✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक

स
सिरुसेरि यांनी
गुरुवार, 05/19/2016 - 18:54  ·  लेख
लेख
सरदार दिठेरीकरांची गढी - कथा - काल्पनीक शहरातुन दुपारी बाराच्या सुमारास निघालेली जीवनराज ट्रॅव्हल्सची बस दिठेरी गावापाशी आली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. बसमधील प्रवासी जरा पेंगुळले होते . बसमध्ये पुढच्या सीटवर बसलेले टुर मॅनेजर श्री. कारेकर हे सर्व प्रवाशांना तत्परतेने माहिती सांगु लागले . "मंडळी , दिठेरी नदीच्या काठी वसलेले गाव म्हणुन या गावालाही दिठेरी किंवा दिठेरीवाडी असे म्ह्णतात . आपण चाललो आहोत ते ठिकाण इथुन फार लांब नाही . फार तर अर्धा तास . आता हा उजवीकडे जाणारा रस्ता दिठेरी नदीवरील पुलावरुन जातो . हि नदी ओलांडली की ते पहा दिठेरी देवीचे मंदिर लागते. पुढे साधारण वीस मिनीटाचा घाट वळणाचा रस्ता आहे . घाट संपला की दहा मिनीटात आपण गढीपाशी येतो." सर्व प्रवासी उत्सुकतेने बाहेरील ठिकाणे बघत होते . बस आता नदी ओलांडुन , दिठेरी देवीचे मंदिर पार करुन घाट रस्त्याला लागली . एका बाजुला उंच डोंगर तर दुसरीकडे खोल कातर दरी बघताना सर्वांना थोडी मजा तर थोडी भितीही वाटत होती . गढीकडील या रस्त्यावर एरवीही फारशी वर्दळ नसते . त्यामुळे ड्रायव्हर जोरात गाडी मारत होता . बाहेरील घाटाची मजा बघतानाच फोटो काढणे , एकमेकांशी हसत खिदळत गप्पा मारणे हे प्रवाशांचे उद्योग चालु होते . काही प्रवासी मंडळी एकमेकांना आपल्या याआधी केलेल्या सफरींचे किस्से सांगुन भाव मारत होती . तर इतरांना काव आणत होती . अचानक ड्रायव्हरने एकदम करकचुन ब्रेक मारुन गाडी थांबविली . आतमध्ये आपल्याच नादात असलेली गाफील प्रवासी मंडळी या अचानक बसलेल्या धक्क्याने जोरात पुढे मागे फेकली गेली . नशीब बरे की कुणाला जास्त लागले नाही . "अरे दत्ता , तु घाटामध्ये एवढ्या स्पीडने का चालवतो ? असं चालवु नको . जरा सांभाळुन " टुर मॅनेजर कारेकर हे ड्रायव्हरवर थोडे खेकसलेच . "अहो साहेब , माझी काय चुकी नाय . ते बघा ना . ते येडं एकदम रस्त्याच्या मधेच आलं " दत्तु समोर खुण करत दाखवत होता . सर्वांनी तिकडे बघितले . खरोखर रस्त्याच्यामध्ये एक वेडसर वाटणारा मनुष्य उभा होता . अंगात फाटलेले , मळके , जीर्ण कपडे होते . खोल गेलेले , तांबारलेले डोळे , बेसुमार वाढलेले विस्कटलेले केस , अस्ताव्यस्त दाढी असा त्याचा अवतार होता . तो वेडा या बसमधील सर्वांकडे बघत खदाखदा हसत होता . मधेच काहितरी पुटपुटत होता . तर मध्येच "नको , नको , कोण ? कोण ? " असे ओरडत होता . त्याचे जोरजोरात हातवारे चालले होते . जणु काही तो सर्वांना "पुढे जाउ नका" असे सांगत होता . सगळे प्रवासी त्या वेड्याचा दंगा पाहुन पार घाबरुन गेले . अचानक तो वेडा रस्त्याच्या कडेला गेला . तिथुन पुढे खोल दरी होती . वेड्याने एकदा परत या सर्वांकडे पाहिले .एक जोरदार आरोळी मारुन त्याने स्वताला दरीमधे झोकुन दिले . हळु हळु त्याचा ओरडण्याचा आवाज कमी होत गेला . सर्वजण धावत रस्त्याच्या कडेला गेले . आणी तो वेडा कुठे दिसतोय का पाहु लागले . पण ती दरी इतकी खोल होती कि काहिच दिसत नव्हते . हा प्रकार बघुन सर्व प्रवाशांचे हातपायच गळुन गेले . "चला मंडळी , आपल्याला उशीर होतोय . तो कुणीतरी वेडा होता . त्याला कोण काय करणार ? आपल्याला निघालं पाहिजे" टुर मॅनेजर श्री. कारेकर यांनी सर्वांना धीर दिला आणी बसमधे बसवले . सर्वजण चुपचापपणे बसमध्ये येउन बसले . कोणच काही बोलत नव्हते . "हा घाट संपला कि एक दहा मिनीटाचा जंगलातुन जाणारा रस्ता आहे . या जंगलाला सर्व गावकरी दिठेरी देवीचे संरक्षीत रान मानतात . त्यामुळे इथे कधी जंगलतोड होत नाही . हा खुप छान गर्द घनदाट परिसर आहे . कुणाला फोटो काढायचे असतील तर अवश्य काढा ." श्री. कारेकर यांनी गंभीर बनलेले वातावरण हलके करण्यासाठी माहिती दिली . सर्वजण शांतपणे बाहेर बघत बसले . कुणीच काहि हालचाल केली नाही . त्या वेड्याच्या धक्क्यातुन अजुन कोणी पुरते सावरले नव्हते . तो वेडा कोण असावा ? तो जगला असेल का ? तो कसले हातवारे , खाणाखुणा करत होता ? काय सांगत होता ? असे प्रश्न सर्वांना पडले होते . अखेर तो दहा मिनीटाचा घनदाट जंगलातुन जाणारा रस्ता संपला . सर्व प्रवाशांना हि शेवटची दहा मिनीटे दहा तासांसारखी लांबलचक वाटली होती . सर्वांनी आता मोकळा श्वास घेतला . वातावरणही थोडे हलके झाले . एक झोकदार वळण घेउन बस गढीच्या मुख्य दारापाशी येउन थांबली . बाहेरुन दिसणारी गढीची भव्य तटबंदी पाहुन सर्व प्रवाशांची उत्सुकता चाळवली गेली . गढीचा मुख्य दरवाजाही चांगलाच भव्य , बुलंद दिसत होता . "चला मंडळी . आपले मुक्कामाचे ठिकाण आले . सरदार दिठेरीकरांची गढी ." कारेकरांनी सुचना दिली . ------ क्रमशः --------------------कथा---------- काल्पनीक ----------------
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
4950 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

उत्कंठावर्धक सुरवात.

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 05/19/2016 - 19:00 नवीन
उत्कंठावर्धक सुरवात. पुढचे भाग लवकर लिहा आता.
  • Log in or register to post comments

भारी लिहिलंय.

प्रचेतस
गुरुवार, 05/19/2016 - 19:38 नवीन
भारी लिहिलंय. भाग तसा लहान झाला असला तरी चांगला झालाय. वातावरणनिर्मिती अजून हवी होती जरा.
  • Log in or register to post comments

क्या बात...

बाबा योगिराज
गुरुवार, 05/19/2016 - 23:30 नवीन
जास्त वेळ वाट पहायला लावू नका. पुलेशु. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

छान जमलीय अगदी, पुढील लेखनास

अभ्या..
गुरुवार, 05/19/2016 - 23:48 नवीन
छान जमलीय अगदी, पुढील लेखनास शुभेच्छा. कोणत्याही वादात न पडता सातत्याने लिहित राहणे आणि इतर लेखकाना नियमित प्रतिसादहि देणे हा तुमचा गुण फार आवडतो.
  • Log in or register to post comments

सुरेख निरीक्षण! +1

असंका
Fri, 05/20/2016 - 07:25 नवीन
सुरेख निरीक्षण! +1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+१

नाखु
Fri, 05/20/2016 - 10:09 नवीन
सगळ्या प्रतिसादास सहमती पुभा प्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

भारी.

रेवती
Fri, 05/20/2016 - 03:28 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments

पुभाप्र

अजया
Fri, 05/20/2016 - 09:20 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

मस्तं! वाचतेय.

पद्मावति
Fri, 05/20/2016 - 15:10 नवीन
मस्तं! वाचतेय.
  • Log in or register to post comments

मस्त. खतरनाक लिहा काहीतरी...मजा येतेय...

समीरसूर
Fri, 05/20/2016 - 15:29 नवीन
मस्त. खतरनाक लिहा काहीतरी...मजा येतेय...
  • Log in or register to post comments

रोचक सुरूवात

सस्नेह
Fri, 05/20/2016 - 17:00 नवीन
येऊदे अजून.
  • Log in or register to post comments

आपल्या प्रतिक्रियांबद्दल

सिरुसेरि
Fri, 05/20/2016 - 18:07 नवीन
आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे .
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक आहे नक्कीच!!

जव्हेरगंज
Fri, 05/20/2016 - 18:39 नवीन
उत्कंठावर्धक आहे नक्कीच!! पुभाप्र!!!
  • Log in or register to post comments

सुरवात तर मस्त आहे...

विवेकपटाईत
Fri, 05/20/2016 - 20:39 नवीन
सुरवात तर मस्त आहे...
  • Log in or register to post comments

टूर म्हणजे नियमित

चलत मुसाफिर
Sun, 05/22/2016 - 07:42 नवीन
पर्यटन कंपनीची टूर होती. म्हणजे ती नियमित दिठेरीकर गढीला येतच असणार (अर्थात वेगवेगळ्या पर्यटकांना घेऊन). तो रस्ता, दरी, वेडा मनुष्य हे सर्व पर्यटकांना परिचयाचे नसले तरी चालक आणि व्यवस्थापकांना असणारच. पुढील भागात या मुद्द्याची दखल घेतली जावी ही विनंती. :-)
  • Log in or register to post comments

@चलत मुसाफिर

सिरुसेरि
Sun, 05/22/2016 - 20:05 नवीन
धन्यवाद . दिठेरीकर गढीला हि पहिलीच टुर होती . ========================================================== कारेकरांनी परत सर्वांचे आभार मानले . मग सर्वांना पुढचा दिनक्रम सांगितला . "मंडळी , हे दिठेरी गाव व येथील ऐतिहासीक गढी आजपर्यंत फारशी ऐकीवात नव्हती . आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सने या वर्षीपासुन मुद्दामुनच या कमी गर्दीच्या ठिकाणी टुर सुरु केली . येथील गढीचे जुने , ऐतिहासिक स्वरुप कायम ठेवुन , त्यामध्ये नवीन आधुनीक सुविधांचा मिलाफ केला आहे . या गढीचे एका हेरिटेज स्थळामधे रुपांतर केले आहे . तुम्ही सर्वांनी आम्हाला जो उत्साही प्रतीसाद दिला त्याबद्दल आमच्या जीवनराज ट्रॅव्हल्सतर्फे मी आपणा सर्वांचे मनापासुन आभार मानतो . " ===================================================
  • Log in or register to post comments

भाग २ व ३

सिरुसेरि
Sun, 05/22/2016 - 20:12 नवीन
सरदार दिठेरीकरांची गढी ----- भाग २ ----- कथा ------ काल्पनीक सरदार दिठेरीकरांची गढी - भाग ३ ----- कथा ------ काल्पनीक
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा