औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय.
मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला.
माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच.
ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी.
मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन.
पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.
औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी :
पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत)
गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे.
औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात.
कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे.
अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच.
वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे.
खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे.
औरंगजेबाची कबर आहे.
म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही.
म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल.
जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत.
पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे.
औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे.
खरेदी
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे.
पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी.
गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत.
खादाडगिरी
गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक.
कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव.
उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही.
बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते.
ओमकार पावभाजी क्रांती चौक
लक्ष्मी सँडविच क्रांती चौक
पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते.
पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते.
चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर
मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात.
तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत.
गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान.
गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे.
कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे.
तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही.
मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात.
उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.
जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 4:18 pm | एस
छान लिहिलेय. कधी गेलोच औरंगाबादला तर ह्या धाग्याचा उपयोग होईल.
17 Feb 2016 - 4:19 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
17 Feb 2016 - 5:17 pm | सुधांशुनूलकर
नुसतं म्हणताय काय? वेरूळ कट्टा आयोजित करा आता लवकरात लवकर..
मार्चमध्ये मुलांच्या परीक्षा संपताहेत. त्यानंतर कधीही..
kind attn. : मुवि
17 Feb 2016 - 5:19 pm | प्रचेतस
एप्रिलमध्ये?
17 Feb 2016 - 6:03 pm | सुधांशुनूलकर
चालेल, एप्रिलमध्ये जमवायचा प्रयत्न करू.
17 Feb 2016 - 4:35 pm | उगा काहितरीच
तारा पान सेंटर चे नाव ऐकलेले आहे. पण आता ते म्हणे फ्रिजमधे ठेवलेले पान देतात. पहिल्यासारखे बनवून देत नाहीत.बाकी म्हैसमाळ खरंच सुंदर आहे. फक्त जाण्यायेण्याची चांगली सोय नाही आहे. स्वतःचे वाहन असेल तर उत्तम . वेरूळ अजिंठा मस्तच आहे. पण "उरकून घेण्यासाठी " नाहीये . जाणकाराच्या सोबत २-३ दिवसही लागतील . बिबी का मकबरा वगैरे ठीक आहे. देवगीरी (दौलताबाद) चा किल्ला पण छान आहे. शहरात खाण्याचे विशेष योग आले नाहीत त्यामुळे पास ! शहराच्या जवळपासचे ठिकाणे बघायचे तर आपले वाहन असलेले उत्तम कारण अतिशय वाईट सार्वजनिक व्यवस्था .
17 Feb 2016 - 4:59 pm | आकाश खोत
नाही. जे अगदी साधे मसाला पान आहे, सर्वाधिक खपाचे, तेच जास्त तयार करून ठेवलेले असते. पटकन देतात ते.
निवांत वेळी गेलो तर ते हि समोर बनवून मिळते.
बाकी बनारस, मीनाक्षी, फुलचंद असे पान तयारच करून देतात आपल्यासमोर. आपण आपल्या आवडीनुसार सुद्धा बनवून घेऊ शकतो.
शहरात फिरायला सार्वजनिक व्यवस्था बेकार आहे हे खरेच. पण सोबत आपले मेंबर जास्त असतील तर इंडिका ते टेम्पो भाड्याने घेऊन फिरू शकतो. त्या ड्रायव्हर लोकांना औरंगाबाद दर्शन सांगितला तर कुठून कुठे कोणत्या क्रमाने न्यायचे ते सर्व माहित असते.
बिविका मकबरा ताजमहाल समोर काहीच नाही. पण ज्यांना अजून तो ताज महाल प्रत्यक्ष पाहण्याचा योग आलेला नाही, ज्यात मी देखील आहे त्यांना तो आवडू शकतो.
वेरूळ अजिंठा, देवगिरी ह्या सर्व जागा गाईड लावून फिरणे उत्तम. नाहीतर केवळ काही तुटलेली काही चांगली शिल्पे, अंधारातली चित्रे पाहून आपल्याला काहीच बोध होत नाही.
17 Feb 2016 - 4:41 pm | गणामास्तर
तारा पान सेंटर आवर्जून जाण्या इतके काही विशेष वाटले नाही.
बाकी,पुण्यावरून औ.बादला जाताना गंगापूर फाट्याजवळ दत्त कि दिगंबर कायसा धाबा आहे तिथली शेव भाजी, पिठलं भाकरी आवडते. जालना रोड वर सिडको बस स्थानकाच्या अलीकडे डाव्या हाताला रामगिरी म्हणून हॉटेल आहे तिथली काळ्या मसाल्यातील शेवगा हंडी पण मस्त.
नॉन वेज खायचे असेल तर बड्डी गल्ली मधले 'सागर' अप्रतिम आहे. तिथला 'नान खलिया' प्रकार जबरदस्त.
17 Feb 2016 - 5:04 pm | आकाश खोत
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे बंधू हॉटेलमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे.
17 Feb 2016 - 7:04 pm | बाबा योगिराज
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे बंधू हॉटेलमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे.
भावा नको आठवण काढूस.
लवकरच एक भेट द्यावी लागणार.
17 Feb 2016 - 4:43 pm | पिलीयन रायडर
तुम्ही खुप काही कव्हर केलय तरी माझे तिकडचे प्रतिसाद चोप्य पस्ते करते
खरेदी :-
अत्तरं - मला वाटतं गुलमंडीत मिळतात. तिथे एक गल्लीच आहे अत्तरांची.. (पण माझे ज्ञान यथातथाच आहे..!)
औ.बाद मध्ये हिमरु शाली सुद्धा सुंदरच मिळतात. त्याचे चांगले दुकान मला आत्ता आठवत नाही. माहिती काढुन सांगु शकेन.
क्रांती चौकातच गार्डन वरेलीचे ही दुकान आहे. चांगले ड्रेस मटेरियल मिळते.
पैठण्याही मिळतात. धाग्यात सांगितलेल्या ठिकाणी मी एकदा गेले आहे. चांगली व्हरायटी होती.
खादाडी
पाणीपुरी आवडते मला फार औ.बादची.. क्रांती चौकात एक पापुवाला आहे, त्याची आवडते. बाकी खुप ठिकाणी मिळते. काहींना गुलमंडीतलीही आवडते. किंवा कॅनॉट प्लेसची.
क्रांती चौकात गायत्रीचे दुकान आहे, तिथे पावभाजीचेही एक हॉटेल आहे. तिथे जा.. आणि त्या हॉटेलात नाही, त्याच्या समोरच्या खोपचीत गाड्यावर पाभा मिळते, ती खा. मला तर खुपच आवडली.
बीड बायपास साईडच्या धाब्यांची सुद्धा माहिती देता येईल.. हवी असल्यास.
भटकंती
बघायला... बीबी का मकबरा, लेण्या, पाणचक्की वगैरे आहेच. प्रोझोन मॉल वगैरे पण आहे.
जरा वेळ असेल तर बीबी का मकबरा वगैरे पेक्षाही मी म्हणेन की देवगिरी किल्ला, अजिंठा - वेरुळ पहा. मला ते जास्त आवडतं.
शनिवारी रात्री असाल तिथे , तर जमल्यास भद्रा मारुतीला जाऊ शकता. लोक रात्री चालत जातात वर.
औ.बाद ते पुणे रस्त्यावरः-
औ.बादहुन पुण्याला परत येणार असाल तर पांढरी पुलाला भेळ खायला थांबा नक्की.. सरहदवाडीसुद्धा चांगला पर्याय आहे, पण मला पांढरीपुल जास्त आवडतो. एस.टीने येणार असाल तर गाडी लिलीयम पार्क (किंवा गांगासागर किंवा वडाळ्याचा फुडमॉल) नावाच्या भिकार हॉटलला थांबेल. नावावर जाऊ नकात. फार बेक्कार हॉटेल आहे.
नगरला "जलाराम बेकरी" नावाची बेकरी ऑन द वे आहे. तिथे तोंडात टाकताच विरघळेल अशी खारी.. आणि टाळुला चिटकुन रसभंग करणार नाही अशा क्रिमचा क्रिमरोल मिळतो.
17 Feb 2016 - 5:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काटाकीर मिसळपाव (क्याननॉट प्लेस), अन्नाचा वडा पाव,(बाबा पंप), पंचवटीची पाव भाजी (त्रिमूर्ती चौक), पाणीपूरी ( सावरकर चौक), सर्व प्रकारचे आइसक्रीम (झी कॉर्नर) मोबाइल (झी कॉर्नर), कपड़े (टिळकपथ), ज्यूस लक्की ( पैठण गेट), अजुन आठवेल तसं लिहितो.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 5:31 pm | प्रचेतस
:(
फक्त भोजलाच नेल्याबद्दल णिषेध.
17 Feb 2016 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझं पहिलं प्रेम म्हणजे माझी एक मैत्रिण (जी सतत जीव घेत असते) आणि दुसरं प्रेम म्हणजे वल्ली, धन्या, प्रशांत (पुणे) (जे सतत जीव लावत असता) सालं तुम्हाला घेऊन एकूण एक ठिकाणी घेऊन जाईन. सुट्टीत या. सर्व फ़िरवेन आणि खाऊ घालेन. हाय काय अन नाय काय.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 8:25 pm | प्रचेतस
आमचंच चुकतं राव.
आम्हास वेरुळ सोडून इतरत्र जाववतही नाही.
पण ह्याखेपी नक्कीच आता.
17 Feb 2016 - 4:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन खायचं असेल तर गुलमंडीतील हॉटेल मराठा, मटन हंडी, चिकन हंडी खायची असेल आणि सोबत 'पार्सल' असेल तर हॉटेल 'लोकसेवा'. शेवगा कंटकी, शेवगा फ्राय, शेवग्याच्या शेंगाचे विविध प्रकार खायचे तर केंब्रिज शाळेपुढे गेल्यावर शेळकेचा ढाबा, बिड बायपास वरुन जात असाल तर 'राजदरबार' ढाबा. (पार्सल घेऊन यावं लागतं)
फुलंब्री रोडच्या पुढे 'साई ढाबा' साडेतीनशे रूपये एका माणसाला, चिकन,मटन, मासे अन लिमिटेड आणून देतात.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 4:59 pm | गणामास्तर
बिड बायपास वरुन जात असाल तर 'राजदरबार' ढाबा.
सर हा ढाबा नेमका कुठे आहे ? त्याचं काये कि बजाज हॉस्पिटल बीड बायपास वर असल्याने तिथे जाणं होतचं हो नेहमी. =)) =))
17 Feb 2016 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बजाजच्या पुढे देवळाली चौक तिथून पुढे दोन किलोमीटर वर आहे हा ढाबा आहे मस्तय. माझं कॉलेज तिकडेच आहे आलात की कळवा. बसू ;)
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 9:14 pm | बोका-ए-आझम
का हो?
17 Feb 2016 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 5:03 pm | आकाश खोत
औरंगाबादला असेपर्यंत तरी अभक्ष्य भक्षण करत नव्हतो. आता बाहेर येउन जरा करायला लागलो आहे. पण हौस कमीच.
हि माहिती पुरवल्याबद्दल आभार सर. मलासुद्धा खाउन बघता येईल.
17 Feb 2016 - 7:24 pm | बाबा योगिराज
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन खायचं असेल तर गुलमंडीतील हॉटेल मराठा, मटन हंडी, चिकन हंडी खायची असेल आणि सोबत 'पार्सल' असेल तर हॉटेल 'लोकसेवा'.
ह्या यादीत अजून थोडी भर.
निराला बाजार वरून अंजली बिग सिनेमा कडे जातांना उतार सम्पून चढ लागला कि डाव्या हाताला लालाजीज. एकदम झणझणीत.
अंजली बिग सिनेमा समोर नवीन झालेलं झलक (सम्पूर्ण मांसाहारी हॉटेल). मस्त जेवण सम्पूर्ण परिवारासोबत जाता येईल अशी जागा
17 Feb 2016 - 4:53 pm | विनायक प्रभू
खरेदी सोडुन आणखी काय काय करता येते?
17 Feb 2016 - 5:01 pm | आकाश खोत
स्थळदर्शन आणि खादाडगिरी.
17 Feb 2016 - 5:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्यापीठ लेणीत प्रेयसीचा हात हातात घेऊन आणि गल्यात हात टाकुन बसता येतं. विद्यापिठात इतिहास विभागाचं संग्राहलय आहे ते पाहता येतं. गुलमंडित तरुण स्रिया निरखता येतात, खुप वेळ जाऊ शकतो इथे, प्रोझन मॉल मधे टाईमपास तर अप्रतिम होतो. स्पोर्ट्सचं दूकान ख़ास आहे, टेबल टेनिस, ब्याड़मिन्टन खेळता येतं. तिथेच एफ एम् रेडियो वाले काही ना काही करून आपली मुलाखत 'बजाते रहो' म्हणून घेत असतात. साहित्यिक परिसंवाद ऐकायचा असेल तर शनिवार, रविवार सहा वाजता मराठवाडा साहित्य परिषदेत नवा लेखक भेटत असतो.
आपल्याला अपेक्षित काय आहे ?
-दिलीप बिरुटे
17 Feb 2016 - 5:19 pm | प्रचेतस
=))
विद्यापीठामागची लेणी बघायला यायचंच आहे एकदा.
17 Feb 2016 - 6:05 pm | नाव आडनाव
प्रतिसादातला एक शब्द कोळीगितांमधे एकला होता, दुसर्यांदा आता :)
17 Feb 2016 - 6:13 pm | मदनबाण
17 Feb 2016 - 10:56 pm | सतिश गावडे
कोळीगीतातील शब्द "गल्यान" असा आहे.
18 Feb 2016 - 12:24 am | गामा पैलवान
प्राडॉ, म्या त्ये गल्ल्यात म्हून वाचलं. म्हंटलं येव्हढा फुडारलेपना झाला हल्ली होय?
आ.न.,
-गा.पै.
17 Feb 2016 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नोन्व्हेज खात असायचो तेव्हा सागर मधे जेवलोय प्रचंड गर्दी असते नान ख़ासच. पण मटनात सालं पिस खुप मोठे होते जेवण झालं आणि मित्र मला म्हणाला सर, हे पिस 'बड़े के' तर नसतील अशा शंकेने माझा तिथेच 'वकार युनुस' झाला. :(
-दिलीप बिरुटे
18 Feb 2016 - 4:10 pm | गणामास्तर
अरारारारा .. उगीचं सांगितलं तुम्ही हे आम्हाला. आता नान खलिया साठी 'सागर' ला पर्याय तुम्हीच सुचवा.
17 Feb 2016 - 5:36 pm | आकाश खोत
हे विसरलोच. बरकत चाय.
रोक्सी सिनेमा जवळ.
एका कपात समाधान होतच नाही. पुन्हा प्यावा वाटतो.
17 Feb 2016 - 5:36 pm | मदनबाण
आकाशराव... लयं लयं धन्यवाद ! मस्त माहिती दिली हाय तुम्ही. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
26 Feb 2016 - 5:57 pm | मदनबाण
आमच्या नातेवाइकांनी आमचा अगदी थाटबाट केला ! :)



अतिशय उत्तम जेवण आणि व्यवस्था होती.
चांदीच्या ताटात मेजवानी होती... ताटा पासुन वाटी पर्यंत आणि पेल्या पासुन चमच्या पर्यंत सगळं चांदीचे ! अश्या शाही जेवणाचा आनंद संभाजीनगरात घेतला.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
26 Feb 2016 - 6:11 pm | आकाश खोत
होय थाटबाट प्रसिद्ध आहे अशा चांदीच्या ताट वाटीतून शाही जेवणासाठी
26 Feb 2016 - 6:17 pm | बाबा योगिराज
बघा बघा, बिरुटे सर,
बघताय ना.
तुम्ही लोक्स औरंगाबाद येणार, थाट-बाट ला भेट देणार, आन आमाला सादा संदेश पण नै देणार.
मंग गाडीत झुरळ बदला नै घेणार तर काय होणार.
उगाच आपलं आमच्या गाव च्या लेर्वे गाडीला नाव ठूतेत लोक्स.
26 Feb 2016 - 7:32 pm | मदनबाण
दौर्याचा कार्यक्रम अचानक बदलल्यामुळे यावेळी घाई झाली.बिरुटे सर आणि आपणास देखील भेटता आले असते. हाताशी वेळ कमी असल्याने यावेळी तिकडे येउन देखील कोणाची भेट घेता आली नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये
यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर
मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजना
26 Feb 2016 - 8:28 pm | बाबा योगिराज
अहो, गंमत केली हो मी.
26 Feb 2016 - 6:12 pm | आकाश खोत
वेलकम. तुम्ही पण द्या आता तुमच्या गावाची माहिती एका नव्या धाग्यावर.
17 Feb 2016 - 5:52 pm | मराठी कथालेखक
भटकंती
हर्सुल तलाव पण चांगला आहे.. शांत.
सलीम अली बाग
विद्यापिठातले दोन्ही संग्रहालय (इतिहास विभाग व सोनेरी महल) चांगले आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवाजी संग्रहालय.
गारखेडा स्टेडियमला भेट देवू शकता
खादाडी
अपुर्वा थाळी , इंडियाना रेस्टॉरंट (दोन्ही उच्च न्यायालयाजवळ)
बाकी नावात भोज असलेली हॉटेल्स चांगली आहेत.
17 Feb 2016 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उस्मान भाई-भजे, (पदमपूरा) दिल्लीगेट वरचा फालूदा, सूतगिरणीजवळ हैदराबादी बिरयानी, असं बरंच काही. औरंगाबादचा धागा समृद्ध करून टाकू हाय काय अन नाय काय.
पैठणी चांगली मीळते. संगीता धकाते या बनवतात, रामायण क्लचरल हॉल जवळ.
आमच्याकड़े लेखक कवी खुप आहेत.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
18 Feb 2016 - 1:32 pm | मराठी कथालेखक
मी औरंगाबादला फक्त ७-८ महिने होतो. पण तेवढ्या काळात जीवाचा औरंगाबाद केला :)
कारपेक्षा बाईक बरी पडते शहरातून फिरताना.
बाकी रिलायन्स मॉल पासून जवळ असलेल शर्विन बार-रेस्टॉरंट चांगल आहे, तिथे मोठा प्रोजेटर टीवी आहे.
22 Feb 2016 - 6:40 pm | सप्तरंगी
आमच्याकड़े लेखक कवी खुप आहेत.***
17 Feb 2016 - 9:46 pm | कंजूस
बालाजी : महिकर इथला?
17 Feb 2016 - 10:13 pm | रेवती
सगळ्यांनीच छान लिहिलय. एक सहल झाली थोडक्यात! मी दोनदा आले होते. एकदा संपूर्ण सहा तासांसाठी. साखरपुडा अॅटेंड करून लगेच परत! नंतर लग्नाच्या रिसेप्शनला! दोन्ही वेळी अगत्य, फूड, तेथील घरे असे सगळे आवडले. फूड वेगळ्या चवीचे असते हे नक्की पण आवडले.
17 Feb 2016 - 10:16 pm | सत्याचे प्रयोग
मध्यंतरी टिव्ही वर औ. बाद येथील पानाविषयी वृत्तांत दाखविला होता. तेथे पान चार ते पाच हजार रुपये किमतीचे मिळते असे दाखवले होते. ते तारा पान सेंटरच आहे का? असल्यास. काय बरे टाकत असतील त्यात.
17 Feb 2016 - 10:49 pm | बाबा योगिराज
सगळ्यात महागडं पान 5000 ₹ च आहे.
ते पान मधुचंद्रा वाल्या लोकांसाठी असतंय. त्यातील माल मसाला तर नाही सांगितला त्यांनी. परंतु आधी सांगावं लागेल अस सांगण्यात आलंय.
17 Feb 2016 - 10:51 pm | मदनबाण
ते पान मधुचंद्रा वाल्या लोकांसाठी असतंय. त्यातील माल मसाला तर नाही सांगितला त्यांनी. परंतु आधी सांगावं लागेल अस सांगण्यात आलंय.
हॅहॅहॅ... "पलंगतोड" पान ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
18 Feb 2016 - 12:07 am | कंजूस
रस्त्याकडच्या टपय्रांवर ठेवलेले लालभडक समोसे बघवत नाहीत.सकाळी सहालाच वेरूळ उघडते म्हणून बस स्टँडवर गेलो लवकर.बाहेर कुठेच हॅाटेल नाही.स्टँडच्या कँटिनवाल्याने सांगितले पोहे मिळतील सवासहाला. तिकडे फळकुटावर एका परातीत पोहे ओले करून ठेवलेले होते.एकाने भसकन त्यावर फोडणी ओतली आणि ते बशीत आणून दिले.गिळा.यस्टीने मात्र साडेसातला वेरूळला पोहोचवले आणि तिकडे एका गाइडला विचारले " वेळ थोडा आहे काय पाहू?"
" १५,१६ आणि ३४."
एक ते ३४ सर्व गुंफा बारापर्यंत पाहिल्या.नंतर घृष्णेश्वर पाहून हॅाटेल रूम सोडून अडीचची तपोवन मिळाली होती.
लेणी पाहताना खालील संवाद ऐकले-
"हिकडं पन मूरतीच हैत चला लवकर."
"त्यां काइ नथी,आपरो अहियाँ छे ( ३०-३४ जैन लेणी)।"
जैन लोक पर्यटकांच्या बसेस थेट तिकडेच पार्क करतात आणि तिकडूनच कटतात.
लेण्यातले न कळणाय्रांनी आणि लहान मुलांना घेऊन अजिबात जाऊ नये.मंगळवारी बंद असतात.
18 Feb 2016 - 12:54 am | रेवती
हा हा हा.
18 Feb 2016 - 3:40 am | यशोधरा
अरारा!
18 Feb 2016 - 6:56 am | प्रचेतस
१ ते ३४ गुंफा फ़क्त ४:३० तासात???? बहुत नाईसान्फ़ी हय.
18 Feb 2016 - 9:50 am | कंजूस
होय. पहिल्या एक ते नऊ विहारात डोकावलो.दहा ते पंधरापैकी दोन नीट पाहिल्या.कैलाश (१६),खोटा/छोटा कैलास,१७ ते२९ पैकी दोन तीन आणि ३० ते ३४ पुर्ण हे सर्व बायको आणि लहान मुलीला घेऊन शक्य झाले कारण मी अगोदर सकाळी सहा ते दुपारी एक पुर्ण पिंजून काढले होते.कुठे काय आहे ते माहित होते.कॅम्रा नव्हता त्यामुळे त्या नादात वेळ वाया गेला नाही.OUDL LIBRARY एक चांगलं पिडिएफ पुस्तक वाचू शकता कोणास फारच उत्साह असेल तर.
फुटलेल्या मुर्ती पाहिल्या की नाराजी येते आणि लोक आवरतं घेतात.त्यापेक्षा बदामि छान आहे.हॅाटेल्सही दोन किमीरात भरपूर.
22 Feb 2016 - 7:26 pm | palambar
आम्हि ही गेलो होतो तेव्हा शाळेची सहल आली होती , ईतका
गोंधळ , मलाही वाटते की अश्या ठिकाणी सर्वांना प्रवेश देऊ नये , मुलांना काही कळत नाही आणि अश्या जागतिक ठेव्याचे नुकसान टाळता येईल
18 Feb 2016 - 4:19 am | आकाश खोत
अंबा अप्सरा टाकीज समोर साबुदाणा वडा सुद्धा बेस्ट.
18 Feb 2016 - 9:53 am | कंजूस
नकारात्मक प्रतिसादाबद्दल माफ करा.मी फक्त माझं निरीक्षण दिलं.
18 Feb 2016 - 11:27 am | Parag Purandare
औरंगाबाद-बिड रस्त्यावर औरंगाबादपासून फक्त ४० कि.मी. अंतरावर अंबड तालुक्यात जामखेड नावाचे छोटेसे गांव आहे. हे जामखेड रामायणातील जांबुवंताचे गांव म्हणून प्रसिध्द आहे. या गावांजवळ एका डोंगरावर एक गुहा असुन ती जांबुवंताची गुहा समजली जाते. याच गुहेत जांबुवंताचे मंदिरही बनवलेले आहे. मात्र जामखेडचे वैशिष्ट्य म्हणजे एक फारसे कुणाला माहिती नसलेले उत्तर चालुक्यकालीन (१२ वे शतक) शंकराचे खडकेश्वर मंदिर या गावांत आहे. गावक-यांनी बांधकाम करुन मंदिराची बाहेरुन वाट लावली आहे पण आपल्या सुदैवाने मंदिराचा आतील भाग सुस्थितीत असुन प्रेक्षणिय आहे. मंदिराची रंगशिळा अष्टकोनी असुन या रंगशीळेच्या आठही कोनांवर उभ्या असलेल्या खांबांवर उत्क्रुष्ट कोरीव काम आहे. औरंगाबादला जाणा-या कुणीही हे ठिकाण चुकवु नये असेच आहे.
18 Feb 2016 - 1:32 pm | गामा पैलवान
अवांतर :
पपु,
मला आठवतं त्यानुसार जांबुवंत महाभारतातील एक पात्र आहे. त्याची कन्या जांबवती श्रीकृष्णाची एक पत्नी आहे.
असो. मंदिराचा परिचय आवडला.
आ.न.,
-गा.पै.
18 Feb 2016 - 1:37 pm | अभ्या..
रामायणात पण कोणतरी असतय हो अस्वलासारखे जांबवंत. नल, नील, जांबवंत. अंगद ही ग्यांग पाहिल्याचे आठवते. भौतेक सेतूची असाइनमेंट त्यानीच घेतली होती.
18 Feb 2016 - 4:05 pm | मृत्युन्जय
जांबवंत रामायण आणि महाभारत दोन्हीकडे आहे. मार्कंडेय ऋषी, परशुराम, हनुमान, बिभीषण हे देखील दोन्हीकडे हजेरी लावतात :)
18 Feb 2016 - 6:33 pm | गामा पैलवान
माहितीबद्दल धन्यवाद! :-)
-गा.पै.
18 Feb 2016 - 6:44 pm | प्रचेतस
आचार्य अत्रे ह्यांची पण एक प्रसिद्ध कथा आहे. 'जांबुवंत दंतमंजन' फारच विनोदी.
18 Feb 2016 - 11:45 am | सनईचौघडा
मस्त माहिती. वाखु साठवली आहे.
18 Feb 2016 - 3:40 pm | एस.योगी
१९९६ ते २००२ औरंगाबाद मध्ये होतो.
खादाडी भरपूर झाली.
सर्व सदस्यांनी माहिती दिलीच आहे. परंतु काही ठिकाणे अपेक्षित होती. ती पुढीलप्रमाणे
गुलमंडी - 'मिलन मिठाई' - मलई पेढा
गुलमंडी - 'उत्तम मिठाई' - इमारती + भजी चोम्बिनतिओन
गुलमंडी - 'बसय्ये बंधू' - खारे शेंगदाणे जम्बो साईझ
सिडको बस स्थानक - 'चारमिनार' - बिर्याणी साठी प्रसिद्ध
चेलीपुरा - 'गुलशन टी हाउस' - अप्रतिम चहा
दिवाण देवडी - 'भोलेशंकर (आप्पा) चाट भांडार' - झणझणीत भेल, दही बटाटा पुरी अफलातून
हर्सूल - 'प्रिया धाबा' - मटन भारी आहे.
टीवी सेंटर कॉर्नर - 'अनिल भाऊ' ची अंडा भुर्जी
नोंद :-
१. मी औरंगाबाद २००२ मध्ये सोडलं. तो पर्यंत हि ठिकाणे हयात होती. आता नवीन झालेली ठाऊक नाहीत.
२. काही बंद पडलेली ठिकाणे -
गोविंदा डायनिंग हॉल, खडकेश्वर - व्हेज थाळी
क्रांती चौकात चायनीजची गाडी होती - 'Prowns hakka rice' (३ वर्ष वेड्यासारखा खाल्ला.)
सिटी चौकात 'गरीब नवाझ' हॉटेल होता. 'सागर' च्या तोडीचा होता लेकाचा. रेट पण शुल्लक. कधी बंद झालाय माहित नाही.
22 Feb 2016 - 8:19 pm | बाबा योगिराज
गोविंदा सुरु आहे दादा. घरासमोरच आहे. या भेट घडवतो.
18 Feb 2016 - 3:41 pm | एस.योगी
चोम्बिनतिओन* = कोम्बिनेशन
18 Feb 2016 - 6:02 pm | बॅटमॅन
रोफ्ल @ चोम्बिनतिओन आणि त्याचं एक्ष्प्लनतिओन =)) =)) =))
18 Feb 2016 - 4:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म. गांधी चौकात म्हणजे शहागंज मधे लाखेच्या सुंदर बांगडया मिळतात. ऑर्डर प्रमाणे छान डिझाइनच्या बांगडया करून मिळतात. एकदा या विषयावर स्वतंत्र धागा काढायचा आहे.
-दिलीप बिरुटे
(चूड़ीवाला बाबा) :)
18 Feb 2016 - 4:31 pm | अजया
ही खरी कामाची माहिती! आता वाखु साठवते :)
18 Feb 2016 - 6:01 pm | बॅटमॅन
एक नंबर माहिती!!!!!!!!!!!!
22 Feb 2016 - 6:38 pm | सप्तरंगी
बरीच माहिती आहे तुम्हाला माझ्या औरंगाबादची:), पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ? गायत्री चाट भांडार आणि तारा पान मस्तच. मध्ये मी काळे बंधूंच्या जेवणाबद्दल आणि कुठल्यातरी शेवगाच्या शेंगांच्या मसाला भाजी बद्दल पण ऐकले, छान आहे म्हणे.
22 Feb 2016 - 8:17 pm | बाबा योगिराज
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?
बाब्बो.
भावा कुठल्या साळचा रे तू.
ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.
22 Feb 2016 - 8:17 pm | बाबा योगिराज
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?
बाब्बो.
भावा कुठल्या साळचा रे तू.
ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.
25 Feb 2016 - 8:48 pm | आकाश खोत
आ कृ वाघमारे प्रशाला. :)
तुम्ही कुठले बाबा योगीराज?
26 Feb 2016 - 1:00 am | बाबा योगिराज
आजूनबी लांडगे सर हायेत, पवार सर हायेत, कुलकर्णी सर हायेत, वादें म्याडम हाये का सोडून गेल्यात, अरे त्ये जाऔ दे.
दहावी कंची रे तुही?
26 Feb 2016 - 1:54 pm | आकाश खोत
२००४. तुम्ही कोणत्या वर्षी झाले एस एस सी
26 Feb 2016 - 6:05 pm | बाबा योगिराज
1998
26 Feb 2016 - 6:09 pm | आकाश खोत
सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P
26 Feb 2016 - 6:19 pm | बाबा योगिराज
;-)
26 Feb 2016 - 8:55 pm | सप्तरंगी
१९९८ ला ssc आणि नाव काय तर बाबा योगीराज :)
26 Feb 2016 - 9:19 pm | बाबा योगिराज
नै आजोबा योगीराज "नीट" वाटलं नसत ना. म्हणून बाबा योगीराज.
25 Feb 2016 - 9:42 pm | सप्तरंगी
seriously? sb मध्ये असताना आम्ही नेहमी जायचो
26 Feb 2016 - 1:02 am | बाबा योगिराज
मायला किती लोक्स हायेत इत?
25 Feb 2016 - 8:47 pm | आकाश खोत
सुरु आहे. आणि तीच चव आहे.
22 Feb 2016 - 7:44 pm | सुमीत भातखंडे
छान माहिती.
वेगळा धागा केला ते बरं झालं. प्रतिसादांमधूनही बरीच भर पडतेय.
22 Feb 2016 - 9:10 pm | यशोधरा
हे सगळे वाचून एकदा औरंगाबादला भेट द्यावीशी वाटत आहे.
23 Feb 2016 - 5:08 am | बहुगुणी
एक सुचवावसं वाटलं:
या धाग्याच्या निमित्ताने देशभरातल्या शहरांविषयीही (महाराष्ट्राच्या तरी नक्कीच, पण निदान जिथे जिथे मराठी-भाषिक पोहोचले आहेत अशा इंदूर, ग्वाल्हेर, दिल्ली, वगैरे शहरांविषयीही) असेच संकलित धागे यावेत. या प्रकारे मिपावर गावगप्पा नावाचं एक उत्तम आणि आगळंच (unique / differentiating अशा अर्थी) सदर सुरू करता येईल. हल्ली कामामुळे म्हणा वा मौजेसाठी देशांतर्गत प्रवास करणं वाढलं आहे. या सदरातून बर्याच उपयोगी माहितीचं आदान-प्रदान होऊ शकेल.
23 Feb 2016 - 9:03 am | उगा काहितरीच
अनुमोदन ! रच्याकने या निमीत्ताने का होईना . नदीपलीकडेही जग असते हे कळेल एका दोन अक्षरी नाव असलेल्या शहरातील लोकांना .
23 Feb 2016 - 9:04 am | प्रचेतस
प्रतिसाद हीन वाटला.