अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
24 Feb 2016 - 5:43 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

८ नोव्हेंबर २०१६ रोजी अमेरिकेत होणार्‍या अध्यक्षीय निवडणुकांचे पडघम वाजू लागलेच आहेत.त्यासंदर्भातील घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा काढला आहे. या निमित्ताने मला जेवढी अध्यक्षीय निवडणुकांविषयीची माहिती आहे ती सर्वप्रथम लिहितोच.त्यातील चुका/त्रुटी दाखविणे, नवीन माहितीची भर टाकणे इत्यादी गोष्टी मिपाच्या परंपरेप्रमाणे होतीलच.मराठी आंतरजालावर अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांसाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल असे स्वरूप या धाग्याला द्यायचा उद्देश आहे.तो उद्देश कितपत साध्य होतो हे बघू.

भारतात कुठल्याही निवडणुकांसाठी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडणे ही प्रक्रिया बरीचशी अपारदर्शक असते.म्हणजे वेगवेगळे पक्ष आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहिर करतात पण नक्की कोणत्या आधारावर हे उमेदवार निवडले या प्रश्नाचे नक्की उत्तर नसते. अमेरिकेत मात्र अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार निवडण्यासाठीची प्रक्रिया ठरलेली आहे.

अमेरिकेतील दोन महत्वाचे पक्ष--डेमॉक्रॅटिक आणि रिपब्लिकन आपले अध्यक्षीय निवडणुकांसाठीचे उमेदवार जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्‍या पक्षांच्या राष्ट्रीय अधिवेशनात निवडतात.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ रोजी ओहायो राज्यात क्लिव्हलँड येथे तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २५ ते २८ जुलै २०१६ रोजी पेन्सिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया या ऐतिहासिक शहरात होणार आहे.या अधिवेशनांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे एकूण २४७२ प्रतिनिधी तर डेमॉक्रॅटिक पक्षाचे एकूण ४७६४ प्रतिनिधी त्यांच्या पक्षांचे उमेदवार निवडणार आहेत.निवडणुकांसाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी या प्रतिनिधींपैकी अर्ध्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे अनुकूल मत मिळणे गरजेचे आहे. म्हणजेच रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी १२३७ तर डेमॉक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी २३८३ मते मिळणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून नक्की कोण सहभागी होणार याची निवड विविध राज्यांमधील प्रायमरी आणि कॉकस यातून होते.काही राज्यांमध्ये प्रायमरी होतात तर काही राज्यांमध्ये कॉकस होतात.प्रायमरी आणि कॉकस यांच्यातील फरक म्हणजे दोन्ही पक्षांच्या प्रायमरी म्हणजे त्या त्या राज्यातील राज्य सरकारने घेतलेल्या सरकारी खर्चाने घेतलेल्या निवडणुका असतात तर कॉकस म्हणजे विविध ठिकाणी पक्षाने स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे असतात. प्रायमरी या निवडणुका म्हणजे नोव्हेंबर मध्ये होणार्‍या निवडणुकीसारखी छोटेखानी निवडणुकच असते.प्रायमरी मध्ये कोण मतदान करू शकतो? तर हे नियम राज्यांप्रमाणे बदलतात.ओपन प्रायमरीमध्ये त्या राज्याच्या मतदारयादीत नाव असलेला कोणीही मतदार आपले मत देऊ शकतो तर क्लोज्ड प्रायमरीमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात.त्याचप्रमाणे ओपन कॉकसमध्ये त्या राज्यातील कोणीही आणि क्लोज्ड कॉकसमध्ये संबंधित पक्षाचे सदस्यच मत देऊ शकतात. प्रायमरीमधील मतदान प्रत्यक्ष निवडणुकांमधील मतदानाप्रमाणेच (मतपत्रिका/मशीनद्वारे) तर कॉकसमधील मतदान खुल्या पध्दतीने--एक तर हात वर करून किंवा संबंधित उमेदवाराच्या समर्थकांना गटांमध्ये एकत्र करून होते. अमेरिकेतील राज्यांपैकी केवळ अलास्का, कोलोरॅडो, हवाई, कॅन्सस, मेन, मिन्नेसोटा, नेवाडा, नॉर्थ डॅकोटा, वायोमिंग आणि आयोवा या राज्यांमध्ये कॉकस तर इतर सर्व राज्यांमध्ये प्रायमरी होतात.

दोन्ही पक्ष विविध राज्यांमधून राष्ट्रीय अधिवेशनासाठी नक्की किती प्रतिनिधी जाणार याचे आकडे ठरवितात. उदाहरणार्थ डेमॉक्रॅटिक पक्षाचे कॅलिफॉर्नियामधून ५४६ तर व्हर्जिनियामधून १०९ प्रतिनिधी आहेत तर रिपब्लिकन पक्षाचे या दोन राज्यांमधून अनुक्रमे १७२ आणि ४९ प्रतिनिधी आहेत.या प्रतिनिधींमध्ये दोन प्रकारच्या प्रतिनिधींचा समावेश होतो. पहिला प्रकार असतो तो म्हणजे प्रायमरी-कॉकसमधून निवडलेले प्रतिनिधी आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे इतर प्रतिनिधी. डेमॉक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते (माजी अध्यक्ष, आजीमाजी सिनेटर वगैरे) यांना सुपरडेलिगेट असेही म्हणतात.डेमॉक्रॅटिक पक्षासाठी वर दिलेल्या आकड्यांमध्ये सुपरडेलिगेटचाही समावेश आहे.रिपब्लिकन पक्षात असाच काहीसा 'अनबाऊंड डेलिगेट' हा प्रकार असतो.

राज्यांमधून हे प्रतिनिधी (डेलिगेट) कसे निवडले जातात हे बघणे पण रोचक आहे.डेमॉक्रॅटिक पक्षांच्या उमेदवारांना विविध राज्यांमध्ये त्या राज्यात मिळालेल्या मतांच्या (प्रायमरी किंवा कॉकसमधून) प्रमाणात असतात.तर रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना बहुतांश राज्यांमध्ये 'विनर टेक्स ऑल' म्हणजे एखाद्या राज्यातून सर्वाधिक मते मिळविलेल्या उमेदवाराला त्या राज्यातून निवडून गेलेले सर्व प्रतिनिधी मिळतात. टेक्साससारख्या काही राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनाही मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळतात.तर न्यू हॅम्पशायर सारख्या राज्यांमध्ये राज्याच्या कायद्याप्रमाणे उमेदवारांना त्यांना मिळालेल्या मतांच्या प्रमाणात प्रतिनिधी द्यावे लागतात. थोडक्यात हे सगळे नियम राज्यांप्रमाणे आणि पक्षाप्रमाणे बदलतात.समजा एखाद्या उमेदवाराला एखाद्या राज्यातून २० प्रतिनिधी मिळणार असतील तर ते २० प्रतिनिधी नक्की कोण असावेत हे संबंधित उमेदवार ठरवितो/ते.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आयोवा आणि न्यू हॅम्पशायरपासून प्रायमरी आणि कॉकसना सुरवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या प्रायमरी आणि कॉकसमधील निकाल बघण्यापूर्वी दोन्ही पक्षांचे महत्वाचे उमेदवार कोण हे बघू. मूळ लेखात सर्व उमेदवारांची विविध प्रश्नांवरील मते वगैरे विस्तारभयास्तव लिहित नाही. ते नंतर कधीतरी प्रतिसादांमधून लिहेन किंवा ही माहिती अन्य कोणी मिपाकराने लिहिली तर उत्तमच.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार

१. माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन
२. व्हरमाँट राज्याचे सिनेटर बर्नी सँडर्स

रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार

१. उद्योगपती डॉनल्ड ट्रम्प
२. टेक्सास राज्याचे सिनेटर टेड क्रुझ
३. फ्लॉरिडा राज्याचे सिनेटर मार्को रुबिओ
४. ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसिच
५. बाल्टीमोरमधील जॉन हाफकिन्स मेडिकल सेंटरमधील माजी डॉक्टर बेन कार्सन

आता बघू आतापर्यंत झालेल्या कॉकस आणि प्रायमरीमध्ये लागलेले निकाल---

१. आयोवा कॉकस (१ फेब्रुवारी २०१६)

डेमॉक्रॅटिक पक्ष

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 आयोवा कॉकस१ फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
हिलरी क्लिंटन49.9%23
बर्नी सँडर्स49.6%21
मार्टिन ओ'मॅली0.6%0

मार्टिन ओ'मॅली यांना आयोवा कॉकसमध्ये फार प्रभाव दाखवता आला नाही.त्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

रिपब्लिकन पक्ष

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

आयोवा कॉकस१ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
टेड क्रुझ27.6%8
डॉनल्ड ट्रम्प24.3%7
मार्को रुबिओ23.1%7
बेन कार्सन9.3%3
रॅन्ड पॉल4.5%1
जेब बुश2.8%1

२. न्यू हॅम्पशायर प्रायमरी (९ फेब्रुवारी २०१६)

डेमॉक्रॅटिक पक्ष

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 न्यू हॅम्पशायर प्रायमरी९ फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
बर्नी सँडर्स60.4%15
हिलरी क्लिंटन38.0%9

रिपब्लिकन पक्ष

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

न्यू हॅम्पशायर प्रायमरी९ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प35.3%11
जॉन कॅसिच15.8%4
टेड क्रुझ11.7%3
जेब बुश11.0%3
मार्को रुबिओ10.6%2

३. नेवाडा कॉकस

डेमॉक्रॅटिक पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 नेवाडा कॉकस२० फेब्रुवारी २०१६
डेमॉक्रॅटिक पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
हिलरी क्लिंटन52.6%19
बर्नी सँडर्स47.3%15

रिपब्लिकन पक्ष (२३ फेब्रुवारी २०१६)

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 नेवाडा कॉकस२३ फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प45.9%12
मार्को रुबिओ23.9%5
टेड क्रुझ21.4%5
बेन कार्सन4.8%0
जॉन कॅसिच3.6%0

४. साऊथ कॅरोलायना प्रायमरी

रिपब्लिकन पक्ष (२० फेब्रुवारी २०१६)

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

  
 साऊथ कॅरोलायना प्रायमरी२० फेब्रुवारी २०१६
रिपब्लिकन पक्ष उमेदवारमते %प्रतिनिधींची संख्या
डॉनल्ड ट्रम्प32.5%50
मार्को रुबिओ22.5%0
टेड क्रुझ22.3%0
जेब बुश7.8%0
जॉन कॅसिच7.6%0
बेन कार्सन7.2%0

डेमॉक्रॅटिक पक्षाची साऊथ कॅरोलायना प्रायमरी २७ फेब्रुवारी रोजी आहे.

आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षात (सुपरडेलिगेट मिळून) हिलरी क्लिंटन ५०३ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर बर्नी सॅन्डर्स ७० प्रतिनिधींसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प ६८ प्रतिनिधींसह आघाडीवर आहेत तर टेड क्रुझ ११ प्रतिनिधींसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत.मार्को रुबिओ,जॉन कॅसिच आणि बेन कार्सन यांना अनुक्रमे ९, ५ आणि ३ प्रतिनिधी मिळाले आहेत.

यानंतर १ मार्चला अलाबामा, अलास्का, अरकॉन्सॉ,कोलोरॅडो,जॉर्जिया,मॅसॅच्युसेट्स,मिन्नेसोटा,ओक्लाहोमा,टेन्नीसी, टेक्सास, व्हरमॉन्ट आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये प्रायमरी किंवा कॉकस असतील. या मंगळवारला सुपर ट्युजडे म्हणतात.जशी या प्रायमरी-कॉकसचे निकाल येतील तसे ते इथे लिहिणारच आहे.

या विषयात रस असलेल्या सर्व मिपाकरांना विनंती आहे की तुम्हीही या लेखात जेव्हा जमेल तेव्हा आणि तशी भर टाका. मला एकेकाळी अमेरिकेच्या राजकारणात भारताच्या राजकारणाइतकाच रस होता.पण आता तो खूप कमी झाला आहे.त्यामुळे माझ्या माहितीत काही चुका/त्रुटी असतीलच.त्या पण कोणी दूर केल्या तर फारच उत्तम.मी पण वेळ मिळेल त्याप्रमाणे प्रतिसादांद्वारे नवी माहिती लिहिणारच आहे.

प्रतिक्रिया

नन्द्या's picture

4 Mar 2016 - 8:04 pm | नन्द्या

ट्रंप ने मेक्सिको ला पैसे भरायला लावून एक आठ फुटी उंच भिंत बांधली! आणि मेक्सिको कडून नुसतेच पैसे घेतले नाहीत तर मेक्सिकन लोकांनाच ती बांधायला लावली.

तरी पण आपले मेक्सिकन घुसताहेतच!
मग कुणी म्हणाले भिंत १२ फूट उंच करा. नंतर ती १६ फूट उंच केली, तरी काही फरक नाही!
असे का बरे? अमेरिकेचेच बिलियन डॉ. खर्च करून गोर्‍या अमेरिकन लोकांकडून याची वर्षभर चौकशी झाली.

शेवटी एका मेक्सिकन ंआणसानेच साम्गितले - अहो भिंत १२ फूट उंच, १६ फूट उंच, अगदी ५० फूट उंच बांधलीत तरी या मेक्सिकन लोकांनी भिंत बांधता बांधता अत्यंत सुखसोयीनी संपन्न होतील अशी अनेक भुयारे पण बांधून ठेवली आहेत! (नि त्याला पैसे पण अमेरिकेतल्या लोकांनीच दिले- स्वस्तात कामे करायला कायदेशीरपणे रहाणारे कसे कबूल होतील? हे बेकायदेशीर नेक्सिकनच हवेत!)

:)

नुसत्या वल्गना! अकलेचे काम करायला मुळात अक्कल असती तर ट्रंप ला कशाला पाठिंबा दिला असता? नुसते
चालू व्यवस्थेचा राग आला, ती बदलली पाहिजे अश्या घोषणा देऊन ते होत नाही त्याला अनेक वर्षे लागतील, नि ते काम हळू हळू करावे लागेल, नि त्याला अक्कल लागते! मान मोडून काम करावे लागते. सध्या इमिग्रंट्स आहेत, अक्कलहि आहे नि ते स्वस्तहि आहेत. पण त्यांना हाकलले तर?

हुप्प्या's picture

6 Mar 2016 - 2:31 am | हुप्प्या

>>अकलेचे काम करायला मुळात अक्कल असती तर ट्रंप ला कशाला पाठिंबा दिला असता?

बेकायदेशीररित्या देशात प्रवेश करणे हे चूक समजले जावे असे मानणारे अक्कलशून्य आहेत असा निष्कर्ष कसा काढला आपण?

>>
चालू व्यवस्थेचा राग आला, ती बदलली पाहिजे अश्या घोषणा देऊन ते होत नाही त्याला अनेक वर्षे लागतील, नि ते काम हळू हळू करावे लागेल, नि त्याला अक्कल लागते! मान मोडून काम करावे लागते.
<<
इतके दिवस हे बदलले पाहिजे असे ठासून म्हणणारा पुढारीच नव्हता. बेकायदा लोकांकडे दुर्लक्ष करा आणि यथावकाश त्यांना त्यांच्या घुसखोरीची "शिक्षा" म्हणून अमेरिकन नागरिक बनवा असे सांगणारे नेते उदंड होते. खरे तर अशा नेत्यांच्या मागे जाणारे अक्कलशून्य लोक होते. आता ट्रंपमुळे अशा लोकांना जाग येऊ लागली आहे. तर त्यात वाईट काय?

ट्रंपचे धोरण हे कुठलीही प्रक्रिया न करता बेकायदेशीररित्या देशात घुसणार्‍या लोकांविरुद्ध आहे. कुठल्याच परदेशी लोकांना अमेरिकेत येऊ देऊ नये असे म्हटल्याचे मी तरी ऐकलेले नाही.
तमाम अमेरिकन लोक आळशी आहेत आणि त्यांना काम करता येत नाही हा निष्कर्ष कसा काढला ते समजून घ्यायला आवडेल.

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2016 - 11:04 am | पिवळा डांबिस

अत्यंत माहितीपूर्ण आणि मनोरंजक धागा आणि चर्चा.
पण माझं मत बदलावं असं काहीच आढळलं नाही...
:)
माझ्या मते यावेळची निवडणूक ही राष्ट्राध्यक्षपदी कोण जिंकून येतो याविषयी नाहीच आहे.
यावेळची निवडणूक ही रिपब्लिकन पार्टी स्वतःला बदलणार की फुटणार याविषयी आहे.
सुदैवाने याचे पडसाद डेमोक्रॅटिक पार्टीतही दिसताहेत.
अमेरिकेच्या सगळ्या परंपरागत राजकारणाला एक निराळंच वळण लावणारी अशी ही यावेळची निवडणूक आहे.
इट इज अबाऊट टाईम वुई चेंज...

अनुप ढेरे's picture

6 Mar 2016 - 11:08 am | अनुप ढेरे

तुम्ही कोणाला मत देणार ते सांगा की!

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2016 - 11:16 am | पिवळा डांबिस

आमच्याकडे(ही) मतदान हे गुप्त असतं हो, नाहीतर सांगितलं असतं!!
:)

तसे माझे मत नाही.
उलट इथले लोक सतत काही ना काही करत असतात, शोध लावतात, काही उपयोगी काही पैसे मिळवायला - खरे तर संगणक,नि त्यासंबंधीच्या सगळ्या कल्पना - जसे फार पूर्वी पासून सांगायचे तर थेट डेटाबेस, सिएमेम (तश्या अनेक प्रणाली निरनिराळ्या मोठ्या कंपंन्यांमधे प्रचलित आहेत, नि यशस्वी आहेत), युनिक्स, पीसी, इन्टरनेट, त्याचे प्रोटोकोल वगैरे बरेच काही सतत करत आलेले आहेत.
आज जगाला टीसीपी आय पी, इंटरनेट, हेच माहित आहे. जे इथे अनेक वर्षे राहिले त्यांनी या पूर्वीचे प्रोटोकोल, नेटवर्किंग, संगणक या सगळ्यावर सतत काम केले आहे - अगदी कोबॉल, असेंब्ली सारख्या भाषात प्रोग्राम लिहून कामे करत आलेली आहेत.

शास्त्र व तंत्रशास्त्र, या क्षेत्रांत मोठनोठे शोध लावण्यात अमेरिकेत रहाणार्‍या लोकांचा वाटा फार मोठा आहे.

त्यामुळेच इथे मोठ्या प्रमाणात लोक श्रीमंत झाले, पैशानी मिळणार्‍या सुखसोयी गेली अनेक वर्षे उपभोगू शकले.

त्यामुळेच आता कमीत कमी पगार असलाच पाहिजे वगैरे कायदे झाले. तेव्हढा कमीत कमी पगार देऊन कामे करून घेणे परवडत नाही, म्हणून बेकायदेशीर लोक घुसू देतात, नि किंमती जास्त होऊ देत नाहीत.

दुसरा मुद्दा - ज्यांची अक्कल नुसत्या घोषणा करणारे नि वाट्टेल ते बोलणे यावर संपते, ते सोडून बाकीच्यांसाठी.
भिंती संबंधी -
भिंती आहेत हो, कायदे केले अनेक वर्षांपूर्वी, पैसे पण ओतले. आठ वर्षे रिपब्लिकन नि आठ वर्षे डेमोक्रॅटिक लोकांचे राज्य झाले - फरक पडला का? मग तरी तोच एक मार्ग?

नुसते बेकायदेशीरपणे घुसणे चूक आहे हे म्हणणे बरोबर आहे, पण आज मुस्लिमांना, लॅटिनो लोकांना येऊ देणार नाही, उद्या इराणी, कोरियन लोकांना येऊ देणार नाही, दहशत वाद्यांना (नि ते नक्की कोण हे कुठे माहित आहे का? बरेच लोक चक्क उगाच पकडून आणले होते) क्रूर वर्तणूक देऊ, त्यांच्या निरपराधी बायका मुलांना सुद्धा मारून टाकू, असले बोलणे शहाणपणाचे नाही.
असले बोलणार्‍या हिटलरचे नि त्याच्या देशाचे काय झाले हे इथे बर्‍याच लोकांना माहित आहे, तसे अमेरिकेचे होउ द्यायचे नाही एव्हढी तरी अक्कल असायला पाहिजे ना? हिटलरहि जर्मनीला सर्वश्रेष्ठच करण्याच्या हेतूने असे करत होता, पण तो मार्ग चुकीचा आहे एव्हढी अक्कल जगात बर्‍याच लोकांना आली आहे.

कायदे असे आहेत की हिटलरच्या राज्यात येताजाता कागदोपत्री पुरावा दाखव, नाहीतर अटक, असले प्रकार अमेरिकेत चालत नाहीत. सरकारी अधिकारी असले तरी हक्क मर्यादित, नि लोकांना ते माहित आहे.

त्या बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांना काढणे कठीण, कायद्याने त्यांची इथे जन्मलेली मुले अमेरिकेची नागरिक, त्यांची त्यांच्या कुटुंबियांपासून ताटातूट करावी हे बर्‍याच जणांना बरोबर वाटत नाही, कदाचित कायद्याने करता पण येणार नाही.
त्या ऐवजी त्यांना नागरिकत्व द्यावे, उपयोगी कामे तर करताहेत ना, शिवाय त्यांनी कामे केली तर इतर अमेरिकन आळशीपणे बसतात का? तेहि निरनिराळी कामे शोधून काढून आपले पैसे मिळवतात, देशाचे जीडीपी कितीतरी जास्त करून ठेवले आहे.

ते लोक कामे करतात तर निदान कर वसूल करावा वगैरे इतर अनेक मार्गांचा विचार व्हावा असे बोलणारे पण इथे आहेत, नि त्यांना हि बर्‍याच लोकांचा पाठिंबा आहे.

आणि ट्रंपला मते देऊ नका असे खुद्द रिपब्लिकनच का म्हणतात बरे?

कारण उगीच बेकायदेशीरपणा नको, गुन्हे नको, सगळ्यांना बंदूका द्या वगैरे फक्त घोषणा दिल्या की त्यासाठी निवडून देणारे नि विचार करून मत बनवणारे यांच्यात फरक असतो.
केवळ एक मुद्दा (खरे तर त्याबाबत नुसतीच घोषणा) धरून त्यावरून एकदम शहाणपणा ठरत नाही, इतर बर्‍याच गोष्टी देशाचे नेतृत्व करायला असाव्या लागतात. हे तरी समजायची अक्कल पाहिजेच ना!

मी अर्थातच अमेरिकन नागरीक नाही आणि भविष्यात अमेरिकन नागरीक होईन याची शक्यताही नाही.तेव्हा या बाबतीत अमेरिकन कसा विचार करतात हे मला समजणार नाही.पण निदान भारतात घुसलेल्या बांगलादेशींना मात्र दयामाया न दाखवता हाकलून दिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.कदाचित काही लोक तसाच विचार काही अमेरिकन मेक्सिकन लोकांविषयी करत असतील.

रच्याकने, १९८० साली रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते रॉनाल्ड रेगन तर त्यांचे रनिंग मेट होते थोरले जॉर्ज बुश. त्या दोघांची या विषयावरील १९८० मधील मते आजच्या रिपब्लिकन ट्रम्पपेक्षा अगदी जमिन-अस्मानाचा फरक असण्याइतकी वेगळी आहेत. रेगन यांनी म्हटले की मेक्सिकोच्या सीमेवर कुंपणही नको आणि ती सीमा खुली हवी.तर आज ट्रम्प म्हणत आहेत की तिथे भिंतच बांधा!!

हुप्प्या's picture

8 Mar 2016 - 11:06 pm | हुप्प्या

>>भिंती आहेत हो, कायदे केले अनेक वर्षांपूर्वी, पैसे पण ओतले. आठ वर्षे रिपब्लिकन नि आठ वर्षे डेमोक्रॅटिक लोकांचे राज्य झाले - फरक पडला का? मग तरी तोच एक मार्ग?
<<
आजवर झाले नाही म्हणून यापुढेही होऊ शकत नाही असे का? ओबामा अध्यक्ष होण्यापूर्वी कोणी काळा माणूस अध्यक्ष बनला नव्हता म्हणून तसे कधीच होणार नाही असे म्हणायचे का? जेसी जॅक्सन, अल शार्प्टन ह्यांनी तसे प्रयत्न केले होतेच.

>>
नुसते बेकायदेशीरपणे घुसणे चूक आहे हे म्हणणे बरोबर आहे, पण आज मुस्लिमांना, लॅटिनो लोकांना येऊ देणार नाही, उद्या इराणी, कोरियन लोकांना येऊ देणार नाही, दहशत वाद्यांना (नि ते नक्की कोण हे कुठे माहित आहे का? बरेच लोक चक्क उगाच पकडून आणले होते) क्रूर वर्तणूक देऊ, त्यांच्या निरपराधी बायका मुलांना सुद्धा मारून टाकू, असले बोलणे शहाणपणाचे नाही.
<<
घुसखोरांना थांबवणे हे चूक की नाही हा मुद्दा आहे. त्यात मुस्लिम, लॅटिनो यांची सरमिसळ का करत आहात?
आज अमके म्हणतो आहे म्हणजे उद्या तमके म्हणेल असा आततायी निष्कर्ष काढणे तर्काला धरून नाही.
मुस्लिमांविरुद्ध ट्रंप असे म्हणाला होता की अमेरिकन सरकारला आपण काय करत आहोत हे कळेपर्यंत मुस्लिमांना देशात येऊ देऊ नये. असे का म्हणाला तो? सॅन बर्नार्डिनो इथे अतिरेकी कारवाया करणार्‍या दांपत्यातली बायको अत्यंत जहाल अतिरेकी असताना व्हिसा मिळवून अमेरिकेत येऊ शकली आणि अशी कारवाई करू शकली. अमेरिकन सरकार काय झोपा काढत होते का? असा प्रश्न अनेक सामान्य नागरिकांच्या मनात आला होता. तोच विचार ट्रंपने मांडला.

जर डेमोक्रॅट आणि अन्य लोक जर घुसखोरीचे समर्थक आहेत तर त्यांनी कायदे बदलून अमेरिका आणि मेक्सिकोची सीमा पूर्णपणे खुली करावी. ज्याला हवे त्याने बिनधास्त घुसावे. कारण ते अमेरिकन लोकांची कामे स्वस्तात करुन देतील आणि अमेरिकेचेच भले करतील ना!

>>
आणि ट्रंपला मते देऊ नका असे खुद्द रिपब्लिकनच का म्हणतात बरे?
<<
ही खरी तर चांगली गोष्ट आहे. प्रस्थापित रिपब्लिकन हे गन लॉबी, शस्त्र लॉबी, तेल लॉबी आणि अर्थातच आर्थिक लॉबी अशा लोकांकडून नियंत्रित आहेत. हे लोक भरपूर पैसे देतात आणि रिपब्लिकन उमेदवाराकडून हवे ते करुन घेतात. बुशने सुरू केलेले इराक युद्ध हे अशाच दबावगटाच्या प्रभावातून घडले होते. ट्रंप हा श्रीमंत आहे. त्याला अशा दबावगटाकडून मदत घ्यायची गरज नाही आणि तो हे ठणकावून सांगतो. त्यामुळे प्रस्थापित रिपब्लिकन त्याच्या विरुद्ध आहेत. विचारांनी देखील ट्रंप हा पूर्णपणे जुना परंपरावादी नाही. न्यूयॉर्क सारख्या शहरात वाढल्यामुळे त्याचे विचार अनेक बाबतीत पुरोगामी आहेत जसे गर्भपात करण्याचा हक्क. ही खरे तर स्तुत्य गोष्ट आहे. त्याच त्या मागास विचारांचा प्रभाव असणारा रिपब्लिकन पक्ष किती दिवस चालवून घ्यायचा? ट्रंपच्या निमित्ताने तो पक्ष कात टाकत असेल तर त्यात वाईट काय?

काल (शनीवार ५ मार्च) कॅन्सस आणि लुईझियाना राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या तर नेब्रास्कामध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची तर मेन आणि केंटकी या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षांच्या प्रायमरी/कॉकसेस झाली. या प्रायमरी/कॉकसेसचे (सुपर सॅटरडे) निकाल पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 डेमॉक्रॅटिक पक्ष   
राज्यकॅन्ससलुईझियानानेब्रास्का आतापर्यंत
हिलरी क्लिंटन103510 1121
बर्नी सॅंडर्स231214 481
एकूण334724 1602
      
      
  रिपब्लिकन पक्ष   
राज्यकॅन्ससलुईझियानाकेंटकीमेनआतापर्यंत
डॉनल्ड ट्रम्प9181712382
टेड क्रुझ2418159300
मार्को रूबिओ6570128
जॉन कॅसिक107235
एकूण40414623860

सुपर सॅटरडेमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी लुईझियाना मध्ये तर बर्नी सॅडर्स यांनी कॅन्सस आणि नेब्रास्का या पारंपारीक मतदारांच्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. क्लिंटन दांपत्य लुईझियाना राज्यात बरेच लोकप्रिय आहे. बिल क्लिंटन यांना १९९२ आणि १९९६ या दोन्ही निवडणुकांमध्ये लुईझियानामध्ये आरामात विजय मिळाला होता. या प्रायमरीमध्ये हिलरींना या राज्यातून तब्बल ७१% मते मिळाली आहेत. कदाचित २०१६ मध्ये हिलरींनाही तसाच विजय या राज्यात मिळू शकेल.

रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांनी लुईझियाना आणि केंटकी राज्यांमध्ये निसटता विजय मिळवला आहे. लुईझियानामध्ये प्रतिनिधीसंख्येत त्यांना टेड क्रुझ यांच्याइतकेच प्रतिनिशी मिळाले आहेत. तर टेड क्रुझ यांनी कॅन्सस आणि मेन या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. सुपर सॅटरडे त्यामानाने टेड क्रुझ यांना चांगला गेला.

डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी आता ७४० मतांची आघाडी घेतली आहे तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांची आघाडी ८२ मतांपर्यंत खाली आली आहे. अर्थात यावरून रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांची घोडदौड थंडावली आहे हा निष्कर्ष काढणे खूपच घाईचे ठरेल. आजच पाम बीच,फ्लॉरीडा येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले--"क्रुझ मेनमध्ये जिंकणे तसे अपेक्षितच होते.कारण मेन हे राज्य कॅनडाला बरेच जवळ आहे!! (टेड क्रुझ यांच्या कॅनडातील जन्माचा संदर्भ घेऊन).टेड मिशीगनमध्ये जिंकू शकत नाहीत, टेड कॅलिफॉर्नियामध्ये जिंकू शकत नाहीत". ट्रम्प यांनी मार्को रूबिओ यांना माघार घ्यायचे आवाहनही केले.दरम्यान डॉ.बेन कार्सन यांनी माघार घेतली आहे.

थोड्या वेळात फ्लिंट, मिशिगन येथे सी.एन.एन ने प्रायोजित केलेली डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांची चर्चा सुरू होत आहे. तसेच मंगळवारी मिशिगनमध्ये दोन्ही पक्षांची प्रायमरी आहे. त्याचे निकाल आल्यावर इथे पोस्ट करेनच.

गॅरी ट्रुमन's picture

7 Mar 2016 - 11:08 am | गॅरी ट्रुमन

टंकताना वरील तक्यात थोडी चूक झाली आहे. मेन राज्यात टेड क्रुझ यांना १२ तर डॉनल्ड ट्रम्प यांना ९ प्रतिनिधी मिळाले आहेत. तक्त्यात हे आकडे उलटेसुलटे झाले आहेत.

मेन राज्यातील डेमॉक्रॅटिक कॉकसेसचे निकाल जवळपास आले आहेत. हे टंकेपर्यंत ९७% मते मोजून झाली आहेत. या राज्यात बर्नी सँडर्स ६४% मते घेऊन मोठा विजय मिळवताना दिसत आहेत. राज्यातील १५ प्रतिनिधी सँडर्स यांना तर उरलेले ७ प्रतिनिधी हिलरींना मिळतील अशी चिन्हे आहेत.

डेमॉक्रॅटिक पक्षातील चित्र पुढीलप्रमाणे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}

   
 सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण
हिलरी क्लिंटन4586721130
बर्नी सँडर्स22477499
एकूण48011491629

हिलरींना सुपर डेलिगेटमध्ये ४३६ मतांची तर प्रायमरी/कॉकसेस मधून निवडून गेलेल्या डेलिगेटमध्ये १९५ मतांची आघाडी आहे. अर्थातच सुपर डेलीगेटची मते नंतर बदलूही शकतात. तेव्हा बर्नी सँडर्स यांना उमेदवारी जिंकायला बरेच प्रयत्न करावे लागतील.जर का त्यांनी इतर राज्ये जिंकली तर कदाचित सुपर डेलीगेटमधील काही त्यांच्यामागे उभे राहतील.

उद्याच्या मंगळवारी मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये तर पुढच्या आठवड्यातील मंगळवारी (१५ मार्चला) फ्लॉरीडा, इलिनॉय, मिसॉरी, नॉर्थ कॅरोलायना आणि ओहायो राज्यात मतदान असेल.त्यावर बरेच काही अवलंबून असेल.

गॅरी ट्रुमन's picture

7 Mar 2016 - 11:44 am | गॅरी ट्रुमन

रिपब्लिकन पक्षात प्यूर्टो रिको मधील प्रायमरी मार्को रूबिओ यांनी जिंकली आहे.पक्षातील सध्याचे चित्र पुढीलप्रमाणे आहे:

table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8686;
color: #FFF;
font-weight: bold;
}

 
उमेदवारप्रतिनिधीसंख्या
डॉनल्ड ट्रम्प384
टेड क्रुझ300
मार्को रूबिओ151
जॉन कॅसिक37
इतर15
एकूण887

सध्या डॉनल्ड ट्रम्प आघाडीवर असले तरी त्यांना प्रतिनिधींच्या संख्येत बहुमत नाही.त्यांना ८८७ पैकी ३८४ प्रतिनिधी मिळाले आहेत तर इतर उमेदवारांना ५०३ प्रतिनिधी मिळाले आहेत.उद्याच्या मंगळवारी (८ मार्च) मिशिगन, हवाई, आयडॅहो आणि मिसिसीपी राज्यांमध्ये, १२ मार्चला डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियामध्ये तर १५ मार्चला फ्लॉरीडा, इलिनॉय, मिसॉरी, नॉर्थ कॅरोलायना आणि ओहायो राज्यांमध्ये मतदान होणार आहे.यातील काही राज्ये 'विनर टेक्स ऑल' अशी आहेत त्यामुळे त्या राज्यांमध्ये अगदी एका मतानेही विजय मिळाला तरी त्या उमेदवाराला त्या राज्यातील सर्व प्रतिनिधी मिळतील.

जर रिपब्लिकन पक्षाच्या जुलैमधील अधिवेशनापर्यंत ट्रम्प यांना ५०% पेक्षा जास्त प्रतिनिधी मिळाले नाहीत तर कदाचित अधिवेशनात मतदान घेऊन उमेदवार निवडला जाईल. अशी वेळ आतापर्यंत एकदाच-- १९७६ मध्ये आली होती. अध्यक्ष जेराल्ड फोर्ड प्रतिनिधींच्या संख्येत आघाडीवर होते पण त्यांच्याकडे ५०% पेक्षा जास्त प्रतिनिधींचा पाठिंबा नव्हता. रॉनल्ड रेगन थोडे मागे होते.त्यावेळी मतदान घेतले जाऊन जेराल्ड फोर्ड यांना उमेदवारी मिळाली आणि रेगन यांना उमेदवारीसाठी आणि अध्यक्षपदासाठी आणखी ४ वर्षे थांबावे लागले.

रिपब्लिकन पक्षात अशी मतदान घ्यायची वेळ आली तर आयत्या वेळी वेगळा उमेदवार पुढे येऊ शकतो हे एका प्रतिसादात लिहिलेच आहे.त्यातच २०१२ मधील उमेदवार आणि मॅसॅच्यूसेट्सचे माजी गव्हर्नर मिट रॉमनी यांनी अशावेळी आपली उमेदवारी अशक्य आहे असे स्पष्टपणे म्हटलेले नाही.

एकूणच रिपब्लिकन पक्षातील चित्र बरेच इंटरेस्टींग आहे.

अनन्त अवधुत's picture

26 Sep 2020 - 1:08 pm | अनन्त अवधुत

२०२० चे घोडामैदान जवळ आहे म्हणुन धागा वर काढतोय. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे स्वरुप जाणुन घेण्यासाठी हा भाग उत्तम.