सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ५

तर्राट जोकर's picture
तर्राट जोकर in काथ्याकूट
8 May 2016 - 11:05 pm
गाभा: 

ह्या मालिकेचा चौथा भाग दोनशे प्रतिसाद पार करुन गेल्याने पाचवा भाग.

माझा प्रश्नः एखाद्या लेखमालेचे आंतरजालासाठी लेखन करतांना किती शब्दमर्यादा असावी जेणेकरुन ती कंटाळवाणी वाटणार नाही, किंवा 'अरे हे काय संपला पण हा भाग' असे वाटणार नाही? तसेच दोन भागांमधे अंदाजे किती काळाचे अंतर असावे?

शब्दमर्यादेचा प्रश्न ह्यासाठी की पीसी-मोबाईलवर वाचतांना अनेक व्यवधाने, व्यत्यय येतात. सलग खूप वेळ मिळणे शक्य नसते. किमान पंधरा मिनिटांत वाचून होईल इतपत भाग असावा असे माझे वैयक्तिक मत. बाकी लेखक-वाचकांच्या अनुभवसिद्ध उत्तरांच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रिया

रघुनाथ.केरकर's picture

28 Jul 2016 - 6:38 pm | रघुनाथ.केरकर

गेट डेटा बॅक , स्टेलार फीनीक्स, आय डेटा केअयर, इजअस तस्सम डेटा रीकोवरी अअ‍ॅप्स डेटा परत मिळवुन देतिल.

अधीक डीटेल्लः
युसबी हार्ड डिस्क उघडुन तीच्या साटा इन्टर्फेस ला केबल ने मदर्बोड ला कन्नेक्ट करा. वींडोज एक्सप्लोरर मध्ये जाउन काही दीसते का बघा, नाही दीसल्यास. रन मध्ये compmgmt.msc टाइप करुन एंटर करा. एक वींडो ओपेन होइल त्यात disk management शोधा. त्यात physical volume दीसतील. त्यात तुमची क्रॅश झालेलि हार्ड डिस्क दीसते का बघा. दीसत असेल तर वरिल पैकि कोणतेही एक अ‍ॅप डाउन लोड करुन रन करा.

दिसत नसल्यास मात्र डीस्क क्लोन करुन r & D करा.

फोटो होतील पण मुवी चि खात्री नाही. आणी मुवी झाल्या तरी दोन मुवीच्या फ्रेम एक मेकांत मिक्स होतील. (हे फार भयंकर, आधीच्या जुन्या मुवीज च्या फ्रेम पण दीसतात मधेच)

मराठी पटापट टाइप करता येत नसल्याने इथेच थांबतो.

चिंचवडमधील माझ्या फ्लॅटमध्ये FM Radio अनेक मोबाईल / निटसा चालत नाही. माझ्याकडे एक म्युजिक सिस्टीम होती तीवर नीट चालत नव्हता, काही मोबाईल्सवर पण नीट चालत नाही. पण एका पाहूण्यांच्या samsung मोबाईल वर बर्‍यापैकी चालला, एका sansui मोबाईल वर पण बरा चालला.
तरी सर्वात उत्तम प्रकारे कोणत्या मोबाईल वर चालेल असा स्वस्तातला मोबाईल घ्यायचा आहे (फक्त FM Radio साठी ..मोबाईलचा स्पीकर फार उत्तम नसला तरी चालेल कारण मी मोबाईल म्युजिक सिस्टीमला जोडणार आहे)
किंवा दुसरा पर्याय म्हणजे नुसता रेडिओ..पण नुसत्या रेडिओचीसुधा खात्री हवी की नीट वाजेल.. मोबाईल गाजराची पुंगी असेल अगदीच worst case fm नीट चालले नाहि तरी मोबाईल घरात कुणाला वापरायला देता येईल (ज्यांना स्मार्ट फोन नकोय अशा कुणाला)
samsung, nokia, sansui अशा पर्यांयाचा विचार करतो आहे

इल्यूमिनाटस's picture

23 Aug 2016 - 8:27 am | इल्यूमिनाटस

माझ्याकडे आहे सॅमसंग हिरो. चालतो बऱ्यापैकी रेडू त्याच्यावर (चिंचवड मध्येच). फक्त जरा मोबाईल उंचीवर ठेवावा लागतो.
हे मॉडेल बंद झाले असेल पण आता. तरी सॅमसंग लाच द्या प्राधान्य

मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 11:34 am | मराठी कथालेखक

धन्यवाद. मी सॅमसंग गुरू चा विचार करतोय. त्याबद्दल काही माहिती आहे का ?

इल्यूमिनाटस's picture

23 Aug 2016 - 3:44 pm | इल्यूमिनाटस
मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 3:46 pm | मराठी कथालेखक

अहो पण त्याचा FM कसा वाजतो...सिग्नल्स नीट पकडतो का याबद्दल माहिती हवीये. अ‍ॅमेझॉन वर विकत मिळतो हे तर माहीत आहे हो ;)

इल्यूमिनाटस's picture

23 Aug 2016 - 3:50 pm | इल्यूमिनाटस

आवं, गुरु मधेच 2- 3 मोडेल आहेत!
ह्याचा स्पीकर चांगला आहे म्हणून याची लिंक दिली

मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 5:46 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद.
पण मी मोबाईल ४.१ म्युजिक सिस्टीमला जोडेन त्यामुळे मोबाइलच्या स्पीकरचे जास्त महत्व नाहि, तरि बहूधा याच मॉडेलचा विचार करेन.

तुम्ही रेडियो साठी antenna चा विचार केला का. आम्ही कॉलेज ला असताना टेरेस वरून एक वायर घेऊन रेडियो च्या antenna ल जोडायचो. तुम्ही DTH च्या डिश ला वायर जोडून त्याच्याच केबल बरोबर खाली आणा. असा काहितरी जुगाड बघा नवीन मोबाईल घेण्यापेक्षा.

मराठी कथालेखक's picture

2 Sep 2016 - 4:56 pm | मराठी कथालेखक

आधीच्या म्युजिक सिस्टिमला १०० रु चा एक अँटेना बसवून पाहिला होता, पण फारसा उपयोग झाला नाही.

इल्यूमिनाटस's picture

23 Aug 2016 - 3:44 pm | इल्यूमिनाटस
वाल्मिक's picture

22 Aug 2016 - 10:48 pm | वाल्मिक

online radio eika ki

मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 11:33 am | मराठी कथालेखक

पुण्यातले कोणते FM online उपलब्ध आहेत ? कोणत्या site वर?
पण तरीही रेडिओ हवाच म्हणा..

सानझरी's picture

23 Aug 2016 - 5:15 pm | सानझरी

गाना च्या अ‍ॅप वर ऑनलाईन रेडिओ ऐकता येईल.
आकाशवाणी ऐकायचं असेल तर बर्‍याच DTH वर दिल्ली प्रसारण उपलब्ध आहे. (Dish TV चं channel no 2400 or 2401.)

.

मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 5:44 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद. gaanaa बघतो. माझ्याकडे Airtel dth आहे , त्यात FM channels नाहीत. शिवाय मला स्थानिक म्हणजे पुण्यातली प्रसारणे (विशेषतः मिर्ची आणि रेड ) ऐकण्यात रस आहे.

अहो, आमचं ऐका ना. रेडिओ सिटी 91.1. पुण्यात पण आहे.

मराठी कथालेखक's picture

23 Aug 2016 - 7:14 pm | मराठी कथालेखक

हो. ते पण. ते ही ऐकतो. तेच म्हणायचय की स्थानिक प्रसारण ऐकायचेत. सकाळी सकाळी रेडिओ ऐकायला बर वाटतं

१)मोबाइलातला रेडिओसाठी सॅमसंग गुरू आहेच,रेकॅार्डींगही होते m4a (mp4)format मध्ये.
पण स्क्रीन 128x196 - 1.8inch फार ताण देते.
२)इंटर्नल एंटेनावाले मोबाइल आता येत नाहीत,हेडफोन वायर लावावी लागतेच.
३)स्पाइसचे मोबाइलात एक एंटेना असायची.
४)माझ्याकडे ट्रान्झिस्टरला १०वाटचा फिलिप्स स्पिकर जोडलेला आहे.दणाणा वाजतो.दोन सेल दोन महिने पुरतात.
५)इंटरनेट रेडिओ म्हणजे तासाला साठ एमबी डेटा उडतो,चारपाच जिबी डेटा महिन्याला लागेल.
६) माझ्याकडे कार्बनचा बटणवाला मोबाइल दोनवर्षांपुर्वी घेतलाय.१८०० एमेच ब्याटरी पाच दिवस जाते.१६०० रु K20+,
एफेम रेकॅार्डींग wavमध्ये/amr होते.
७) एफेम रेकॅार्डींगवालाच घ्या.
८) म्यु सिस्टमला मोबाइल कसा जोडणार?ते कळलं नाही

मराठी कथालेखक's picture

2 Sep 2016 - 5:03 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद
मोबाईलला ३.५ mm output असते, त्याच्याने तो music system ला जोडू शकतो, bluetooth चा ही पर्याय आहेच.
internal antenna च हवी अस काही नाही, मला फक्त fm नीट ऐकायला मिळावे इतकीच इच्छा आहे
internet वर पुण्यातले live प्रक्षेपण सापडले नाहित. gaana.com वर पण नाही. (इकडे साधा रेडिओ लावला आणि तिकडे internet रेडिओ वर तोच स्टेशन वाजवला तर एकच कार्यक्रम ऐकाय्ला मिळावा, पण असं कुठे सापडलं नाही. बाकी broadband असल्याने data usage बद्दल काहि अडचण नाही.

वाइरलेस एँटेनावाले फोन I ball कंपनीचे बाजारात आले आहेत १५००च्या आसपास किंमत आहे.रेकॅार्डींगही आहे.चारपाच हँडसेटस पैकी दोघांत कॅाल रेकॅार्डींगही आहे.अशा रेडियोत चार्जरची /हेडफोनची वायर लावलेली असल्यास रेडियो जोरदार वाजतो असा अनुभव आहे.
Iball feature phones
Neon, skipper,leader,biggy,tarang.

मराठी कथालेखक's picture

5 Sep 2016 - 3:49 pm | मराठी कथालेखक

धन्यवाद

एफेम रेडीओसाठी मी पाह्यलेला सर्वोत्तम फोन. नोकीया एक्स२-०२. साधा बेसिक फोन आहे ड्युएल सिमचा. आवाज एकदम पत्थरफोड आहे. वजन कमीय, कव्हरेज चांगले पकडतो, बॅटरी लाईफ जबरा. विदाउट वायर एफेम वाजतो. अगदी क्लीअर. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याला एफेम ट्रान्समीटर पण आहे. त्याच्यावर बरेच प्रयोग केले पण ते काय असते अजून कळले नाही. बहुधा आपण स्वतंत्र एफेम चालवू शकू असे माझ्या भाबड्या मनाला वाटलेले. :(

खरंय त्यावेळी २०११ मध्ये तीन फोन आलेले X2 00/01/02
परंतू स्पेसि वाचल्यावर कळलं की नोकियाने प्रत्येकात काही विशेष दिलंय तर ते दुसय्रातून गाळलंय.
00 - 5 mp camera,flash,wireless fm.
01 - full big keypad पण कॅम्रा 2 mp,128video
02 - wireless fm. radio trans, fm recording,पण कॅम्रा 2 mp,128video

मी 00 घेतला आणि अजून अफलातून फोटो देतो.

पाटीलभाऊ's picture

2 Sep 2016 - 5:52 pm | पाटीलभाऊ

विंडोज मोबाईलसाठी 'ऑल इंडिया रेडिओ' (AIR) म्हणून एक अँप आहे. त्यावर विविध भारती, आकाशवाणी मराठी ह्या वाहिन्यादेखील आहेत. अँड्रॉइड साठी देखील असेच एखादे अँप असावे.

गोव्याला एन्ट्री फी चालू आहे का? किती आहे?

धन्यवाद...

प्रीत-मोहर's picture

23 Aug 2016 - 3:31 pm | प्रीत-मोहर

आहे. एंट्री फी वाहनापरत्वे बदलते.

झेन's picture

23 Aug 2016 - 4:15 pm | झेन

छोटी चारचाकी 250 रू.

असंका's picture

23 Aug 2016 - 4:55 pm | असंका

आभार्स.. :)

सोनुली's picture

23 Aug 2016 - 8:32 pm | सोनुली

स्वप्नरेखा नावाचे एक पुस्तक याचे काही भाग आहेत. हे पुस्तक काही वर्षांपूर्वी एका लायब्ररीतून आणून वाचले होते. ह्यात प्रमुख पात्र त्रिशला नावाची छोटी मुलगी आहे. सध्या हे पुस्तक कुठे मिळेल??

तुषार काळभोर's picture

23 Aug 2016 - 9:19 pm | तुषार काळभोर
सोनुली's picture

23 Aug 2016 - 9:48 pm | सोनुली

नाही.स्त्री लेखिका आहेत. पूर्ण पुस्तक या त्रिशला वर आधारित आहे. छोटी साधारण २-५ वयापर्यंतचा कालखंड आहे.

मराठी कथालेखक's picture

24 Aug 2016 - 10:38 am | मराठी कथालेखक

आवर्जुन दखल घ्यावे असे मधूर गाणे ..पण 9x झकास पलीकडे फारसे पोहोचले असे वाटत नाही. म्हणून इथे देत आहे. रसिकांनी आनंद घ्यावा,

पी. के.'s picture

26 Aug 2016 - 11:13 am | पी. के.

उद्या व परवा नवी मुंबई-भंडारदरा-अमृतेश्वर मंदिर- रंधा दबदबा-शिवनेरी किल्ला- भीमाशंकर- नवी मुंबई अशी बुलेट राईड करायचे योजले आहे.
1) ओन द व्हे आणि भंडारदरा च्या आजूबाजूला बगण्यासारखी ठिकाणे कोणती?
2)भंडारदरा ते भीमाशंकर रोड कसा आहे? या रोड वर निवासाची सोय कुठे होईल?

एकटा आसल्यामुळे कुठेही निवास करू शकतो.
कृपया मदत करा...

बेसिक , विदाउट कॅमेरा मोबाईल हँडसेटमध्ये सध्या कुठले हँडसेट चांगले आहेत .

वाल्मिक's picture

26 Aug 2016 - 2:14 pm | वाल्मिक

नोकिया 1110 आणि 3310 सोडून काही पण घेऊ नये

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Aug 2016 - 10:44 am | कैलासवासी सोन्याबापु

3310 मिळतो का अजून??

११०० पाह्यला बाप्पू आज, ८०० रु. ला आहे शॉपक्ल्युजला. म्युझिक एक्स्प्रेस सिरिजमधला पण एक दिसला. त्याच्यासाठी आधी लै मरमर केलेली. आता बघू पण वाटेना.
३३१० चा हातोडा काय दिसला नाही.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Aug 2016 - 10:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

आपल्याला 3310 हवा भावड्या, आपण अँड्रॉइड फेकून देऊ त्याच्याकरता

वाल्मिक's picture

29 Aug 2016 - 11:57 am | वाल्मिक

कितीतला घ्याल?

श्रीगुरुजी's picture

28 Aug 2016 - 8:55 pm | श्रीगुरुजी

पुण्यात पांढरा चाफा (देवचाफा) व लाल चाफ्याची रोपे कोठे मिळतील?

रिकामटेकडा's picture

29 Aug 2016 - 10:23 pm | रिकामटेकडा

परवा तळ्यात पोहायला उतरलेल्या व्यक्तीचा पाण्यात सोडलेल्या इलेक्ट्रिक मोटार मुळे पाण्यात सप्लाय येऊन शॉक लागून मृत्यू झाला अशी बातमी वाचनात आली. त्यावरून मनात असा प्रश्न आला कि तळ्याच्या पाण्यात हा इलेक्ट्रिक शॉक लागण्याचे क्षेत्र केवढे असेल. आणि ते कशावर अवलंबून असेल. कारण त्या तळ्यातील पाण्याला जे जे स्पर्श करतील त्याना शॉक लागायला हवा पण तसे होत नाही
कृपया जाणकारांनी खुलासा करावा

सुंबरान चित्रपटात दाखवलेले मंदिर कोणते आणि कुठे आहे, याची कोणाला माहिती आहे का?

ray's picture

5 Sep 2016 - 11:02 pm | ray

पण ते घर दाखवालय ते.. कुरुंदवाडच्या राजवाड्यातलं हाय

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Sep 2016 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु

रिलायन्स जियोची डोंगल आहेत का उपलब्ध, घ्यावीत काय?

सामान्य वाचक's picture

2 Sep 2016 - 1:12 pm | सामान्य वाचक

राउटर किंवा डोन्गल मिळतात का सिम च घ्यावे लागते

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 3:54 pm | संदीप डांगे

डॉण्गल नाही, वायफाय हॉट्स्पॉट आहे.

जियोडॉटकॉम ला विजिट करा.

वाल्मिक's picture

3 Sep 2016 - 8:39 pm | वाल्मिक

दात किडलाय
पुण्यात कोणता डेंटिस्ट्स आहे जो रूट कॅनॉल ना सांगता व्यवस्थित सल्ला देईल ?

सानझरी's picture

5 Sep 2016 - 12:34 pm | सानझरी

डॉ. जोशी, झांबरे पॅलेस, चव्हाण नगर, सातारा रोड
माझी दाढ किडुन पूर्ण पोकळ झाली होती, सिरॅमिकने भरुन दिली त्यांनी. २ वर्ष झालेत, नंतर कधिच काही प्रॉब्लेम नाही आला.
हवा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर व्यनि करते.

वाल्मिक's picture

5 Sep 2016 - 2:42 pm | वाल्मिक

धन्यवाद
खर्च किती झाला ?

सानझरी's picture

5 Sep 2016 - 3:04 pm | सानझरी

सधारण १०००-१२००..

मागे ह्या बद्दल एका धाग्यात उल्लेख झाला होता पण मला सापडत नाहीये. तर कोणी ऑनलाईन पद्धतीने फर्निचर मागवले आहे का ?कितपत विश्वासार्ह आहे ? pepperfry बद्दल काय मत आहे?
कोणी विकत घेतले असल्यास कळवावे , तसेच खर्च कितपत असतो, हिडन चार्जेस असतात का काही, गॅरंटी बद्दल कसे काय असते? रिटर्न पोलिसी वगैरे. हे पण सांगितल्यास बरे होईल. तसेच खराब लाकूड (वाळवी अथवा बोअरर लागलेले) असे फर्निचर नाही हे कसे बघावे?
जेवढी शक्य होईल तेवढी माहिती द्यावी हि विनंती.धन्यवाद.

-तेजस आठवले.

अभिदेश's picture

6 Sep 2016 - 8:23 pm | अभिदेश

फर्निचर बघा. चांगला अनुभव आहे. फक्त लाकडाचं आहे.

अभ्या..'s picture

11 Sep 2016 - 9:41 pm | अभ्या..

पेपरफ्रायचे अनुभव मीच लिहिलेले आधीच्या धाग्यात. चांगला होता अनुभव. स्वस्त मिळाला बेड, मार्केट पेक्षा. मटेरिअल अत्युत्तम आहे. इथले डिलर त्याला नाके मुद्दामुन मुरडतात. मिस्त्रीने चेक करुन सांगितले. त्याचे बोर्ड पार्टिकल असले तरी डेन्सिटी उत्तम आहे. मज्बूत काम आहे. अगदी प्युर वूडचा बेड सद्य काळात परवडणार नाही, मेन्टेनन्स जमत पण नाही. पेपरफ्रायन्ने फ्री डिलिव्हरी दिली. फेस्टिइव्ह ऑफर असतात. पुण्यात तर घरी येऊन फिट करुन देतात. अर्बन लॅडर पण चेक करायला हरकत नाही. मला एकदम भारी ऑफिस चेअर्स १७०० ला एक अशा मिळाल्या. फ्री डिलिव्हरी. (इथे मार्केटात त्या ३००० च्या खाली नव्हत्या)
.
(टीपः माझा पेपरफ्रायशी झैरात संदर्भात कोणताही करार नाही अथवा ही जाहिरात ऑर पेड रिव्ह्यु नाही)

अभिदेश's picture

12 Sep 2016 - 9:01 pm | अभिदेश

छान केलंत , डिस्क्लेमर टाकून ...नाहीतर काही लोकांचे लगेच प्रतिसाद आले असते.

तेजस आठवले's picture

27 Sep 2016 - 6:52 pm | तेजस आठवले

धन्यवाद श्री अभ्या जी,
जर ती लिंक देऊ शकत असाल तर बरे पडेल, एकदा नजरेखालून घालतो. व्यनि मधून कळवलीत तरी चालेल.
धन्यवाद.

-तेजस आठवले.

पिशी अबोली's picture

14 Sep 2016 - 12:51 pm | पिशी अबोली

पेपरफ्रायचा अनुभव चांगला आहे. फक्त वेळ लागतो. अगदी त्याच आठवड्यात मिळत नाही.

बरेच स्वस्त आणि स्टाइलिश फर्निचर भुस्सा बोर्ड पासून बनवतात शिवाय त्यात सांधा नसतो.दुकानाचे इंटिअरिअर जे वाटरप्रुफ प्लाइचे सांधे मारून सन माइका लावून करतात त्या कामाशी या स्वस्त फर्निचरची तुलना होऊ शकत नाही.

संदीप डांगे's picture

5 Sep 2016 - 4:09 pm | संदीप डांगे

सहमत आहे काका, स्वस्त फर्निचर खर्‍या लाकडापासून बनवलेल्या फर्निचरच्या एक तृतीयांश किंमतीत मिळते पण आयुष्य अगदी काही महिन्यांचे असू शकते. तसेच आजकाल पार्टिकल बोर्ड हे इतके प्रगत झाले आहेत की सहजासहजी फरक लक्षात येत नाही.

मिपावर कालपासून नवीन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करतोय. पण "this website has encountered a problem " अशी error येत आहे.
कृपया मदत करावी.

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 4:04 pm | वाल्मिक

मिपाचा 10 व वर्धापन दिन ,पण डाउन time सोडून कितवा ?

कंजूस's picture

7 Sep 2016 - 7:55 am | कंजूस

किती ते ---?
तू तेरा देख.

मिपाकरांनो.. तुमच्या एरियातला गणपती उत्सव काय म्हणतोय. आमच्याइथे हनी सिंगच्या लुंगी डॅन्स नंतर पोलीस सायरनचं म्युझिक लावलंय. अतिशय बिभत्स म्युझिक लागोपाठ सुरू आहे..4 वाजल्यापासून.. आता 5 तास झाले, साधारण अकरा वाजेपर्यंत अजुन सुरू राहील..तुमच्या इथला काय हालहवाल?

सुबोध खरे's picture

11 Sep 2016 - 10:25 pm | सुबोध खरे

मुंबई पोलिसांनी दिनांक ६ आणि १० तारखेला रात्री बारा म्हणजे बारा वाजता सर्व ढोल ताशे इ. कानठळ्या बसवणारे प्रकार बंद केले
अन आज रात्री दहाच्या ठोकळ्याला सर्व मिरवणुकांचे ढोल ताशे बोंबले( लाऊड स्पीकर) इ बंद केले आहेत.
मुंबई पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडेच.
उद्या जमल्यास मुलुंड पोलीस स्टेशन ला जाऊन तेथल्या पोलिसांना धन्यवाद देणार आहे.
एका गणेश मूर्ती बरोबर फक्त चार माणसे आणि दहा ढोल ताशे आणि बोंबले घेऊन हजारो लोकांच्या आरोग्याला धोका देणारे हे प्रकार केंव्हा बंद होतील हे त्या श्री गजाननालाच ठाऊक.

दहाला सगळे लाऊड स्पीकर बंद केले हे ऐकून आनंद झाला. आमच्या इथे काल अकरा वाजेपर्यंत सगळं सुरूच होतं.

मिपापन्खा's picture

15 Sep 2016 - 11:46 am | मिपापन्खा

मला 8 ते 5 या वेळात स्टडी साठी जागा हवी आहे फी असल्यास माफक असावी जागा शांत आणि हवेशीर असावी
कृपया माहिती असल्यास सुचवावे

फेरगुसून कॉलेज शेजारी रानडे वाचनालय

मिपापन्खा's picture

15 Sep 2016 - 1:25 pm | मिपापन्खा

धन्यवाद वाल्मिक

vikramaditya's picture

15 Sep 2016 - 8:14 pm | vikramaditya

मंडळी ,

मी गोरेगाव मुम्बई येथे राहतो. ऑक्टोबर च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहकुटुंब ३ दिवसांची सहल काढू म्हणतो.

बेसिकली , आराम करणे आणि चांगले सामिष (मासळीचे) भोजन करणे असा कार्यक्रम असेल. जवळपास काही टुरिस्ट स्पॉट असेल तर ठीक... किंवा समुद्र किनारा असेल तर उत्तमच.

वडिलांचे वय (७५) लक्षात घेता बोरिवली ते डहाणू या मध्ये एखादा रिसॉर्ट शोधत आहे. कारण फार जास्त प्रवास करू इच्छित नाही.

एखादा चांगला (फॅमिली साठी) रिसॉर्ट कोणी सुचवू शकेल का?

धन्यवाद.

पिशी अबोली's picture

15 Sep 2016 - 11:12 pm | पिशी अबोली

सोनी आय सी रेकॉर्डरमधून महत्वाच्या फाईल्स डिलीट केल्या आहेत चुकून. रिकव्हर करता येतील का?

एकुलता एक डॉन's picture

18 Sep 2016 - 6:22 pm | एकुलता एक डॉन

सरकार कोणताही कर केव्हाही कमी जास्त करू शकते कि काही नियमावली आहे ?
कृपया मार्गदर्शन द्यावे

ऑर्डिनन्समार्फत कायद्यात बदल करून काहीही बदल ताबडतोब करता येतात. पण ऑर्डिनन्सचं आयुष्य सहा महिन्याचं असतं, त्यानंतर तो कायद्यात रूपांतरित करावा लागतो. (संसदेत/विधानसभेत चर्चा वगैरे करून, मतदान घेऊन.)

एकुलता एक डॉन's picture

28 Sep 2016 - 10:35 pm | एकुलता एक डॉन

धन्यवाद

आबा, सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते मात्र वाढवायचा असेल तर मात्र तो बजेट्मध्ये फायनान्स बील मध्येच शक्य असते. हे बरोबर आहे का?

कराच्या दरात काही कमीजास्त करायचं असेल तर बजेट / फायनान्स बिलच लागतं असं नाही. राष्ट्रपतींच्या सहीने काढलेला ऑर्डिनन्सही चालतो.

(राज्यघटनेच्या दृष्टीने बजेट हे "मनी बिल" असतं. आर्टिकल १२३ प्रमाणे संसद ज्या विषयांवर कायदा करू शकते अशा सर्व विषयांवर ऑर्डिनन्स काढायची पावर राष्ट्रपतींना असते. त्यामुळे मनी बिलही ऑर्डिनन्सच्या स्वरूपात आणता येतं.)

सरकार कोणताही कर कधीही कमी करू शकते

मला असा काही नियम असल्याचं ठाऊक नाही. पण मला नाही वाटत असं असेल. लॉजिकली विचार करता - सरकार बजेटचा प्रस्ताव मांडतं, त्यावर चर्चा होते आणि फा० बिलचा फा० अ‍ॅक्ट होतो. आता, त्यात लिहिलेला रेट मध्येच स्वतःच कमी करणं म्हणजे संसदेचा अवमान करण्यासारखं होईल. (पुन्हा हे राजकीय शस्त्र म्हणूनही वापरता येईल.)

डोंबिवलीत चांगला ज्योतीषी माहित आहे का?

मी स्टॅंडिंग डेस्क विकत विचार करतो आहे. मार्गदर्शन हवे
आहे. वापारल्याचा अनूभव असाल्यास पाटदूख़ी मधे काही फरक जनावतो काय?

सचु कुळकर्णी's picture

28 Sep 2016 - 4:00 pm | सचु कुळकर्णी

जर आपल्यापैकि कोणि फॅशन टेक्नोलॉजि / डिझायनिंग चा कोर्स केला असल्यास किंवा माहिति असल्यास ठाणे - डोंबिवलि परिसरात त्यासाठि चांगले कॉलेज किंवा ईन्स्टिट्युट सुचवा. कोर्स केल्यानंतर जॉब च्या संधि कश्या असतिल ? किंवा
स्वतः च काहि छोटेखानि युनिट सुरु करता येईल का ? कोणाला काहि अनुभव किंवा माहिति असल्यास कृपया शेअर करा.

धन्यवाद

वाल्मिक's picture

28 Sep 2016 - 4:41 pm | वाल्मिक

मुंबई आणि पुणे येतेच मोफत वायफाय कुठे कुठे आहे ?

आनंदी गोपाळ's picture

14 Oct 2016 - 10:50 am | आनंदी गोपाळ

रेल्वे स्टेशन वेटिंग रूम्स.

माझ्या हपिसातल्या मुलाला १० हजार स्टेट बँकेच्या सीडीएम ला भरायला सांगितली. बँक टाइम संपला होता. तो भरत असताना नोटा ठेवल्यावर ड्रोवर शटर बंद झाले आणि सर्वर टाइमाऊट झाला. ट्रन्झॅक्शन झालेच नाही. (अकाउंटला जमा झालेच नाही) वॉचमनने एक रिटन कंप्लेंट लिहून घेतली फॉर्मवर. नंबर्/अकाउंट्/डिटेल्स. सकाळी मॅनेजरला बोलले असता त्याने २ दिवस लागतील असे सांगितले. दोन दिवसानी त्याने सांगितले मशीन सर्व्हिसिंग चार दिवसानी आहे. नंतर बँकेच्या सुट्ट्या लागल्या. आता म्हणतोय १५ दिवस लागतील. ह्याला काही नियम, भरपाई, कारवाई असु शकते का? एक कर्मचारी म्हणाला की सीडीएम ही तुम्हाला दिलेली फॅसिलिटी आहे. त्यावर भरपाई मिळत नाही. बँकेने देईल तेंव्हाच मिळतील.
कसे करावे?

संदीप डांगे's picture

12 Oct 2016 - 1:36 pm | संदीप डांगे

ब्यांका उपकार केल्यासारखी सेवा का देतात?

Cdm ला Atm चा सात दिवस वाला नियम लागू असला पाहिजे असे वाटते,

कंजूस's picture

12 Oct 2016 - 2:45 pm | कंजूस

हे सिडिएमचे प्रश्न इथे सांगिलल्याबद्दल धन्यवाद.जागरुकता वाढेल.

अभ्या..'s picture

13 Oct 2016 - 7:09 pm | अभ्या..

कुणी तरी मार्ग सांगा यार. अजून पैसे मिळाले नाही. :(
रात्री जाऊन मशीन खोलू का?

तुषार काळभोर's picture

14 Oct 2016 - 10:06 am | तुषार काळभोर

नको!

सायरन वाजंल!

त्यापेक्षा उचलून घेऊन ये!

टवाळ कार्टा's picture

14 Oct 2016 - 10:59 am | टवाळ कार्टा

मशीनपेक्शा सायबाला उचललस तर पैशावर व्याजपण मिळेल =))

सिरुसेरि's picture

13 Oct 2016 - 7:01 pm | सिरुसेरि

मिसळपाव सारखी ईंग्रजी लेख वाचण्यासाठी कुठली वेबसाईट चांगली आहे .

राघवेंद्र's picture

13 Oct 2016 - 7:28 pm | राघवेंद्र
प्रदीप's picture

5 Nov 2016 - 10:49 am | प्रदीप

छानच आहे. पण अलिकडे त्यात एक गंमत अनुभवली. मी परदेशात रहातो, तेथून मी ते वापरायला लागलो. तेव्हा कुठल्याही विषयावर उत्तरे देणारे बहुराष्ट्रीय असत. मध्यंतरी मी भारतात गेलो असतां, तेथून कोराला लॉग- इन केल्यावर त्याच विषयांवरील बहुसंख्य उत्तरे भारतांतील भारतीयांनी दिलेलीच येऊ लागली. मी स्वतः हे काही बदलू शकलो नाही. नंतर मी माझ्या देशात आल्यावर फीड पूर्ववत झाला. आता येथे भारतातील भारतीयांनी दिलेली उत्तरे दिसत नाहीत. आणि मी तसा प्रयत्न करूनही ती माझ्या फीडमधे येत नाहीत.

साधा मुलगा's picture

14 Oct 2016 - 11:23 am | साधा मुलगा

आठवड्या पूर्वीच्या पावसामुळे आतील भिंत ओली झाली आहे, त्यावर रंग मारायचा आहे, रंगारी भिंत वाळू द्या म्हणतो, भिंत लवकर सुकेल यासाठी काही उपाय आहेत काय?

मार्मिक गोडसे's picture

14 Oct 2016 - 4:23 pm | मार्मिक गोडसे

ऑक्टोबर हीटने वाळेल भिंत.
हा प्रयोग करुन बघा. आठवडाभराने ओल नसलेल्या व ओलवाल्या भिंतीचा एक छोटा भाग पॉलिश पेपरने घासून घ्या व त्यावर पत्र्याने वॉल पुट्टी लावा. २४ तासानंतर दोन्ही भिंतींच्या पुट्टीत काहीही फरक दिसत नसेल तर रंगकाम करायला हरकत नाही.

साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 10:28 am | साधा मुलगा

धन्यवाद,वाळली भिंत ऑक्टोबर हिट ने! रंग काम पण झाले!

पिशी अबोली's picture

14 Oct 2016 - 10:13 pm | पिशी अबोली

1. टोपली कारवी रायरेश्वर पठारावर फुलली आहे का?
2. तिचा बहर कधीपर्यंत टिकतो साधारण? नोव्हेंबर पर्यंत असू शकेल का 15-20 दिवसात संपेल?

मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर पुणे इथे जाण्यासाठी चार्टर्ड कॅब मिळतात का ? या कॅबची उपलब्धता कशी असते ? भाडे किती घेतात ?

पिशी अबोली's picture

21 Oct 2016 - 12:00 am | पिशी अबोली

Kk travels. मला वाटतं 24 तास आधी बुक करावी लागते. चार्टर्ड साठी 2700 च्या दरम्यान असेल भाडं.

साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 10:32 am | साधा मुलगा

माझ्या अँड्रॉइड फोने वरचे सर्व काँटॅक्टस हे G-mail account वर सेव्ह झाले आहेत, सिम कार्ड वर नाही, त्यामुळे मी सिम कार्ड change करून दुसऱ्या फोन वर टाकले तर सर्व काँटॅक्टस गायब होतात, ते gmail चे सीम कार्ड वर परत कसे आणायचे?

कॉन्टॅक्टस>म्यानेज कॉन्टॅक्टस > इंपोर्ट/ एक्सपोर्टस कॉन्टॅक्टस > एक्स्पोर्ट टु सिम कार्ड.

आशा प्रकारे तुमी कॉन्टॅक्टस चा बॅकअप मेमरी कार्ड वर पण घेऊ शकता.

साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 1:17 pm | साधा मुलगा
साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 1:18 pm | साधा मुलगा
साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 1:20 pm | साधा मुलगा
साधा मुलगा's picture

5 Nov 2016 - 1:21 pm | साधा मुलगा
मराठी कथालेखक's picture

10 Jan 2018 - 1:51 pm | मराठी कथालेखक

एखाद्या अंध व्यक्तीला नेत्रदानाने दृष्टी लाभली असेल तर अशी व्यक्ती मृत्युपश्चात नेत्रदान करु शकते का ?
जर उत्तर हो असेल तर असे किती वेळा एखादे नेत्र दान केले जावू शकते ?

अंदाजाने उत्तर देतेय:

शरीरातील प्रत्येक अवयव एक्सपायरी डेट घेऊन येत असणार. त्यामुळे डोळे खराब होणार. परतपरत वापरता येणार नाही.

+
दुसर्या व्यक्तिचा अवयव सूट होणं हे बऱ्यापैकी अवघड असणार. त्यामुळे नेत्रदान केले तरी त्याचा उपयोग कोणालातरी होईलच अशी खात्री नाही.

नेत्रदानाने दृष्टी लाभली ???

- नेत्रदानाने दृष्टी लाभते? सर्वच आंधळे डोळस झाले नसते का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2018 - 8:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

नेत्रदान हा एक प्रकारे चुकीचा शब्द (मिसनोमर) आहे. नेत्रदानातून मिळालेल्या संपूर्ण डोळ्याचे (आयबॉल) रोपण केले जात नाही, तर केवळ डोळ्यातील समोरच्या पारदर्शक पडद्याचे (स्वच्छमण्डल, कॉर्निया) रोपण केले जाते.


(चित्र जालावरून साभार)

अर्थातच,

१. कॉर्नियातील दोषामुळे (ती अपारदर्शक असणे/होणे, तिच्या वक्रतेत/गोलाईत खूप दोष असणे/होणे, इ) दृष्टीदोष असल्यास नवीन कॉर्नियाचे रोपण करून फायदा होऊ शकतो.

२. डोळ्याच्या इतर भागांच्या... उदा. दृष्टि तन्त्रिका (ऑप्टिक नर्व्ह), नेत्र/दृष्टी-पटल (रेटिना), डोळ्याचे भिंग (लेन्स), इत्यादींच्या... आजारांवर कॉर्नियाचे रोपण हा उपाय होऊ शकत नाही.

मराठी कथालेखक's picture

11 Jan 2018 - 5:40 pm | मराठी कथालेखक

बरं पण कार्नियाचे रोपण एकाकडून दूसर्‍याकडे होते.. मग दूसर्‍याकडून तिसर्‍यकडे आणि पुढे असे होवू शकते का

चांगले डोळे मिळत असताना कोण दुसय्रा तिसय्रा पायरीवर उतरेल?
प्रश्नाचा रोख नक्की कशाबद्दल आहे?

एखाद्या राज्याला किती उप मुख्य मंत्री पाहिजे ह्याला काही नियम आहेत का ? आंध्र ला ५ आहेत

तुषार काळभोर's picture

7 Jun 2019 - 9:27 pm | तुषार काळभोर

अशी आहे.
समजा N एवढे विधानसभा सदस्य असतील तर जास्तीत जास्त N-2 एवढे उपमुख्यमंत्री होऊ शकतील.

जॉनविक्क's picture

7 Jun 2019 - 10:42 pm | जॉनविक्क

पण याला लीप इयर इलेकशन अपवाद आहे असे कोणतरी म्हणत होतं.

श्वेता२४'s picture

7 Jun 2019 - 11:57 pm | श्वेता२४

उपमुख्यमंत्री पद घटनात्मक पद नाही

हस्तर's picture

14 Jun 2019 - 10:59 am | हस्तर

N-२

कसा ?

N - (मुख्यमंत्री + विधानसभा अध्यक्ष) = संभाव्य उपमुख्यमंत्र्यांची संख्या

हस्तर's picture

14 Jun 2019 - 12:41 pm | हस्तर

विरोधी पक्ष ?

तुषार काळभोर's picture

14 Jun 2019 - 1:48 pm | तुषार काळभोर

सत्तेत नसलेल्या पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या किंवा अपक्ष आमदाराला उपमुख्यमंत्रीपपद किंवा फॉर दॅट मॅटर कोणतंही मंत्रीपद देणं घटनाबाह्य नसावं. त्यामुळं आतासुद्धा देवेंद्रफडणवीस अजित पवार, धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री बनवू शकतात.

फडणवीस साहेब उप सोडा मुख्यमंत्री पदही अनिल कपूर ला देउ शकतात ;)
=))