जेएनयूतला अराज्यवाद (?)

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 2:13 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

9 फेब्रुवारी 2016 ला दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घडलेल्या घटनेची चित्रफित मी 10 फेब्रुवारीला पाहिली! विद्यार्थ्यांच्या देशाविरूध्द जोशातल्या घोषणा ऐकून खूप अस्वस्थ झालो. दुसर्‍ंया दिवशी विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या- ऐकल्यात तर अजून चक्रावलो. हा काय प्रकार आहे? काय लिहावे. लिहू का नको वाटले. पण आत खदखदत राहिलो. 10 फेब्रुवारीला दाखवली गेलेली चित्रफित खोटी होती म्हणे. म्हणून सुधारीत 11 फेब्रुवारीला प्रसारीत केलेली चित्रफित पाहिली. घोषणांचा आशय तोच होता. जेएनयूतले काही विद्यार्थी बदलले तरी घोषणा भडकाऊ होत्याच. या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ कोलकत्त्यातील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पुन्हा तेच केले. रस्त्यावर उतरून जेएनयूतल्याच आक्षेपार्ह घोषणा दिल्या.
भारत सरकार म्हणजेच भारत देश समजतात की काय असे लोक? भारत सरकार आणि भारत देश यांच्यात फरक करता आला पाहिजे! (सरकार पाच वर्षांत बदलत असतं. शासन स्थिर असतं. आपण सरकार आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूध्द लढू शकतो. भ्रष्ट व्यवस्थेविरूध्दही लढू शकतो. लोकशाहीने आणि भारताच्या संविधानाने दिलेला तो आपला हक्क आहे. पण देशाविरूध्द लढणे माझ्या आकलनापलिकडे आहे!) केंद्रात अन्य इतर पक्षाचे सरकार असतानाच्या काळात या विद्यापीठात अशा प्रकारचे आक्षेपार्ह कार्यक्रम याआधीही घेण्यात आले आहेत, म्हणून हे अधिक चिंताजनक ठरते. केंद्रात कोणतेही सरकार असो, दहशतवादी वा नक्षलवादी विचारसरणीचा प्रचार आपण कसा सहन करावा? समजा भारतात नव्हे तर उदाहरण म्हणून अमेरिकेच्या काही नागरिकांनी अमेरिकेत अमेरिकेविरूध्द अशा दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या घोषणा दिल्या तरी भारतीय असूनही आपल्याला ती पटणार नाहीत, इतकी ही गोष्ट आक्षेपार्ह आहे. आपल्या खिशातून जो कर जातो त्या करातून हे विद्यार्थी शिकतात. या विद्यापीठातील एका विद्यार्थ्यामागे एका वर्षाला तीन लाख रूपये शासन म्हणजे आपण खर्च करतो. त्यांनी भारताचे तुकडे करण्याची भाषा करावी, हे मी (पुरोगामी असलो तरी) समजू शकत नाही. दहशतवाद्यांचे काम किती सोपे होत आहे पहा.
एखाद्या देशात जन्माला येऊन वा एखाद्या देशाचे नागरिकत्व असूनही त्याच देशाच्या बरबादीसाठी स्वत:ला झोकून देत लोकांचं प्रबोधन करणं याला विशिष्ट बौध्दीक पातळीवर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणणं समजा घटकाभर मान्य केलं तरी अशा लोकांनी त्या देशाच्या नागरिकांच्या करातून शैक्षणिक वा अन्य सवलती मिळवणं हे त्यांच्या नैतिकतेत बसू शकतं का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा सवलती त्यांनी प्रथम नाकारायला हव्यात.
एका विद्यार्थ्याला अटक झाली त्याच वेळी सर्व आरोपींना अटक व्हायला हवी होती. एकाला अटक करून बाकिच्या आरोपी गुन्हेगारांना भूमिगत व्हायला पुरेसा वेळ मिळाल्यानं हे प्रकरण जास्त चिघळत गेलं. आरोपी गुन्हेगार विद्यार्थी नेमके कोणते ते शोधून त्या सर्वांना पोलिसांनी उशीरा का होईना एकाच वेळी ताब्यात घ्यायला हवं होतं. अटक केलेल्या विद्यार्थ्याचे अपील वाचलं होतं. त्या अपिलाची गोळाबेरीज एका वाक्यात अशी सांगता येईल: ‘माझा भारताच्या संविधानावर आणि एकात्मतेवर विश्वास आहे!’ ...दुसर्‍या दिवशी त्याने सांगितलं की ते अपिल पोलिसांनी त्याच्याकडून दबावानं लिहून घेतलं. याचा अर्थ त्या विद्यार्थ्याचा भारताच्या संविधानावर विश्वास नाही असा होऊ शकतो का?
जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो. ज्या देशावर वा देशातल्या प्रांतांवर हे राजकीय पक्ष राज्य करणार आहेत, त्याच देशाच्या बरबादीचा प्रचार करणार्‍या मुठभर लोकांना काही राजकीय पक्ष कुरवाळतात. हे बेरजेचं राजकारण नसून संधीसाधूपणा आहे. रस्ता चुकलेल्या लोकांच्या जातीधर्माचे सर्व लोक आपल्याला मतदान करतील अशी खोटी व संकुचित विचारसरणी या मागे दिसते. अशा फुटीरतावादी लोकांच्या पाठिंब्याने निवडून आलेले सत्ताधारी देशाला कसं वाचवू शकतील? पण अशा मुठभर फुटीरतावादी लोकांमागे त्या त्या जाती धर्माचे लोक उभे नसतात हे अशा राजकारण्यांनी लवकर समजून घेतलेलं बरं.
संसद हल्यानंतर अफजल गुरूची मुलाखत ऐकली होती. जेएनयू घटनेनंतर पुन्हा दुसर्‍यांदा ऐकली. त्या मुलाखतीतून त्याच्या गुन्ह्याची त्याने कबूली देत असं स्वत: स्पष्ट केलं आहे: पाकिस्तानातील गाझीबाबा व जैशच्या तो संपर्कात आल्याने त्याच्या आहारी गेला होता. त्याच्या आदराखातर पाकिस्तानात जाऊन दहशतवादी ट्रेनिंग घेऊन भारतात आला. गाझीबाबा सांगेल ते करण्याची त्याची तयारी होती कारण त्याला पैशांची आवश्यकता होती. पैशांसाठी त्याने संसदेवर हल्ला करण्याच्या कटाला पूर्णत्व ‍दिलं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रतिकावर हा हल्ला होता. (संसदेत घुसून सर्व खासदारांना ठार मारणं- मग ते कोणत्याही पक्षाचे असोत- असा हा कट होता, असं अफजल गुरू म्हणाला. त्या हल्ल्यातून आपल्या जवानांचे बळी देऊन वाचलेले खासदार आज वाट चुकलेल्या विद्यार्थ्यांचे समर्थन करीत आहेत. याला काव्यगत न्याय म्हणावा का अजून काही?)
काश्मीर भारतात कसं वि‍लीन झालं, हे अफजलला माहीत नव्हतं. काश्मीरच्या काही भागावर पाकिस्तानने कसा कब्जा मिळवला हे त्याला माहीत नव्हतं. आणि काश्मीर का आझाद करायचं हेही त्याला माहीत नव्हतं. काश्मीरबाबत कसलाही आदर्शवाद त्याच्यापुढे नव्हता की कुठलं विशिष्ट तत्वज्ञानही नव्हतं. सारांश, अफजल गुरू हा पैशांसाठी विकला गेलेला एक धंदेवाईक- वाट चुकलेला फक्‍त दहशतवादी होता. (याउलट अफजलगुरूचा मुलगा उच्च शिक्षण घेऊन देशासाठी काही करू इच्‍छितो, हे ऐकून बरं वाटलं.)
या पार्श्वभूमीवर अशा फालतू आदर्शहीन व कोणताही बौध्दीक पाया नसलेल्या दहशतवादी अफजल गुरूच्या व मकबूल भट्टच्या समर्थनार्थ, जेएनयूतील स्कॉलर- संशोधक (?) विद्यार्थी भारताच्या नागरिकांच्या पैशाने शिकत, जर आपल्याच देशाविरूध्द कट कारस्थानं करत असतील तर ह्या विद्यार्थ्यांना कोणती विशेषणं लावावीत, मला सुचत नाही. हे विद्यार्थी खरंच अभ्यासू असतील, उदारमतवादी असतील आणि ‍वैश्विक दृष्टीकोनातून त्यांना दहशतवाद्यांची भूमिका योग्य वाटत असेल तर त्यांनी तसा अभ्यासपूर्ण प्रबंध लिहून आपल्या संशोधनातून जगासमोर सिध्द केलं पाहिजे. सवंग घोषणा देऊन त्यांचा उदारमतवाद सिध्द होत नाही.
राज्यशास्त्रात अराज्यवाद नावाची एक संकल्पना आहे. त्यात जगातील काही विचारवंत कोणतीच सत्ता वा देशाची विशिष्ट सीमा मानायला तयार नसतात. जगाचे स्वतंत्र नागरिक म्हणून आपले स्वातंत्र्य अबाधित का असू नये असं त्यांचं म्हणणं असतं. या विद्यार्थ्यांच्या डोक्यात अशी काही संकल्पना असण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण असे विचारवंत वा बुध्दीवान लोक एका फालतू विकाऊ बिनबुडाच्या दहशतवाद्याच्या समर्थनार्थ कधीही घोषणा देणार नाहीत आणि आपल्या स्वत:च्याच काय अन्य कोणत्याही राष्ट्राच्या बरबादीसाठी घोषणा देत रस्त्यावर उतरणार नाहीत. म्हणूनच वेगवेगळ्या पध्दतीने पुरोगामी विचार करून, स्वत:ला वैश्विक नागरिक समजूनही मला अशा (वाट चुकलेल्या) विद्यार्थ्यांच्या बाजूने अवाक्षरही बोलता येणार नाही. (लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

1 Mar 2016 - 3:00 pm | बोका-ए-आझम

+१

सुबोध खरे's picture

2 Mar 2016 - 12:06 am | सुबोध खरे

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Mar 2016 - 3:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सहमत !

पण हल्ली इतका साधा-स्वच्छ-प्रामाणिक विचार करणे बुद्धिवादाचे लक्षण समजले जात नाही. :(

पण हल्ली इतका साधा-स्वच्छ-प्रामाणिक विचार करणे बुद्धिवादाचे लक्षण समजले जात नाही. :(

जर हा लेख केक असेल तर इए काकांचा प्रतिसाद इज चेरि ऑन धिस केक.
लेखातिल मतांशि सहमत.

पैसा's picture

1 Mar 2016 - 9:56 pm | पैसा

लेख आवडला. सहमत आहे.

निमिष ध.'s picture

1 Mar 2016 - 11:53 pm | निमिष ध.

लेख चांगला आहे पण पूर्ण अभ्यास करून लिहीलेला नाहीये. जर त्यांनी पकडलेल्या कन्हैयाचे भाषण नीट ऐकले असते तर "जेएनयूतील स्कॉलर- संशोधक (?) विद्यार्थी भारताच्या नागरिकांच्या पैशाने शिकत, जर आपल्याच देशाविरूध्द कट कारस्थानं करत असतील तर ह्या विद्यार्थ्यांना कोणती विशेषणं लावावीत, मला सुचत नाही." अशी विधाने केली नसती.

माहितगार's picture

2 Mar 2016 - 1:53 pm | माहितगार

बरं मग त्यांनी कोणते दिवे लावले, ते तरी सांगा
dive

छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स छा: सबरी

प्रश्न हा आहे कि "देशा विरुद्ध घोषण देणे, पत्रके वाटणे..".हे समर्थनीय आहे कि नाही" मग ते कान्हय्या ने करो कि xyz ने करो....कान्हय्याने नसेल दिल्या तर तो न्यायालयात सुटेल पण बुद्धिवादी लोक ह्या घोषणाबाजीला गुन्हा मानायला तयार नाहीत कारण तो व्यक्तिस्वातंत्रयाचा भाग आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
आणि हे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न करतायत...काही म्हणतात हा ब्रिटिशकालीन कायदा आहे आणि त्याची गरज नाही आणि ब्रिटिश संसदेने सुद्धा तो रद्द केलाय ई ई.
पर्वा नेट वर अमेरिकन पॅट्रिऑट ऍक्ट पोस्ट 9/11 वाचत होतो...आपल्याकडील बुद्धिवादी तर चक्कर येऊन पडतील.

मोदक's picture

2 Mar 2016 - 6:56 am | मोदक

>>>पर्वा नेट वर अमेरिकन पॅट्रिऑट ऍक्ट पोस्ट 9/11 वाचत होतो...आपल्याकडील बुद्धिवादी तर चक्कर येऊन पडतील

इथे देता का ?

तो करातून शिक्षणाचा मुद्दा सोडल्यास बाकी सर्व लेख +100

नाखु's picture

2 Mar 2016 - 9:49 am | नाखु

तर भांगेतली तुळस आहे

अस्सल लिखाणाचाही वाचक नाखु

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 10:19 am | मुक्त विहारि

+१

देशपांडे विनायक's picture

2 Mar 2016 - 10:39 am | देशपांडे विनायक

खर दुखणे हे आहे ''जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो ''
यावर उपाय ?

काही लाेकांना वाटते की थे बुद्धिजीवी आहेत व त्यांना काहीही करण्याचा हक्क आहे, पण अशा मुर्खांच्या नंदनवनात राहणा- यांना खरे देशभक्त जिवंत ठेवणार नाहीत.

मुमताझ काद्री च्या फाशि वरुन पाकिस्तानात सध्या जो धिंगाणा चालला आहे तो बघा. दहशतवादाला आणि कट्टरपंथियांना सपोर्ट करता करता पाकिस्तान ने आपलेच हात कसे जाळुन घेतलेयत ते बघा.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 2:48 pm | तर्राट जोकर

तेच आम्ही इथेही भारतात सांगत असतो. कट्टरपंथियांना जास्त हवा देऊ नका. नाहितर त्याचा पाकिस्तान, अफगाणिस्तान् होतो. पण काही लोकांना आपलं वेल-मॅनर्ड वाटत असतं. मुस्लिम एक्स्ट्रीमिस्टना सुद्धा असंच वाटतं.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Mar 2016 - 5:52 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. कट्टरपंथी नुकसानच करतात. त्या 'ल्ल्ल्ल्ल्ल्ल लाल सलाम लाल सलाम' वाल्यांनी प. बंगालचे कसे हाल केले आहेत ते पाहीले कळते. वाईट वाटते याचे की तेच लोक जनेयु मधे पण गोंधळ घालत आहेत हे काही लोक मान्य करत नाहीत. शिक्षणाचे इतके प्रचंड Rediकलायझेशन झाले आहे की एखादा योग्य लिहीणारादेखील भगवा वाटू लागतो.
असो.

होबासराव's picture

2 Mar 2016 - 5:54 pm | होबासराव

पेशव्यांशी पुर्णत: सहमत

पुअर एन्ड असतो बिचार्‍यांचा. १७ व्या शतकातलि थिअरी वापरुन त्याना स्वप्न दाखवले जातात, जे कि पुर्णतः कालबाह्य आहे.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 6:27 pm | तर्राट जोकर

तेच. कुठलाही कट्टरपंथी नुक्सानकारकच. म्हणूनच आम्ही कोणत्याही कट्टरपंथीच्या विरोधात असतो. त्यामुळे आम्ही मग कोणाला हिरवा वाटतो, कोनाला लाल, कोणाला अजुन काही.

विरोधी रे विरोधी तेरा रंग कैसा, जिसके खिलाफ बोलु उसके विरोधी जैसा.;-)

गुलाम's picture

2 Mar 2016 - 4:06 pm | गुलाम

एका अतिशय गंभीर आणि गुंतागुंतीच्या घटनेचं अतिसुलभीकरण केलेला लेख. हा पुर्ण घटनाक्रमच सुरुवातीपासून अतिशय संशयास्पद वाटतोय आणि यात नक्कीच कुणाचेतरी कारस्थान आहे. आता कारस्थान भाजपचे की डाव्यांचे ते नक्की माहित नाही आणि कदाचित कधीच कळणार नाही. यातल्या प्रत्येक घटनेबद्द्ल भाजप चे आणि डाव्यांचे वेगळे व्हर्जन ऑफ ट्रुथ (मराठी प्रतिशब्द?) आहे आणि त्यासाठी परस्परविरोधी पुरावेही समोर येत आहेत.

आज पुन्हा बातमी आली आहे की देशविरोधी घोषणांच्या सातपैकी तीन क्लिप्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे समोर आले आहे. खरेखोटे कोर्टात समोर येईलच. पण तोपर्यंत केवळ टीआरपीभुकी मिडीयाच्या सांगण्यावर विसंबून कुणाला देशद्रोही ठरवणे आणि त्यांना जिवंत ठेवणार नाही वगैरे म्हणणे चुकीचे आहे.

राजाभाउ's picture

2 Mar 2016 - 4:54 pm | राजाभाउ

जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो

या मागे हेच एक (मेव) कारण आहे.

होबासराव's picture

2 Mar 2016 - 4:58 pm | होबासराव

जेएनयूतील घटनेने एक गोष्ट लक्षात आली: कोणत्याही राजकीय नेत्याला वा पक्षाला देशाच्या एकात्मतेशी काही घेणं देणं नाही. येत्या निवडणूकांसाठी आपली वोटबँक कशी वाढेल या भूमिकेची जो तो काळजी घेताना दिसतो

लय वेळा सहमत. त्यात निवडणुक पश्चिम बंगाल किंवा केरळ मध्ये असलि कि काहि कालबाह्य विचारसरणि असलेले पक्ष असले निंदनिय कृत्य करतातच करतात.

माझ्या मते तरी भाजपा रीसिव्हिंग एन्ड ला आहे. बचाव करायचा प्रयत्न करतेय, त्यामुळे कारस्थान कोणाचे आहे हे स्पष्ट होत.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 5:37 pm | तर्राट जोकर

जे एन यु राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा आहे हे विधान कधी प्रकाशित झाले ते सर्च मारुन बघा. रिसीविंग एन्ड आणि कारस्थानाचा उगम ह्याबद्दल मत कदाचित बदलेल.

होबासराव's picture

2 Mar 2016 - 5:45 pm | होबासराव

जे एन यु राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा आहे हे विधान कधी प्रकाशित झाले ते सर्च मारुन बघा
मि मुळात सर्च मारुन बघितलेल्या सगळ्याच गोष्टिं वर विश्वास ठेवत नाहि. राहिला प्रश्न जे एन यु चा तर अगदि जवळच्या लोकांनि जे कधि काळि जे एन यु शि पिएचडी रिलेटेड संबधित होते जे मत व्यक्त केलय सेम तेच मत मिपाकर सोन्याबापु आणि बॅटमॅन ह्यांनि व्यक्त केलय ते मत म्हणजे जे एन यु वेडझव्यांचा अड्डा आहे. आणि मि ह्या मताशि सहमत आहे.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 6:24 pm | तर्राट जोकर

नक्कीच. जे एन यु हा कम्युनिस्ट युटोपिया आहे. पण कम्युनिस्ट युटोपिया असणे म्हणजे राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा संबोधले जाणे फारफेच्ड वाटत नाही?

ही बातमी नोवेंबर २०१५ ची. पांचजन्य ह्या संघाच्या मुखपत्रात असे विधान केले गेले आहे.

खाली लिंक देतोय, पांचजन्यमधे जे एन यु शी संबंधीत सर्व लेखांची तारिखवार मांडणी आहे.

http://panchjanya.com/Search.aspx?lang=5&q=%20%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%8...

ही लेखमाला पहिला दुवा,प्रत्यक्षात हा ही नाही.

१. ७५ पोलिस मारले गेले (६ एप्रिल २०१०)
२. ह्यानिमित्त जेएनयुतल्या प्रो-नक्सली विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला असा भाजपाचा दावा आहे. ह्या दाव्याला समर्थन देणारी निष्पक्ष बातमी वा पुरावा नाही. पण जे एन युतले वातावरण बघता हे झाल्याची शक्यता टाळू शकत नाही. पण भाजपा जशी मांडते आहे ती घटना तशीच घेतली पाहिजे असेही नाही.
३. ह्यानंतर पांचजन्यची जेएनयु लेखमाला.
४. एबीवीपीचा जेएनयु स्टुडंट युनियनचा अध्यक्ष होण्यासाठीचा प्रकर्षाचा संघर्ष.
५. कन्हय्यांचे अध्यक्षिय निवडणुकीसाठी झालेले संघविरोधी,ब्राह्मणवर्चस्ववादविरोधी, मनुस्मृती विरोधी टीपीकल आंबेडकरी छापाचे भाषण.

एक एक पाऊल उचलत कन्हय्याच्या मारहाणीपर्यंत गोष्ट गेली. देशविरोधी घोषणा म्हणजे ज्यांनी खरंच भारतीय भडकले ते म्हणजे भारत तेरे तुकडे होंगे, हर घरसे अफझल निकलेगा, भारत की बरबादी तक जंग रहेगी ह्या घोषणा देणारे कोण हे अजून तरी पकडले गेले नाहीत. अनेक रिपोर्ट्स नुसार कार्यक्रम तर आयोजित केला होताच, पण दोन गृपमधे घोषणाबाजी होऊन ह्या घोषणा विडियोत आल्या (की बाहेरून टाकल्या) हे स्पष्ट नाही. पोलिस इन्क्वायरीमधे दोन गृपमधे अशी बाचाबाची झाली असे नमूद केलंय पण तो दुसरा गृप कोण हे मात्र सांगितलेले नाही. इथे तो अभाविपचा गृप आहे असे दुसर्‍या काही रिपोर्ट्सवरुन कळतं.

मी आधीच म्हटल्याप्रमाणे इथे संशयाचा फायदा कुणालाच मिळत नाही. ना डावे, ना संघ, ना परदेशी ताकते(ह्यात अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही). हेच प्रकरण उकरुन काढण्यासाठी रोहित प्रकरणावरुन लक्ष हटवणे हा डाव्यांचा दावा आहे. जेएनयुच्या पुर्वैतिहासानुसार असे कार्यक्रम वर्षानुवर्षे जर जेएनयुत होत असतील तर नेमकं आत्ताच असं व्हायला काय निमित्त असावं?

बाकी निष्कर्ष काढणारे आपण कोण? जे तिथे होते, ज्यांनी ते प्रत्यक्ष बघितलं त्यांनाही रशोमोन सारखं सत्य माहित असेलच असे नाही. सत्य सत्य असतं, पण प्रत्येकाच्या व्यक्तिगत सत्याचा अजेंडा वेगळा असतो. सगळ्यांचे सगळे दावे फारफेच्ड वाटतात. कोणीही (अगदी डावे, उजवे, मध्यम, माध्यम) मांडत असलेल्या भूमिका स्पष्ट आणि निष्कपट वाटत नाहीत.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 6:32 pm | तर्राट जोकर

पोलिसांच्या स्टेट्सरिपोर्टची हार्डकॉपी
http://www.firstpost.com/india/jnu-row-how-delhi-police-assembled-its-ca...

जेएनयुच्या पुर्वैतिहासानुसार असे कार्यक्रम वर्षानुवर्षे जर जेएनयुत होत असतील तर नेमकं आत्ताच असं व्हायला काय निमित्त असावं?

फक्त एकच प्रश्न
"भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह" "अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है" ह्या असल्या घोषणा सुद्धा असल्याच वर्षानु वर्ष चालणार्‍या कार्यक्रमात दिल्या गेल्या आहेत का?
का तो व्हिडिओ कंप्लिटलि फॅब्रिकेटेड होता आणि ते विद्द्यार्थि "भारत माता कि जय" "वंदे मातरम" म्हणत होते.
जर आयोजक कन्हैय्या चा ह्या गोष्टिंशि काहि हि संबध नव्हता तर मग "भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह" "अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है" ह्या घोषणा देणारे कोण होते ? जर ते विद्यार्थि होते तर मग जेएनयु सुद्धा चौकशि च्या कक्षेत येते. जर ते विद्यार्थि नव्ह्ते आणि तरि तिथे असल्या घोषणा देत होते तर मग त्यांचा एक्झॅक्ट्लि जेएनयु शि कनेक्श्न काय ? त्यांचे कुठले स्लिपर सेल आणखि जेएनयु मध्ये आहेत ?

हे प्रश्न मला एक सामान्य भारतिय म्हणुन पडलेयत, तुम्हाला शक्य असेल तर उत्तर द्यावे पण हे प्रश्न मि वैयक्तिकरित्या तुम्हाला एकट्यालाच नाहि विचारत आहे.

तर्राट जोकर's picture

2 Mar 2016 - 6:52 pm | तर्राट जोकर

एकच म्हणून अनेक प्रश्न विचारलेत. ;-)

भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह" "अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है" ह्या असल्या घोषणा सुद्धा असल्याच वर्षानु वर्ष चालणार्‍या कार्यक्रमात दिल्या गेल्या आहेत का?
>> माहित नाही. त्यांचे तसे विडिओ कधी दिसले नाहीत.

का तो व्हिडिओ कंप्लिटलि फॅब्रिकेटेड होता आणि ते विद्द्यार्थि "भारत माता कि जय" "वंदे मातरम" म्हणत होते.
>> माहित नाही. ह्या घोषणांचा विडियो एचआरडी मंत्र्यांच्या सहायक शिल्पी तिवारी यांच्या अकांउंटवरुन पहिल्यांदा इंटरनेटवर आला आहे असे काही स्रोत कालपासून सांगत आहेत. ख.खो.दे.जा.

जर आयोजक कन्हैय्या चा ह्या गोष्टिंशि काहि हि संबध नव्हता तर मग "भारत तेरे तुकडे होंगे इन्शाअल्लाह" "अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है" ह्या घोषणा देणारे कोण होते ?
>> घोळक्यात तोंडाला फडके बांधलेले नॉन-जेएनयु व्यक्ती होत्या. हे पोलिस रिपोर्टातही नमूद आहे. एका विडियोत कन्हैया कोणाला तरी आयडीकार्ड विचारत आहे असेही दिसते.

जर ते विद्यार्थि होते तर मग जेएनयु सुद्धा चौकशि च्या कक्षेत येते. जर ते विद्यार्थि नव्ह्ते आणि तरि तिथे असल्या घोषणा देत होते तर मग त्यांचा एक्झॅक्ट्लि जेएनयु शि कनेक्श्न काय ? त्यांचे कुठले स्लिपर सेल आणखि जेएनयु मध्ये आहेत ?
>> हाच पोलिस इन्क्वायरीचा प्रमुख मुद्दा आहे. घोषणा देणारे कोण, तिथे कसे आले, उमर खालिद आणि कन्हयाचा त्यांच्याशी काय संबंध?

दुसर्‍यांच्या सभेत आपली माणसे गुप्तपणे पाठवून सभा उधळून लावण्याचीही कारस्थाने आपल्याकडे होतच असतात. ह्यात असेही काही झाले असेल. नेमके कोणी केले हे नेहमीप्रमाणेच (अगदी डावे, उजवे, मध्यम, माध्यम) हे गुलदस्त्यात आहे व कदाचित कायम राहिल.

खरच कि लक्षातच नाहि आल ;)

चौकटराजा's picture

2 Mar 2016 - 6:49 pm | चौकटराजा

कम्युनिझम मधेही काही चांगल्या गोष्टी आहेत हे चक्क देवेंद्र फडणवीस यानी कबूल केले आहे. कम्युनिझम चांगला आहे पण त्याला कम्युनिस्टानी बदनाम केले शराब को शराबियोने बदनाम किया . असे माझे तरूण पणा पासून मत आहे.डावे म्ह्टले की अस्पृश्य असा एक मतप्रवाह धर्म व पैसा यांच्या प्रभावाखाली असणार्यांत असतो. रशियात झालेला समाजवादाचा
पराभव ही विसाव्या शतकातील सर्वात दु:खद घटना आहे असे कुणी " मराठी" लेखकाने म्हटले होते बरे ? आम्हाला लोकशाही नाही ठोकशाही आवडते असे ही कोणीतरी " मराठी" माणूस म्हणाला होता ना ?