तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

सनईचौघडा's picture
सनईचौघडा in काथ्याकूट
17 Feb 2016 - 1:19 pm
गाभा: 

तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.

१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे.

२)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार.

३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व .

४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व.

५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.

६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी.

७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे.

८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले.

९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव.

१०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व.

सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.

तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.

प्रतिक्रिया

टीव्र णिशेढ ....

;)

ह घ्या

मी पयला....

आनन्दा's picture

17 Feb 2016 - 2:28 pm | आनन्दा

तुम्ही ना ?
ढगळ पँट, इस्त्रीचा टीशर्ट, आणि चेहर्‍यावर खाली मुंडी पाताळ धुंडी भाव.

हाकानाका...

माहितगार's picture

21 Feb 2016 - 11:43 am | माहितगार

आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.)

* दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून)

* चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्‍हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही.

* आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :)

आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.

सतिश गावडे's picture

21 Feb 2016 - 9:54 pm | सतिश गावडे

आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही.

मात्र संक्षी आणि विवेक ठाकूर या दोन आयडींचे जन्मोजन्मीचे संबंध किंवा ऋणानुबंध असावेत असे वाटते.
संक्षी सॉरी विवेक ठाकूर या प्रतिसादाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत याची खात्री असल्यानेच मी हा प्रतिसाद देतोय. :)

स्पा's picture

17 Feb 2016 - 1:45 pm | स्पा

यशो

एकदम भारी =))

यशोधरा's picture

17 Feb 2016 - 2:00 pm | यशोधरा

भारी काय?? =)) इंदिरा गांधी तरी म्हणायचे मला! ओ सचौ, बदला ते. इंदिरा गांधी करा!:D

खान्ग्रेस पेक्षा सेना बरी ;)

पण नीलमपेक्षा इंदिरा ब्येष्ट!

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2016 - 2:30 pm | प्रमोद देर्देकर

अहं तुम्ही निलम गोऱ्हेच बरोबर इंदिरा गांधी म्हंटले की ती सोनीया धसका घ्यायची तिकडे.

अजया's picture

17 Feb 2016 - 1:47 pm | अजया

पिरा स्रुजा हाणणार =)))
या गं लवकर

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2016 - 1:53 pm | प्राची अश्विनी

:))

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

हेच मनात आले... स्त्रियांच्या वयांचे अंदाज आणि तेही २५ पेक्षा (बरेच) जास्त म्हणजे महायुद्धाची घोषणाच. काहिही हाँ सचौ !!! =)) =)) =))

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 2:09 pm | गॅरी ट्रुमन

हहपुवा

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:22 pm | पिलीयन रायडर

मी संतापाने धुमसत आहे... थांबा मला शांत होऊ द्या...

ज्या कोणी खापर पणज्याने हा धागा काढला आहे...

अजुन मी तीशी सुद्धा गाठलेली नाही.

५०????????
५०????????
प न्ना स??????????????????

तुम्हारी ये जुर्रत.... सर कलम कर दो इस नामाकुल का!!!!!!!!

(ह.घ्या हो... !! मी सिरीयसली ३० ला दोन कमी आहे हो.. जिथे तिथे लोक्स मला "जास्तच" आदर देऊ लागलेत..)

मृत्युन्जय's picture

17 Feb 2016 - 5:13 pm | मृत्युन्जय

पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे त्यांचे म्हणणे असावे. यातुन एकच निष्पन्न होते की सनईचौघडा हा किमान टका, ब्ञामॅ आणि विठांचा डु आयडी नाही ;)

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 5:19 pm | पिलीयन रायडर

बॅमॅ आणि विठा इज राईट... पण टका!!! कान्त से यु नो!

तुमच्या बद्दल अंदाज -

वय ३५-४० , अंदाजे ५'१०" - ६' उंची, मध्यम बांधा, रंग सावळा, चष्मा, गंभीर व्यक्तिमत्व
तुमच्याकडे खुप अवघड अवघड पुस्तकं असतील..

;)

इशा१२३'s picture

17 Feb 2016 - 5:29 pm | इशा१२३

खीक्क !
वय, रंग, चष्मा,व्यक्तीमत्व हे अंदाज वाचुन :)

मृत्युन्जय's picture

17 Feb 2016 - 6:01 pm | मृत्युन्जय

पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत की नाही ते सांगता येत नाही. बाकी सगळॅ अंदाज चुकले ;) पण वयाच्या बाबतीत काठावर पास देता येइल. :)

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 6:56 pm | बोका-ए-आझम

रंग सावळा - लोल!

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 6:59 pm | पिलीयन रायडर

आता काय करणार.. त्यांच नावंच तसं आहे..

मला सारखं ऊन.. सूर्य... म्हणुन टॅन असंच काहीतरी वाटतं!!

गोरेप्पान वगैरे आहेत का?!

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 8:19 pm | बोका-ए-आझम

माझ्या शेजारी उभे राहिले तर जास्तच गोरे दिसतील! ;)

काय गं पोरींनो कशाला लेकराला त्रास देताय?

पोरा , आज फार च हसले बघ. तुझे आजोबा पण विचारत होते आज स्वारी खुदुखुदु का हसते आहे एवढी? पन्नाशीची वाटते होय रे मी तुला? चहाटळ मेला.. उद्या झगा घाल म्हणशील तुझ्या या आजीला.

आणि या पोरीं अगदी वात्रट आहेत हो. किती ती कामं धामं सोडुन बडबड. त्या अजया ला लेकीला उजवायचं सोडून बाकी उद्द्योग सांगा. घोडनवरी झालीये हो ती ! उरका आता तिचे , मी डोळे मिटायला मोकळी मग.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 8:54 pm | पिलीयन रायडर

गुडघे कसेत ग तुझे आता!

आता काय पोरी ? कधी दुखतात कधी बरे असतात. आता या वयात हे चालायचंच. गुडघे नीट असुन मला नाचायला का जायचंय या वयात ? आता बागडण्याचे दिवस तुमचे. मी मेली तुमच्या आजोबांबरोबर एका बाजुला बसुन डोळे भरुन बघणार हो ..

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 9:52 pm | कविता१९७८

कुणाला?? आजोबाना का??

स्रुजा's picture

17 Feb 2016 - 9:54 pm | स्रुजा

इश्श्य .. विचार तुझ्या आजोबांना... येतील ही काठी घेऊन नाचायला.

सही रे सई's picture

18 Jun 2016 - 1:55 am | सही रे सई

हे काय स्रुजा ताई, परवाच म्हणत होतीस ना की सोसायटीच्या कार्यक्रमात आयटम साँग वर नाचलीस म्हणून.

बापरे मार खावा लागणार आता.. पळा..

तू मेल्या कशाला आला होतास सिनियर सिटिझन्स च्या स्नेहसंमेलनात? बरं आलाच आहेस तर फोटो काढ म्हणलंन तर पलिकडच्या झिपरीशी गुलुगुलु बोलत बसलास. पुन्हा ये कोथिंबीरीच्या वड्या हादडायला मग बघते.

आणि अरे तुझे आजोबा तसे रोमँटिक च आहेत. म्हणुन नाचले त्यांच्या बरोबर .. आणि आयटम साँग काय म्हणतोस शम्मी कपुर च्या गाण्याला ???

सही रे सई's picture

20 Jun 2016 - 11:11 pm | सही रे सई

फोटो काढायला गेले तर फोटोग्राफरची ही गर्दी तुझा एक लूक मिळावा म्हणून. मला मेलीला त्या गर्दीत धड उभपण राहायला मिळालं नाही. तरी घेतलेच तुझे फोटो, त्या झिपर्‍याला बाजूला करून आणि फोटो घेता घेता पडले, पाय मुरगळला माझा. त्याबद्दल कोथिंबीरीच्या वडी सोबत काहीतरी गोडधोड पण दे पुढच्या वेळी. तरचं फोटोची प्रत देईन तुला.

(पाय मुरगळलेली) सई

अग्गो बाय माझी ती. पण गुपचुप खा हां गोड, तुझ्या आजोबांना द्यायचं नाहीये फार गोड ;)

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2016 - 11:08 am | टवाळ कार्टा

"सही रे सई"...हा का हि??? नक्की म्याटर काय हाय???

पियुशा's picture

17 Feb 2016 - 3:35 pm | पियुशा

तुम्हाला कुनी सान्गितली स्रुजा काकि ५० च्या पुढे असेल काहीही हा ती फक्त ४९ वर्शे न ११ महिने ;)
मरतेय आता मी न स.. चॉ तुम्ही तर मरणारच आज ;)
पळा.................

जुइ's picture

17 Feb 2016 - 10:08 pm | जुइ

=))

छान!!

असाच एक प्रयत्न जवळपास ८ वर्षांपूर्वी केला होता, कुणालाही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी. पण जरा वेगळ्या पद्धतीने!!

पैकी बर्‍याचजणांच्या भेटी-गाठी नंतर झाल्यादेखिल!

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2016 - 2:12 pm | प्राची अश्विनी

भारी लिहिलेय!

सूड's picture

17 Feb 2016 - 2:18 pm | सूड

निषेध निषेध!!

स्मिता श्रीपाद's picture

17 Feb 2016 - 2:21 pm | स्मिता श्रीपाद

५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. >>>

या पुढचे वाचले नाही...खिक...
कुठे गेलात ग तिघी ?

नूतन सावंत's picture

17 Feb 2016 - 6:42 pm | नूतन सावंत

अगदी.अगदी.

अगं, आधी धागा बघायला उशीर झाला. मग त्यातलं आमचं वय वाचून आधी काशीयात्रेचं बुकिंग केलं.

उगा काहितरीच's picture

17 Feb 2016 - 2:21 pm | उगा काहितरीच

असा धागा काढायचा विचार होता माझ्या मनात . पण ठिक आहे. प्रतिक्रिया वाचायला मजा येईल .
१) श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले अशी प्रतिमा आहे त्यांची माझ्या मनात.
२)प्रा डॉ :- वय ३५-४० , सावळा वर्ण, मध्यम उंची , एक कूल ॲटिट्युड असलेले व्यक्तीमत्व ! विद्यार्थ्यांना कधीच असाइनमेंट्स वगैरे साठी परेशान न करणारे प्राध्यापक .
३) विपु :- वय ३०-४० शर्टिंग न केलेले शर्ट आणी फॉर्मल पॕन्ट घातलेले. वेगवेगळ्या विषयावरचे वाचन करणारे. असे व्यक्तीमत्व .
४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव,
५) माहीतगार साहेब:- वय ५०+ , चेहेर्यावर प्राध्यापकी प्रौढपणा, एक गौरवर्णी, शांत व्यक्तीमत्व .
बाकी वेळ मिळेल तसे टंकतो.

सुबोध खरे's picture

17 Feb 2016 - 6:27 pm | सुबोध खरे

श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले
मध्यम बांधा-- एवढं बाकी चुकलं. आम्ही आयुष्यात सरासरी पेक्षा कमी वजन टिकवून आहोत.

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2016 - 9:43 pm | श्रीरंग_जोशी

४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव,

उंची सहा फुट, बांधा सडपातळ ते अ‍ॅथ्लेटिक यांच्या दरम्यानचा. मोठे कपाळ अन धारदार नाकामुळे सतत धुमसत राहणार्‍या कट्टर धर्माभिमानी तरुणासारखा दिसतो. तलवारींना धार करून ठेवलीच पाहिजे असे म्हणेल काय असे वाटत राहते ;-) .

उका - एकदम शिन्शेर, होतकरू मा.तं. मधला तरुण.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:29 pm | पिलीयन रायडर

क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस

संक्षी / विठा - क्लिंटन प्रमाणेच टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस, फक्त वर साधारण ५०च्या आसपास, चेहर्‍यावर तुच्छ कटाक्ष!

नीलमोहर - - २५शीतली धडपडी मुलगी!

आनंदी गोपाळ - - ४५शीतले डॉकटर, स्थुल बांधा, फटकळ बोलणे ;)

जयंत कुलकर्णी - - ५०-६० चे काका, गौर वर्ण, हॅण्डसम असावेत असं उगाच आपलं वाटतं! ;)

खुप जणांना मी कट्ट्यांच्या फोटोत पाहिले आहे. त्यामुळे अंदाज बांधायला इतकेच आठवले. सापडले की सांगते अजुन!

चेहर्‍यावर तुच्छ कटाक्ष!... :)

किमान ५० मिपाकरांना कट्ट्याच्या फोटूत / चेपूवर/ जाल्निशीत पाहिलंय. न पाहिलेल्यांविषयी उत्सुकता आहे.

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 3:08 pm | गॅरी ट्रुमन

क्लिंटन - जास्तीतजास्त ३५,

धन्यवाद पिराताई. मागे एकदा एका बसस्टॉपवर एका शाळकरी मुलीने "will this bus go to Bandra, UNCLE" असे विचारले होते तेव्हापासून मला बरोबर वयाचे कोणी समजेल ही आशाच सोडली होती :) फक्त १ वर्षाची चूक झाली आहे वयात :)

टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस

नाही ब्वॉ.इथे मात्र चूक केलीत. म्हणजे पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये मध्ये हं सडसडीत म्हणण्यात नाही :)

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:32 pm | पिलीयन रायडर

सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज..
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 4:11 pm | गॅरी ट्रुमन

चूक केलीत ते पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये--सडसडीत म्हणण्यामध्ये नाही :) म्हणजे याचाच अर्थ मी सडसडीत आहे. हो मी जाडा आहे असे कोण मान्य करेल :)

कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!

तीच तर बोंब आहे.शेवटचा फुल-फ्लेज्ड कट्टा अटेंड केला होता त्याला चार वर्षे होतील आता.मधल्या काळात एकट्या टकाला तेवढे भेटलो होतो आणि ते सुध्दा ३१ डिसेंबरच्या शुभमुहुर्तावर :) बघू पुढचा कट्टा कधी अटेंड करायला मिळतो ते!!

सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज..
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!>>>>

अति अति अति सहमत. पण हा दुजाभाव का आधी तुम्ही तिघींनी अनाहिता कट्ट्याच्या छायाचित्राचे अनावरण करावे मग समजेल की तुम्ही षोडशा आहात की की ५०+ बायका आहात ते , मग गॅरी ट्रुमन कट्टा करतील काय समजलाव .

नीलमोहर's picture

17 Feb 2016 - 3:54 pm | नीलमोहर

Smiley

द ग्रेट 'पिरा' चा अंदाज सपशेल चुकलाय...
ते एक मुलगी सोडलं तर ;)

अर्थात २५ हे मानसिक वय कायमस्वरूपी राहणार आहेच..
बाकी तुझ्या बाबतीतला माझा अंदाज बर्‍यापैकी बरोबर निघाला.
धागाकर्त्यांनी काही अंदाज फारच चुकवलेले दिसतायेत उदा. एस, मांत्रिक, स्रुजा, पिरा, रेवतीताई.

माहितगार's picture

21 Feb 2016 - 11:44 am | माहितगार

आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.)

* दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून)

* चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्‍हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही.

* आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :)

आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:30 pm | पिलीयन रायडर

महत्वाचं राहिलं.

सनईचौघडा - वय १७५!

अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७ . फक्त ते पुढचे ५ काढ की बहुतेक ती चुकुन टायपो मिस्टेक झाली कै?

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:43 pm | पिलीयन रायडर

हो का? १.७५ नको का? मानसिक वय म्हणून??!!!

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 2:58 pm | सनईचौघडा

धावा धावा संपादक ओ संपादक धावा लवकर.

इथे सुध्दा चुकुन टिंब नको तिथे पडलंय ते १७.५ पाहिजे हो की नै पिरातै.

तेव्हा लवकर धावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Feb 2016 - 2:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

महायुद्धाची पहिली ठिणगी अजून कशी पडली नाही हा (यक्ष)प्रश्न पडला होताच ! आता कुठे जरा हुश्श्य वाटतेय :) ;)

टवाळ कार्टा's picture

17 Feb 2016 - 2:31 pm | टवाळ कार्टा

महालोल धागा...घरी जौन टंकतो...

चिनार's picture

17 Feb 2016 - 2:32 pm | चिनार

स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.

मी या तिघींना भेटलो नाहीये...पण वर्णन वाचल्यावर त्या तिघींच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ह्याचा विचार करतोय.

सनईचौघडा साहेब जीव मुठीत धरून सैरावैरा पळतायेत असं चित्र डोळ्यासमोर येतंय...

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:34 pm | पिलीयन रायडर

अजुन एक महत्वाचा तपशील ध्यानात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!!

मी दिवसभर इथे मेगाबायटी प्रतिसाद टंकत असते ह्यावरुनच तुम्हाला कळायला हवं की मला नोकरी आहे.. चांगलं दणदणीत स्पीडचं इंटरनेट असणारी!!!! गृहीणींना एवढा वेळ मिळत नसतो.. खापर खापर खापर पणजोबा... ;)

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 2:33 pm | कविता१९७८

१) अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली
२) त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी , चाळीशी ओलांडलेली गृहीणी,
३) मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव
४) मनीमाउ - तिशी ओलांडलेली, घरात मांजर पाळणारी, पाळणाघर चालवणारी
५) पैसा - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, अतिशय श्रीमंत घरातील , एकता कपुर सीरीयल स्टाईल माँ जी
पियुशा - निरागस, स्टायलिश, पंचविशीतली , जीन्स - टॉप घालणारी , बारीक केस, मस्तमौला

या सर्वांना कधी पाहीन कोण जाणे

नाव आडनाव's picture

17 Feb 2016 - 2:37 pm | नाव आडनाव

त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी
दोन ? ३ पाहिजेत ना? :):):)

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 2:44 pm | कविता१९७८

दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी म्हणजे झाले की त्रिवेणी

पैसा's picture

17 Feb 2016 - 2:39 pm | पैसा

फिशपाँड्स चालू आहेत का काय! =)) =))

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 2:53 pm | कविता१९७८

केव्हा भेटतेस ग ताई

पैसा's picture

17 Feb 2016 - 2:54 pm | पैसा

शिक्रेट कट्टा करूया.

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 2:55 pm | कविता१९७८

वोक्कै

विशाखा राऊत's picture

17 Feb 2016 - 3:20 pm | विशाखा राऊत

पैसा ताई एकता कपुर स्टाईल म्हण ना, नही .... नही.... नही.. मान पण झटक हा. ;)
बाकी सगळ्या परफेक्ट ;)

पैसा's picture

17 Feb 2016 - 3:23 pm | पैसा

माझे तीन अँगल्सने फोटो कोण काढणार?

स्पा's picture

17 Feb 2016 - 3:25 pm | स्पा

हम हे ना

विशाखा राऊत's picture

17 Feb 2016 - 3:32 pm | विशाखा राऊत

बघ तु बस डायलॉग सुरु कर.. स्पा गोव्यात असेल तयार कॅमेरा घेवुन ;)

पियुशा's picture

17 Feb 2016 - 3:41 pm | पियुशा

कवडे लोवे यु ;)

जेपी's picture

17 Feb 2016 - 2:35 pm | जेपी

प्राडॉ-
30-35,लांब बाह्याचा सदरा,पांढरा लेंगा,पायात चप्पल,आंडदांड व्यक्तीमत्व..

--
प्राडॉ-हलकेच घ्या..

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 11:00 pm | सतिश गावडे

जेप्या, हे कोणत्या पंच्यागात बघून सांगितलंस?

अ हो ना वा त च त र ति न वे ण्या आ हे त : )

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 2:40 pm | कविता१९७८

दोन वेण्या आणि एक फुलाची वेणी म्हणजे झाले की त्रिवेणी

एस's picture

17 Feb 2016 - 2:38 pm | एस

मी मागेच खफवर सांगितल्याप्रमाणे माझे वय २१ ला फ्रीझ करून ठेवले आहे! ;-)

अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली
मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव

वारल्या गेले आहे

पियुशा's picture

17 Feb 2016 - 3:43 pm | पियुशा

तुला "गेलो " म्हणायच का स्पावडी ;)

पिव्डे मराठी कधी शिकणार गो तू,

"ते" वारणे असते.

तो नाही

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 2:44 pm | सनईचौघडा

ह ह पु वा अरे काय हे माझ्या खव तर पिरातै नी तोफच डागली आहे.

शांत गदाधारी भीम शांतच्या धर्तीवर शांत तोफची मिपाकरीण शांत

पैसा's picture

17 Feb 2016 - 2:49 pm | पैसा

पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.

पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.>>>>

पुण्यात ? हॅट कोण जातंय? कोणते पुणे? काय पुणे ?

च्यायला त्या पेशाव्यांनी पुणे राजधानी केली म्हणुन एवढी पुणेकरांची पोपटपंची नाही तर " ठाणे तिथे काय उणे" अशी म्हणच आहे. म्हणजे आमचे भाईच अस म्हणालेत ना.

पेशव्यांनी खरे तर ठाण्याला रविवार वाडा बांधायला पाहिजे होता. मग खाडीतुन समुद्रमार्गे खुप व्यापार करुन बक्कळ पैसा कमावला असता तर भारताचे किमान महाराष्ट्राचे तरी चित्र काहीसे वेगळे बघायला मिळाले असते. ते राहले बाजूला गेले तिकडे अटके पार झेंडा रोवायला गेले. काय गरज होती?

पम्याभाऊ, पेशवे तुमच्याकडून सल्ला घ्यायला विसरलेच बघा, एक डाव माफी द्या ना प्लीज! :P

यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे

आणि

स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या

>>>>
मरेगा . भाई तू मरेगा . .

=]]

बर्याच लोकांना पाहिलेलं आहे तसे प्रत्यक्ष आणि फेबु वर,
बाकी काही ID

ग्यानोबाचे पैजार : ६० च्या पुढचे, धोतर , कापली टिळा, पांढरी बंडी, शांत व्यक्तिमत्व
पिरा : दामिनी मधल्या प्रतीक्षा लोणकर टाईप लुक
एस ओर्फ स्व्याप : ३५ शी दरम्यान कचकून स्थूल , टिपिकल आयटी पर्सन
संक्षी / विठा : ४५-५० च्या दरम्यान , उंच व्यक्तिमत्व, बर्यापैकी केस गेलेले , धारदार नाक, कदाचित चष्मा, घारे डोळे
आनंद मोरे : ४० च्या आसपास , मध्यम उंची, स्थूल , गौर वर्णीय :)

अजून आठवतील तसे लिहितो

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2016 - 5:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी साठीच्या पुढचा का रे? धोतर आणि कपाळाला टिळा?

थांब भेटलास की बघतोच तुला

स्पांडुरंग स्पांडुरंग

पैजारबुवा,

"स्थूल" काय, "गीता पे हाथ रखकर कसम बिसम" खाऊन मगंच लिहा असा तुमचा आणि मिपाचा करार आहे की माझ्या राशोमोन सिरीजवरचा हा राग आहे?

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 2:54 pm | सनईचौघडा

जाता ना तुला बरोबर घेवुन जातो गं पै तै.
नाही तरी मला मस्तानी आणि तुला च्या वसुल करायचाय की.
आणि गुरुजींकडून आपण शांती करवुन घेवु है कि नै.

अवखळ पम्या

पैसा's picture

17 Feb 2016 - 2:56 pm | पैसा

मला चा मिळालाय. पुणेकरानी त्याचे फटु काढून ठेवलेत. तुझ्या मस्तानीचे काय ते तू बघ. आणि पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. मला कै एवढ्यात मरायचं नाय.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:00 pm | पिलीयन रायडर

मग काय तर.. एक तर मह्त्प्रयासाने आपला कंपु बनवायचं चाल्लय आपलं.. एका मस्तानी पाइ फुट पाडुन घेउ काय????

आणि स्रुजा लांब कॅनडात आहे असं समजु नकोस.. येतेच आहे ती.. ठार मारेल ठार!

ठार हा शब्द मवाळ वाटत नाहिये का? अगदिच साधा...

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:30 pm | पिलीयन रायडर

नाऊ दॅट आय थिंक अबाऊट इट....

अगदीच सौम्य वाटतोय...

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 2:59 pm | पिलीयन रायडर

अवखळ??????? मी पन्नशीची गृहीणी न तु अवखळ????

बाद्वे... पुण्यात आलास तर सांगुन ठेवते.. मला आईस्क्रीम फार आवडतं.

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 3:16 pm | सनईचौघडा

मस्तानी चालेले कै.

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 4:09 pm | सनईचौघडा

जय देवी जय देवी जय पिरातै
आईस्क्रीम खायची तुला इतकी का घाई
जय देवी जय देवी || १||

मेगाबायटी प्रतिसादाने तु करिशी बोळवण
विठा , संक्षी,डांगे रोज काढती आठवण
जय देवी जय देवी... ||२||

वाढवले वय असता करिशी तणतण
दंबुक , तोफ उडवुन दे दणादण
जय देवी जय देवी....||३||

बाकीची पुरी करा रे कोणी तरी च्यायला तो अभ्या कुठे उलथला नेमका आत्ताच...

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 4:30 pm | पिलीयन रायडर

ये ये रे.. ये ये रे पम्या..

पुण्याला आणुन... दणके घालुन
पुजा बांधिन रे सोन्या....

ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ध्रू ||

मेगा बायटी नसते बोळवण
मिपा ट्यार्पीची ठेव आठवण
अभ्यास वाढव चम्या

ये ये रे.. ये ये रे पम्या.. || १ ||

एज म्ह्णे असे जस्ट नंबर
तुक्का मारला तरी कमीचा मार
खुश होतील रे तर्ण्या!
ये ये रे.. ये ये रे पम्या.. || २ ||

रेवाक्का तरी आहे प्रेमळ
मी आणि स्रुजा भारी लाथाळ
सांभाळुन अस रे डोम्या

ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ३ ||

(चाल :- जय देवी मंगळागौरी)

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 4:36 pm | सनईचौघडा

ऐकत नाही हा तै तु. लै भारी शिघ्र कवियात्री.

1

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 8:24 pm | बोका-ए-आझम

याला ये गो ये ये मैना पिंजरा बनाया सोनेका या अजरामर बालगीताची चाल पण बसू शकते.

वात्रट मेली. एवढी छान देवीची आरती आहे त्याचं पार भजं केलंन हिने.. कसे संसार होणार यांचे अशाने? आमची कधी हिंमत नव्हती हो असली थेरं करायची ..

बबन ताम्बे's picture

17 Feb 2016 - 2:58 pm | बबन ताम्बे

हे गृहस्थ साधारण पंचेचाळीशीचे, गोरे, घारे, नाकावर बायफोकल चष्मा आणि डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूकडे चापून चोपून वळवून टक्कल झाकायचा प्रयत्न केलेला, "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.

चौथा कोनाडा's picture

21 Feb 2016 - 8:18 pm | चौथा कोनाडा

बबन ताम्बेसाहेब, लै भारी इम्याजिनेशन !
आईशप्पत, मी येवडा भारी असेल हे बगुन मला गहिवरुन आले.

Taklya

आता माझा हा फुटु मी आरश्यावर लावलाय अन त्यात भांग पाडल्या बिगर कामाला जात नाय.

(आमची धाव म्हण्जे भिंतीतला कोनाडा ते फारतर ओसरी पर्यंत ! पण माझी रेंज "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " ही बघुन कुठल्यातरी विद्यापिठाची डॉक्कटरेट मिळाल्या सारखं वाटलं!)

होबासराव's picture

17 Feb 2016 - 3:02 pm | होबासराव

"मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.

माफ करा हा अधिकार आलरेडि आहे एका मिपा संता (कि सांता) कडे.

सनईचौघडा's picture

17 Feb 2016 - 3:02 pm | सनईचौघडा

दु दु पै तै.

पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. >>> चालेल मी इकडची मस्तानी तिकडे फिरवीन मग पिरातै शांत होईल. नाहीतर मी संक्शी / विठा यांच्या बरोबर जातो मग तिचं लक्षच जाणार नाही गरिब बिचार्या माझ्याकडे.

पैसा's picture

17 Feb 2016 - 3:04 pm | पैसा

हा तुझा भ्रम आहे. मग अगदी नक्कीच हातात सापडशील. त्या दोघाना दोन बाजूना उभे कर हां जय विजय म्हणून.

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2016 - 3:03 pm | प्राची अश्विनी

"अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली
--हहपुवा

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 3:06 pm | कविता१९७८

ओह अशी दिसत नाही का अजया

प्राची अश्विनी's picture

17 Feb 2016 - 3:10 pm | प्राची अश्विनी

=))

अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल तर सुचव बाई .देशस्थच हवा.मुलीच्या लग्नाचं टेन्शन मुलीच्या आईलाच :'(
त्यात ती माझ्यावर आहे.लांब केस आणि सावळी =)))

इशा१२३'s picture

17 Feb 2016 - 4:32 pm | इशा१२३

अगबाइ हो का? टेन्शनच !

हुंडा देणारेस का?

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 4:36 pm | पिलीयन रायडर

मुलगा आहे बै नजरेत एक... बाशिंग बाधुन तय्यार आहे!!

तुझ्या ओळखीतलाही आहे..

आता त्याला तुझी मुलगी आवडते की विनोद.. हे एकदा ठरलं की झालं!!!

=))

इशा१२३'s picture

17 Feb 2016 - 4:43 pm | इशा१२३

भावी सासुबाइना टॊमेटो भात करता येतो का?

इशा१२३'s picture

17 Feb 2016 - 4:43 pm | इशा१२३

भावी सासुबाइना टॊमेटो भात करता येतो का?

अजया's picture

17 Feb 2016 - 4:48 pm | अजया

मुलीच्या ना? विचारू वरपरिक्षेच्या वेळी.

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 4:38 pm | कविता१९७८

मासे खाणारा चालेल की डोक खाणारा हवाय??

मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट मुलगी खाईलच.
पिरे,तू माझी अट नाही वाचलीस नीट.अभक्ष्यभक्षण अपेयपानवाला नक्को.देशस्थच हवा;)आणि गृकृद.
इशे,मुलींनी हुंडा घ्यायचे दिवस आता.किती घेऊ अॅडव्हाइस द्या हं.

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 4:45 pm | कविता१९७८

घोडनवरा चालेल??

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 4:47 pm | पिलीयन रायडर

घोड नवरा चालत असेल तर ते अभक्ष्यभक्षण.... वगैरे अटी शिथील करा की जरा.. एक मुलगा फिट्ट बसतोय बघा अपेक्षांमध्ये.. हुंडाही मिळेल बघ!

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 4:49 pm | कविता१९७८

बर मग अजया अभक्ष्यभक्षण करणारा घोडनवरा मुलगा चालेल??

नको गं बाई.मला विनोदी जावई नको.घोडनवरा तर अज्जिबात नको :-/

कविता१९७८'s picture

17 Feb 2016 - 5:03 pm | कविता१९७८

अरे सगळे असच म्हणाले तर कस होईल आमच्या मुलाच??

" ट " आद्याक्षर असलेला चालेल का ? ;)

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 4:46 pm | पिलीयन रायडर

=))

बोका-ए-आझम's picture

17 Feb 2016 - 4:44 pm | बोका-ए-आझम

आणि तिच्या लग्नाचं तुम्हाला का टेन्शन?

अरे ती माझी न झालेली मुलगी नाही का! तिच्या लग्नाचं टेन्शन ;)

गॅरी ट्रुमन's picture

17 Feb 2016 - 3:13 pm | गॅरी ट्रुमन

सनईचौघडा, यावेळी भारतात दुपार आहे म्हणजे अमेरिका/कॅनडामध्ये रात्र. अजून रेवतीताई आणि स्रुजाताईंनी हा धागा बघितलेला दिसत नाही.त्या दोघी इथे येण्यासाठी अजून काही तास थांबा.आगे आगे देखो होता है क्या :)

इशा१२३'s picture

17 Feb 2016 - 3:18 pm | इशा१२३

मज्जा आली धागा वाचुन.
पिरा,स्रुजा,रेवाक्का ५० + काय.....
हहपुवा
स्रुजाताइ उठा.....या इकडे

Maharani's picture

17 Feb 2016 - 5:23 pm | Maharani

Ag atasha srujatainna gudhage dukhini laukar uthavat kahi....

अगो, किती जोरात ओरडतेस? किती वेळा सांगायचं गं तुम्हाला, पोरीच्या जातीला एवढा दंगा शोभत नाही हो. सकाळी पोथी असते माझी, तुझे आजोबा जातात फिरायला. तेवढ्या वेळात देवाचं नाव घेते मी , एवढं माहिती असून तेंव्हाच मेलं हाका मारायच्या जोर जोरात. तुझ्या आजोबांना ऐकु येत नाही पण माझे कान शाबुत आहेत, काय समजलीस?

तुझे आजोबा जातात फिरायला.
आईशप्पथ! त्याला आजोबा काय काका तरी म्हणेल का कोणी पुढील २० वर्षात?

स्रुजा's picture

21 Feb 2016 - 9:07 pm | स्रुजा

बघ की गं.. पण वय कळत नसलं तरी आहे हो ;)

न पाहिलेल्या मिपाकरांविषयी प्रतिमा:
१) वल्ली/प्रचेतसः सडसडीत बांधा, चेहर्‍यावर प्राध्यापकी हावभाव, गीतगोविंदातल्या राधेचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा ते प्रक्षिप्त पात्र आहे सांगणारं व्यक्तीमत्व.
२) सतिश गावडे उर्फ धन्या: खुर्चीत पुरण भरल्यासारखी सुदृढ बालक स्पर्धेत पहिला नंबर आलेली शरीरयष्टी, मानसशास्त्राचा अभ्यास करणारा गूढ गंभीर चेहरा.
३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका
४) किसन शिंदे: आनंद दिघे छाप दाढी, झब्बा आणि घाटावरची लोकं घालतात तसा ढगळ, अघळ-पघळ लेंगा, प्राथमिक शिक्षक असावे अशी देहबोली.
५) बॅटमॅनः बॅटमॅनसारखा लूक
६)टवाळ कार्टा: यत्ता दुशली ब मध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला असल्यासारखा आदर्श स्वभाव, शांत, मितभाषी.
७) वपाडाव: तोंडात पानाची भक्कम पिंक, डोक्यावर प्रभाकर पणशीकर छाप टोपी, तोंडातून (नको तिथे देखील) गज़लांचा पाऊस पाडणारे व्यक्तीमत्व.

तूर्तास इतकेच!! या लोकांनी जर जीव घेतला नाही, तर उरलेल्यांबद्दल लिहू =))

स्पा's picture

17 Feb 2016 - 3:23 pm | स्पा

अजून एक राहिले

सूड : वेस्ट इंडीज क्रिकेट टीममधला एखादा प्लेयर वाटावा अशी अष्ट बिस्कुटधारी कमावलेली शरीरयष्टी

किसन शिंदे's picture

18 Feb 2016 - 9:37 am | किसन शिंदे

३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका

=))

मूखदूर्बळ's picture

17 Feb 2016 - 3:19 pm | मूखदूर्बळ

:) मस्त धागा :)

तुषार काळभोर's picture

17 Feb 2016 - 3:20 pm | तुषार काळभोर

प्रतिसादावरूनः
पिरा (यांनी स्वतः वरती सांगितलंय तरी, माझा अंदाज): ३०-३५ पुणे-आयटी-लेकुरवाळी
प्रचेतसः सहा फूट, डॉ खरेंसारखा फिटनेस , कार्गो पँट, कदाचित चष्मा, ३५ वर्षे
खेडूतः वय ५०, साडेपाचच्या आतबाहेर उंची, किरकोळ बांधा, शर्ट-ब्यागी पँट, बारीक मिशी व चष्मा
बबन तांबे: सेम अ‍ॅज खेडूत (वय ३०)
डॉ सुहास म्हात्रे: राजकारणात येण्याआधीचे विनामिशी डॉ अमोल कोल्हे
संदीप डांगे:३०-३५, बारीक बांधा, ५'६"-५'८" उंची, टीशर्ट-पँट
अभ्या: गोरा वर्ण, ६ फूट, किरकोळ बांधा, चष्मा

विशाखा राऊत's picture

17 Feb 2016 - 3:22 pm | विशाखा राऊत

पिरा आयटी... ये ग ये.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:29 pm | पिलीयन रायडर

मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे ३०-३५ लिहीतात... दुष्ट ग बै दुष्ट्ट मिपाकर...

विशु..
मला सुखात बघवत नाही का ग तुला?? आयटीत नेतेस ओढुन!!!

विशाखा राऊत's picture

17 Feb 2016 - 3:33 pm | विशाखा राऊत

मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला आय्टीत... अजिबात येवु नकोस..
या जन्मी मस्त सुखी रहा आयटीत नाहीस हा विचार करुन ;)

बाकी तु २५ची आणि काय तुला आजी करत आहेत. बंदुक कहा है तुम्हारी...

स्पा's picture

17 Feb 2016 - 3:37 pm | स्पा

आय टी सारखे सुख या भू तळावर नाही

वर्षातले ६ महिने बेंच, पाच दिवस काम (जेमतेम )
भरपूर ओनसाईट , कचकून दाबून पगार
घरपोच कुल क्याब.

तरी स्वताला हमाल म्हणवून घेण्यात काय सुख वाटते देवच जाणे

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:39 pm | पिलीयन रायडर

अहो नको.. आधीच ठासुन इंधन भरलय धाग्यात.. आत्त्ताच गरज नै..

विशाखा राऊत's picture

17 Feb 2016 - 3:52 pm | विशाखा राऊत

जागो जागो.
हे सुख कुठे असते म्हणे आयटिला. कायच्या काय अफवा पसरवतो का.
रिलिझसाठी दिवसरात्र मेहनत, क्लायंटच्या शिव्या, लो बजेट, मॅनेजरची मनमानी हे भी होता है बर का

हमाल नाही गधेमजुरी गधेमजुरी

सतिश गावडे's picture

17 Feb 2016 - 11:02 pm | सतिश गावडे

"माझी पळते तर तुझी का जळते?" असे एका रिक्षाच्या मागे लिहिलेले होते. ती रिक्षा तुमची होती काय?

विशाखा राऊत's picture

18 Feb 2016 - 1:38 am | विशाखा राऊत

आयटीवाले कुल कॅब ने जातात असे स्पाने म्हटले आहे :)
उगा रिक्षा म्हणुन अवमान करु नये ;)

खटपट्या's picture

19 Feb 2016 - 9:54 pm | खटपट्या

ख्खिक्क !!

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:38 pm | पिलीयन रायडर

तोफ डागुन आले त्या मेल्या पम्यावर.. सोडते की काय!!
;)

षोडशाच म्हणायला पाहिजे खरं तर... नै का!!

ते वाचलं हो... ते वाचायच्या आधीचा अंदाज सांगितला. 'तीसलादोनकमी' वाली व्यक्ती मेगाबायटी प्रतिसादाला किलोबायटी उत्तर देते, असं वाटत नाही. म्हणून माझा अंदाज ३०-३५ होता. (खरंतर ४०, पण स्त्रीदाक्षिण्य म्हणून ३० म्हणालो ;)
असो. हघ्याहेवेसांनल.

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:53 pm | पिलीयन रायडर

इथुन पुढे मी फक्त वन लायनर आणि लाईट मुड मधलेच प्रतिसाद देणार बै...!

काय पण पैलवान तुमचा अंदाज सपशेल चुकलाय बर का ? धाग्या कर्त्याने अचुक बान्धलाय अंदाज ;)
( पिरा आइ भागो भागो ........)

पिलीयन रायडर's picture

17 Feb 2016 - 3:57 pm | पिलीयन रायडर

गप ग.. मी ६१ चं कसं बस ३० वर आणलय.. आणि आता थोड्याच वेळात १६ पण पटवीन... ;) तू बाकी काही आठवणी काढु नकोस..!!

अभ्या..'s picture

17 Feb 2016 - 5:14 pm | अभ्या..

चष्मा...???? नाय वो अजून.

६ फूटाला २ इंच कमी फक्त.

किरकोळ बांधा....८२ किलोला किरकोळ म्हणतेत व्हय? जिमची बाडी हाय म्हाराजा.

गोरा...............इल्ले. मिडलक्लास कलर बघा.

आणि ते पेन पेन्शील खेळत नाही ब्वा कधी. कवातरी सही करायलालागतो तेव्हाच वापरतो. बाकी नाही.

एका जागी बसत नाहीहे मात्र खरे . ;)

कुणीतरी माझ्या ह्याण्डसमपणाचे कौतुक करा रे बघितलेल्यांनी. ;)

नाखु's picture

17 Feb 2016 - 5:16 pm | नाखु

पण तुला चालणार नाही !!!!!!