साप भी मर गयो.....(नगरी) (मराठी भाषा दिन २०१६ )

पियुशा's picture
पियुशा in लेखमाला
24 Feb 2016 - 3:00 pm

हंम्म.... मी तर तशी जात नै बर का कुठ परस्पर, घरी फोन लावून सांगत असत्ये मम्मीला कि मी इकडे चालले बर का, तिकडे चालले बर का , मंग मम्मी म्हणती ठीकय,पण वेळेत घरी यावा लेकीच्या जातीनी ,मंग मी म्हणत्ये हम्म येईन ग मम्ये मी काय लहान नै आता .
एकदा अस झाल तेवा मी ११विला होते बर का, न बड्डे होता एका मैत्रिणीचा ! मंग ती म्हणली कॉलेज सुटल का पार्टी करू आपण :) आम्हाला भारी हौस!कधी जन्मात न केलेल्या गोष्टींची माणसाला लईच हौस असती हा मनुश्य स्वभावच्च ;) पार्टी म्हणजे काय हॉटेलात जाउन खायच आपल अचर्बचर !
मी म्हणल मम्मीला विचारते , सगळ्या हसाया लागल्या अग बावळे एकाधा तास उशीर हुइन त्यात काय इचारायचं अजून तू बच्ची हाय का ? नै विचारल एखाद्या टायमाला तर काय फरक पडतोय ? मी म्हणाल नायभो एक फोन करतेच घरी तसा मैत्रिणीन मोबैलच हिसकून घेतला मग बसले गप्प ! पार्टी सुरु लै मज्जा आली , लय धिंगाणा घातला केक काय फासलाय तोंडाला एकेकीच्या. पार लोळू लोळू बड्डे पंचमी साजरी करून मंग सगळ जिकड तिकड करून स्वारी घरी पोचली तसा एकधा तास उशीर झाला म्हणून मम्मी काय विचारात नसती मंग मी अशी दुपारच्या टळटळित उन्हातून असा स्कार्फ - बिर्फ बांधून चोताडॉन होऊन घरी आले ;)
पंखा लावला स्याक फेकून दिली न पडले लोळत गारगार फर्चीवर , डोळे मिटून, कसलं भारी वाटून राहील " आज कुणाचा बड्डे होता ग ? तशी मी ताडकन उठून बसले एखादा चोर अंधारात तिजोरी फोडत असंन न गापकन लाईट लागल्यावर कस होत ? तस वाटलं मला मिंटभर , मी म्हणले अग ते आप्ल .. मम्म्ये आज त्या ढम्किचा बड्डे होता ना तीनच लै आग्रह केला म्हणून गेलो मंग सगळ्या , पण ह्ये तुला कुणी सांगितलं ? मी तर फोन बी नाय केला आज ?
अग काय नाय त्या समोरच्या अमोल नि सांगितल कि तुमची लेक आज हॉटेलात गेली मैत्रिणीबरोबर मित्र बी आहेत , त्याच नाव ऐकून माझा पारा ज्ज्ये चढला ना ……….
हम्म अस का अमल्या का ? हे ध्यान आमच्या समोरच रहायला माझ्यावर लई लाइन मारली मंग एक दिवस मी मुहूर्त बघून राखीच बांधून टाकली पण ते ब्येन काय सुधारत नव्हत , तो थोड बोबड बोलायचा मग मी त्याला तोत्रू म्हणायची.
ह्म्म्म... अश्या चुगल्या करतो का माझ्या ? म्हणून मी डायरेक त्यांच्या दारासमोर उभी राहून धाड धाड दार वाजवल दारावर पाटी " येथे पेप्स्या कुल्फ्या मिळतील "
बिचारी त्याची आई झोपली असंल, दुपारची अस धाडधड ऐकून वैतागूनच दार उघडल " कै ग पेप्सी चैजे कै ?
( त्या मारवाडी , आपण पिव्वर नगरी पण त्यांची सगळि भाषा ए टू झेड पाठ आपल्याला )
मी म्हणल नै थाको छोरो चैजे ,ती म्हणाली " यो बयो इसो कै बोले , कै हुयो ? कै कियो म्हारे टाबर ने ?
मी म्हणल भाभी तुमच्या पोराला आवरा माझ्या चुगल्या करायचा काम नाही "कशाला सांगितला रे तोतर्या माझ्या आईला मी पार्टीला गेले होते ते "?
तो काहीतरी गिळून हात पुसत बाहेर आला तशी मी त्याची गचांडी धरली "कै रे बोब्डो थने कै उद्योग नै ? म्हारी चुगली करे ? तू कै करे बतौ क्या थारी मम्मीने बतौ क्या बतौ ? परत इसो कियो ना थारी तंगडी तोडणे हात मे देउला " इतका डायलॉग संपता संपता अर्धी कॉलनी जमा झाली , माझी मम्मी मला म्हणाली पोरींच्या जातीला शोभत का अस ? सोड त्याला सोड नाहीतर तुझच तंगड तोडीन अशी झटा लोंबी शोभती का ? मग दिला गपकन सोडून शेखचाची म्हणली अरे " तुम एकीच कालेज मे पढते ना कैसे भाई बहन सरीका रेइनेका अस ऐकल्याबरोबर अमल्याला ठसका लागला त्याची आई माझा अवसान बघून बिचकलीच जरा माझ्या मम्मीला म्हणाली " थाकि छोरी घनी तमाशा करे इत्तुसी बात न लेके" , मी म्हणल " थाको को टाबर भी कम नही चुग्गल खोर कैको " मंग गल्लीतल्या बायांनी पेटण्याच्या आधी मधी पडून मिटवल प्रकरण ! माझ्या मम्मीचा चेहरा असा झाल्ता कुठून मला दुर्बुद्धी सुचली आन मी विचारला ह्या कार्टीला !
पण मी मनात लै खुश झाले भो " साप भी मर गयो न म्हारी लाठी भी साबूत " ;)

* हि कथा काल्प्निक आहे
मारवाडी भाषा केवळ मनोरंजन हेतू आहे कुणाला दुखवण्याचा हेतू अजिबात नाही :)

प्रतिक्रिया

मीता's picture

24 Feb 2016 - 3:06 pm | मीता

धमाल !!!!!

म्हे आउला नगरने तो पाची पार्टी करुला थारे साथ,पक्का..

काय लिहिलयस पिवाशे. मजा आली वाचून..

कविता१९७८'s picture

24 Feb 2016 - 3:10 pm | कविता१९७८

भारी

बॅटमॅन's picture

24 Feb 2016 - 3:11 pm | बॅटमॅन

टाबरा घणा बांडा ;)

मनं ये स्टोरि बडो घणी लागे हे.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2016 - 3:15 pm | बिपिन कार्यकर्ते

तू गुंड आहेस हे माहित होतेच.

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2016 - 3:26 pm | प्रीत-मोहर

पिवडी रॉक्स अन मारवाडी शॉक्स!!!

Maharani's picture

24 Feb 2016 - 3:43 pm | Maharani

+१००
हा हा..धमाल..

अजया's picture

24 Feb 2016 - 3:36 pm | अजया

पिवडे पिवडे भेट तू :)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Feb 2016 - 4:10 pm | बिपिन कार्यकर्ते

काही उपयोग नाही.

चांदणे संदीप's picture

24 Feb 2016 - 3:52 pm | चांदणे संदीप

काय लीवाव का आमी?

पियुशा's picture

24 Feb 2016 - 3:55 pm | पियुशा

लिवा कि भौ ;)

चांदणे संदीप's picture

24 Feb 2016 - 5:58 pm | चांदणे संदीप

आवाल्डा लेख!

(म्हन्ल इचारल्याल बर! उग म्या काय कमी जास्त बोलायचो.....आधीच घरी उठता-बसता मार हाये. आता बारक्या लेकरान्पुढ मार खाया चान्गल नाय वाटत ओ!)

क्रेझी's picture

24 Feb 2016 - 4:05 pm | क्रेझी

भन्नाट .. लोल :)
लेख वाचत आहे असं वाटलं नाही इतकं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं :)

नाखु's picture

24 Feb 2016 - 4:19 pm | नाखु

कांडकाच पाडला...

टाबर चा चेहरा कसा झाला असेल त्याचा विचार करतोय !!!!

वाचनवाला नाखु

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2016 - 4:08 pm | टवाळ कार्टा

चला म्हणजे तू टारगट आहेस हे सिध्ध केलेस...ते यत्ता दूश्ली ब मधून डायरेक्ट ११वीत उडी मारणे वगैरे अत्मरंजन सोडले तर लेख जमलायं :)

भुमी's picture

24 Feb 2016 - 4:10 pm | भुमी

कायपन भारी लिवायलीस!!मी फरशीवं लोळायले;)

एस's picture

24 Feb 2016 - 4:18 pm | एस

ड्यांजर लिवलंय पियुशाभाई तुने तो.

असंका's picture

24 Feb 2016 - 4:36 pm | असंका

बाप रे!!!! कहर हसवलंत...!!
धन्यवाद!

(नगरची लईच आठवण यायलीय आता....)

पैसा's picture

24 Feb 2016 - 4:40 pm | पैसा

पिवशी लै ड्यांजर है!

आनंद कांबीकर's picture

24 Feb 2016 - 4:42 pm | आनंद कांबीकर

...

भारीच गं पियु! कशी एकदम दुशली ब मधून ११ वीत गेली! हुश्शार मुलगी गं!

भिंगरी's picture

24 Feb 2016 - 5:03 pm | भिंगरी

वा! अगदी नगरला आल्यासारखे वाटले.

बबन ताम्बे's picture

24 Feb 2016 - 5:11 pm | बबन ताम्बे

आवडली कथा.

भीडस्त's picture

24 Feb 2016 - 5:35 pm | भीडस्त

दे धनाधन

मुक्त विहारि's picture

24 Feb 2016 - 5:41 pm | मुक्त विहारि

मस्त

नाव आडनाव's picture

24 Feb 2016 - 6:10 pm | नाव आडनाव

गोष्ट भारी हे तुमची :)

आयला इधं तं लै नगरी कार्यकर्ते दिसतेत.

विवेकपटाईत's picture

24 Feb 2016 - 6:54 pm | विवेकपटाईत

मस्त आवडली, आमची आजी पण मारवाडी मस्त बोलायची.

नूतन सावंत's picture

24 Feb 2016 - 7:21 pm | नूतन सावंत

छान ग पियू.नगरला कधी वेळ आली तर राडा करायची तर दुप्पट जोमाने करता येईल.

निमिष ध.'s picture

24 Feb 2016 - 9:07 pm | निमिष ध.

नगरी मराठी आणि मारवाडी वाचून अगदी मज्जा आली. संगमनेरला सुद्धा असेच संवाद घडायचे अर्धवट मराठी आणि अर्धवट मारवाडीत. बरेच मारवाडी मित्र असल्याने थोडीफार शिकली गेली होती आणि मधून मधून बोलणे पण व्हायचे ;)

मित्रहो's picture

24 Feb 2016 - 9:18 pm | मित्रहो

नगरला असताना विचारायचे कोठाल्ले तुम्ही, काही कळत नव्हते काय उत्तर द्यावे हळूहळू कळायला लागले.

सभ्य माणुस's picture

26 Feb 2016 - 1:02 pm | सभ्य माणुस

कोठाल्ले नै "कुढाल्ले"

आदूबाळ's picture

24 Feb 2016 - 10:11 pm | आदूबाळ

झक्कास! नगरी मित्रांच्या आठवणींनी एकदम गलबलून आलं. नहार, ओस्तवाल, सप्रे, निंबोळकर वगैरे मंडळी एकाच टोनमध्ये बोलायची ते लैच भारी वाटायचं. त्यातून "आमच्या अहम्मदनगरला..." असं बोलून सुरुवात झाली की संपलंच!

रातराणी's picture

25 Feb 2016 - 12:26 am | रातराणी

मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Feb 2016 - 5:39 am | अत्रुप्त आत्मा

@ आज कुणाचा बड्डे होता ग ? तशी मी ताडकन उठून बसले एखादा चोर अंधारात तिजोरी फोडत असंन न गापकन लाईट लागल्यावर कस होत ? तस वाटलं मला मिंटभर , >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

सस्नेह's picture

25 Feb 2016 - 8:11 am | सस्नेह

पिवशी यत्ता दुश्लीतनं वर चढली हे बरं झालं !

मितान's picture

25 Feb 2016 - 9:50 am | मितान

Lol !!!

प्रचेतस's picture

25 Feb 2016 - 10:03 am | प्रचेतस

=)) =)) =))

सनईचौघडा's picture

25 Feb 2016 - 12:56 pm | सनईचौघडा

खीऽक मिपाची मेरी कोम. पिवशे अता तुला घाबलायला हवे.

1

हायला पिवशे. भारी लिव्हलीस की.
तू पहिल्यापासूनच राखी स्पेशालिस्ट दिसतीस. चांगलेय चांगलेय. ठेवीत जा पर्सीत ४-५ राख्या.

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2016 - 6:11 pm | पिलीयन रायडर

एखादा चोर अंधारात तिजोरी फोडत असंन न गापकन लाईट लागल्यावर कस होत ? तस वाटलं मला मिंटभर

=))

काय लिहीलय!! वा!!

ध मा ल लिहिलय! पियु दिसली कि टाबर पळुन जात असेल आता :)

हासिनी's picture

26 Feb 2016 - 11:05 am | हासिनी

ढमे किती धमाल लिवतेस ते!!
= ))
भारी एकदम!! जिकलीसच...

पॉइंट ब्लँक's picture

26 Feb 2016 - 11:52 am | पॉइंट ब्लँक

अमल्या बिच्चार लईच मवाळ निघालं :p

सभ्य माणुस's picture

26 Feb 2016 - 1:05 pm | सभ्य माणुस

लय भारी लेल्ह्यय..! नगरमधीच आसल्यासारख वाटतय.

स्पा's picture

27 Feb 2016 - 7:44 am | स्पा

लय भारी पिवडे :D

अत्रुप्त आत्मा's picture

27 Feb 2016 - 12:09 pm | अत्रुप्त आत्मा

आला आला पांडू आला! http://freesmileyface.net/smiley/cool/cool04.gif

रुपी's picture

4 Aug 2017 - 5:12 am | रुपी

हा हा..
भारीच लिहिलंय.. मजा आली :)