औरंगाबादला कट्टा करण्याविषयी एक धागा उघडला गेलाय.
मिपावर मी आल्यापासून पहिल्यांदाच औरंगाबादविषयी चर्चा पाहतोय. आनंद झाला.
माझे लक्ष नसताना काही धागे झाले असतील, पण मी पाहिलेला पहिलाच.
ह्या धाग्यावर मी हि खालचीच माहिती पुरवली होती. पण तिची लांबी पाहून ह्या विषयावर एक स्वतंत्र धागा असावा असे वाटले. इथे नसलेली औरंगाबाद विषयी उपयुक्त माहिती मिपाकरांनी पुरवावी.
मी औरंगाबादचा आहे पण सध्या तिथे राहत नाही. त्यामुळे यावेळी कट्ट्यात सहभागी नसेन.
पण धागा पाहून उत्साह आला आहे, त्यामुळे औरंगाबादविषयी माहिती पुरवतोय.
औरंगाबाद शहरात आणि जवळपास पाहण्यासारख्या गोष्टी :
पाणचक्की, बिवी का मकबरा, औरंगाबाद लेणी (वेरूळइतक्या प्रसिद्ध किंवा छान नाहीत)
गोगाबाबा टेकडी : हे काही टिपिकल प्रेक्षणीय स्थळांच्या यादीतले ठिकाण नाही. पण शहराचा मकबऱ्यासकट छान व्ह्यू मिळतो. आणि शहराबाहेर छान हवेशीर जागा आहे.
औरंगाबाद हे दरवाजांचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते. जुने शहर तटबंदी आणि ५२ दरवाजे यांनी बंदिस्त होते. तुम्हाला शहरात फिरताना हे दरवाजे आणि तटबंदीचे काही अवशेष दिसू शकतात.
कलेक्टर ऑफिसजवळ एक संग्रहालय आहे.
अजिंठा वेरूळ सर्वांना माहित आहेच.
वेरूळ येथे लेणी तर आहेतच. पण घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगसुद्धा आहे. गणपतीचे एक जुने मंदिर आहे. वेरूळ येथे शिवाजीराजे यांचे पूर्वज शहाजीराजे आणि मालोजीराजे यांचे वतन होते. त्यांचे स्मारक अशातच बांधण्यात आले आहे.
खुलताबाद येथे निद्रिस्त मारुतीचे मंदिर आहे.
औरंगजेबाची कबर आहे.
म्हैसमाळ हे औरंगाबादचे हिल स्टेशन. तिथे छान बालाजी मंदिर आहे. बालाजीचे इतके शांत मंदिर दुसरे नाही.
म्हैसमाळच्या रस्त्यावर एक लहान फाटा आहे. पटकन लक्षात येत नाही. तिथून गेल्यावर मार्लेश्वर हे गुहेतले शिव मंदिर आहे. खूप मोठे शिवलिंग पाहायला मिळेल.
जटवाडा आणि कचनेर आणि येथे जैन मंदिरे आहेत. जटवाडा येथे भव्य मूर्ती आहेत.
पैठणला जायकवाडी धरण आहे. बागेत संगीत कारंजी आहेत. आणि संत एकनाथ यांची समाधी आहे.
औरंगाबादपासून लोणार सरोवरसुद्धा जवळ आहे.
खरेदी
औरंगाबादमध्ये पैठणी आणि हिमरूशाली छान मिळतात. बऱ्याच दुकानात मिळतात. पण पर्यटक औरंगाबाद वेरूळ रस्त्यावरच्या दुकानात जास्त जातात. सिडकोमध्ये लोकमत भवनच्या बाजूलासुद्धा एक छान दुकान आहे.
पण ह्यावर महिलांनी जास्त माहिती द्यावी.
गुलमंडी, औरंगपुरा, गोमटेश मार्केट, सराफा, सिटी चौक हे सर्व एकमेकांना लागून असलेले भाग खरेदीसाठी प्रसिद्ध आहेत.
कपडे, पुस्तके, दागिने, अत्तरे, पूजा साहित्य, इलेक्ट्रोनिक्स अशा सर्व गोष्टींची दुकाने ओळीने आहेत.
खादाडगिरी
गायत्री चाट भांडार : गुलमंडी आणि क्रांती चौक.
कचोरी समोसा आणि मुंगभजी गरम आणि मस्त मिळतात. वर्षानुवर्षे पासून उत्कृष्ट चव.
उत्तम, गुलमंडी : गरम गरम जिलेबी आणि इमरती, आणि बरेच काही.
बाजूला एक छोटे दुकान आहे तिथे मसाला दुध छान मिळते.
ओमकार पावभाजी क्रांती चौक
लक्ष्मी सँडविच क्रांती चौक
पूर्णानंद औरंगपुरा : हे माझ्या शाळेतल्या भागातले मुलांचे आवडते दुकान. इथली वडापाव, मसाला पाव, सामोसा, दाबेली यांची चव इतक्या वर्षात बदललेली नाही. औरंगाबादला गेलो आणि तिथे नाही गेलो तर चुकल्यासारखे वाटते.
पाणीपुरी : पुणे आणि मुंबईला बहुत करून रगडावाली पाणीपुरी देतात. पण औरंगाबादला बटाटावाली जास्त मिळते.
चांगले पाणीपुरी वाले : दयावान गारखेडा, पंकज कुमार एन ४, गुरुकृपा सिडको समोर
मथुरावासी : भल्ला आणि गुजीया हि इथली खासियत. बाकी सर्व प्रकारची चाट मस्त मिळते. पाणीपुरी अगदी वेगळ्या प्रकारची. घट्ट आणि तिखट पाणी असते, आणि त्यात डाळिंब आणि अंगूरसुद्धा टाकतात.
तिथून जवळच पैठण गेटला लक्की आणि पॅरिस हि ज्युसेसची मस्त सेन्टर्स आहेत.
गुरुकृपा सूतगिरणी चौक जवळ : चाट आणि मिठाईचे चांगले दुकान.
गोधुली दाबेली : कनॉट प्लेस. दाबेली सोबत भेलसुद्धा छान आहे.
कनॉटच्याच कोपर्यात एक मस्त भेळवाला आहे.
तारा पान सेंटर : पान खाण्याचे शौकीन असणार्यांना हे नाव माहित असतेच. इथल्या पानाची सर पुणे मुंबईला खाल्लेल्या एका हि पानाला नाही. अगदी पुणेकर जिथे गर्दी करतात त्या शौकीन, नाद वगैरेसारख्या ठिकाणीसुद्धा नाही.
मी औरंगाबादला गेलो कि ऑफिसमध्ये लोक इथला पान आणण्याची वाट पाहतात.
उत्साहाच्या भरात जे आठवेल ते लिहिले आहे. खादाडगिरीवर किती लिहिले आहे त्यावरून आणखी माहिती हवी असल्यास विचारावे.
जाणकारांनी आणखी माहिती पुरवावी.
वाचने
40728
प्रतिक्रिया
118
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिलेय. कधी गेलोच
+१
In reply to छान लिहिलेय. कधी गेलोच by एस
नुसतं म्हणताय काय?
In reply to +१ by प्रचेतस
एप्रिलमध्ये?
In reply to नुसतं म्हणताय काय? by सुधांशुनूलकर
प्रयत्न करू या
In reply to एप्रिलमध्ये? by प्रचेतस
तारा पान सेंटर चे नाव ऐकलेले
नाही. जे अगदी साधे मसाला पान
In reply to तारा पान सेंटर चे नाव ऐकलेले by उगा काहितरीच
तारा पान सेंटर आवर्जून जाण्या
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे
In reply to तारा पान सेंटर आवर्जून जाण्या by गणामास्तर
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे
In reply to शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे by आकाश खोत
शेवगा हंडी केम्ब्रिजजवळ काळे बंधू हॉटेलमध्येसुद्धा प्रसिद्ध आहे.भावा नको आठवण काढूस. लवकरच एक भेट द्यावी लागणार.तुम्ही खुप काही कव्हर केलय
लै आठवू राहिलं
In reply to तुम्ही खुप काही कव्हर केलय by पिलीयन रायडर
:(
In reply to लै आठवू राहिलं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळ कुठे देता तुम्ही मला.
In reply to :( by प्रचेतस
आमचंच चुकतं राव.
In reply to वेळ कुठे देता तुम्ही मला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला धागा,
बिड बायपास वरुन जात असाल तर
In reply to चांगला धागा, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिड बायपास वरुन जात असाल तर 'राजदरबार' ढाबा.सर हा ढाबा नेमका कुठे आहे ? त्याचं काये कि बजाज हॉस्पिटल बीड बायपास वर असल्याने तिथे जाणं होतचं हो नेहमी. =)) =)):)
In reply to बिड बायपास वरुन जात असाल तर by गणामास्तर
देवगिरी महाविद्यालय
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही.
In reply to देवगिरी महाविद्यालय by बोका-ए-आझम
औरंगाबादला असेपर्यंत तरी
In reply to चांगला धागा, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन
In reply to चांगला धागा, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमी पैशात भरपूर तर्रीबाज चिकन खायचं असेल तर गुलमंडीतील हॉटेल मराठा, मटन हंडी, चिकन हंडी खायची असेल आणि सोबत 'पार्सल' असेल तर हॉटेल 'लोकसेवा'.ह्या यादीत अजून थोडी भर. निराला बाजार वरून अंजली बिग सिनेमा कडे जातांना उतार सम्पून चढ लागला कि डाव्या हाताला लालाजीज. एकदम झणझणीत. अंजली बिग सिनेमा समोर नवीन झालेलं झलक (सम्पूर्ण मांसाहारी हॉटेल). मस्त जेवण सम्पूर्ण परिवारासोबत जाता येईल अशी जागाखरेदी
स्थळदर्शन आणि खादाडगिरी.
In reply to खरेदी by विनायक प्रभू
खरेदी सोडून
In reply to खरेदी by विनायक प्रभू
=))
In reply to खरेदी सोडून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादातला एक शब्द
In reply to खरेदी सोडून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रतिसादातला एक शब्द कोळीगितांमधे एकला होता...
In reply to प्रतिसादातला एक शब्द by नाव आडनाव
नाही...
In reply to प्रतिसादातला एक शब्द by नाव आडनाव
प्रेयसीच्या गल्यात हात?
In reply to खरेदी सोडून by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सागर हॉटेल
अरारारारा .. उगीचं सांगितलं
In reply to सागर हॉटेल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरकत चाय
आकाशराव... लयं लयं धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maariआमच्या नातेवाइकांनी आमचा अगदी
In reply to आकाशराव... लयं लयं धन्यवाद ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाहोय थाटबाट प्रसिद्ध आहे अशा
In reply to आमच्या नातेवाइकांनी आमचा अगदी by मदनबाण
बघा बघा, बिरुटे सर,
In reply to आमच्या नातेवाइकांनी आमचा अगदी by मदनबाण
दौर्याचा कार्यक्रम अचानक
In reply to बघा बघा, बिरुटे सर, by बाबा योगिराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रेल्वे बजेट : सुरेश प्रभू यांच्या रेल्वे बजेटची वैशिष्ट्ये यंदाही लोकप्रिय घोषणा नाही, पायाभूत सुविधांवर भर मुंबईकरांसाठी दीर्घकालीन योजनाख्या ख्या ख्या
In reply to दौर्याचा कार्यक्रम अचानक by मदनबाण
वेलकम. तुम्ही पण द्या आता
In reply to आकाशराव... लयं लयं धन्यवाद ! by मदनबाण
भटकंती
भजे /कपड़े / लेखक.
In reply to भटकंती by मराठी कथालेखक
मी औरंगाबादला फक्त ७-८ महिने
In reply to भजे /कपड़े / लेखक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्याकड़े लेखक कवी खुप आहेत.*
In reply to भजे /कपड़े / लेखक. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बालाजी : महिकर इथला?
सगळ्यांनीच छान लिहिलय. एक सहल
तारा पान
खर आहे
In reply to तारा पान by सत्याचे प्रयोग
ते पान मधुचंद्रा वाल्या
In reply to खर आहे by बाबा योगिराज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maariरस्त्याकडच्या टपय्रांवर
हा हा हा.
In reply to रस्त्याकडच्या टपय्रांवर by कंजूस
संवाद!
In reply to रस्त्याकडच्या टपय्रांवर by कंजूस
१ ते ३४ गुंफा फ़क्त ४:३० तासात
In reply to रस्त्याकडच्या टपय्रांवर by कंजूस
होय. पहिल्या एक ते नऊ विहारात
In reply to १ ते ३४ गुंफा फ़क्त ४:३० तासात by प्रचेतस
आम्हि ही गेलो होतो तेव्हा
In reply to रस्त्याकडच्या टपय्रांवर by कंजूस
अंबा अप्सरा टाकीज समोर
नकारात्मक प्रतिसादाबद्दल माफ
खडकेश्वर मंदिर, जामखेड
अवांतर : रामायणातल जांबुवंत ?
In reply to खडकेश्वर मंदिर, जामखेड by Parag Purandare
रामायणात पण कोणतरी असतय हो
In reply to अवांतर : रामायणातल जांबुवंत ? by गामा पैलवान
जांबवंत रामायण आणि महाभारत
In reply to अवांतर : रामायणातल जांबुवंत ? by गामा पैलवान
धन्यवाद!
In reply to जांबवंत रामायण आणि महाभारत by मृत्युन्जय
आचार्य अत्रे ह्यांची पण एक
In reply to जांबवंत रामायण आणि महाभारत by मृत्युन्जय
मस्त माहिती. वाखु साठवली आहे.
काही ठिकाणे अपेक्षित होती. ती पुढीलप्रमाणे
गोविंदा सुरु आहे दादा.
In reply to काही ठिकाणे अपेक्षित होती. ती पुढीलप्रमाणे by एस.योगी
चोम्बिनतिओन* = कोम्बिनेशन
रोफ्ल @ चोम्बिनतिओन आणि
In reply to चोम्बिनतिओन* = कोम्बिनेशन by एस.योगी
अजुन एक
ही खरी कामाची माहिती! आता
एक नंबर माहिती!!!!!!!!!!!!
बरीच माहिती आहे तुम्हाला
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.पूर्णानंद अजूनही सुरु आहे का
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
पूर्णानंद अजूनही सुरु आहे का ?बाब्बो. भावा कुठल्या साळचा रे तू. ये तुला काकूंच्या हातचा(पूर्णानंद) गरमा गरम सोमोसा खाऊ घालतो.आ कृ वाघमारे प्रशाला. :)
In reply to पूर्णानंद अजूनही सुरु आहे का by बाबा योगिराज
बाब्बो
In reply to आ कृ वाघमारे प्रशाला. :) by आकाश खोत
२००४. तुम्ही कोणत्या वर्षी
In reply to बाब्बो by बाबा योगिराज
1998
In reply to २००४. तुम्ही कोणत्या वर्षी by आकाश खोत
सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P
In reply to 1998 by बाबा योगिराज
;-)
In reply to सिनियर म्हणजे तुम्ही आमचे. :P by आकाश खोत
१९९८ ला ssc आणि नाव काय तर
In reply to ;-) by बाबा योगिराज
नै आजोबा योगीराज "नीट" वाटलं
In reply to १९९८ ला ssc आणि नाव काय तर by सप्तरंगी
seriously? sb मध्ये असताना
In reply to पूर्णानंद अजूनही सुरु आहे का by बाबा योगिराज
सभु?
In reply to seriously? sb मध्ये असताना by सप्तरंगी
सुरु आहे. आणि तीच चव आहे.
In reply to बरीच माहिती आहे तुम्हाला by सप्तरंगी
छान
हे सगळे वाचून एकदा औरंगाबादला
उत्तम माहिती! एक सुचवावसं वाटलं...
अनुमोदन ! रच्याकने या
In reply to उत्तम माहिती! एक सुचवावसं वाटलं... by बहुगुणी
प्रतिसाद हीन वाटला.
In reply to अनुमोदन ! रच्याकने या by उगा काहितरीच