महत्वाची सूचना

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
4 Apr 2016 - 5:47 pm

सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत.

मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये.

जे सदस्य याचा विचार न करता दुसर्‍या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.

प्रतिक्रिया

एवढा मोठा गोतावळा संभाळने फार अवघड काम आहे, त्यात आणखी पिंडे पिंडे मतभिन्नता असनारच, पन म्हणुन सभ्यतेच्या मर्यादा सोडुन बोलने न पटनारेच आहे, मिसळपावचे काही आयडी आमच्या सारख्या सामान्य/फुकटवाचक आयडींसाठी स्टार पेक्षा कमी नाहीत, इथले खेळकर वातावरण टिकवण्याची जबाबदारी मात्र संस्थळ मालकांची नसुन इथे वावरनारांची, नवनवे वाचायला / प्रकाशित करायला किंवा धमाल करायला येनारांची आहे, थोडक्यात काय तर आपल्याला फुकटात बरच काही भेटलय थोड्यांचा नालायकपना न सगळ्यांची माती व्हायची
येवढे बोलुन मि माझे दोन शब्द संपवतो
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मिसळपाव

अस्वस्थामा's picture

4 Apr 2016 - 8:38 pm | अस्वस्थामा

येवढे बोलुन मि माझे दोन शब्द संपवतो
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मिसळपाव

ओ, पन तुमी "भारत माता की जय" का म्हनला नाय ओ ?

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 8:39 pm | एकांतप्रेमी

बरोबर आहे बाबुदा. पण काये ना की याच भूमीवर राहून, इथेच व्यवसाय, नोकर्या, भटजीगिरी करणारे काहीजण पुन्हा आंतरजालावर हिंदु धर्म, देवीदेवता, श्रद्धास्थाने यांचेविषयी अश्लाघ्य, घृणास्पद, निंदाजनक गर्दभ लाथा झाडत फिरतात. तेव्हा असल्या मर्कटमानवांच्या लीलांचा बंदोबस्त करावाच लागतो हो.

चांदणे संदीप's picture

4 Apr 2016 - 8:41 pm | चांदणे संदीप

संपूर्ण प्रतिसादाला अनुमोदन!

मिपा फुकट आहे हे यानिमित्ताने अधोरेखित करतो. पैसे देऊन मेगाबायटी प्रतिसाद किंवा एकूणच हमरीतुमरी, स्कोर सेटलिंग, कंपूबाजी हे काही सदस्य करतील का? असा प्रश्न पडतो.

करून टाका वार्षिक सभासद फी, होऊन जाऊदे!

ई लोवे मिपा! :)

Sandy

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Apr 2016 - 9:24 pm | लॉरी टांगटूंगकर

मिपावर आपले स्वागत आहे.

lgodbole's picture

4 Apr 2016 - 9:38 pm | lgodbole

छान

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 9:44 pm | एकांतप्रेमी

अरे वा मोगा/दादूस/हीतेश/नाना/माई/तजो/काके...
तुम्हाला हा धागा आवडला का? वा वा वा!

प्रचेतस's picture

4 Apr 2016 - 9:56 pm | प्रचेतस

ह्या धाग्यावर पण काही डू आयडींचा सुकाळ झालेला दिसतोय. :)

एस's picture

4 Apr 2016 - 10:24 pm | एस

त्यातल्या एका डुआयडीला मी पकडलंयही. बघूयात हे महाशय अजून किती खाली घसरताहेत ते.

एस's picture

5 Apr 2016 - 1:29 pm | एस

गेल्या वेळेप्रमाणेच हाही बाण अचूक वर्मी लागला की! =))

बादवे, मला अशा आयडींमागील व्यक्तींबद्दल कधीकधी कणव वाटते. बिचारे मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात. त्यामागे बहुतेक वेळेस शोषणाचा, पीडनाचा इतिहास असतो. त्यातून येणारी असुरक्षिततेची भावना हे लोक टाळू शकत नाहीत. शिवाय आपल्या कृत्यांची जबाबदारी घेण्याइतपत धैर्यही यांच्या छातीत नसते. मग या सगळ्या कुचंबणेतून डुआयडी घेऊन प्रच्छन्न शिवीगाळ करणे, प्रक्षोभक प्रतिसाद देणे, चिखलफेक करणे असे प्रकार यांच्या हातून घडतात. या असुरक्षिततेच्या व आत्मविश्वासाच्या अभावाच्या मुळाशी सामाजिक अस्वीकृतीची जाणीव यांच्या मनात असते व ती भयानकपणे यांना त्रास देत असते. तेव्हा आपणही यांच्या प्रतिसादांच्या पातळीवर खाली चिखलात उतरून प्रत्युत्तर देऊ पाहणे हे एका अर्थाने त्यांच्या ह्या मानसिकतेला खतपाणी घालणेच ठरेल.

वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात

वैयक्तिक आणि अपमानास्पद याची एकच आणि निर्विवाद व्याख्या सर्वांसाठी जाहीर व्हावी.

कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा

अशा तक्रारींची दखल घेतली जात नाही असा अनुभव आहे. परिणामी संबधित प्रतिसाद धोरणात बसतो आणि त्यात कोणताही व्यक्तिगत रोख किंवा अपमान नाही असा अर्थ निघतो. मग त्यावर तशाच स्वरुपाचे प्रतिसाद देण्याशिवाय पर्याय राहात नाही. एकदा असा सिलसिला सुरु झाला की वातावरण बिघडत जाते.

हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर पहिल्यांदा `व्यक्तिगत रोख आणि अपमान' यांची स्पष्ट व्याख्या हवी आणि त्यानुसार कोणत्याही सदस्यानं तक्रार केल्यास त्याला संमंकडून किमान उत्तर (स्पष्टीकरण नाही) तरी दिलं जावं.

मूळात तक्रार निवारणाची प्रक्रिया जितकी जलद तितकी व्यक्तिगत आणि अवमानकारक प्रतिसाद आणि लेखन संपुष्टात येण्याची शक्यता जास्त.

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 10:31 pm | एकांतप्रेमी

हा हा वरती स्वतःला इन्स्पेक्टर प्रध्युम्न समजणारे काही स भुक्कड फारच थयथयाट करून राहीलेत हो!

विवेक ठाकूर's picture

4 Apr 2016 - 10:42 pm | विवेक ठाकूर

विषय काय आणि प्रतिसाद काय!

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 10:43 pm | एकांतप्रेमी

ओ विठामाऊली तुमचीच बाजू घेतोय. काय पण करताय राव?

कोण आयडी कसा आहे आणि काय करतोयं यावर नाही. माझा गैरसमज झाला असेल तर माफ करा.

उगा काहितरीच's picture

4 Apr 2016 - 10:48 pm | उगा काहितरीच

हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर पहिल्यांदा `व्यक्तिगत रोख आणि अपमान' यांची स्पष्ट व्याख्या हवी आणि त्यानुसार कोणत्याही सदस्यानं तक्रार केल्यास त्याला संमंकडून किमान उत्तर (स्पष्टीकरण नाही) तरी दिलं जावं.

मूळात तक्रार निवारणाची प्रक्रिया जितकी जलद तितकी व्यक्तिगत आणि अवमानकारक प्रतिसाद आणि लेखन संपुष्टात येण्याची शक्यता जास्त.

हे पटलं साहेब! पण कसं आहे ना , संपादक संपादक म्हणवणारे जे व्यक्ती आहेत ते पण तुमच्या माझ्यासारखे मिपाकर आहेत. त्यांनाही स्वतःच्या पोटापाण्यासाठी काहीतरी कामधंदा करावाच लागत असेल ना! त्यामुळे कधी कधी उशीर होणे , किंवा छोटया छोट्या गोष्टी दुर्लक्ष होणे साहजिकच आहे. त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटते की आपण सर्वांनीच थोडी परिपक्वता दाखवावी. वाद होणारच नाही असं नाही. पण तरी आपली बाजू मांडताना आपल्या स्वतःचा तोल तर जात नाही ना हे प्रत्येकाने पहायला हवे. अर्थात हे फक्त तुम्हाला उद्देशून नाहीऐ. माझ्यासगट सर्वच मिपाकरांना उद्देशून आहे. मिपा आपले सर्वांचे आहे तर ते चांगले ठेवणेही आपल्या सर्वांचेच काम आहे ना.

पण तक्रार निवारण जलद व्हायला पाहिजे. म्हणजे व्यक्तिगत रोख असलेले किंवा अवमानकारक प्रतिसाद ताबडतोप डिलीट व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संबधित सदस्यांना लगेच समज मिळेल आणि त्यावर प्रतिसादांच्या फैरी झडणारच नाहीत. तस्मात, वातावरण बिघडण्याची शक्यता संपेल.

अर्थात त्यासाठी :

वैयक्तिक आणि अपमानास्पद याची एकच आणि निर्विवाद व्याख्या सर्वांसाठी जाहीर व्हावी

हे खरं !

माहितगार's picture

4 Apr 2016 - 10:45 pm | माहितगार

व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचे सर्वाधिक प्रमाण असते, अनफॉर्च्युनेटली या धाग्यावरही व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचे प्रदर्शन पहावयास मिळते आहे.

व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो.

एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३]
उदाहरणे

" महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते."
" तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही."
"डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?"
"तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही."
"सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"

एकांतप्रेमी's picture

4 Apr 2016 - 10:54 pm | एकांतप्रेमी

..................

संपादित

सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.

अत्रे's picture

4 Apr 2016 - 11:38 pm | अत्रे

रीपोर्टेड.

अत्रे's picture

4 Apr 2016 - 11:33 pm | अत्रे

मला वाटते २ प्रकारचे व्यक्तिगत हल्ले आहेत.

१. एखद्याला समोरासमोर शिव्या देणे - उदा. तू मूर्ख आहेस.
२. एखाद्याला (चुकिच्या गृहीतिकाच्या आधारावर) स्टीरीओटाइप करणं - उदा. तुम्ही क्षयज्ञ समर्थक, तुम्ही असेच म्हणणार

दोघांची पेनाल्टी सारखीच असायला हवी का?

माहितगार's picture

5 Apr 2016 - 12:12 pm | माहितगार

१) मी सदस्यांच्या आपापसातील संवादातील सभ्यतेस अधीक महत्व देईन,
२) मी मिपा बाह्य गोष्टीवर कॉमेंट करताना कायद्याच्या कक्षेत बसणारे अधिकतम व्यक्ती स्वातंत्र्य देईन आणि ते व्यक्ती स्वातंत्र्य कसेही वापरले तरीही त्याच्या अगेन्स्ट मध्ये मिपासदस्याच्या अगेन्स्ट व्यक्तीगत टिकेने स्कोर सेटल करण्याचे समर्थन करणार नाही.
३) जिथ पर्यंत तर्कदोष आणि विरुद्ध संदर्भ दाखवून प्रसंगी विरुद्ध कठोर टिका करुन काम भागते तेथ पर्यंत मी पेनल्टी सहसा लावणार नाही. पण आपण संयम बाळगूनही सदस्यांच्या आपाप्सातील संवादासाठी अभिप्रेत किमान स्वरुपाच्या सभ्यतेस सातत्याने अडकाठी येत असेल तर मी पेनल्टी लावेन

मी म्हणजे माझे व्व्यक्तीगत मत, माझा मिपा प्रशासनात सहभाग नाही हे जाणत्यांन माहित आहेच.

अत्रेजी मी आपण विचारल्या पेक्षा अधिक लिहिले त्या बद्दल क्षमस्व आणि आपल्या प्रतिसादांसाठी खूप धन्यवाद.

भिकापाटील's picture

4 Apr 2016 - 10:52 pm | भिकापाटील

सरपंच,
खोटे सदस्यखाते घेवून ग्रामपंचायत मधे गोंधळ घालणार्या शिखंडींना कोंडवाड्यात घालून खोडव्यात घ्या.

मायला या धाग्याचं पन काश्मीर हिनर की काय? बाकी तजोंची लय आठवन येउन र्‍हायली.. अजून आले न्हाइत ते? उडाले बिडाले की काय?

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 11:32 pm | तर्राट जोकर

आनंदा, कधी कधी आपणही पॉपकॉर्नचा डबा घेऊन शांतपणे बाल्कनीत बसलं पाहिजे. दांभिकतेचे खेळ बघायला फार मजा येते. और का कही. आप खुद समझदार हो.

बाकी, आम्ही ह्या धाग्याच्या तिसर्‍या परिच्छेदानुसार आजच निघालेल्या एका धाग्यावर कारवाईची वाट बघतोय.

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 11:36 pm | नाना स्कॉच

वाट बघा!!! वाटच बघा!! नाही बघतच रहा आता!! वाट म्हणे तुम्ही !!

(तुम हम है हम तुम है इसका वो उसका ये लाहौल विलाकुवत )

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 11:42 pm | तर्राट जोकर

अरे ऐसा मत बोलो, साक्षात्कार झाला, नानासाहेब. भगवान के घर देर है पर अंधेर नही.

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 11:49 pm | नाना स्कॉच

माफ़ी मागतो जाहिर!!!

______/\______

:)

अभ्या..'s picture

4 Apr 2016 - 11:29 pm | अभ्या..

अरे सरपंचांचा धागा आहे. महत्वाची सूचना ह्या नावाने आहे. जरा तरी गांभीर्य ठेवा. :(

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 11:33 pm | तर्राट जोकर

सहमत

नाना स्कॉच's picture

4 Apr 2016 - 11:40 pm | नाना स्कॉच

डोंबलाचं गांभीर्य! (यु रेड इट राईट)

चार दिवस वय असलेले आयडी , "गुरुजींचे आत्मविश्व"कार लोकांना येऊन भोंदू पुजारी वगैरे म्हणून जातात इथे कसले गांभीर्य असणार!

असल्या आयडीच्या अस्तित्वाचे कारण फ़क्त द्वेष् असतो! बाकी काही नाही! असो!

तर्राट जोकर's picture

4 Apr 2016 - 11:38 pm | तर्राट जोकर

अनेक धन्यवाद सरपंच, साक्षात्कार झाला.

कंजूस's picture

5 Apr 2016 - 7:31 am | कंजूस

जे लोक एकमेकांस ओळखतात त्यांनी विशेष पिचकाय्रा खरडीत वापराव्यात.

किचेन's picture

5 Apr 2016 - 9:11 am | किचेन

धन्यवाद

मिपावर नाव बदलण्याची सोय आहे का?

नीलकांत वा प्रशांत ह्यांना कळवा.

नाखु's picture

5 Apr 2016 - 9:53 am | नाखु

सहकार्य होते, राहीलही.

सर्वांना समान न्याय असावा असे राहून राहून वाटते.

अखिल मिपा नववाचक, नव मिपासाक्षर , मिपासाक्षर ते सभासद, मिपासभासद ते प्रतीसादक,मिपाप्रतीसादक ते लेखक,
मिपालेखक ते आस्वादक,मिपाआस्वादक ते प्रतीसादक चळवळ संघाचा फुटकळ सभासद नाखु.

मिपा संस्थळ सदस्य चालवतात मालक संपादक न्हवे त्यामुळे एकदा ध्येय धोरणे(एकतर्फी) स्पष्ट केल्यावर पुन्हा या धाग्याची गरज काय ? एकदा का पक्षपातीपणा अधिकारी लोकांना टाळ्ता आला तरी मिपाचे कल्याण आहे अन ते होत नसेल तर हे मोरल पोलिसिंग फुकट आहे हे अजुनही धागाकर्ते समजू शकले नाहित हे दुर्दैव आहे 2013 ते 2016 मिपाव्र सॉलिड इण्टोलरन्स वाढला होता आशा आहे आता तरी असे होणार नाही संस्थळ मालकसल्लागारांबद्दल आदर आहेच पण झेपत नसेल तर त्यांनी ताण घेतलाच पाहिजे अशी अजिबात अपेक्षा नाही अन वातावरण निट ठेवायला शॉर्टकट मारावेत हे तर अजिबात पसंत नाही

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2016 - 10:58 am | पिलीयन रायडर

सरपंचांच्या दंगा घालु नका धाग्यावर दंगा झालेला पहिल्यांदाच पाहिला. इथेच चार दोन नमुने आहेत भाषेसंदर्भात..

आनन्दा's picture

5 Apr 2016 - 11:07 am | आनन्दा

यानिमित्ताने अन्य एका संस्थळासारखी प्रतिसादाला श्रेणी देण्याची व्यवस्था करता येईल का याचा देखील विचार व्हावा.. यातही कंपूबाजी होईलच यात शंका नाही, पण तरी देखील प्रत्येकालाच आपण किती पाण्यात आहोत हे देखील कळेल असे वाटते.

पण अन्य एका संस्थळाची एखादी गोष्ट ढापन्यापेक्षा हे च संस्थळ त्यात विलीन कारणे जास्त योग्य आहे असे मी म्हनेन

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 2:16 pm | टवाळ कार्टा

खिक्क...

आता इथली कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेण्याइतपत निर्ढावलेपण आलेय असे वाटते.

स्वेअरिंग प्रकाराचा अनुभव मीही पहिल्यांदा इथेच घेतला..
अर्थात तिथे चिखलात दगड मारण्याची चूक केल्यामुळे अंगावर चिखल उडाल्याची तक्रार मी करू शकत नव्हते,
एकतर आपण त्या लेव्हलला जाऊ शकत नाही आणि अशा फुटकळ वादांतून मनस्तापाशिवाय इतर काही हाती लागत नसल्यामुळे दुर्लक्ष करणे श्रेयस्कर असते, कोणाची एखादी गोष्ट खटकली तरी योग्य शब्दांत सांगण्याचाच प्रयत्न असतो मात्र समोरची व्यक्ति आक्रस्ताळेपणा करू लागली तर पुढे उत्तर देणे जमत नाही आणि इच्छा त्याहून होत नाही.
आपण शांतपणे प्रतिवाद करत असतो, मात्र समोरची व्यक्ति स्वतःचे फ्रस्टेशन काढ्तांना आपला मुखवटा उतरतोय याचीही पर्वा करत नाही, हुच्चभ्रूपणाचा आव आणून लेखन करणार्‍यांचा मुखवटा निघत असतांना रंग कसा बदलतो आणि खरे रूप कसे समोर येते हे बघतांना गंमत वाटते.

सर्वांनीच थोडा समजूतदारपणा आणि मॅच्युरिटी दाखवली तर अशा सूचनांची आणि कारवाईची गरज उरणार नाही.

टवाळ कार्टा's picture

5 Apr 2016 - 2:16 pm | टवाळ कार्टा

ता तुम्ही अस्सल मिपाकर झालात??

नीलमोहर's picture

5 Apr 2016 - 2:36 pm | नीलमोहर

समजले नाही..

अप्पा जोगळेकर's picture

5 Apr 2016 - 1:14 pm | अप्पा जोगळेकर

'महत्वाची सूचना' असे लिहिलेले असताना देखील इतका दंगा कसा काय होतो याचे आश्चर्य वाटते.
गेले काही महिने मिसळपावच्या संचालकांनी फारच नेमस्त भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच बरीच मंडळी सोकावली आहेत.
'एक दोनदा तर माझा अमुकाढमुक प्रतिसाद का उडवला' वगैरे प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण संपादक देत होते हे पाहून फारच वाइट वाटले.
पूर्वी 'उडवलेले प्रतिसाद अथवा धागे अथवा सदस्यत्व' यांबद्दलच्या तक्रारीची दखलही घेतली जात नसे आणि तेच योग्य होते असे वैयक्तिक मत आहे.
फार तर 'चपला अडकवा आणि चालू पडा' असे लिहिले जायचे.
ज्याप्रमाणे एखादे चांगले वृत्तपत्र मनाचा ठाव घेते त्याप्रमाणे मिसळपाव.कोम ने अनेक जणांच्या मनात कायमचे स्थान मिळवले आहे. ते स्थान तसेच राहायला हवे असेल तर संचालकांनी चाबूक उगारायला पुन्हा सुरुवात करावी असे मनापासून वाटते.

एस's picture

5 Apr 2016 - 1:18 pm | एस

अत्यंत सहमत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Apr 2016 - 1:26 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अत्यंत सहमत. काही आयडींच्या चपला स्पॉन्सर करायला मी तयार आहे.

यातून तुम्ही जास्त ट्रोल जन्माला घातले अन बायकि संस्थळ असा लौकिक निर्माण केला... मिपावाराच्या विश्वासाला फार मोठा तडा यामुळे गेला बाकी आम्ही पैसा फेकत नाही म्हणून चपला दाखवण्यापेक्षा सरळ होटल बंद करा अन अतिविशिष्ट लोकांना च प्रवेश देणारा आश्रम सुरु करा हे जास्त योग्य

अप्पा जोगळेकर's picture

5 Apr 2016 - 1:53 pm | अप्पा जोगळेकर

तुम्ही 'तिथले' ना ? मग इकडे कुणीकडे ?

पिलीयन रायडर's picture

5 Apr 2016 - 2:50 pm | पिलीयन रायडर

"बायकी" संस्थळ?

(बाकी तुमची प्रोफाईल पाहुन आले.. मला उत्तर नाही दिलं तरी चालेल. पण सार्वजनिकरित्या काही तरी लिहीत आहात तर उगाच चालवुन घेतोय अशी प्रतिमा नको व्हायला म्हणुन आक्षेप नोंदवत आहे. ह्या धाग्यावरचा माझा मुद्दा पटवायला फारच उपयोगी प्रतिक्रिया (ही आणि जी उडवली गेली ती तर अजुनच!))