या लोकांची, कारण काय? मी एक हिंदु आहे अन एक भारतीय आहे म्हणून मला किळस आली रोहतांग पास ते कसोल गांजा पिऊन पडलेली जनता बहुतांशी हीच मंडळी असते, ज्या भुमीला आपण प्रेमाने "देवभूमी हिमाचल म्हणतो" तिथे ह्या लोकांनी मांडलेले प्रकार पाहून एखादा वेडा देवळात शी शु करताना दिसला तर जसे होईल तसे मला झाले हे ही नमूद करतो, अन ते स्वतःच्या स्वातंत्र्याच्या किंवा स्वाभिमानाच्या रक्षणात कड़वे आहेत म्हणजे ते काय जगावर उपकार करतायत काय?? स्वातंत्र्यप्रेमी जनतेची किंवा राष्ट्राची खरी ओळख पटवायची कसोटी म्हणजे ते राष्ट्र इतर राष्ट्रांच्या (शत्रु राष्ट्रे नव्हे तर मित्र/तठस्थ राष्ट्रे) स्वातंत्र्याचा किती आदर करते ही होय अन त्या स्केल वर इसरायली हे महाहोपलेसच आहेत हे मी एक धर्माभिमानी अन राष्ट्राभिमानी हिंदु भारतीय म्हणून ठासुन म्हणतो,

अधिक जाणून घ्यायचे असले तर "मलाना क्रीम" करा सर्च गूगल वर

धन्यवाद

बहिर्जी

हो, हिमाचलात धुडगूस घालतात ही काही मंडळी हे खरेय. हिमाचलात एक कॅफेमध्येही फक्त हे लोक अलाऊड होते आणि भारतीयांना मज्जाव होता जाण्यास. त्याची रीतसर तक्रार हिमालयन क्लबने करुन हा प्रकार बंद पाडला.

नाईकांचा बहिर्जी's picture

26 May 2016 - 8:17 am | नाईकांचा बहिर्जी

आमच्या हॉटेलवाल्याने सांगितले होते हे सुद्धा पुढे तो म्हणाला की, हॉटेल्स जर "reserved for foreign tourist" असती तर काही वाटले नसते पण हॉटेलचे बोर्ड सुद्धा हिब्रू मधे करायला लावणे रिजर्व्ड ओनली फॉर इसरायली टूरिस्ट करायला भाग पाडणे असे धंदे करतात, एका हॉटेल मालकाला विचारले तुम्ही त्यांच्या पैश्याचे का मिंधे होताय? तर हॉटेल वाला म्हणाला साहेब आमच्याकडे असेच चालते हे लोकं जो हॉटेलवाला त्यांना नंगानाच करायला देतो त्याला बक्कळ पैका देतात समजा 2 हॉटेल्स शेजारी शेजारी आहेत अन एक रिजर्व्ड आहे तर तिथे चालणार प्रकार पाहून शेजारच्या नॉर्मल हॉटेल मधे इतर विदेशी ग्रुप्स किंवा भारतीय फॅमिली येत नाहीत मग धंदा बुड़तो नाइलाजाने मग ते हॉटेल पण रिजर्व्ड फॉर इसरायली टूरिस्ट होते अन हिब्रू बोर्ड लागतात अशी गावंच्या गावं कैप्चर करतात ही लोकं वीसा लेप्स झाल्यावर सुद्धा ओवरस्टे करतात असे प्रॉब्लेम तो हॉटेल वाला सांगत होता.

काही बाबतीत फरक करुन रशियन टुरिस्ट आणि गोवा याबद्दलही यासम ऐकलंय. उ. गोव्यात काही हाटेलच्या नावापासून मेनूपर्यंत सगळं रश्यन भाषेत पाहिलंय.

अर्थात हे अवांतर आहे. पण त्यात अर्थकारण आहेच आणि पैसा मिळतोय तिथे अडाप्टेशन नैसर्गिकच आहे. फक्त त्यांच्यासाठी रिजर्व्ड हे मात्र नसावं.

भारतीय टुरिस्टसचं जगात अन्य देशात वागणं पाहिलंय बरंच. जनरल भारतीय प्रवासी लोकांचं वर्तन बेजबाबदार, बेशिस्त , अधाशी इ. असतंच. खूप.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

25 May 2016 - 7:49 pm | ईश्वरसर्वसाक्षी

राहिला प्रश्न पॅरानॉईड होण्याचा तर त्यात काहि गैर नाहि, ह्यापेक्षा वाईट अवस्था तर अमेरिकन ऐअरपोर्ट वर असते कोणा भारतिय टिनपाट अभिनेत्याला फक्त त्याच्या नाव-आडनावामुळे ते ६--६ तास प्रश्न विचारुन भंडावुन सोडतात तर कधि कधि ह्याच पॅरानॉईड पणामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहि च्या माजि राष्ट्रप्रमुखांचे जे कि एक महान वैज्ञानिक सुद्धा होते त्यांचे जोडे विमानात येवुन उतरवतात व तपासायला नेतात (साला ह्या प्रकाराचा खुप राग आला होता). पण तस बघायला गेलात तर दे आर जस्ट डुइंग देअर ड्युटि टु सेफगार्ड देअर सिटिझन. आणि इथे कोण कुठला तो रॉबर्ट वड्रा आणि ह्याला "नो फ्रिस्किंग" हे प्रिव्हिलेज मिळायच प्रत्येक भारतिय एअरपोर्ट वर ?

नाईकांचा बहिर्जी's picture

25 May 2016 - 9:59 pm | नाईकांचा बहिर्जी

Clear your mind sir,

अमेरिका ही जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे अगदी फ्रेंच लोकशाहीच्या सुद्धा अगोदरची, तिची स्थापना ही लिबर्टी इक्वलिटी एंड फ्रटर्निटी ह्या 3 तत्वांवर झाली आहे अन ही तीन तत्वे "यूनिवर्सल" असल्याचे अमेरिकन्स ठासुन सांगत असतात ! इतकेच नव्हे तर त्यांचा "स्वातंत्र्याचा जाहिरनामा" (डिक्लेरेशन ऑफ़ इंडिपेंडेंस) क्लियर म्हणतो

We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.

ह्याच्यातली शब्दरचना लक्षात घ्या तो "ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल" म्हणतो "ऑल अमेरिकन सिटीजन्स " नाही म्हणत तेव्हा हे जे काही पॅरानॉइया तुम्ही बरोबर ठरवु इच्छिता तो साक्षात् अमेरिकन स्वातंत्र्याच्या मुळ दस्तऐवजानुसार किंवा त्याच्या फॉउंडिंग फादर्स नुसार एक हीन अपराध आहे, त्यात कुठलीही देशसेवा किंवा उदात्त भाव नाही तर फ़क्त कालानुरूप आलेली मगरूरी आहे

रॉबर्ट वड्राविषयी केवळ फॅक्ट स्पष्ट असावी म्हणून,...

.. एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या सुरक्षापथकाचे जवान सोबत असले तरच रॉबर्ट वड्रा यांना नो फ्रिस्किंग प्रिव्हिलेज होता. आता तोही काढून घेतलाय असं ऐकलं.

अर्थात त्यांना एसपीजी प्रोटेक्शन काय म्हणून ? हा प्रश्नही कोणी उपस्थित करु शकेल. त्याचं उत्तर माहीत नाही.

ईश्वरसर्वसाक्षी's picture

25 May 2016 - 8:42 pm | ईश्वरसर्वसाक्षी

अर्थात त्यांना एसपीजी प्रोटेक्शन काय म्हणून ?
हे काढलल्य तरी पण का प्रोव्हाईड केल्या गेल होत त्याच नवल आहे.

आपल्या सुरक्षा एजन्सीकडे गांधी घराण्यासंबंधीत लोकांच्या जीवाला धोका असण्यासंबंधी काहि रिपोर्ट आला होता. त्यामुळे एस.पी.जी. देण्यात आलं होतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

26 May 2016 - 11:01 am | कैलासवासी सोन्याबापु

तुम्ही ट्रॅक केलेल्या टाइमलाइन ऑफ़ इवेंट्स मधुन किमान एयर ट्रांसपोर्ट सेफ्टी संबंधी मौलिक माहीती मिळाली उत्तम कॉमेंट्स आहेत तुमच्या

बाकी एयरक्राफ्ट घातपात/इस्राएल/पर्यटन इत्यादी वाचुन काहीच टोटल लागली नाही मला तरी, शिवाय गवि, जर आपण SPG ची कार्यशैली, ती फ़ोर्स अस्तित्वात का आली , तिचे कायदेशीर अधिष्ठान अन ड्यूटी चार्टर उर्फ़ कार्यसनद पाहिली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यांनी प्रोवाइड केलेल्या सिक्यूरिटी कवर विषयी!