ग्वाटेमाला - चित्रपुरवणी

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
11 Mar 2016 - 10:47 am


इडली डोसा यांच्या प्रवासवर्णनामध्ये
सचित्र भर म्हणून हा पुरवणी लेख. त्यांच्या लेखामुळे बऱ्याच जणांना हा देश नव्याने माहिती झाला आहे तर काही जणांना माहित असलेली जागा चित्रातून पहावयास मिळत आहे, त्यात माझीही दोन मुठी भर…

मध्य अमेरिकेतील ग्वाटेमाला व तीन शेजारी देशांची तीन ठळक पैलूंविषयी माहिती:
१. प्राकृतिक सौंदर्य :
या देशांचे प्राकृतिक सौंदर्य फार विशेष आहे. अनेक रौद्र सक्रीय ज्वालामुखी पर्वत या प्रदेशात मोठ्या शहरांच्या अगदी अंगणात आहेत. यातील पकाया हा ज्वालामुखी काही वर्षांपासून सक्रीय आहे, तर अलिकडेच फुएगो ही जागृत झाला आहे. अँटिग्वा शहरातून हे दोन्ही तासाभराच्या अंतरावर आहेत. उंची फार नाही परंतु चढण थोडी कठिण आहे, पण तरिही बहुतेकांना तयारीशिवायही करता येण्यासारखी आहे. मी रहात असलेल्या हॉस्टेलवर दोन इटालियन मुलींना तेथे जायचे होते, पुढे असेच एक दोन करत अजून सहा जण मिळाले व ही चढाई आम्ही मिळून केली. हवामानाने फारशी साथ दिली नाही, तरिही अनुभव अद्वितीय होता. अनेक स्थानिक संस्था मोठ्या गटांत सहलीही नेतात. 'ज्वालामुखीय गिर्यारोहण' हे आवर्जून करावे असे काही...
एल साल्वाडोर या देशात अजून मोठे सुप्त ज्वालामुखी आहेत. काहींची विशाल विवरे मोठ्या तळ्यांमध्ये रुपांतरीत झाली आहेत. अस्थिर परंतु अतिशय सुंदर सृष्टी येथे पहावयास मिळते.


पकाया वर चढाई करताना समोर दिसणारा ज्वालामुखी

जागृत ज्वालामुखी पर्वतारोहण

काळी ज्यालामुखीय मृदा

पकाया लाव्हा बेड

जमिनीखाली असलेल्या लाव्हामुळे त्या उष्णतेवर भाजलेले अन्न खाणे हा वेगळा अनुभव

'एल बोकेरॉन' ज्वालामुखीचे विशाल मुख, एल साल्वाडोर

कोआतेपेक ज्वालामुखीचे मुख, विशाल सरोवर, एल साल्वाडोर

कोआतेपेक ज्यालामुखीय सरोवर

कोआतेपेक ज्यालामुखीय सरोवर

२. जैवविविधता :
हा संपूर्ण प्रदेश हिरवा गार, नैसर्गिक संपदेने श्रीमंत आहे. पशु, पक्षी, वनस्पती यांच्या असंख्य प्रजाती, सुंदर प्रजाती. पक्षीनिरीक्षकांनी जरूर भेट द्यावी असा प्रदेश! या बाबतीत मी शेजारी होंडुरासला कैक गुण अधिक देईन, त्यांनी जपलेली जैवविवीधता कौतुकास्पद! बेलीझ सुद्धा या बाबतीत अतिशय संपन्न आहे. अर्थात, देशांच्या सीमा मानवांसाठी, सातही मध्यअमेरिकन देशांना निसर्गाचे श्रेष्ठ वरदान प्राप्त आहे! पक्षांचे रंग इतके आकर्षक, पुरातन स्थानिक, रंगीत पिसे पैशांच्या जागी वापरत. ग्वाटेमालाचे चलन केत्झाल हे पक्षाचेच नाव. (जरूर गूगलवर पहा, quetzal). होंडुरास मध्ये कोपान या प्रसिद्ध 'माया' शहरात असंख्य मकाव व टुकान अन्य रंगीत पक्षाबरोबर पहावयास मिळतात.
काही पक्षांची चित्रे:

ग्रेट टेल्ड ग्रॅकल

अल्तामिरा ओरिओल

हेपॅटिक टॅनॅगर

व्हाईट विंग्ड डव्ह

राज गृध्र

ऑसीलेटेड टर्की

टूकनचे प्रकार : एमरल्ड टूकन , कॉलर्ड आराकेरी, चेस्टनट टूकन, कील बिल्ड टूकन

कील बिल्ड टूकन

मकाव

मकाव त्यांच्या नैसर्गिक वावरात

मकाव रंग


नवे मित्र

३. स्थापत्य विशेष :
या देशांतील स्थापत्यविशेष दोन प्रमुख प्रकारचे, प्राचीन माया, व वसाहतकालीन स्पॅनिश. पहिल्या प्रकारात निर्विवाद उत्कृष्ट उदाहरण म्हणजे टिकाल! उत्तुंग भव्य मंदिरे, राजप्रासाद, क्रीडासंकुल या सर्वांनी सुसज्ज महानगर. चिचेन इत्झा, पलेंके, टिकाल व कोपान ही चार ज्ञात माया महानगरे इतिहास प्रेमींना नेहमीच आकर्षित करतात. यातील पहिली दोन मेक्सिको मध्ये आहेत. ग्वाटेमालातील टिकाल भव्यतेसाठी तर होन्डुरासमधील कोपान कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत.

टिकाल : मुख्य इमारत समूह

टिकाल : मुख्य इमारत समूह


टिकाल : राजप्रासाद


कोपान येथील मुख्य प्रांगण, होंडुरास


कोपान येथील बॉल कोर्ट, होंडुरास


कोपान येथील संग्रहालयात पुनर्रचित मंदिर, होंडुरास

कोपान येथील हनुमंत सदृश देवतेची मूर्ती, होंडुरास

कोपान येथील राजाची एक मूर्ती, होंडुरास

एल साल्वाडोर येथील 'होया दे सेरेन' ज्वालामुखी विस्फोटानंतर अख्खे गाव राखेखाली गाडले गेले, आणि त्यामुळे जसेच्या तसे जतन झाले. अमेरिकेचे 'पॉम्पे' अशीही याची ओळख आहे. या जागेमुळे हजार वर्षापूर्वीच्या सामान्य माया जीवनाबद्दल बरीच माहिती मिळते
वसाहतकालीन स्थापत्य कोपान व अँटिग्वा या शहरात पाहण्यासारखे आहे. येथे सतत भूकंप होत असतात त्यामुळे बरीच जुनी बांधकामे आज शिल्लक नाहीत, परंतु नंतर बांधलेल्या इमारतीही जुन्याप्रमाणेच रंगवलेल्या व सजवलेल्या आहेत. जुन्या भग्न इमारतींचाही शहराच्या सजावटीसाठी उत्तम उपयोग करण्यात आला आहे.


कोपान येथील जुन्या बांधणीचा मार्ग, खालच्या गल्लीत एक बजाज ची रिक्षा उभी आहे, भारतीय वाहनांची मध्य अमेरिका मोठी बाजारपेठ आहे


कोपान येथील जुन्या बांधणीचा मार्ग
पुढील सर्व चित्रे अँटिग्वा येथील


विविध वाद्ये वाजविणारे स्थानिक वादक


भूकंपात उध्वस्त झालेल्या चर्चचा बगीचा केला आहे


खुला बाजार

तर ही झाली मध्य अमेरिकेची भटकंती…
…आणि हो, खाण्या पिण्याशिवाय भटकंती कशी पुर्ण होइल? :-) ह्या फोटोत स्थानिक खाद्य पदार्थ, पुपुसा ब्रेड - राजम्याचे सारण भरलेली मक्याची पोळी, राजम्याचे पिठले (फ़्राईड बीन्स) केळ्याचे भाजलेले काप (Plantain) भात व अव्होकाडो.

अवांतर:
१ युद्धभूमीबाहेर जगातील सर्वात असुरक्षित देश म्हणून होंडुरास व एल साल्वाडोर ही नावे युनोच्या यादीत सर्वात वर आहेत. गुन्हेगारी, विशेषकरून खूनाचे प्रमाण येथे सर्वाधिक... दोन्ही देशांतील माझे अनुभव बऱ्यापैकी चांगले होते, पण सद्यस्थितीविषयी नमुद करावेसे वाटले. ग्वाटेमाला ही तसा याच यादीतला
२ अजून एक म्हणजे, भारतीयांना होंडुरास व एल साल्वाडोर दोन्ही देशांसाठी व्हिसा लागत नाही. युरोप किंवा युएस चा मल्टिपल एन्ट्री व्हिसा असेल तर ग्वाटेमाला व बेलीझ यांचाही व्हीझा आवश्यक नाही
३ सन्दर्भासाठी माझा प्रवासाचा मार्ग : मी एल साल्वाडोर ची राजधानी सॅन साल्वाडोर येथे सुरुवात केली, पुढे सर्व प्रवास रस्त्यानेच, होंडुरास मध्ये कोपान, तिथून मध्य ग्वाटेमाला, पुढे उत्तर ग्वाटेमालात टिकाल, तिथून पूर्वेकडे बेलीझ व बेलीझ सिटी मध्ये समाप्ती.


शुभं भवतु

अन्य भटकंती : दक्षिण अमेरिका - पेरू, दक्षिण अमेरिका - अमेझॉन ब्राझील, मध्य अमेरिका - ग्वाटेमाला होंडुरास एल साल्वाडोर बेलीझ, ईशान्य भारत - मणिपूर, ईशान्य भारत -त्रिपुरा, ईशान्य भारत : आसाम, आग्नेय आशिया - ब्रह्मदेश थाईलँड लाओस कंबोडिया मध्य व पश्चिम आशिया - उझबेकिस्तान ताजिकिस्तान अफगाणिस्तान अझरबैजान तुर्कस्तान , पूर्व आफ्रिका - इथियोपिया

प्रतिक्रिया

अप्रतिम प्रकाशचित्र आणि माहिती.
माया संस्कृती अनुभवायची तर चारही देश बघणे क्रमप्राप्त दिसते आहे.इतके दिवस फक्त मेक्सिकोबद्दल जाणून होते.होंडुरास ग्वाटेमाला त्यात येतात माहितच नव्हते.होंडुरासला व्हिसा कटकट नाही ते वाचून आनंद झाला!

सुंदर फोटो आणि रोचक माहिती.

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 11:23 am | वेल्लाभट

माय गुडनेस!

पिलीयन रायडर's picture

11 Mar 2016 - 2:08 pm | पिलीयन रायडर

+१११११११

पद्मावति's picture

11 Mar 2016 - 12:21 pm | पद्मावति

अप्रतिम लेख आणि फोटो.

एस's picture

11 Mar 2016 - 1:01 pm | एस

वाह!

पियुशा's picture

11 Mar 2016 - 1:17 pm | पियुशा

ओएम्जी ....सगळॅ फोटो खतरा जबरा घर/ फुल / रस्ते /बगिचे / पक्षी सगळ किति किति क्युट आहे :)

पैसा's picture

11 Mar 2016 - 2:11 pm | पैसा

तुमची छायाचित्रे नेहमीच सुंदर आणि नावीन्यपूर्ण असतात! जरा जास्त वेळा लिहा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Mar 2016 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

खूप सुंदत फोटो आणि उपयोगी माहिती.

बघण्याच्या यादीत मध्य अमेरिका वर आली !

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 2:44 pm | मधुरा देशपांडे

अप्रतिम!!

जगप्रवासी's picture

11 Mar 2016 - 3:12 pm | जगप्रवासी

पक्षांचे फोटो अप्रतिम आलेत आणि ज्वालामुखी सरोवराचे तर खासच.

सविता००१'s picture

11 Mar 2016 - 3:44 pm | सविता००१

कातिल फोटो आहेत एक से एक. पक्षी, फुलं, घर्,बगीचे, इमारती सगळं एक से एक आहे.
माहितीही रोचक.

इडली डोसा's picture

12 Mar 2016 - 12:56 am | इडली डोसा

तुमच्या या भटकंती वर एक वेगळी लेखमाला हि होऊ शकते.

इडो तू आणि समर्पक तुम्ही, एका अनोळखी, अनवट जागेची ओळख अतिशय सुरेख करुन दिलीत. दोघांचे आभार. कातिल फोटोज आहेत सगळेच.

विद्यार्थी's picture

12 Mar 2016 - 3:39 am | विद्यार्थी

फारच सुंदर फोटो आहेत!!!

यशोधरा's picture

12 Mar 2016 - 8:21 am | यशोधरा

सुरेख फोटो. आवडले.

दीपा माने's picture

12 Mar 2016 - 7:39 pm | दीपा माने

प्रवास आणि फोटोंचे धावते वर्णन आवडले.

सतिश गावडे's picture

13 Mar 2016 - 10:49 am | सतिश गावडे

अप्रतिम... चित्रओळख प्रचंड आवडली.

चित्रपुरवणी प्रचंड आवडली.
इथे फ्रेंच वसाहत होती का? काहीशी पाँडिचेरीतल्यासारखी घरं दिसताहेत.
ज्वालामुखीच्या धगीत पदार्थ गरम करताना पुनः ज्वालामुखी सुरु होण्याची भीती नसते का?

समर्पक's picture

5 Apr 2016 - 3:21 am | समर्पक

इथे स्पेन ची वसाहत होती त्याचा प्रभाव स्थापत्यावर आहे.

ज्वालामुखी सध्या संथ कार्यरत आहे, शास्त्रज्ञ सतत अभ्यास करत असतात त्यामुळे धोका असेल तर काही महिने आधी हालचालीतील फरकामुळे समजते. तसा एल साल्वाडोर मधील ज्वालामुखी साधारण दर १०० वर्षांनी जागृत होतो, त्याचा धोका सध्या वाढला आहे.

चित्रपुरवणी फारच चांगली.

नंदन's picture

5 Apr 2016 - 4:40 am | नंदन

चित्रपुरवणी आणि माहिती - दोन्ही क्लास!

मदनबाण's picture

5 Apr 2016 - 5:05 am | मदनबाण

सुरेख...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का

खटपट्या's picture

5 Apr 2016 - 5:14 am | खटपट्या

जबरा चित्रे

यशोधरा's picture

5 Apr 2016 - 6:17 am | यशोधरा

सुरेख प्रचि. धन्यवाद!

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2016 - 7:22 am | श्रीरंग_जोशी

अप्रतिम आहेत सर्व फोटोज. पक्षांचे तर खूपच आवडले. थोडक्यात लिहिलेले वर्णनही तुमच्या सदस्यनामाप्रमाणेच समर्पक आहे.