पेरू : भाग १ : राजधानी लिमा

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
12 Aug 2014 - 9:54 pm

माझ्या पेरु देशातील एकल प्रवासाची ही कहाणी. निसर्गवैविध्यसंपन्न अशा मोजक्या देशांपैकि हा एक!
हे देश एका अर्थाने 'पैसा वसूल' असतात कारण एकाच भेटीत अनेक अनुभव घेता येतात. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानासाठी तयारीही करावी लागते, ओझं ही बाळगावं लागतं. साधारण एक दीड महिना आधी, पीतज्वर लसिकरण् व तिकिटांपासून तयारीला सुरुवात झाली. (विषुववॄत्तीय देशांमध्ये जाण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे)

आधी थोडा इतिहास भूगोलः हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम-मध्य किनारपट्टीवर आहे. उत्तर आणि पूर्व भाग अमेझॉनचे जंगल, दक्षिण-मध्य भाग हा उंच पठार व हिमाच्छादित पर्वतरांगा, दक्षिण किनारपट्टीवर रूक्ष वाळवंट व धुक्याने कायम आच्छादलेला पश्चिम किनारा असा थोडक्यात भूगोल. इथले मूळचे लोक हे अनेकविध भटक्या व नागरी संस्कृतींचे वंशज आहेत. केचुआ हे त्यातील सर्वात प्रगत. त्यांच्या राजाला 'इंका' असे म्हणत आणि त्याच अभिधानावरून बहुतांश जग या संस्कृतीला 'इंका' या (चुकीच्या) नावाने ओळखते. पुढे स्पेनच्या गुलामीचे दुर्दैवी पर्व आणि सध्याचा 98% ख्रिस्ती देश असा थोडक्यात इतिहास.

.

माझ्या प्रवासाची सुरुवात मी इथपासून केली. राजधानी लिमा. जुन्या शहरातील प्रवास हा मुख्यत्वे पाईच केला. संग्रहालयांपैकी फ़क्त महत्वाची दोन पहायची ठरवली कारण कुठल्याही ऐतिहासिक संपन्नता असलेल्या देशांची संग्रहालये हाच मुळी अतिशय वेळखाऊ विषय असतो, आणि वेळ असेल तर मात्र नक्की द्यावा. असो, संग्रहालयांवर एक भाग नंतर...

राजधानी लिमा हे बंदर असून अतिशय नपिक व ओसाड भागात वसलेले आहे. परंतु कोलोनिअल् स्थापत्यकलेचे अतिशय समृद्ध नमुने इथे पहावयास मिळतात. अतिशय विस्तृत असे चौक, रेखिव बाल्कन्या (सौध/गवाक्ष) आणि भडक पण शोभणारे रंग अशी येथील वास्तुकलेची काही वैशिष्ट्ये.

प्लाझा सान मार्टीन्

.

काही रेखीव बाल्कनी

.

.

.

.

.

चर्च ही दुसरी बघण्यासारखी वास्तुशिल्पे.

इग्लेझिआ डे ला मेर्सेद् चे अल्तार
.

लिमा मुख्य चर्च्
.

.

.

सान् पेद्रो बसिलिका
.

सान् फ़्रान्सिस्को चर्च् च्या तळघरात मिळालेले असंख्य सांगाडे. धर्मांतराचे बळी...
.

नव्या जुन्याचा संगमः भर वस्तीतले दक्षिण अमेरिकी पिरॅमिड् : व्हाका-पुक्याना (huaca pucllana)
.

कोस्ता वेर्दे हिरवा किनाराः भर दुपारी सुद्धा असे मळभ/धुके असते...
.
.

पेरू राष्ट्रपती भवनः राष्ट्रीय चिन्ह
.

नविन लिमाः एका उद्यानातील कारंजे
.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Aug 2014 - 10:12 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम!!! फारच सुंदर!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2014 - 12:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

इमारतींचे बाह्य भाग फारच आवडले. त्या इमारतींमागे निश्चितच रक्तरंजित वसाहतवादाचा इतिहास आहे. पण तरीही तो पिवळा रंग खास द. अमेरिकन वाटला.

कवितानागेश's picture

13 Aug 2014 - 6:00 pm | कवितानागेश

सुंदर जागा आहे.

प्यारे१'s picture

13 Aug 2014 - 6:09 pm | प्यारे१

सुंदरच. येऊ द्या अजून.

मधुरा देशपांडे's picture

13 Aug 2014 - 7:12 pm | मधुरा देशपांडे

सुंदर फोटो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2014 - 7:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त फोटो ! बाल्कन्या फारच आवडल्या.

माचूपिच्चू मनात भरलेली, सतत खुणावणारी गोष्ट आहे. तिच्या फोटोंची वाट पहात आहे :)

एस's picture

13 Aug 2014 - 8:14 pm | एस

काय मस्त फोटो काढले आहेत आपण! सुरेख. पण जरा प्रत्येक फोटोची थोडक्यात ओळख करून देता येईल का? पुभाप्र.

सखी's picture

13 Aug 2014 - 8:21 pm | सखी

छान फोटो आणि वर्णन, ओळखही आवडली. शेवटचा फोटो खासच.
माझ्या कॉलेजमध्ये एक पेरुमधली मैत्रिण होती, तिथल्या निसर्गाचे - डोंगर-द-यांचे फोटो अजुनही लक्षात आहेत - तुमच्या वर्णनात ते येतील अशी आशा बाळगुन आहे.

खटपट्या's picture

13 Aug 2014 - 10:16 pm | खटपट्या

सुन्दर फोटो !!

मुक्त विहारि's picture

13 Aug 2014 - 11:28 pm | मुक्त विहारि

आवडले...

खटपट्या's picture

14 Aug 2014 - 1:53 am | खटपट्या

सुन्दर !!!

चौकटराजा's picture

14 Aug 2014 - 10:38 am | चौकटराजा

सर्व फोटो उत्तम आले आहेतच. तेथील घरांवर अर्थातच युरोपमधील वास्तुकलेचा प्रभाव आहे. चर्च मधील आईल चा छताचा भाग केवळ अतिसुंदर !

जगभरातले एरवी कधी पाहिले जाण्याची शक्यता नगण्य असलेले सुंदर देश फिरुन तिथला वृत्तांत, परिचय आणि फोटो देणारे लेख ही आंतरजालामुळे मिळालेली एक अत्यंत उत्कृष्ट भेट आहे.

या आणि अशा लेखांमुळे मिपासारखी व्यासपीठं सार्थ होतात.

तुम्हाला आणि तुमच्यासारख्या असंख्य मुशाफिरांना धन्यवाद.

प्रचेतस's picture

14 Aug 2014 - 11:19 am | प्रचेतस

धन्यवाद.
पेरूमधल्या नाझ्का रेषा पाहिल्या असतील तर त्यावरही काही येऊ द्यात.

केदार-मिसळपाव's picture

14 Aug 2014 - 1:39 pm | केदार-मिसळपाव

द. अमेरिका... मस्तच...आता वाचतो.
ते माचु-पिचु तिथलेच ना?

शरभ's picture

14 Aug 2014 - 4:05 pm | शरभ

मस्त फोटो. शेवटच्या फोटोमधे जोडप्याचं येणं खास.

माझीही शॅम्पेन's picture

14 Aug 2014 - 8:22 pm | माझीही शॅम्पेन

अरे फोटो बघून ब्राझीलचा जुळा भाउ वाटतोय ..

माझ्या भर फुटबाल विश्वचषकातील ब्राझील वारी वर आता लिहिण आल

प्यारे१'s picture

14 Aug 2014 - 8:59 pm | प्यारे१

मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना?

भाजी...आगागागागागाआआ ;)
(तिखट लागल्यानंतर गायचं पद्य)

माझीही शॅम्पेन's picture

14 Aug 2014 - 9:08 pm | माझीही शॅम्पेन

"मिपावर वेगळा पुरुष विभाग येणार होता ना"

अगदी अगदी तस झाल तर ब्राझील बद्दल तेंव्हाच अजुन मनोरंजक लिहिता येईल :)

आमचं प्र-वकता प्रतिनिधी कुठं गेलं हुम्ब कुणाला म्हायती!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2014 - 11:15 pm | अत्रुप्त आत्मा

छान!

पैसा's picture

18 Aug 2014 - 10:15 pm | पैसा

खूप छान फोटो आणि वर्णन! मात्र ते सांगाडे पाहताना अंगावर शहारे आले. क्रौर्यात स्पॅनिश लोक पोर्तुगीजांपेक्षा काकणभर सरसच होते बहुधा. :(

सफरीची सुरुवात छान झालीये. धर्मांतराच्या बळींचा सोडला तर बाकी फोटू अगदी छान!

सहज मागे भटकंती मध्ये पाहत होतो, कारण बर्‍याचदा मिपा वर येता आले नसल्याने काही सफरी वाचायच्या राहुन गेल्यात. आणि तुमची ही सफर सापडली.. मस्त सुरुवात आहे.. सर्व भाग वाचेन..

ब्राझील - पेरु यांना निसर्गाने खुप काही दिले आहे असे ऐकुन आहेच.. त्यामुळे ही सफर सापडल्याने मजा आली