Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 07:34
मोदीभक्त आम्ही रात्रंदिन जपतो नमो नमः ।।धृ।। तुमचे दौरे तुमच्या भेटी तुम्ही जोडलेली जगभरची नाती शिंझो अबे तुमचा मित्र बराक तुमचा जणू शाळूसोबती फेसबुक अन गूगलवाले जीव भारी त्यांचा तुमच्यावरती मिडियाच कशाला इथला जग सारे गुणगान गाते पहा ।।१।। परदेशी गुंतवणुकीस आला आहे नुसता आता पूर कारखान्यांमधून पुन्हा निघू लागला सोन्याच्या धूर साऱ्या देशाचा आता बदलत चालला पुरता नूर झाली सुखाची परमावधी अच्छे दिन आले आम्हास अहा! ।।२।। डिजिटल इंडिया जोरात अन् स्वच्छ आमचा भारत झाला जगभरचे धनिक लागले मेक इन इंडिया सारे करायला मन की बात ऐकून तुमच्या प्रत्येकजण धन्य धन्य झाला "दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।।

Submitted by प्रचेतस on Wed, 03/16/2016 - 07:36

Permalink

आदरणीय राहुलजी गांधीजी

आदरणीय राहुलजी गांधीजी ह्यांचेवरही अशीच गोग्गोड कविता करा ब्वा.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 08:15

Permalink

डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे

डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे कवितेचे???
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 03/16/2016 - 08:41

In reply to डॉक्टर साहेब वृत्त कुठले आहे by नाना स्कॉच

Permalink

वृत्त की वृत्ती?

वृत्त की वृत्ती?
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 08:54

In reply to वृत्त की वृत्ती? by प्राची अश्विनी

Permalink

वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती

वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती लक्षात आलीच!!
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Wed, 03/16/2016 - 17:12

In reply to वृत्तातच भंजाळलोय हो! वृत्ती by नाना स्कॉच

Permalink

दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी

दलित, अल्पसंख्य आणि शेतकरी वृत्त म्हणतात त्याला.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 08:54

Permalink

मुक्त

मुक्त
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 08:55

Permalink

मुक्त.

मुक्त. वृत्त आणि वृत्ती दोन्ही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 09:03

Permalink

मुक्त छंद असतो का वृत्त??

मुक्त छंद असतो का वृत्त?? (मला माहीती नाही, ऐकिवात आहे की छंद असतोय), अन हो वृत्ती अतिमुक्त उर्फ़ स्वैर दिसते आहेच! सकाळ सकाळ मोदींच्या नावं शिमगा :D
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 03/16/2016 - 09:26

Permalink

मस्त मस्त

चान चान "उठे सुटे,टंकती प्रसिद्धीसाठी नेमाने कुठे! " कोणी काही म्हणा पण एकमेव ज्ञानभांडार दार उघडे आपल्या साहित्यप्रतिभेचा सूर्य असाच तळपत रहावो एक दिवस वांती क्रांती जरूर येईल. अखिल दोरुगडे,कुटे,कात्रे ज्ञानसागर समुद्रम्थन मौक्तीक अभिलाषी बापुडवाणा मिपाकर महासंघ आणि शहरी मिपाकर वाचक चळ्वळ
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 03/16/2016 - 09:29

In reply to मस्त मस्त by नाखु

Permalink

चुकून नेमाडे वाचलं राव :P

चुकून नेमाडे वाचलं राव :P
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:35

In reply to मस्त मस्त by नाखु

Permalink

क्रांति कुठली येतेय राव!

क्रांति कुठली येतेय राव! कंटाळून हल्ली लोक मुलींची नावे क्रांती ठेवू लागलेत! वांती तुम्ही आताच टंकली ना! आणि कसली डों**ची प्रसिद्धि! ती तुम्हालाच लखलाभ असो!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Wed, 03/16/2016 - 09:27

Permalink

आपली येक रिक्वेष्ट

१९९१ नंतर मनमोहन सिंग यानी मुक्त अर्थ व्यवस्था आणली त्यातून अनेक चांगल्या गोष्टी झाल्या अनेक अनर्थ ही. कोळसा, कॉमनवेल्थ टू जी ,लोकपाल गोन्धळ व मुख्य म्हणजे महागाई, चलनवाढ ,कॉन्ग्रेस या समावेशक पक्षाचे पतन . ई चा ही आढावा घेणारी एखादी कविता येउ द्या. आपली ही कविता मस्त जमली आहे म्हणून म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:38

In reply to आपली येक रिक्वेष्ट by चौकटराजा

Permalink

धन्यवाद!

तशी कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 03/16/2016 - 12:07

In reply to धन्यवाद! by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

आवर्जुन करा... फक्त वरून तशी

आवर्जुन करा... फक्त वरून तशी कविता प्रसिद्ध करायचा आदेश आहे का ते बघा. उगाच हिशोबात घोळ व्हायचा आणि पुन्हा दोष मोदींना जायचा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/16/2016 - 16:35

In reply to आवर्जुन करा... फक्त वरून तशी by मोदक

Permalink

एक कविता काय पाडली तर लगेच

एक कविता काय पाडली तर लगेच हायकमांड वगैरे? =)) मज्जाच आहे एकूण. =))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:07

Permalink

मुक्त छंदच असतो. वृत्त आणि

मुक्त छंदच असतो. वृत्त आणि वृत्तिबद्दलच्या प्रश्नांस एकत्रित उत्तर द्यावे म्हणून तसे म्हटले.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 10:09

Permalink

पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत

पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत राहतो न सर, कविता कुठल्या वृत्तात बसवली आहे म्हणे मी?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 03/16/2016 - 10:26

In reply to पण मग बेसिक प्रश्न अनुत्तरीत by नाना स्कॉच

Permalink

"छंद = वृत्त" हि माझी समजूत

"छंद = वृत्त" हि माझी समजूत आहे सामान्यतः वृत्त म्हणजे अक्षरगणवृत्त असे आपण समजतो पण याखेरीज मात्रा वृत्त हि असतात (नियमबद्ध पद्याप्रकारांमध्ये). मुक्तछंद (वृत्त) म्हणजे नियमबद्ध पद्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 03/16/2016 - 10:13

Permalink

सकाळी सकाळी पोट साफ झालं का?

सकाळी सकाळी पोट साफ झालं का? छान!
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:17

In reply to सकाळी सकाळी पोट साफ झालं का? by अनुप ढेरे

Permalink

हो, तुम्हाला मात्र पोटदुखी

हो, तुम्हाला मात्र पोटदुखी सुरु झालीय वाटतं!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 03/16/2016 - 10:16

Permalink

मोदी पंतप्रधान झाले नसते

तर डाॅ.दोरुगड्यांनी असल्या भिकार कविता कोणावर केल्या असत्या यावर एक सदाहरित धागा काढावा!
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 10:22

In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम

Permalink

बा डी स

मोदी सरकार किंवा त्यांच्या निती अन निर्णयांवर मीही टिका करतो, किंबहुना माझ्यावर फुरोगामी शिक्का बसावा इतकी टिका करतो पण "चला बुआ एक भिकार कविता करू" म्हणून कधीही करत नाही ह्याचा मला सार्थ अभिमान आहे :D, "कवितेत" मांडलेल्या "मुद्द्यांवर" लैच जास्त दळणे दळून झाली आहेत! टिका करायची तर ती डोळस करा की राव !
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:46

In reply to बा डी स by नाना स्कॉच

Permalink

नानासाहेब,

नानासाहेब, उगाच का चिडता? मी कुठे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतोय? तुम्ही लिहीता त्यावर मी कधी टीका केलिय का? मी अभिव्यक्त होताना कविता, हलके फुलके लेख यांद्वारे अभिव्यक्त होतो. विद्वान मी नाहिए. तसा आव ही आणत नाही. तुमच्यासारखा. हा, जर तसं काही सुचलं तर निश्चितच मिपावर टंकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:27

In reply to मोदी पंतप्रधान झाले नसते by बोका-ए-आझम

Permalink

मोदी पंतप्रधान होण्याआधीही

मोदी पंतप्रधान होण्याआधीही कविता करितच होतो. कांग्रेसवाले पिसाळुंन चावायला येत नव्हते. आणि मोदी आल्यापासूनच तर तुमच्यासारख्या भिकार माणसाना बोलायला जास्त चेव आलाय. (इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 10:41

In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

अजुन लिहिले असते पण तुम्हाला

अजुन लिहिले असते पण तुम्हाला ह्या कुस्तीत आनंद येतोय अशी पुसट शंका येतेय, तो आनंद मी तुम्हाला मिळवून देऊ इच्छित नाही. (समजणारे समजतीलच) म्हणुन असोच.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 03/16/2016 - 11:04

In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

भिकार कवितेला म्हटलंय

तुम्हाला म्हटलं नव्हतं. पण ते उगाच स्वतःवर घेऊन आणि प्रतिसाद देणाऱ्यांवर जळफळून तुम्ही तुमचं आतापर्यंतचं शिक्षण फुकट घालवलंत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by शलभ on Wed, 03/16/2016 - 11:13

In reply to मोदी पंतप्रधान होण्याआधीही by डॉ. एस. पी. दोरुगडे

Permalink

बोका तुमच्या कवितेला भिकार

बोका तुमच्या कवितेला भिकार म्हणाले तुम्हाला नाही. तुम्ही असे बोलून स्वतःची लायकी दाखवताय.
  • Log in or register to post comments

Submitted by नाव आडनाव on Wed, 03/16/2016 - 10:25

Permalink

टुकार.

टुकार.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:36

In reply to टुकार. by नाव आडनाव

Permalink

हे तुमचे खरे नाव का?

हे तुमचे खरे नाव का?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Wed, 03/16/2016 - 10:40

Permalink

ती स्टेज पेटायची कविता तुमचीच

ती स्टेज पेटायची कविता तुमचीच काय ओ ?
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ. एस. पी. दोरुगडे on Wed, 03/16/2016 - 10:48

In reply to ती स्टेज पेटायची कविता तुमचीच by sagarpdy

Permalink

छे!

पेटवा पेटवी ची भाषा मी कधी केलिय का?
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 03/16/2016 - 10:56

Permalink

मोदीसाहेब

मोदीसाहेब तुम्हारा चुक्याच ! कशाला हो अच्छे दिनांचा वायदा केला ? तो करण्यापूर्वी, इथे बसलेल्या निरगांठी किती पक्क्या आहेत, याचा विचार करायचा होता. आता प्रत्येकाला घाईची लागलीये आणि निरगांठी सुटत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Wed, 03/16/2016 - 10:58

Permalink

काटा रूते कुणाला,आक्रंदतात

काटा रूते कुणाला,आक्रंदतात कोणी? मज फुलही रूतावे,हा दैवयोग आहे.... घेई छंद भकरंद,
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Wed, 03/16/2016 - 11:03

Permalink

दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे

दलित, अल्पसंख्य, शेतकऱ्यांचे काय?" हे कोण बोलला? देशद्रोहीच दिसतो हा ।।३।
ख्वा ख्वा ख्वा..... दोरूगडे साहेंबाना कोणीतरी जागे करा प्लीज, झोपेत बडबडतायत बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/16/2016 - 11:05

Permalink

राहूल गांधी वरची कविता मिटके

राहूल गांधी वरची कविता मिटके मारत वेंजॉय करणार्‍यांना ही कविता खड्यासारखी खटकेल . थोडा तो स्पोर्टींग स्पिरिट दिखाना मंगता. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 03/16/2016 - 11:10

In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर

Permalink

राहुल गांधींवर कविता

कुणी केलीय? मी त्या कवितेलाही भिकार म्हणेन, जर भिकार असली तर.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Wed, 03/16/2016 - 11:12

In reply to राहूल गांधी वरची कविता मिटके by तर्राट जोकर

Permalink

आता यात काय नवीन आहे दादा?

आता यात काय नवीन आहे दादा? इकडचे तिकडल्यावंर मिटके मारतात, तिकडचे इकडल्यांवर मिटके मारतात, आणि इथे इकडचे जास्त आहेत त्यात काय नवीन?
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/16/2016 - 11:24

In reply to आता यात काय नवीन आहे दादा? by खालीमुंडी पाताळधुंडी

Permalink

हे हे. थोडा खुलासा करतो.

हे हे. थोडा खुलासा करतो. नेहमीसाठी लक्षात असु द्या. काय की धुळवडीत चेहरे ओळकू येत नाहीत म्हणून. आम्ही राहूलभक्त, सोनियाभक्त, कॉंग्रेसभक्त नाही. मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत.
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Wed, 03/16/2016 - 11:36

In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर

Permalink

अगदी मीही तसाच :O:O

अगदी मीही तसाच :O:O
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 12:20

In reply to हे हे. थोडा खुलासा करतो. by तर्राट जोकर

Permalink

मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त

मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त-विरोधक आहोत. काय सिक्सर मारलाय देवा!!!

*चाय से केटली गरम

असले की ते विचित्र वाटते असे म्हणु का? *ही एक हिंदीभाषी म्हण आहे तरीही कृपया ह्याचा संबंध मोदींशी जोडू नये ही नम्र इणंती
  • Log in or register to post comments

Submitted by चेक आणि मेट on Wed, 03/16/2016 - 14:49

In reply to मोदीविरोधकही नाही. मोदीभक्त by नाना स्कॉच

Permalink

खीक्क

हे म्हणजे स्वतःची आरती स्वतःच ओवाळून घ्यायची.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना स्कॉच on Wed, 03/16/2016 - 14:54

In reply to खीक्क by चेक आणि मेट

Permalink

तुम्हाला स्वतःबद्दल अन

तुम्हाला स्वतःबद्दल अन इतरांबद्दल बरेच गैरसमज आहेत जे तुम्ही लवकरात लवकर क्लियर करा! अशी विनंती करतो
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Wed, 03/16/2016 - 11:32

Permalink

टुकार , पांचट , इतर समानार्थी

टुकार , पांचट , इतर समानार्थी शब्द लाऊन घ्या सगळे यमकात बसणारे , तसं हि यमक जुळवण्या शिवाय दुसरं काही नाहीच यात
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 03/16/2016 - 13:39

Permalink

थोडी भर टाकतो.

डॉक्टर एस पी दोरुगडे, तुमची कविता थोडी वाढवतोय. गोड मानून घेणे. वंचितांच्या आडोश्याने देशद्रोह्यांची कारस्थाने चालती सुखेनैव त्यांस बसला नमोंचा फांस म्हणून सगळी मळमळ काढायची झाली घाई पण बिचकल्या मुखी शब्दच फुटंत नाही आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत_खाडे on Wed, 03/16/2016 - 13:43

Permalink

नमस्कार, दोरुगडे साहेब.

नमस्कार, दोरुगडे साहेब. तुमच्या या धाग्यावर आपली बाचाबाची सुरु असताना, तर्राट जोकर यांनी मध्यस्थी केली आणि तो विषय थेट मोदी भक्त-विरोधक येथे जाऊन पोहचला, आणि या धाग्यावरही तेच चालू आहे. अहो मोदी-अमोदी चा विषयच नाही. विषय आहे या पचगळ कवितेचा. तुम्ही केलेली हि बाळबोध "कविता" एकदम फालतू आणि बेसलेस आहे. मान्य करा दोरुगडे साहेब, तुम्हाला कविता करताच येत नाही (जजमेंटल म्हणा हवे तर), वरून प्रत्येक वेळी तुम्हाला यमक जुळवून मोदीवर टीका करायची असते. एका चारोळी साठी धागा काढणारे तुम्ही, हे सगळे निव्वळ टीआरपी साठी करताय हे सगळ्यांना माहिती आहे. एकतर तुम्ही स्वतः एक नंबरचे मूर्ख आहात किंवा इतर लोक मूर्ख आहेत असे समजताय. (इतर मिपाकर- अशी भाषा वापरल्याबद्दल क्षमस्व.) रच्याकने, तुमच्याकरता एक अत्यंत उपयुक्त दुवा देतोय, व्यवस्थित वाचून घ्या. काही अडचणी आल्यास, यांचेशी संपर्क साधा. https://en.wikipedia.org/wiki/Dunning–Kruger_effect
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Wed, 03/16/2016 - 13:46

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by गरिब चिमणा on Wed, 03/16/2016 - 13:55

Permalink

आवडली कविता ,मस्त झालिए

आवडली कविता ,मस्त झालिए भक्त इथे थयथयाटाशिवाय काही करणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/16/2016 - 13:59

Permalink

सर्वात मोठ्या मोदीभक्त.

  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/16/2016 - 14:00

Permalink

सर्वात मोठ्या मोदीभक्त.

  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Wed, 03/16/2016 - 14:00

Permalink

Posted by Unofficial:

(function(d, s, id) { var js, fjs = d.getElementsByTagName(s)[0]; if (d.getElementById(id)) return; js = d.createElement(s); js.id = id; js.src = "//connect.facebook.net/en_US/sdk.js#xfbml=1&version=v2.3"; fjs.parentNode.insertBefore(js, fjs);}(document, 'script', 'facebook-jssdk'));

Posted by Unofficial: Subramaniam Swamy on Wednesday, March 16, 2016
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 15288 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com