हंम्म.... मी तर तशी जात नै बर का कुठ परस्पर, घरी फोन लावून सांगत असत्ये मम्मीला कि मी इकडे चालले बर का, तिकडे चालले बर का , मंग मम्मी म्हणती ठीकय,पण वेळेत घरी यावा लेकीच्या जातीनी ,मंग मी म्हणत्ये हम्म येईन ग मम्ये मी काय लहान नै आता .
एकदा अस झाल तेवा मी ११विला होते बर का, न बड्डे होता एका मैत्रिणीचा ! मंग ती म्हणली कॉलेज सुटल का पार्टी करू आपण :) आम्हाला भारी हौस!कधी जन्मात न केलेल्या गोष्टींची माणसाला लईच हौस असती हा मनुश्य स्वभावच्च ;) पार्टी म्हणजे काय हॉटेलात जाउन खायच आपल अचर्बचर !
मी म्हणल मम्मीला विचारते , सगळ्या हसाया लागल्या अग बावळे एकाधा तास उशीर हुइन त्यात काय इचारायचं अजून तू बच्ची हाय का ? नै विचारल एखाद्या टायमाला तर काय फरक पडतोय ? मी म्हणाल नायभो एक फोन करतेच घरी तसा मैत्रिणीन मोबैलच हिसकून घेतला मग बसले गप्प ! पार्टी सुरु लै मज्जा आली , लय धिंगाणा घातला केक काय फासलाय तोंडाला एकेकीच्या. पार लोळू लोळू बड्डे पंचमी साजरी करून मंग सगळ जिकड तिकड करून स्वारी घरी पोचली तसा एकधा तास उशीर झाला म्हणून मम्मी काय विचारात नसती मंग मी अशी दुपारच्या टळटळित उन्हातून असा स्कार्फ - बिर्फ बांधून चोताडॉन होऊन घरी आले ;)
पंखा लावला स्याक फेकून दिली न पडले लोळत गारगार फर्चीवर , डोळे मिटून, कसलं भारी वाटून राहील " आज कुणाचा बड्डे होता ग ? तशी मी ताडकन उठून बसले एखादा चोर अंधारात तिजोरी फोडत असंन न गापकन लाईट लागल्यावर कस होत ? तस वाटलं मला मिंटभर , मी म्हणले अग ते आप्ल .. मम्म्ये आज त्या ढम्किचा बड्डे होता ना तीनच लै आग्रह केला म्हणून गेलो मंग सगळ्या , पण ह्ये तुला कुणी सांगितलं ? मी तर फोन बी नाय केला आज ?
अग काय नाय त्या समोरच्या अमोल नि सांगितल कि तुमची लेक आज हॉटेलात गेली मैत्रिणीबरोबर मित्र बी आहेत , त्याच नाव ऐकून माझा पारा ज्ज्ये चढला ना ……….
हम्म अस का अमल्या का ? हे ध्यान आमच्या समोरच रहायला माझ्यावर लई लाइन मारली मंग एक दिवस मी मुहूर्त बघून राखीच बांधून टाकली पण ते ब्येन काय सुधारत नव्हत , तो थोड बोबड बोलायचा मग मी त्याला तोत्रू म्हणायची.
ह्म्म्म... अश्या चुगल्या करतो का माझ्या ? म्हणून मी डायरेक त्यांच्या दारासमोर उभी राहून धाड धाड दार वाजवल दारावर पाटी " येथे पेप्स्या कुल्फ्या मिळतील "
बिचारी त्याची आई झोपली असंल, दुपारची अस धाडधड ऐकून वैतागूनच दार उघडल " कै ग पेप्सी चैजे कै ?
( त्या मारवाडी , आपण पिव्वर नगरी पण त्यांची सगळि भाषा ए टू झेड पाठ आपल्याला )
मी म्हणल नै थाको छोरो चैजे ,ती म्हणाली " यो बयो इसो कै बोले , कै हुयो ? कै कियो म्हारे टाबर ने ?
मी म्हणल भाभी तुमच्या पोराला आवरा माझ्या चुगल्या करायचा काम नाही "कशाला सांगितला रे तोतर्या माझ्या आईला मी पार्टीला गेले होते ते "?
तो काहीतरी गिळून हात पुसत बाहेर आला तशी मी त्याची गचांडी धरली "कै रे बोब्डो थने कै उद्योग नै ? म्हारी चुगली करे ? तू कै करे बतौ क्या थारी मम्मीने बतौ क्या बतौ ? परत इसो कियो ना थारी तंगडी तोडणे हात मे देउला " इतका डायलॉग संपता संपता अर्धी कॉलनी जमा झाली , माझी मम्मी मला म्हणाली पोरींच्या जातीला शोभत का अस ? सोड त्याला सोड नाहीतर तुझच तंगड तोडीन अशी झटा लोंबी शोभती का ? मग दिला गपकन सोडून शेखचाची म्हणली अरे " तुम एकीच कालेज मे पढते ना कैसे भाई बहन सरीका रेइनेका अस ऐकल्याबरोबर अमल्याला ठसका लागला त्याची आई माझा अवसान बघून बिचकलीच जरा माझ्या मम्मीला म्हणाली " थाकि छोरी घनी तमाशा करे इत्तुसी बात न लेके" , मी म्हणल " थाको को टाबर भी कम नही चुग्गल खोर कैको " मंग गल्लीतल्या बायांनी पेटण्याच्या आधी मधी पडून मिटवल प्रकरण ! माझ्या मम्मीचा चेहरा असा झाल्ता कुठून मला दुर्बुद्धी सुचली आन मी विचारला ह्या कार्टीला !
पण मी मनात लै खुश झाले भो " साप भी मर गयो न म्हारी लाठी भी साबूत " ;)
* हि कथा काल्प्निक आहे
मारवाडी भाषा केवळ मनोरंजन हेतू आहे कुणाला दुखवण्याचा हेतू अजिबात नाही :)
वाचने
33327
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
धमाल !!!!!
भारी
टाबरा घणा बांडा ;)
तू गुंड आहेस हे माहित होतेच.
पिवडी रॉक्स अन मारवाडी शॉक्स!
+१०० हा हा..धमाल..
In reply to पिवडी रॉक्स अन मारवाडी शॉक्स! by प्रीत-मोहर
ब्येश्ट
काही उपयोग नाही.
In reply to ब्येश्ट by अजया
काय लीवाव का आमी?
लिवा कि भौ ;)
In reply to काय लीवाव का आमी? by चांदणे संदीप
काय नाय ओ...
In reply to लिवा कि भौ ;) by पियुशा
भन्नाट .. लोल :)
दणक्यात
In reply to भन्नाट .. लोल :) by क्रेझी
चला म्हणजे तू टारगट आहेस हे
पिवडे काय हे,
अगागागा!
बाप रे!!!! कहर हसवलंत...!!
हाहाहा!
छान लिहिलंय
भारीच गं पियु! कशी एकदम दुशली
वा! अगदी नगरला आल्यासारखे
मस्त लिहीलेय.
जाळ न धुर संगच
कथा आवडली..
गोष्ट भारी हे तुमची :)
मस्त आवडली, आमची आजी पण
छान ग पियू.नगरला कधी वेळ आली
झकास
भारी गोष्ट
नै
In reply to भारी गोष्ट by मित्रहो
झक्कास! नगरी मित्रांच्या
मस्त!
@ आज कुणाचा बड्डे होता ग ?
दे धडक !
Lol !!!
=)) =)) =))
खीऽक मिपाची मेरी कोम.
खीऽक मिपाची मेरी कोम.
पिवशे अता तुला घाबलायला हवे.हायला पिवशे. भारी लिव्हलीस की
एखादा चोर अंधारात तिजोरी फोडत
ध मा ल लिहिलय! पियु दिसली कि
ढमे
अमल्या बिच्चार लईच मवाळ
लय भारी लेल्ह्यय..! नगरमधीच
lol
In reply to लय भारी लेल्ह्यय..! नगरमधीच by सभ्य माणुस
आला आला पांडू आला!
In reply to lol by स्पा
हा हा..