गो बाय

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
30 Apr 2016 - 11:33 am

(माझ्या ४ वर्षाच्या मुलीला लिहीलेल एक पत्र जे ती आणिक थोडी मोठी झाली की वाचेल आणिक मला येऊन घट्ट बिलगेल नेहेमी सारखी )

गो बाय तुला येऊन चार वर्ष झाली. तू आलीस म्हणून जगण्याला एक कारण मिळाल अगदी एकूलत एक. आई बापाच्या अकाली जाण्याने मोडून गेलेल्या एका माणसाला उमेद मिळाली.

गो बाय तूला आठवतय का. पोटात असताना तू गर्भ सन्स्काराची सी डी ऐकायचीस अगदी शान्तपणे. कधी कधी खूप मस्ती करायचीस आईला लाथा मारायचीस मग मी कसलस स्तोत्र म्हटल की शान्त व्हायचीस अगदी शहाण्या बाळा सारखी. मग ०५/०३/१२ ला तू आलीस अगदी तुझ्या मावशी आजीच्या तारखेला तू आलीस. लोक म्हणाले बहीणीच्या तारखेला तिची आजीच परत आली. अगदी माझ्या आई सारख्या डाव्या हातावर पानाची खुण घेउन आलीस. मग मीही हेलावलो आणि म्हटल माझी आई आली. तुला आठवतय का तू घरी यायच्या आधी मी स्वतःच्या हातने पूर्ण घर फिनाईलने धुवून काढल फक्त आणिक फक्त तुझ्या साठीच गो बाय. मग तुझ्या साठी केक आणायला जात होतो तेन्व्हा एका म्हातार्‍याने विचारल " काय झाल ? " मी म्हटल मुलगी झाली छान तेन्व्हा तो पिचकला " डोण्ट गेट नर्व्हस " मस्तकात तिडीक गेली. वाटल तिथल्या तिथे त्याला कानफटाव. प्रत्यक्षात मी बेफाम हसलो त्याच्या तोण्डावर. म्हातारा खजील झाला बहुदा

गो बाय मग तू घरी आलीस घराला र.न्ग आला. तुझ्या साठी सत्व बनवण्यात तुला ते खाववण्यात, लाळेराने तुझे तोन्ड पुसण्यात, तुझे ल.न्गोट बदलण्यात तुला झोपवण्यासाठी गाणे म्हणण्यात वेळ कसा गेला ते कळ्लच नाही. आयुष्याला खर्‍या अर्थाने अर्थ आला.

गो बाय तू थोडी मोठी झालीस बोबडे बोल बोलू लागलीस घराला हसवू लागलीस दुडूदुडू धावायला लागलीस. मी झोपलो की माझ्या पोटावर येऊन बसायला लागलीस . गाणी म्हणायला लागलीस. सान्गायला लागलीस की मी डॉक्टर होणार आणि मग काय करणार तर म्हणे घर बा.न्धणार अश्या बाल-लीलानी हसवायला लागलीस. आता शाळेत जायला लागलीस शाळेतल्या गम्मती सान्गायला लागलीस. मला कुठे दुखल तर औषध लावायला लागलीस. मी लटका रागावलो की न कळून मला बिलगयला लागली. गाणी म्हणायला लागलीस, नाच करायला लागलीस. नूस्ती मज्जमाडी.

गो बाय तू थोडी झालीस की कदाचित माझे पत्र वाचशील. मग थोडीशी हळवी होशील. तेन्व्हाही मला बिलगशील. कदाचित रडशील, माझ्याबरोबर. आपण दोघ खुप खुप रडू एकत्र बसून. रडणे सम्पता सम्पता हसू बरोबर बसून. मग तू मला कदाचित माझी आवडती कॉफी करून देशील माझी आई द्यायची तशी. फक्त फरक एकच आहे आईला म्हणायच राहून गेल पण तुला मी म्हणेन गो बाय तू मला खुप खुप आवडतेस.

तू मला खुप खुप आवडतेस

गो बाय

मांडणीविचार

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2016 - 11:42 am | डॉ सुहास म्हात्रे

हृद्य मनोगत ! डोळा पाणी आणणारे !

तुमची मुलगी हे मोठेपणी जेव्हा वाचेल तेव्हा तिला भरून येईल आणि ती आपल्या बाबाला बिलगेल, नि:संशय !

विजय पुरोहित's picture

1 May 2016 - 10:15 am | विजय पुरोहित

सहमत. अगदी खरे.

नीलमोहर's picture

30 Apr 2016 - 12:00 pm | नीलमोहर

अजून पुढे किती गंमतीजंमती होतील पाहत राहा, मुली म्हणजे आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा असतो...

नाखु's picture

30 Apr 2016 - 3:00 pm | नाखु

आयुष्यभरासाठीचा आनंदाचा ठेवा मोठा होताना पाहण्याचे सुख शब्दातीत आहे.

पा लक नाखु

सविता००१'s picture

30 Apr 2016 - 12:49 pm | सविता००१

खूप गोड लिहिलंय

पद्मावति's picture

30 Apr 2016 - 2:55 pm | पद्मावति

खरंच खूप गोड लिहिलंय. मस्तं!

सोनुली's picture

30 Apr 2016 - 3:09 pm | सोनुली

छान लेख आहे.

सुबोध खरे's picture

30 Apr 2016 - 3:13 pm | सुबोध खरे

+100

डोळ्यात पाणी आणणारे लिहितोस.

बोका-ए-आझम's picture

2 May 2016 - 12:00 am | बोका-ए-आझम

ज्यांना मुलगी आहे ते भाग्यवान!

रेवती's picture

2 May 2016 - 1:09 am | रेवती

छान लिहिलय.

मूखदूर्बळ's picture

2 May 2016 - 11:23 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

त्यामुळे मुलीची ओढ आणि प्रेम काय काय असतं याचा अनुभव आहे. छान लिहीलंय तुम्ही.

जगप्रवासी's picture

2 May 2016 - 5:48 pm | जगप्रवासी

छान लिहिलय.

सूड's picture

2 May 2016 - 7:42 pm | सूड

.

मूखदूर्बळ's picture

3 May 2016 - 10:31 am | मूखदूर्बळ

परत एकदा धन्यवाद

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 May 2016 - 1:43 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फार छान. मला पण लेक आहे. मी रिलेट करु शकते.

मितान's picture

3 May 2016 - 6:15 pm | मितान

रिलेट करता आले.. :)

यशोधरा's picture

3 May 2016 - 6:47 pm | यशोधरा

खूप हृदय आणि सुंदर.

भरुन आलं वाचताना.मुलगी नसल्याची कायम उणीव भासतेच..

मूखदूर्बळ's picture

4 May 2016 - 9:57 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

उल्का's picture

4 May 2016 - 10:52 am | उल्का

पत्र आवडले. खात्रीने लेकिला तर खूपच आवडणार ह्यात शंकाच नाही.
मुलं मोठी झाल्यावर लहान्पणीच्या गमती जमती ऐकायला त्याना खूप आवडतं. :)