(सदैव माणसा, पुढेच जायचे )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
20 Sep 2008 - 2:34 pm

सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे

सदा तुझ्यापुढे, असे महा दशा
सदैव फसवी टॅरोट्ची दिशा
हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती
मधेच या नाडी, निर्गाठ मारती
बारा जागेतुनी, हळूच जायचे

प्रलोभने तुला हे स्वामी दाविती
ही जन्मकुंडली तूलाच बाधिती,
मंगळ, शनी हा तुला न थांबवी
न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी
न भविष्य तुझे, असे घडायचे

सदैव माणसा, पुढेच जायचे
भविष्य ना पुन्हा कधी बघायचे

( 'भविष्याच्या अंतरंगात' डोकावणारा ) अमोल
---------------------------------------------------------
मुळ गाणे -

सदैव सैनिका, पुढेच जायचे
न मागुती तुवा, कधी फिरायचे

सदा तुझ्यापुढे, उभी असे निशा
सदैव काजळी, दिसायच्या दिशा
मधून मेघ हे, नभास ग्रासती
मधेच या विजा, भयाण हासती
दहा दिशांतुनी, तुफान व्हायचे

प्रलोभने तुला, न लोभ दाविती
न मोहबंधने, पदांस बांधिती
विरोध क्रोध वा, तुला न थांबवी
न मोह भासतो, गजांत वैभवी
न दैन्यही तुझे, कधी सरायचे

गीत - वसंत बापट
संगीत - वसंत देसाई

विडंबन