महत्वाची सूचना

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
4 Apr 2016 - 5:47 pm

सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.

मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये.

जे सदस्य याचा विचार न करता दुसर्‍या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 2:57 pm | टवाळ कार्टा

१०० निमित्त "भाऊंचे भाऊ" उडाले?

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2016 - 3:05 pm | पिलीयन रायडर

वरचा प्रतिसाद द्यायच्या आधी तेच चेकवुन आले होते.. तर चक्क दिसली प्रोफाईल..
त्यांचे प्रतिसाद बघता त्यांना उडवुन घ्यायचीच इच्छा असावी. नेक्श्ट डु आयडी अ‍ॅक्टीव्हेट करतील आता..

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 3:18 pm | टवाळ कार्टा

नवीन आयडीबद्दल वैट्ट नै हा बोलायचे...आयडी उडाला की पापे संपतात इथे :)

वैभव जाधव's picture

5 Apr 2016 - 10:10 pm | वैभव जाधव

>>>त्यांचे प्रतिसाद बघता त्यांना 'खातं' उडवुन घ्यायचीच इच्छा असावी.

हे 'असं' आहे ना ओ?

इरसाल's picture

5 Apr 2016 - 2:05 pm | इरसाल

तुम्हाला मिसळ्पाव ऐवजी मिपक्रम कराय्चेय कॉय्य.

मराठी कथालेखक's picture

5 Apr 2016 - 2:19 pm | मराठी कथालेखक

प्रतिसादाचे indent एकच ठेवा (मायबोली प्रमाणे)...वादविवाद खूप कमी होतील.

पैसा's picture

5 Apr 2016 - 2:24 pm | पैसा

क्या बात है! मस्त चालू आहे धुळवड. कोणाकोणाला बॅन करायचे शोधायला प्रशांतला दुसर्‍या कोणत्याच धाग्यावर जायला नको! असे समजदार सदस्य पाहिजेत!

स्नेहांकिता's picture

5 Apr 2016 - 2:30 pm | स्नेहांकिता

गूळ तिथे माशा आणि सूचना तिथे डूआय्डींचा तमाशा...!

मार्कस ऑरेलियस's picture

5 Apr 2016 - 4:43 pm | मार्कस ऑरेलियस

कोणाकोणाला बॅन करायचे

हा हा हा ! ह्यावरुन एक किसा आठवला :

एकदा कॅप्टन सौरव गांगुली ने कोच ग्रेग चॅपेल ला विचारले "टिम पर्फॉर्म करत नाहीये , टीम मधुन कोणाला काढुन टाकावे ?"
ग्रेग चॅपेल म्हणाले - " सर्वात आधी तुलाच काढुन टाकले पाहिजे टीम मधुन "

=))))

नाव आडनाव's picture

5 Apr 2016 - 5:05 pm | नाव आडनाव

लैच लांब हाणला सिक्सर, पर्फेक्ट टाइमिंग :):):)

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 5:42 pm | टवाळ कार्टा

अर्रे पण गेला चॅपेलच ना...गांगुली आप्ला चॅपेल परका फिरंगी

पैसा's picture

5 Apr 2016 - 7:37 pm | पैसा

तुम्ही मिपाचे ग्रेग चॅपेल आणि मी गांगुली असे समजताय का? छानच्च हो!

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 9:27 pm | टवाळ कार्टा

प्रगोबरोबर आणखी कोणाचे नंबर लागले? :)

नीलमोहर's picture

5 Apr 2016 - 10:37 pm | नीलमोहर

एक ना एक दिन सबको जाना है बेटा..
मला हा विचार पडलाय कि सगळे आयडी उडाल्यावर आणि उडवल्यावर सर्वात शेवटी मिपावर कोण उरणार आहे :)

एवढ्या एका कोमेंट साठी उडवला आयडी ?

आणि बाकीचे दरिद्री आयडी काय मिपाचे रत्न म्हणून ठेवलेत का ?

हो तर परसाकडल्या कविता कोण पाडेल मग?

अद्द्या's picture

5 Apr 2016 - 11:45 pm | अद्द्या

त्या तर सभ्य असतात न ?

वैभव जाधव's picture

6 Apr 2016 - 12:11 am | वैभव जाधव

त्या 'तू माझे पुसू, मी तुझे पुसू' वाल्या कविता का?

नाव आडनाव's picture

5 Apr 2016 - 11:07 pm | नाव आडनाव

ह्या कमेंट मुळे आयडी उडवला?

बाकी धाग्यावर नेहमीच्या डु आयडी दंगा करतातच,
"लक्ष नका देऊ " इत्यादी सूचना हि पाळल्या, या धाग्यावर हि तेच चाललंय .

मज्जाय सगळीच

अद्द्या's picture

5 Apr 2016 - 2:45 pm | अद्द्या

एखादा आयडी जो पर्यंत त्रास देत नाही तो पर्यंत तो डू असूनही काढू नये,

हे धोरण आहे इथलं, पण एखादा आयडी आधी काढला गेलाय , आणि तोच माणूस पुन्हा नवीन आयडी घेऊन येतो आणि स्वतः ओळख सांगतो किंवा लिखाणावरून समजतं, तरीही त्या आयडीचा हिशोब square one पासून मोजला जातो का ? आणि असले तर ते चूक नाही का ? आणि जर तसं नसेल तर ते का होतं ?

सर्व संपादक आणि मालक लोक आपली कामं सांभाळून हे संस्थळ सांभाळतात, हे कारण मान्य च आहे , आणि त्याबद्दल त्यांच्याबद्दल आदर आहेच. पण हे कामं हाती घेतलाय तर जिथे कडक व्हायला हवं तिथे का होत नाहीये ?
मला नाही वाटत या संस्थळाला लेखकांची कधी कमी भासली आहे, पण तरी "जाऊदे रे " हि मानसिकता का ठेवली जाते हे समजलं नाही

भिकापाटील's picture

5 Apr 2016 - 11:18 pm | भिकापाटील

Mr. Modi to Obama : How do you manage to grow your country so nicely . . ????
Obama : It's because of Indians . . .
Mr. Modi shocked : How because of Indians . . ?
Obama : You give jobs to Reserved Indians and we give the jobs to the Deserved Indians.

गिर्जाला उडवणार्‍यांची लायकी पुनरेकवार कळाली. चान चान बरंका.

नाखु's picture

6 Apr 2016 - 8:50 am | नाखु

नक्की का कारवाई झाली ते कळणे आवश्यक आहे असे वाटते ( जर धोरण पारदर्शक आहे असा सतत वाचकांवर बिंबवले जाते) आणि त्या तथाकथीत प्रमादाची श्रेणी जर इतरे(प्रिय) जनांपेक्षा सामन्य असेल तर हेतुबद्दल नक्कीच शंका येते.

मिपा वाचकाम्तून सभासद आणि सभसदांतून लेखक यावेत हे मनोमन वाटणारा मिपावारकरी नाखु

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 9:52 am | टवाळ कार्टा

हायला बॅट्याला पण उडवले???
इजा (प्रगो) झाला, बिजा (बॅट्या) झाला ता तिजा (टका)?????

टवाळ कार्टा's picture

6 Apr 2016 - 9:53 am | टवाळ कार्टा

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...आयडी बदलायचे विसरलो =))

कवितानागेश's picture

6 Apr 2016 - 9:43 am | कवितानागेश

कडक कारवाई करावी यावर सगळ्यांचेच एकमत आहे तर!

रातराणी's picture

6 Apr 2016 - 11:25 am | रातराणी

सरनार कधी रण :)

दुर्गविहारी's picture

6 Apr 2016 - 12:54 pm | दुर्गविहारी

या निमित्ताने दोन शब्द माझेही.
खरेतर मित्रामुळे हे सन्केतस्थळ कळाले. सह्याद्रीतले ट्रेक हीच एकमेव पॅशन असनार्या मला मिसळपाव खुप आवड्ले. रोज न चुकता मिसळपाव एक फेरी ठरलेली. इथके अनेक लेख नुसते वाचले नाहीत तर डि.व्ही.डि. वर सेव्ह करून इतराना वाचन्यास दिले. राजकारणामध्ये मला काडीचाही रस नव्हता आणि समजही नव्हती. मात्र आज राजकारणावर जे काही बोलू शकतो आणि आमच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप वर लिहू शकतो, त्याचे १००% श्रेय मिपाला. माझ्या गड्किल्ल्याविषयी माहितीचा इतराना उपयोग व्हावा, या साठी मिपावर आयडि काढला. माझा एक मित्र नविन हॉटेल काढणार आहे, त्याला पेठकरकाकाच्या प्रतिसादाची लिन्क दिली.
मात्र नवख्या लेखकाने लिहीलेल्या लेखावरती ज्या पद्धतीने प्रतिक्रीया येतात, त्या बघता इथे लिहावे की नाही हि शन्का मनामध्ये निर्माण झाली आहे. मला विषेश करुन खटकतो तो पॉपकॉर्न नामक प्रकार. माझ्या माहितीत तरी प्रत्येक धाग्यावरती प्रतिक्रीया देणे हे बन्धकारक नाही, असे असताना, उगाच मी वरच्या फान्दीवर बसते, तिकडे सरकून मला जागा दे, चखणा आण, पहील्या सिटवर बसलोय या सर्व प्रतिक्रीया कशासाठी ? जर काथ्थाकूट करायचा नसेल, तर त्या धाग्यावर फिरकू नका किन्वा या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास, त्याची लिन्क तिथे द्या, धाग्यात नविन मान्ड्णी असल्यास नव्याने चर्चा सुरु करता येइल. पण हे टोमणे का ? प्रत्येकजण इथे केन्व्हा ना केन्व्हा तरी नवीन होतेच ना?
अशाने बरेच वाचनमात्र असलेले वाचक की ज्यान्च्या कडे कदाचित खुप चान्गली माहिती किन्वा प्रतिभा असेल ते मिपावर लेखन करायचे की नाही याचा दहादा विचार करतील. मलाही इथे लिहावे की नाही याची शन्का वाटु लागली आहे. बर्याच नवीन आयडिच्या मिपा सदस्यत्वाच्या कालावधीवरून बोलले जाते. सदस्यत्व किती काळाचे आहे हे महत्वाचे की त्याने मान्ड्लेले विचार ? असो.
जर माझ्या लेखनामुळे कोणी सदस्य दुखावले गेले असतील तर क्षमस्व. माझी टिका गैरलागू आहे असे वाटले, तर जरूर हा प्रतिसाद उडवावा. मात्र मिपासारख्या चान्गल्या सन्स्थळाविषयी आतून वाटणार्या कळकळीतुन हा प्रतिसाद आला आहे याची नोद व्हावी.
इति लेखनसीमा

प्रकाश घाटपांडे's picture

6 Apr 2016 - 12:55 pm | प्रकाश घाटपांडे

सर्व सभासदांचे व्हेरिफिकेशन जर बायोमेट्रिक केले तर काय होईल? कसे करणार हेही आहेच.

आशु जोग's picture

6 Apr 2016 - 1:00 pm | आशु जोग

कमेंट्स पाहून... हा धागा कशा संबंधी आहे असा प्रश्न पडतो. लोक्सनी नेहमीच्याच गप्पा सुरु केल्या आहेत

भरत्_पलुसकर's picture

6 Apr 2016 - 1:09 pm | भरत्_पलुसकर

अर्र्र धूमशान क्शापायी एवढं? शांत व्हा मंडळी.

कुणाच्या विचारांचा दर्जा कुणी ठरवू शकत नाही पण माझ्या वडिलांबद्दलच्या कवितांना घाणेरड्या प्रतिक्रिया आल्या. याबाबत आपले काही मार्गदर्शन मिळेल का? मला अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचे असते हे माहीत आहे. मला खरेच त्यांची कीव...कीव येते.कुठलाही माणूस असे दुर्गंधीयुक्त विचार घेऊन मोठा होत नसतो.