अर्जुन आणि कर्ण

साहना's picture
साहना in काथ्याकूट
1 Apr 2016 - 5:47 am
गाभा: 

महाभारताच्या युद्धात सूतपुत्र कर्णाचा आरामात वध केल्याने युद्धानंतर अर्जुनाला खूप गर्व झाला. त्याने ही गोष्ट कृष्णासमोर बोलून दाखवली तेव्हा कृष्ण हसू लागला. काही वेळाने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात जे झालं ते तुला समजलेलं दिसत नाही.

कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की : कर्णाने आपले अपराजित कवच आणि कुंडले, जी जन्मजात त्याच्या शरीराला जोडलेली होती, ते ब्राम्हणाच्या रूपातील इंद्राला देऊन टाकले, कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे. त्यामुळे आपला पुत्र अर्जुन याच्या सुरक्षे साठी इंद्राने कर्णाकडून कवच - कुंडले मागून घेतली आणि महारथी कर्ण दानशूर होता, त्यामुळे त्याने काही विचार न करता त्या गोष्टी इंद्राला दिल्या. इंद्राने त्याला विचारलं की, "मी इंद्र आहे हे माहीत असूनही तू मला कवच कुंडले का दिलीस? " यावर कर्णाने उत्तर दिले की सूर्य पूजेच्या वेळी जर तुम्ही माझे प्राणही मागितले असते तर मी तेही दिले असते." या उत्तराने इंद्र खजील झाला आणि त्याने कर्णाला अमोघ शक्ती दिली ज्यामुळे तो कोणा एका व्यक्तीला असफल न होता मारू शकेल. परंतु त्यानंतर ती शक्ती इंद्राकडे परत येईल. ही शक्ती तीच होती जी कृष्णाने घटोत्कचावर वापरायला भाग पाडले, ज्यामुळे कर्णाच्या विजयाची शेवटची अशाही संपुष्टात आली.

या परिस्थितीत कर्णाचा सामना अर्जुनाशी झाला. याशिवाय कर्णावर काही शापही होते. पाहिला शाप त्याचे गुरु परशुरामांनी दिला होता कारण त्याने त्यांच्याकडून हे सांगून शिक्षण घेतले की तो एक ब्राम्हण आहे. त्यामुळे जेव्हा भगवान परशुरामांना या खोट्या बद्दल माहिती पडले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की जेव्हा तू आपल्या सर्वात कठीण युद्धात असशील, आणि जेव्हा तुला या ज्ञानाची सर्वाधिक गरज असेल, तेव्हा तुला या ज्ञानातील काहीच आठवणार नाही. त्यामुळेच कर्ण आपल्या मृत्यू च्या दिवशी ब्रम्हास्त्र आणि इतर अस्त्रांच्या वापराचा विधी विसरून गेला. दुसरा शाप होता: एकदा कर्ण शिकार करत होता आणि चुकून त्याने एका ब्राम्हणाची गाय आणि तिचं वासरू मारलं. त्या ब्राम्हणाने शाप दिला की युद्धात कठीण वेळी त्याच्या रथाचं चाक धसेल (जमिनीत रुतेल) आणि त्याची आवक देखील बंद होईल. त्याचा सारथी शल्य त्याच वेळी तिथून निघून गेला आणि त्याच्या रथाचं चाक जमिनीत धसले होते तेव्हाच, कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

कर्ण दानशूर होता. त्याच्या सवयी सभ्यता, सज्जनता आणि दयेने एवढ्या परिपूर्ण होत्या की मृत्यू त्याच्या आसपास फिरकू शकला नसता. परंतु कृष्णाने पुन्हा खेळी खेळली. एका गरीब ब्राम्हणाचा वेश घेऊन त्याने युद्धभूमीवर जखमी कर्णाकडून त्याच्या सर्व चांगल्या कर्मांचे फळ दान म्हणून मागून घेतले. दानशूर असल्यामुळे कर्णाने त्याची ही मागणी चटकन पूर्ण केली. त्याच्या पुण्याचं सुरक्षाकवच त्याच्यापासून दूर झालं आणि अर्जुनाला त्याला मारण्यात अडचण आली नाही.

शेवटी कृष्ण म्हणाला : तूच विचार कर आणि निर्णय घे की तुमच्या दोघात श्रेष्ठ योद्धा कोण आहे, तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता. हे ऐकून अर्जुनाला आपली चूक उमगली आणि त्याने मान्य केलं की कर्ण आपल्यापेक्षा महान योद्धा होता.

प्रतिक्रिया

मूळ मुद्याशी काहीही संबंध नसलेली निरर्थक धुळवड चालू करा ….

विजय पुरोहित's picture

1 Apr 2016 - 6:40 am | विजय पुरोहित

यापेक्षा तुमच्या स्वतःच्या शब्दात महाभारत कथा सुरूवातीपासून लेखमाला स्वरूपात टाका.
घरी लहान मुलांना त्या वाचून दाखवता येतील.

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 5:56 am | तर्राट जोकर

काथ्याकूट सदरात काहीही संबंध नसलेले निरर्थक धागे टाकणं बंद करा….

साहना's picture

1 Apr 2016 - 6:42 am | साहना

संबंध नाही द्रौपदी वस्त्रहरणाच्या धाग्यावर इतका काथ्याकुट का करीत आहेत बरे ?

विजय पुरोहित's picture

1 Apr 2016 - 6:46 am | विजय पुरोहित

महाभारत कथा लेखमाला स्वरुपात टाका.
कुणी आक्षेप घेणार नाही. :)

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 4:32 am | तर्राट जोकर

द्रौपदी वस्त्रहरणाच्या धाग्यावर काथ्याकूट सुरु आहे? काय म्हणता? आम्ही बघितले तेव्हा तर आत्मु बुवांचे आत्मकुंथनारिष्ठ (ट का ठ?) वाटून झाले, गाण्याच्या भेंड्या खेळून झाल्या, कॉकटेल-मॉकटेल-दारुपाण्याच्या रेशिपी शेअर झाल्या, दोन चार काड्या टाकून झाल्या, एका संस्कृत श्लोकाचे निरुपण झाले, आर्य-अनार्यांमधे एक फ्रेंडली म्याच झाली, दोन बॉल तर तुम्हीही टाकले त्यात, एक-दोघांची धार्मिक सोडावॉटर बॉटल फसफसून झाली, जयश्रीक्रिश्न चा जैन-ट्रीवीया झाला, अतिशहाण्यांचे उपदेश आणि काडीमास्तरांचा नोबॉल टाकून झाला, पण तुम्ही म्हणताय तो निरर्थक काथ्याकूट कुठे नाही दिसला बरे? वर उल्लेखलेल्या प्रत्येक गोष्टीत प्रतिसादकर्त्यांना आनंद आला आणि ज्यात आनंद येतो ती गोष्ट निरर्थक नसते.

त्या आणि ह्या धाग्यावर एकच गोष्ट निरर्थक झाली ते म्हणजे तुम्ही लेख चक्क कुठूनतरी कॉपी मारला आणि इथे पेस्ट मारला. आता गंमत अशी आहे की तुम्ही अजूनही खुलासा केलेला नाही की passionforwriting हा http://bookstruck.in/ वरचा आयडी तुमचाच आहे की दुसर्‍या कुणाचा. कारण दुसर्‍या कुणाचे लेखन इथे तुम्ही सातत्याने छापत असाल तेही मूळ लेखकाची परवानगी न घेता, त्याचे श्रेय न देता तर तुमच्यासकट मिसळपाव संस्थळाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे म्हणावे लागेल. http://bookstruck.in/author.jsp?id=140 इथे passionforwriting ह्या आयडीने २७ पुस्तके व त्यातली अनेक प्रकरणे असे प्रचंड लिखाण केलेले आढळते.

त्याचवेळी संशयास्पद बाब अशी की तुमचा मिपासदस्य काळ आहे २ वर्षे ४ महिने ह्या काळात आपण सक्रिय दिसता ते फक्त मागच्या दिड महिन्यापासून, एका नंतर एक लांबडे खूप अभ्यास व टायपिंगला वेळ लागणारे लेख तुम्ही धडाधड टाकलेत. तुमच्या लेखनाच्या शैलीत सातत्य दिसत नाही. वैचारिक बैठक वेगवेगळ्या लेखांमधे वेगवेगळी (मला तरी) जाणवते. अर्थात माझा संशय खोटा असेल तर चांगलेच आहे.

पण मग बुकस्ट्रकवरचा आयडी तुमचाच आहे हे सिद्ध करावे लागेल. मिपाप्रशासनाने ह्या एकूण प्रकरणाची रितसर चौकशी करुन खात्री करुन घ्यावी व सर्व वाचकांना संभ्रमातुन बाहेर काढावे ही विनंती. ह्या प्रतिसादाचा साहना ह्या सदस्याबद्दल अपमान, मानहानी असा कोणताही उद्देश नाही. ह्यांच्या मिपावरिल लेखनाबद्दलच्या माझ्या शंका व आक्षेप चुकीचे असतील तर साहना यांची बिनशर्त जाहीर माफी मागायला तयार आहे.

तर्राट जोकर's picture

2 Apr 2016 - 7:13 pm | तर्राट जोकर

अरे काय झालं? कोणाचं च उत्तर नाही ह्या प्रतिसादावर अजूनही. काय गौडबंगाल?

पैसा's picture

2 Apr 2016 - 7:21 pm | पैसा

चोरी असेल तर संपादकांना अप्रकाशित करायची विनंती करू. मागे दिनु गवळी का कोणतरी त्या साईटवरचे कॉपी पेस्ट इकडे आणून टाकत होता.

सदरसंकेत स्थळावरील (काही) साहित्य निर्माण करण्यात माझा सहभाग असून ते पुन्हा प्रकाशित करण्याचे हक्क माझ्या कडे आहेत.
तुम्ही ते http://bookstruck.in/permissions.jsp वर जावून बघू शकता.

तर्राट जोकर's picture

3 Apr 2016 - 12:39 pm | तर्राट जोकर

ह्याबद्दल कायदेशीर, नैतिक भूमिका ठरवण्याचा अधिकार मिसळपावचे संपादक मंडळ व मालकांकडे आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. धन्यवाद.

बहुतेक करून त्यांनी निर्णय घेतला असावा असे वाटते …

प्रचेतस's picture

1 Apr 2016 - 6:12 am | प्रचेतस

खिक्क

नाना स्कॉच's picture

1 Apr 2016 - 6:44 am | नाना स्कॉच

बरं मग काय काथ्याकुट करायचाय ह्या धाग्यावर??

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2016 - 7:08 am | अत्रुप्त आत्मा

निरर्थक स्वात्म कुंथन

जोरदार होतंय एकदम , काही घेत का नाहीत तुम्ही

नेमके काय घ्यायला हवे त्यांनी?

अत्रुप्त आत्मा's picture

1 Apr 2016 - 8:32 am | अत्रुप्त आत्मा

@काही घेत का नाहीत तुम्ही >>> ओं पुचुपुचू ... http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-041.gif जाऊ दे पांडू,तू घे दुधाचा हांडू ! http://freesmileyface.net/smiley/tongue/mockery-035.gif

प्रचेतस's picture

1 Apr 2016 - 9:07 am | प्रचेतस

=))

दिग्विजय भोसले's picture

1 Apr 2016 - 8:41 am | दिग्विजय भोसले

छान होता सिनेमा,
"करन अर्जुन"

सतिश गावडे's picture

1 Apr 2016 - 8:59 am | सतिश गावडे

छान आहे बालकथा. आवडली. "संस्कारधन" वगैरे नावाने अशा बालकथा तुम्ही प्रकाशित करू शकता.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

1 Apr 2016 - 9:04 am | खालीमुंडी पाताळधुंडी

एकलव्य,बर्बरिक,भगदत्त,भीष्म,द्रोण हे पण त्यांच्या तोडीचे होते.
बादवे या सगळ्यांना(एकलव्य सोडून) नियमबाह्य पद्धतीने मारले हाये!
भगदत्तचा उल्लेख जास्त मिळत नाही,पण तो प्राग्यज्योतिषपुराचा राजा कि काय? होता म्हणे?
त्यालाही बेसावध असतातना अर्जुनाने मारले.
तसेच पौंड्रक,शिशुपाल,जरासंध या भल्या योद्ध्यांना कृष्णनीतीने महाभारत युद्धाच्या आधीच मारले जेणेकरून यांपासून युद्धात त्रास कमी होईल.

सनईचौघडा's picture

1 Apr 2016 - 9:26 am | सनईचौघडा

खालील प्रकाशचित्रातील अनुदिनीतील कथा तुम्ही अनुवादीत कराताय. का तुमचीच अनुदिनी आहे ती.

मागे ६ व्या क्रमांकाची द्रौपदीचे वस्त्रहरण आणि आत्ता १५ क्रमांकाची कथा सांगितलीत पण मग साहना तुम्ही थेट त्या अनुदिनीचा विरोपी पत्ता का बरे देत नाही जसे लाटकर सर करतात. कारण उगाच इकडचे तिकडे चिकटकवण्याने एकुणच भारतातील दुरसंचारमध्ये डेटाबेस वाढतोय.

1

सनईचौघडा's picture

1 Apr 2016 - 9:30 am | सनईचौघडा

अरेच्या लिंक गंडली मागील प्रतिसादात. ही घ्या.

1

गामा पैलवान's picture

1 Apr 2016 - 10:15 pm | गामा पैलवान

अवांतर :

च्यायला, हे स्वात्मकुंथन ही काय भानगड आहे? स्वत:चं कुंथन स्वत:च करायचं असतं ना? कुंथण्याचं उपकंत्राट देता येतं, असं तर नाहीये ना? मग आत्म हे उपपद कशास्तव? आणि एक कमी म्हणून स्व नामे दुसरं उपपदही मागे लावून आजून कसला थोर अर्थपरिपोष साधला जातोय?

एक आपली शंका आली मनी. आत्मबंध गुरुजींचा अधिक्षेप करायचा काहीही हेतू नाही.

-गा.पै.

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:05 pm | विजय पुरोहित

बुवांना प्रश्ण विचरायचा नाही. बुवा त्रिकालज्ञानी आहेत.
बुवा महामहोपाध्याय आहेत. हिंदुधर्मकेसरी आहेत.
नास्तिकनारायण प्रवर्तक आहेत.
सुधारणांचे अग्रदूत आहेत.

कोण कोठे कधी केव्हा कुंथते हे त्यांना परफेक्ट माहीत असते!
☺☺☺
ह.घ्या. बुवेश

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:14 pm | विजय पुरोहित

बुवेशकडून अंनिसअॅप्रूव्ह्ड सुधारित नास्तिकनारायणाचे रहस्य समजून घेण्यास इच्छुक...
- मांत्रिक

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:16 pm | विजय पुरोहित
विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:16 pm | विजय पुरोहित
विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:18 pm | विजय पुरोहित

नवनास्तिककेसरी वाचावे...

नन्द्या's picture

2 Apr 2016 - 7:38 pm | नन्द्या

लै मजा राव इथे, म्हणजे मिसळपाव वरच एकंदरीत!
मला अजिबात काही उद्योगधंदे नाहीत, म्हणून इथे येऊन एकेकाचे अकलेचे तारे तोडणे, एकमेकांना टोमणे मारणे, दुसर्‍याचे लिहिणे निरर्थक, माझे मात्र मुद्देसूद वगैरे दावे करणे, इ. वाचण्यात मजाच वाटते.

एक वाचनात आले - खूप गोष्टींची (खरी, खोटी) माहिती असणे, स्वतःला खूप अक्कल आहे असे समज असणे हे म्हणजे अंतर्वस्त्र असण्यासारखे आहे. लक्षावधी लोक ते वापरतात, पण जो सर्वांसमोर त्याचे प्रदर्शन करतो त्याचे हसेच होते.

इरसाल's picture

11 Apr 2016 - 1:18 pm | इरसाल

त्यो सुप्परमॅन का कोन त्यो तेची चड्डी वर घालुन्शिनी फिरतो तवा कुटं त्याच हसु व्हतय ? कायबी आपलं

प्रसाद गोडबोले's picture

2 Apr 2016 - 8:21 pm | प्रसाद गोडबोले

कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे.

=))))

तुम्ही नक्की महाभारचे कोणते पुस्तक वाचत आहात ? उत्तरगोग्रहण पर्वात काय झाले बरे कर्णाचे ? किंव्वा गंधर्वांनी कौरवांना चेपले तेव्हा कर्ण कुठे बरे होता ?
बरें
अर्जुनाकडे असलेल्या पाशुपतास्त्राला एक पशुपतीनाथ सोडले तर कोणीतरी अडवु शकले असते का ? आणी नारायणास्त्राचे काय ?
बरं समजा अर्जुनाला काहीही बरेवाइट झाले असते तर जो स्वतःचे वचन मोडुन खुद्द भीष्मांवरही चालुन गेला अशा भगवान श्रीकृष्णाचा कोप कोणती कवच की फवच कुंडले रोखु शकली असती ??

खुद्द भीष्मांनीही ज्याची यःकश्चित अर्धरथी अशी गणना केली त्या नीच अधम वृत्तीचा पळपुट्या कर्णाला मृत्यंजयकारांनी सहानुभुतीचे वलय लावल्यापासुन कर्णाविषयी मते मांडताना मुळ महाभारत कोणीतरी वाचते का अशी शंका यायला लागली आहे !!

टवाळ कार्टा's picture

2 Apr 2016 - 8:57 pm | टवाळ कार्टा

cracker

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 8:59 pm | विजय पुरोहित

खुद्द भीष्मांनीही ज्याची यःकश्चित अर्धरथी अशी गणना केली त्या नीच अधम वृत्तीचा पळपुट्या कर्णाला मृत्यंजयकारांनी सहानुभुतीचे वलय लावल्यापासुन
प्रगोसाहेब. काय हे?
कर्ण सूर्यपुत्र होता हे विसरलात काय?
केवळ परिस्थितीने त्याला चुकीच्या मार्गावर ओढून नेले असे माझ्या वाचनात तरी आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

2 Apr 2016 - 9:27 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

कुठल्या काळात जगताय महाराजा?

अर्जुनाकडे असलेल्या पाशुपतास्त्राला एक पशुपतीनाथ सोडले तर कोणीतरी अडवु शकले असते का ? आणी नारायणास्त्राचे काय ?

पशुपतास्त्र आणि नारायणास्त्र अशी अस्त्रे होती तर???

भगवान श्रीकृष्णाचा कोप कोणती कवच की कवच कुंडले रोखु शकली असती ??

नीच अधम वृत्तीचा पळपुट्या कर्णाला

आपला तो बाब्या!!!
म्हणजे आपल्या त्या रासलीला अन् दुसर्याच्या त्या कामलीला!

कर्णाविषयी मते मांडताना मुळ महाभारत कोणीतरी वाचते का अशी शंका यायला लागली आहे !!

मूळ महाभारत म्हणजे कोणाचे हो?
ते शंभर टक्के सत्य आहे का?
आणि कर्णाचे उदात्तीकरण केल्यावर तुमच्या पोटात का दुखते?

मृत्युन्जय's picture

5 Apr 2016 - 11:23 am | मृत्युन्जय

वेळ नाही त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरे थोडक्यात देत आहे त्याबद्दल क्षमस्व. तुम्ही मला प्रश्न विचारलेला नसतानाही मध्ये नाक खुपसतो आहे त्याबद्दल दिलगीरः

किंव्वा गंधर्वांनी कौरवांना चेपले तेव्हा कर्ण कुठे बरे होता ?

कर्णाने युद्ध केले. केवळ संख्याबळामुळे त्याला नमते घ्यावे लागले. त्या आधी त्याने अनेको गंधर्वांना ठार मारले. नंतरचे अर्जुनाचे चित्रांगदाबरोबरचे युद्ध लुटुपुटीचे होते. तो केवळ एक देखावा होता.

अर्जुनाकडे असलेल्या पाशुपतास्त्राला एक पशुपतीनाथ सोडले तर कोणीतरी अडवु शकले असते का ? आणी नारायणास्त्राचे काय ?

नारायणास्त्र अर्जुनाकडे नव्हते. ते केवळ कृष्ण, द्रोण आणी अश्वत्थाम्याकडे होते. पशुपतास्त्राचे निवारण पशुपतास्त्राने शक्य होते. कर्ण आणि द्रोणांकडे पशुपतास्त्र होते.

बरं समजा अर्जुनाला काहीही बरेवाइट झाले असते तर जो स्वतःचे वचन मोडुन खुद्द भीष्मांवरही चालुन गेला अशा भगवान श्रीकृष्णाचा कोप कोणती कवच की फवच कुंडले रोखु शकली असती ??

कुठलीच नाही

खुद्द भीष्मांनीही ज्याची यःकश्चित अर्धरथी अशी गणना केली

ते केवळ कर्णाला युद्धभूमीपासुन दूर ठेवण्यासाठी. नंतर त्यांनी कर्णाची गणना एकदा अतिरथी म्हणुन तर एकदा २ महारथ्यांच्या बरोबर केली (मृत्युशय्य्येवर असताना)

त्या नीच अधम वृत्तीचा पळपुट्या कर्णाला मृत्यंजयकारांनी सहानुभुतीचे वलय लावल्यापासुन कर्णाविषयी मते मांडताना मुळ महाभारत कोणीतरी वाचते का अशी शंका यायला लागली आहे !!

मी वाचले आहे आणि मला कर्ण नीच आणि अधम वृत्तीचा अजिबात वाटत नाही. तो अर्जुनाएवढा सज्जन नसला तरी नीच आणि अधम नक्कीच नव्हता. महाभारतातले सग्ळ्यात नीच पात्र म्हणजे युधिष्टिर (प्रमुख पात्रांमधले).

महाभारतातले सग्ळ्यात नीच पात्र म्हणजे युधिष्टिर

का बरे ? (व्यसनी असेल, नीच कसा ?)

नाना स्कॉच's picture

5 Apr 2016 - 12:05 pm | नाना स्कॉच

बायको लावली की देवा पणाला! अजुन काय नीचपणाची कसोटी हवी आहे

अजून कोणती कसोटी लागू पडतेय का ?

नातेवाईकांस मारण्याच्या प्रयत्न, दुसऱ्यांच्या बायका पळवणे, पळवलेल्या मुलीला वाऱ्यावर सोडून आत्महत्येस भाग पाडणे, नरमेध करणे, लज्जारक्षण करण्याची विनंती करणाऱ्या स्त्रीला शक्य असूनही मदत न करणे, पोटच्या मुलाला नदीत सोडून देणे, स्त्रीलोभाने स्वतःच्या विवाहयोग्य झालेल्या मुलास ब्रह्मचर्याचे जीवन जगण्यास भाग पाडणे, इ. कृत्ये व्यसनाधीनतेपेक्षा बरी म्हणायची का ?
व्यसनापोटी सारासारविवेक गमावणे वाईट हे मान्य, पण ते हेतुपूर्वक नसून परिणामांचा विचार न केल्याने स्वतः व स्वतःच्या माणसांची फरफट होणे हा आहे. वरील यादीत परिणाम माहित असताना दुसऱ्यास दुखः देणे हा प्रकार आहे. "नीच"तेचे परिमाण हे हेतूमध्ये आहे असे मला वाटते.

प्रसाद गोडबोले's picture

5 Apr 2016 - 12:34 pm | प्रसाद गोडबोले

मी वाचले आहे

आपण कोणते महाभारत वाचले आहे ?

विशेष करुन हा खालील उल्लेख कोणत्या प्रतीत आहे हे वाचायला अवडेल मला :

कर्ण आणि द्रोणांकडे पशुपतास्त्र होते.

गामा पैलवान's picture

5 Apr 2016 - 1:20 pm | गामा पैलवान

याबाबत प्रगोंशी सहमत. कुठली प्रत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.

तसेच घोषयात्रेप्रसंगी चित्ररथ गंधर्वासोबत झालेल्या लढाईत संख्याबळामुळे नमते घ्यावे लागले हा उल्लेखही कर्णाच्या क्षमतेवर प्रश्नचिह्न उपस्थित करतो. अर्जुनावर अशी कधी वेळ आल्याचं ऐकिवात नाही.

-गा.पै.

मृत्युन्जय's picture

5 Apr 2016 - 7:47 pm | मृत्युन्जय

अर्जुनावर अशी वेळ आली नाही कारण चित्ररथाबरोबरची त्याची लढाई लुटूपुटीची होती. त्याला इजा पोचवायची नाही अस्शी चित्ररथाला आज्ञा होती इंद्राची,

मृत्युंजय,

मी वाचलेल्या प्रतीत लुटुपुटूची लढाई नाही. माझी प्रत इथे आहे : http://www.ebooks10.com/read-books/2014/05/19450489/.html

तिच्यातल्या २४६ वा अध्यायात (पीडीएफ पान क्रमांक १९४) वर चित्रसेन (अगोदर चुकून चित्ररथ लिहिलं) गंधर्व इंद्राच्या आज्ञेने कौरवांना धडा शिकवायला आला होता असा उल्लेख आहे. त्यानुसार चित्रसेनाने अर्जुनाचे रक्षण करावयाचे होते. त्याकरिता चित्रसेनाने अर्जुनास अस्त्रपाशांत जखडून ठेवायचे अपार प्रयत्न केले. मात्र अर्जुनाने त्याची डाळ शिजू दिली नाही.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

7 Apr 2016 - 11:15 am | मृत्युन्जय

मी वरती नमूद केलेल्या प्रतीतले हे उतारे. माझी खात्री आहे की तुमच्या मराठी प्रत्तीत देखील हे उतारे असतीएलः

चित्रसेन म्हणतो:

The lord of the celestials also, having ascertained this purpose of theirs, told me, 'Go thou and bring Duryodhana hither in chains along with his counsellors. Dhananjaya also with his brother should always be protected by thee in battle, for he is thy dear friend and disciple.' At these words of the lord of the celestials I came hither speedily.

चित्रसेन स्प्ष्टपणे म्हणतो की इंद्राच्या आज्ञेनुसार तो आला. अर्जुन त्याचा मित्र आणि शिष्य होता / आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे चित्रसेनाला इंद्राच्या स्पष्ट सूचना होत्या की अर्जुनाला युद्धात पुर्णपणे जप (थोडक्यात युद्ध होणार हे आधीच ठरले होते आणि त्यात अर्जुनाला अणि त्याच्या भावांना काहिही अपाय होता कामा नये हे आधीच ठरले होते)

गामा पैलवान's picture

7 Apr 2016 - 6:02 pm | गामा पैलवान

मृत्युंजय,

मराठी प्रतीतही हेच उतारे आहेत. :-) दुर्योधनाला ठार न मारता कैद करायची आज्ञा इंद्राने दिली होती. त्याच्रमाणे अर्जुनाला चित्रसेनाने पकडलं असतं तरीही चाललं असतं. मात्र ते त्याला जमलं नाही कारण अर्जुन बलवान होता.

असो.

मूळ मुद्दा कर्णार्जुन बलाबलाचा आहे. पुढे वनवासाच्या अंतिम टप्प्यात जयद्रथाने द्रौपदीस पळवून नेते वेळी अर्जुनासमोर कर्ण उभा राहू शकला नव्हता. नंतर विराटाच्या गायी पळवून नेते वेळी देखील अर्जुनासामोर कर्ण टिकाव धरू शकला नव्हता.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

7 Apr 2016 - 6:21 pm | मृत्युन्जय

वनवासाच्या अंतिम टप्प्यात जयद्रथाने द्रौपदीस पळवून नेले तेव्हा कर्ण तिथे नव्हता . मुददा बलाबलाचाच असेल तरत्दोघेही तुल्यबळ होते. तसे नसता कर्णाला कपटाने मारायची गरज पडली नसती.

बाकी अर्जुनाला जिवंत पकडण्यासाठी त्याच्यावर त्याच इर्ष्येने अस्त्रांचा मारा करावा लागला असता. चित्रसेनानने तसा थोडा प्रयत्न केलाच की. पण मग वेळ न घालवता खरे स्वरुप प्रकट केले. शिवाय ते करतान जे तो बोलला त्यातुन बाकीच्या गोष्ती स्पष्ट होतातच

मृत्युंजय,

द्रौपदीहरणाच्या वेळेस कर्ण नव्हता हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. चुकीबद्दल क्षमा असावी.

महाभारताच्या अंतिम युद्धाच्या आधी अर्जुन आणि कर्ण यांची एकमेकांच्या विरुद्धपक्षांत समोरासमोर गाठ दोनदा पडली होती. पहिल्यांदा द्रौपदीस्वयंवराच्या वेळेस आणि दुसऱ्यांदा विराटाच्या गोहरणाप्रसंगी. दोन्ही वेळेंस कर्ण अर्जुनासमोर फिका पडला.

गोहरणाच्या वेळेस कर्णाने अर्जुनाशी एकट्याने लढण्याची फुशारकी मारली. तेव्हा अश्वत्थाम्याने कर्णास उघडपणे विचारले की तू पांडवांपैकी एकाला तरी कधीतरी द्वैरथ युद्धांत जिंकले होतेस काय? तू याक्षणी (=गोहरणप्रसंगी) मत्स्य देशाच्या सीमेपारही गेला नाहीस. वा गायींना अद्यापि जिंकले नाहीस. तुझं भाषण केवळ वल्गनाच आहेत. अर्जुनाशी एकट्याने काय लढणार तू?

कर्ण जरी उत्तम धनुर्धर असला ती अर्जुनाच्या तोडीचा कधीच नव्हता. किंबहुना अर्जुनाच्या तोडीचा केवळ एकंच धनुर्धर होऊन गेलेला दिसतो. तो म्हणजे एकलव्य.

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

7 Apr 2016 - 8:28 pm | प्रचेतस

एकलव्य ही कथा उघडउघड प्रक्षिप्त आहे. भांडारकर प्रतीत बहुधा ही कथा काढून टाकलीय.
बाकी कर्ण अर्जुनाच्या तोडीचा धनुर्धर कधीच नव्हता हे मान्य.

मृत्युन्जय's picture

11 Apr 2016 - 11:51 am | मृत्युन्जय

काही ढळढळीत कारणांसाठी ते दोघे तुल्यबळ नव्हते हे अमान्य. दोघे तुल्यबळच होते पण अर्जुन नक्कीच (कांकणभर) सरस होत्ता. तुल्यबळ म्हणतो तेव्हा दोन्ही पारड्यात एकसारखेच वजन असावे असे नाही. म्हणजे ५० किलोला ५० किलोचाच बॅलन्स हवा असे काही नाही. ५० किलोची तुलना २० किलोशी होउ शकत नाही पण ४८ किंवा अग्दी ४५ किलोशी नक्की होउ शकते.

सचिन हा त्याच्याकाळातला जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे हे मान्य पण लारा काही अगदीच दुर्लक्षिण्याजोगा नव्हतो. थोडेफार तसेच आहे हे.

गामा पैलवान's picture

11 Apr 2016 - 12:51 pm | गामा पैलवान

मृत्युंजय,

तुमची तौलनिक चिकित्सा मान्य आहे. कर्ण अतिशय दुर्दैवी जीव आहे. त्याला आयुष्यात योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. आपल्याला मिळालेलं अंग देशाचं राज्य यालाच तो सर्वस्व मानून बसला. त्यामुळे त्याने दुर्योधनास वाईट मार्गावरून परावृत्त करण्याचा प्रयत्नही केला नाही. दुर्योधनाचं मीठ खाल्लं आहे म्हणून तो म्हणेल तीच पूर्व असंच कर्ण ठरवत गेला.

अर्थात, अर्जुनाचा कायावाचामने प्रखर प्रतिकार करू शकण्यायोग्य योद्धा कर्णच आहे. द्रोण वा भीष्म जरी कर्णापेक्षा महान धरले तरी त्यांना अर्जुनाविषयी ममत्व असल्याने ते हात राखून प्रतिकार करतील असा संशय घेण्यास जागा आहे.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

5 Apr 2016 - 7:34 pm | मृत्युन्जय

मी तशी बरीच व्हर्जन्स वाचली आहेत. पण हे विधान करण्यापुरते मी किसारी मोहन गांगुली भाषांतरित महाभारताचा आधार घेतला आहे. गांगुलींचे भाषांतर हे मूळ महाभारताचे भाषांतर मानले जाते.

त्या भाषांतरातील खालील उतारा वाचा:

When Drona failed to gain any ascendency over the son of Pandu, the son of Bharadwaja, that warrior acquainted with the course of all weapons, invoked into existence the Aindra, the Pasupata, the Tvashtra, the Vayavya, and the Yamya weapons.

यात द्रोणाचार्यांनी शेवटचा उपाय म्हणुन पाशुपत अस्त्र वापरल्याचा उल्लेख आहे. अर्जुनाने अर्थात त्याच्याकडच्या पाशुपताने त्याचे निवारण केले. मला संस्कृत येत नसल्याने मूळ संस्कृत प्रतीत काय लिहिले आहे मला माहिती नाही. पण इथे तरी पाशुपत अस्त्र असा स्पष्ट उल्लेख आहे.

Yonder Karna urges forward the mighty car-warriors of the Dhartarashtras towards the son of
Pritha with the weapons called Sthunakarna, Indrasjaha and Pasupata, and with clubs and other weapons. The king, O Bharata, must be deeply afflicted and exceedingly weakened, because the Pancalas and the Pandavas, those foremost of all wielders of weapons, are seen to proceed
with great speed towards him at a time when speed is of the highest
moment like strong men rushing to the rescue of a person sinking in a
bottomless sea. The king's standard is no longer visible. It has probably
been struck down by Karna with his shafts.

विजय पुरोहित's picture

2 Apr 2016 - 9:44 pm | विजय पुरोहित

कुठल्या काळात जगताय महाराजा? 2016 भावा...

पशुपतास्त्र आणि नारायणास्त्र अशी अस्त्रे होती तर???
असतीलही!!!

कृष्ण भगवान होते???
कवच कुंडले?????? यू मीन बुलेटप्रूफ जॅकेट!!
असतीलही. आदित्य हृदय स्तोत्र वाचून अनुभव घ्या.

आपला तो बाब्या!!!
म्हणजे आपल्या त्या रासलीला अन् दुसर्याच्या त्या कामलीला!
तुम्हाला दुर्योधन आवडतो का? तर घ्या आवडून.

मूळ महाभारत म्हणजे कोणाचे हो?
ते शंभर टक्के सत्य आहे का?
आणि कर्णाचे उदात्तीकरण केल्यावर तुमच्या पोटात का दुखते?
तुम्ही तरी त्या काळात होता का हो?
तुम्हाला पण कुणी संजय भेटला काय?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

2 Apr 2016 - 10:32 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्ही तरी त्या काळात होता का हो?
तुम्हाला पण कुणी संजय भेटला काय?

संजय कशाला भेटायला हवा?
मेंदू आणि त्यातून निघणारा तर्क वापरणे गरजेचे असते.

स्पा's picture

2 Apr 2016 - 9:45 pm | स्पा

वरची चर्चा वाचून असे वाटून राहिले कि हि मंडळी संजयसोबत बसून महाभारत बघत होती =))

झेन's picture

5 Apr 2016 - 5:35 pm | झेन

डिसक्लेमर टाकायचे राहीले ना "केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही"

आनंदी गोपाळ's picture

7 Apr 2016 - 1:56 pm | आनंदी गोपाळ

काथ्याकूट सदरातून काढून जनातले मनात घेऊन जावे की!

mugdhagode's picture

12 Apr 2016 - 8:32 am | mugdhagode

छान कर्मणूक झाली !

कर्म !

प्रचेतस's picture

12 Apr 2016 - 9:04 am | प्रचेतस

हाय मुग्धे...
कशी आहेस?

गणामास्तर's picture

12 Apr 2016 - 9:30 am | गणामास्तर

मजेत एकदम. आपण कसे आहात ?

प्रचेतस's picture

12 Apr 2016 - 9:42 am | प्रचेतस

मी पण मजेत.

टवाळ कार्टा's picture

12 Apr 2016 - 11:04 am | टवाळ कार्टा

आयडी चुकला वो :)

विजय पुरोहित's picture

12 Apr 2016 - 11:06 am | विजय पुरोहित

खरेच की! गोड्यांच्या मुग्धाला विचारलेला प्रश्न आणि गणामास्तर कसे काय उत्तर देताहेत?

नाखु's picture

12 Apr 2016 - 4:46 pm | नाखु

(धाग्यावरच फक्त) लाजते त्या मुळे गणामास्तरांना मध्यस्थी करावी लागली.

अवांतरः
गणामास्तर कसे आहात.
सध्या गावात की गावा बाहेर ?

mugdhagode's picture

12 Apr 2016 - 5:05 pm | mugdhagode

छान. संध्याकाळ होइल. संध्याकाळ झाली की युद्धविराम ...

विजय पुरोहित's picture

12 Apr 2016 - 5:06 pm | विजय पुरोहित

नमस्कार मुग्धा ताई!

प्रचेतस's picture

12 Apr 2016 - 5:07 pm | प्रचेतस

का गो?
तुमच्यात रात्रीयुद्ध नसतं का?

विजय पुरोहित's picture

12 Apr 2016 - 5:08 pm | विजय पुरोहित

=))

सस्नेह's picture

12 Apr 2016 - 10:57 am | सस्नेह

काय हे ? मुग्धा 'गोडे' हे वाचलं नाय का ?

गॅरी शोमन's picture

13 Apr 2016 - 9:18 am | गॅरी शोमन

तू - अर्जुन - जो माझ्या संरक्षणात आणि माझ्या सल्ल्याने युद्ध खेळत होता की तो कर्ण - जो आपलं फुटकं नशीब घेऊन युद्धात सामील झाला होता.

हा विचार देवत्वाच्या अस्तित्वाला मान्य करायला लावणारा आहे त्यामुळे अनेकांना तो अप्रस्तुत वाटला का ?