तुम्ही न पाहिलेल्या मिपाकरांविषयी तुमच्या मनातली प्रतिमा

सनईचौघडा काथ्याकूट
तुम्ही मिपावर वावरताना आजपर्यंत अनेक आयडींशी लेख प्रतिसाद या रुपाने आभासी ओळख निर्माण झालेली आहे. आणि त्या आयडी मागचे व्यक्तीमत्व कसे असेल या बद्दल मनात एक प्रतिमा निर्माण झाली असेल. चला तर मग कोण कसे असेल याविषयी एक अटकळ अंदाज बांधुया.
फक्त अट एकच की ज्यांना तुम्ही मिपा कट्ट्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष आणि मिपावर छायाचित्राच्या स्वरुपात पाहिलेलं नाही अश्याच आयडींची /सदस्यांची तुमच्या मनातील प्रतिमा साकारायची आहे.
१)संदिप डांगे :- वय साधारण ३५ ते ४० च्या आसपास , मध्यम बांधा आणि बहुतेक करुन जिन्स आणि शर्ट या पेहराव आवडत असाणार. सतत अस्थिर , धडपडे एका जागी न बसणारे. २)एस / स्वॅप्सभावु :- वय साधारण ५५ ते ६० च्या आसपास, मध्यम बांधा पण उंच अंगकाठी , हाताची बोटे लांबसडक पण मुलायम (कॅमेरा हाताळतात म्हणुन) , कपाळावरील केस थोडेसे पांढरे, बहुदा पांढरा लेंगा ,पँट हा पेहराव पसंत असणार आणि चेहर्यावर एक शांत समाधानी भाव असणार. ३)अभ्या :- कलाकर व्यक्ती म्हणुन हातात पेन्सिल किंवा सतत पेन खेळवत असणार, विचाराच्या नादात कधी तोंडात ही जात असेल, साधारणपणे ३० ते ३५ च्या आसापास , वर्ण गहुवर्णी , मध्यम बांधा आणि एकाच जागी न बसणारे व्यक्तिमत्व . ४)यशोधरा:- यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे. माझी एक ठाम समजुत झाली आहे की शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि यशोतैमध्ये काहीही फरक नाहीच आहे. सेम टु सेम व्यक्तिमत्व. ५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. ६)गॅरी ट्रुमन/ क्लिंटन :- वय साधारण पणे ४० च्या आसपास गोरा रंग , उंच व्यक्तिमत्व, कुरळे केस असावेत आणि अंगकाठी बारीक असावी. ७)विटेकर काका:- वय साधारण ५० च्या पुढे, डोक्याला थोडेसे टक्कल . पेहराव बहुदा सफारी, व्यक्तिमत्व स्थुलतेकडे झुकणारे. ८)तर्राट जोकरः- वय साधारण ४५ च्या पुढे, मध्यम बांधा गहुवर्णी, आणि साधारणपणे साधी राहणी असलेले. ९)मांत्रिक / विजय पुरोहीतः- वय ३० च्या आसपास, मला हे पहिले तिकडे सोलापुर , कोल्हापुर साईडचे वाटत होते. त्यामुळे भाषेचा तसाच लहेजा असणार असे वाटायचे , साधारणपणे चौकड्यांचा शर्ट, जिन्स असा पेहराव. १०) माहितगार , संक्षी. आणि वि. ठाकुर :- वयानी बहुतेक ५५ च्या पुढे. स्थुल. चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला. सतत काही ना काही तरी माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात असेलेले व्यक्तिमत्व. सध्या हजर असणारे दिसले ते आणि आठवलेत म्हणुन इतकेच लिहले. जसे जसे आठवत जातील तसे आणखीन प्रतिसादात लिहीन. तो पर्यंत तुम्ही सुरुवात करा.
तळटीप :- इथे मला कोणाला ही दुखावायचा हेतु नाहीये. हे असेच एक अंदाज म्हणुन लिहलेला धमाल करण्यासाठी काढलेला धागा आहे. ज्यांच्या विषयी लिहले आहे त्यापैकी कोणी आक्षेप असल्यास मी संपा. मंडळाकडुन त्या व्यक्तिविषयीचे लिखाण काढुन टाकेन. तसेच तुम्हाला ज्यांच्या कोणा विषयी लिहायचे असेल तर ती व्यक्ति दुखावणार नाही ही काळजी तुम्ही घ्यावी.
वर्गीकरण
वर्गीकरण

362 टिप्पण्या 97,945 दृश्ये

Comments

आनन्दा नवीन

In reply to by पगला गजोधर

तुम्ही ना ? ढगळ पँट, इस्त्रीचा टीशर्ट, आणि चेहर्‍यावर खाली मुंडी पाताळ धुंडी भाव. हाकानाका...

माहितगार नवीन

In reply to by पगला गजोधर

आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.) * दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून) * चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्‍हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही. * आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :) आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.

सतिश गावडे नवीन

In reply to by माहितगार

आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही.
मात्र संक्षी आणि विवेक ठाकूर या दोन आयडींचे जन्मोजन्मीचे संबंध किंवा ऋणानुबंध असावेत असे वाटते. संक्षी सॉरी विवेक ठाकूर या प्रतिसादाकडे ढुंकूनही पाहणार नाहीत याची खात्री असल्यानेच मी हा प्रतिसाद देतोय. :)

प्रमोद देर्देकर नवीन

In reply to by यशोधरा

अहं तुम्ही निलम गोऱ्हेच बरोबर इंदिरा गांधी म्हंटले की ती सोनीया धसका घ्यायची तिकडे.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by अजया

हेच मनात आले... स्त्रियांच्या वयांचे अंदाज आणि तेही २५ पेक्षा (बरेच) जास्त म्हणजे महायुद्धाची घोषणाच. काहिही हाँ सचौ !!! =)) =)) =))

पिलीयन रायडर नवीन

In reply to by अजया

मी संतापाने धुमसत आहे... थांबा मला शांत होऊ द्या... ज्या कोणी खापर पणज्याने हा धागा काढला आहे... अजुन मी तीशी सुद्धा गाठलेली नाही. ५०???????? ५०???????? प न्ना स?????????????????? तुम्हारी ये जुर्रत.... सर कलम कर दो इस नामाकुल का!!!!!!!! (ह.घ्या हो... !! मी सिरीयसली ३० ला दोन कमी आहे हो.. जिथे तिथे लोक्स मला "जास्तच" आदर देऊ लागलेत..)

मृत्युन्जय नवीन

In reply to by पिलीयन रायडर

पिरा तु खुप मॅचुअर्ड आहेस असे त्यांचे म्हणणे असावे. यातुन एकच निष्पन्न होते की सनईचौघडा हा किमान टका, ब्ञामॅ आणि विठांचा डु आयडी नाही ;)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by मृत्युन्जय

बॅमॅ आणि विठा इज राईट... पण टका!!! कान्त से यु नो! तुमच्या बद्दल अंदाज - वय ३५-४० , अंदाजे ५'१०" - ६' उंची, मध्यम बांधा, रंग सावळा, चष्मा, गंभीर व्यक्तिमत्व तुमच्याकडे खुप अवघड अवघड पुस्तकं असतील.. ;)

मृत्युन्जय नवीन

In reply to by पिलीयन रायडर

पुस्तके बरीच आहेत. अवघड आहेत की नाही ते सांगता येत नाही. बाकी सगळॅ अंदाज चुकले ;) पण वयाच्या बाबतीत काठावर पास देता येइल. :)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by बोका-ए-आझम

आता काय करणार.. त्यांच नावंच तसं आहे.. मला सारखं ऊन.. सूर्य... म्हणुन टॅन असंच काहीतरी वाटतं!! गोरेप्पान वगैरे आहेत का?!

स्रुजा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

काय गं पोरींनो कशाला लेकराला त्रास देताय? पोरा , आज फार च हसले बघ. तुझे आजोबा पण विचारत होते आज स्वारी खुदुखुदु का हसते आहे एवढी? पन्नाशीची वाटते होय रे मी तुला? चहाटळ मेला.. उद्या झगा घाल म्हणशील तुझ्या या आजीला. आणि या पोरीं अगदी वात्रट आहेत हो. किती ती कामं धामं सोडुन बडबड. त्या अजया ला लेकीला उजवायचं सोडून बाकी उद्द्योग सांगा. घोडनवरी झालीये हो ती ! उरका आता तिचे , मी डोळे मिटायला मोकळी मग.

स्रुजा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

आता काय पोरी ? कधी दुखतात कधी बरे असतात. आता या वयात हे चालायचंच. गुडघे नीट असुन मला नाचायला का जायचंय या वयात ? आता बागडण्याचे दिवस तुमचे. मी मेली तुमच्या आजोबांबरोबर एका बाजुला बसुन डोळे भरुन बघणार हो ..

सही रे सई नवीन

In reply to by स्रुजा

हे काय स्रुजा ताई, परवाच म्हणत होतीस ना की सोसायटीच्या कार्यक्रमात आयटम साँग वर नाचलीस म्हणून. बापरे मार खावा लागणार आता.. पळा..

स्रुजा नवीन

In reply to by सही रे सई

तू मेल्या कशाला आला होतास सिनियर सिटिझन्स च्या स्नेहसंमेलनात? बरं आलाच आहेस तर फोटो काढ म्हणलंन तर पलिकडच्या झिपरीशी गुलुगुलु बोलत बसलास. पुन्हा ये कोथिंबीरीच्या वड्या हादडायला मग बघते. आणि अरे तुझे आजोबा तसे रोमँटिक च आहेत. म्हणुन नाचले त्यांच्या बरोबर .. आणि आयटम साँग काय म्हणतोस शम्मी कपुर च्या गाण्याला ???

सही रे सई नवीन

In reply to by स्रुजा

फोटो काढायला गेले तर फोटोग्राफरची ही गर्दी तुझा एक लूक मिळावा म्हणून. मला मेलीला त्या गर्दीत धड उभपण राहायला मिळालं नाही. तरी घेतलेच तुझे फोटो, त्या झिपर्‍याला बाजूला करून आणि फोटो घेता घेता पडले, पाय मुरगळला माझा. त्याबद्दल कोथिंबीरीच्या वडी सोबत काहीतरी गोडधोड पण दे पुढच्या वेळी. तरचं फोटोची प्रत देईन तुला. (पाय मुरगळलेली) सई

पियुशा नवीन

In reply to by अजया

तुम्हाला कुनी सान्गितली स्रुजा काकि ५० च्या पुढे असेल काहीही हा ती फक्त ४९ वर्शे न ११ महिने ;) मरतेय आता मी न स.. चॉ तुम्ही तर मरणारच आज ;) पळा.................

सुनील नवीन

छान!! असाच एक प्रयत्न जवळपास ८ वर्षांपूर्वी केला होता, कुणालाही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी. पण जरा वेगळ्या पद्धतीने!! पैकी बर्‍याचजणांच्या भेटी-गाठी नंतर झाल्यादेखिल!

स्मिता श्रीपाद नवीन

५)स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान. >>> या पुढचे वाचले नाही...खिक... कुठे गेलात ग तिघी ?

रेवती नवीन

In reply to by स्मिता श्रीपाद

अगं, आधी धागा बघायला उशीर झाला. मग त्यातलं आमचं वय वाचून आधी काशीयात्रेचं बुकिंग केलं.

उगा काहितरीच नवीन

असा धागा काढायचा विचार होता माझ्या मनात . पण ठिक आहे. प्रतिक्रिया वाचायला मजा येईल . १) श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले अशी प्रतिमा आहे त्यांची माझ्या मनात. २)प्रा डॉ :- वय ३५-४० , सावळा वर्ण, मध्यम उंची , एक कूल ॲटिट्युड असलेले व्यक्तीमत्व ! विद्यार्थ्यांना कधीच असाइनमेंट्स वगैरे साठी परेशान न करणारे प्राध्यापक . ३) विपु :- वय ३०-४० शर्टिंग न केलेले शर्ट आणी फॉर्मल पॕन्ट घातलेले. वेगवेगळ्या विषयावरचे वाचन करणारे. असे व्यक्तीमत्व . ४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव, ५) माहीतगार साहेब:- वय ५०+ , चेहेर्यावर प्राध्यापकी प्रौढपणा, एक गौरवर्णी, शांत व्यक्तीमत्व . बाकी वेळ मिळेल तसे टंकतो.

सुबोध खरे नवीन

In reply to by उगा काहितरीच

श्री सुबोध खरे :- वय ५०-५५ च्या आसपास तुळतुळीत दाढी केलेली. उंच, मध्यम बांधा, कॉलर असलेले फेंट टिशर्ट, आणी ब्लु जिन्स घातलेले मध्यम बांधा-- एवढं बाकी चुकलं. आम्ही आयुष्यात सरासरी पेक्षा कमी वजन टिकवून आहोत.

श्रीरंग_जोशी नवीन

In reply to by उगा काहितरीच

४)श्रीरंग जोशी :- मध्यम उंची , मध्यम बांधा, चेहेर्यावर मिस्कील भाव,
उंची सहा फुट, बांधा सडपातळ ते अ‍ॅथ्लेटिक यांच्या दरम्यानचा. मोठे कपाळ अन धारदार नाकामुळे सतत धुमसत राहणार्‍या कट्टर धर्माभिमानी तरुणासारखा दिसतो. तलवारींना धार करून ठेवलीच पाहिजे असे म्हणेल काय असे वाटत राहते ;-) . उका - एकदम शिन्शेर, होतकरू मा.तं. मधला तरुण.

पिलीयन रायडर नवीन

क्लिंटन - जास्तीतजास्त ३५, टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस संक्षी / विठा - क्लिंटन प्रमाणेच टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस, फक्त वर साधारण ५०च्या आसपास, चेहर्‍यावर तुच्छ कटाक्ष! नीलमोहर - - २५शीतली धडपडी मुलगी! आनंदी गोपाळ - - ४५शीतले डॉकटर, स्थुल बांधा, फटकळ बोलणे ;) जयंत कुलकर्णी - - ५०-६० चे काका, गौर वर्ण, हॅण्डसम असावेत असं उगाच आपलं वाटतं! ;) खुप जणांना मी कट्ट्यांच्या फोटोत पाहिले आहे. त्यामुळे अंदाज बांधायला इतकेच आठवले. सापडले की सांगते अजुन!

खेडूत नवीन

In reply to by पिलीयन रायडर

चेहर्‍यावर तुच्छ कटाक्ष!... :) किमान ५० मिपाकरांना कट्ट्याच्या फोटूत / चेपूवर/ जाल्निशीत पाहिलंय. न पाहिलेल्यांविषयी उत्सुकता आहे.

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by पिलीयन रायडर

क्लिंटन - जास्तीतजास्त ३५,
धन्यवाद पिराताई. मागे एकदा एका बसस्टॉपवर एका शाळकरी मुलीने "will this bus go to Bandra, UNCLE" असे विचारले होते तेव्हापासून मला बरोबर वयाचे कोणी समजेल ही आशाच सोडली होती :) फक्त १ वर्षाची चूक झाली आहे वयात :)
टिपीकल पुणेरी गोरा सडसडीत माणुस
नाही ब्वॉ.इथे मात्र चूक केलीत. म्हणजे पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये मध्ये हं सडसडीत म्हणण्यात नाही :)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by गॅरी ट्रुमन

सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज.. कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!

गॅरी ट्रुमन नवीन

In reply to by पिलीयन रायडर

चूक केलीत ते पुणेरी गोरा म्हणण्यामध्ये--सडसडीत म्हणण्यामध्ये नाही :) म्हणजे याचाच अर्थ मी सडसडीत आहे. हो मी जाडा आहे असे कोण मान्य करेल :)
कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!!
तीच तर बोंब आहे.शेवटचा फुल-फ्लेज्ड कट्टा अटेंड केला होता त्याला चार वर्षे होतील आता.मधल्या काळात एकट्या टकाला तेवढे भेटलो होतो आणि ते सुध्दा ३१ डिसेंबरच्या शुभमुहुर्तावर :) बघू पुढचा कट्टा कधी अटेंड करायला मिळतो ते!!

सनईचौघडा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

सडसडीत नसलात तरी स्थुल नसालच.. आणि आता मला सांगु नकात.. माझ्या डोक्यात फिट्ट आहे तुमची इमेज.. कट्टा करा आणि प्रुव्ह करा तुम्ही सडसडीत नाही म्हणुन!!>>>> अति अति अति सहमत. पण हा दुजाभाव का आधी तुम्ही तिघींनी अनाहिता कट्ट्याच्या छायाचित्राचे अनावरण करावे मग समजेल की तुम्ही षोडशा आहात की की ५०+ बायका आहात ते , मग गॅरी ट्रुमन कट्टा करतील काय समजलाव .

नीलमोहर नवीन

In reply to by पिलीयन रायडर

Smiley द ग्रेट 'पिरा' चा अंदाज सपशेल चुकलाय... ते एक मुलगी सोडलं तर ;) अर्थात २५ हे मानसिक वय कायमस्वरूपी राहणार आहेच.. बाकी तुझ्या बाबतीतला माझा अंदाज बर्‍यापैकी बरोबर निघाला. धागाकर्त्यांनी काही अंदाज फारच चुकवलेले दिसतायेत उदा. एस, मांत्रिक, स्रुजा, पिरा, रेवतीताई.

माहितगार नवीन

In reply to by पिलीयन रायडर

आमच्या आयडीचा या धागा लेखात नंबर पाहून डोळे प्वाणावले, ढिशक्लेमर जोडण्याची आणि पहिल्या पानावर यावा हे जरूरी वाटल्यामुळे प्रतिसाद येथे नोंदवत असून आमचा संक्षी. आणि वि. ठाकुर या आयडींशी कै पण संबंध नाही. संक्षी हा आयडी दिसला की आम्ही आंक्षीsss करून दूर जात असतो ;) (संक्षी ह. घ्या.) * दुसरे, वय कमी करुन मिळण्यासाठी सनई किंवा चौघडा काय आणि कसे वाजवावे ? (आयडीचे तुकडे केल्या बद्दल क्षमा मागून) * चेहरा जगातील सर्व गोष्टींचा अनुभवीपणाची ओळख असलेला म्हंजे काय र्‍हातय ? कसे दिसतात हे चेहरे काही फोटू सारखे उदाहरण द्यालका नाई काही. * आम्ही बरीक अधिक स्थुल कसे व्हावे याची पुस्तके बाजारात नित्याने शोधत असतो, स्थुल होण्याचा आनंद मिळवून दिल्या बद्दल धागा लेखकाचे धन्यवाद आणि __/\__ :) आता संक्षी/ठाकूर समजून कोन काय कामेंट दिलय का बघतो आणि तेथे पण ढिसक्लेमर चिटकवितो.

सनईचौघडा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

अगं पिरातै बरोबर ओळखलेस हो १७ . फक्त ते पुढचे ५ काढ की बहुतेक ती चुकुन टायपो मिस्टेक झाली कै?

सनईचौघडा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

धावा धावा संपादक ओ संपादक धावा लवकर. इथे सुध्दा चुकुन टिंब नको तिथे पडलंय ते १७.५ पाहिजे हो की नै पिरातै. तेव्हा लवकर धावा.

डॉ सुहास म्हात्रे नवीन

In reply to by पिलीयन रायडर

महायुद्धाची पहिली ठिणगी अजून कशी पडली नाही हा (यक्ष)प्रश्न पडला होताच ! आता कुठे जरा हुश्श्य वाटतेय :) ;)

चिनार नवीन

स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या टीपीकल भारतीय पेहराव आणि तसेच रहाणीमान.
मी या तिघींना भेटलो नाहीये...पण वर्णन वाचल्यावर त्या तिघींच्या चेहऱ्यावरचे भाव काय असतील ह्याचा विचार करतोय. सनईचौघडा साहेब जीव मुठीत धरून सैरावैरा पळतायेत असं चित्र डोळ्यासमोर येतंय...

पिलीयन रायडर नवीन

In reply to by चिनार

अजुन एक महत्वाचा तपशील ध्यानात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद!! मी दिवसभर इथे मेगाबायटी प्रतिसाद टंकत असते ह्यावरुनच तुम्हाला कळायला हवं की मला नोकरी आहे.. चांगलं दणदणीत स्पीडचं इंटरनेट असणारी!!!! गृहीणींना एवढा वेळ मिळत नसतो.. खापर खापर खापर पणजोबा... ;)

कविता१९७८ नवीन

१) अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली २) त्रिवेणी - दोन वेण्या घालणारी , चाळीशी ओलांडलेली गृहीणी, ३) मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव ४) मनीमाउ - तिशी ओलांडलेली, घरात मांजर पाळणारी, पाळणाघर चालवणारी ५) पैसा - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, अतिशय श्रीमंत घरातील , एकता कपुर सीरीयल स्टाईल माँ जी पियुशा - निरागस, स्टायलिश, पंचविशीतली , जीन्स - टॉप घालणारी , बारीक केस, मस्तमौला या सर्वांना कधी पाहीन कोण जाणे

विशाखा राऊत नवीन

In reply to by कविता१९७८

पैसा ताई एकता कपुर स्टाईल म्हण ना, नही .... नही.... नही.. मान पण झटक हा. ;) बाकी सगळ्या परफेक्ट ;)

जेपी नवीन

प्राडॉ- 30-35,लांब बाह्याचा सदरा,पांढरा लेंगा,पायात चप्पल,आंडदांड व्यक्तीमत्व.. -- प्राडॉ-हलकेच घ्या..

एस नवीन

मी मागेच खफवर सांगितल्याप्रमाणे माझे वय २१ ला फ्रीझ करून ठेवले आहे! ;-)

स्पा नवीन

अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली मितान - पंजाबी ड्रेस, सावळा वर्ण, बारीक अंगकाठी, शांत स्वभाव
वारल्या गेले आहे

सनईचौघडा नवीन

ह ह पु वा अरे काय हे माझ्या खव तर पिरातै नी तोफच डागली आहे. शांत गदाधारी भीम शांतच्या धर्तीवर
शांत तोफची मिपाकरीण शांत

सनईचौघडा नवीन

In reply to by पैसा

पुढच्या वर्षभरात पुण्याला जौ नको.>>>> पुण्यात ? हॅट कोण जातंय? कोणते पुणे? काय पुणे ? च्यायला त्या पेशाव्यांनी पुणे राजधानी केली म्हणुन एवढी पुणेकरांची पोपटपंची नाही तर " ठाणे तिथे काय उणे" अशी म्हणच आहे. म्हणजे आमचे भाईच अस म्हणालेत ना. पेशव्यांनी खरे तर ठाण्याला रविवार वाडा बांधायला पाहिजे होता. मग खाडीतुन समुद्रमार्गे खुप व्यापार करुन बक्कळ पैसा कमावला असता तर भारताचे किमान महाराष्ट्राचे तरी चित्र काहीसे वेगळे बघायला मिळाले असते. ते राहले बाजूला गेले तिकडे अटके पार झेंडा रोवायला गेले. काय गरज होती?

यशोधरा नवीन

In reply to by सनईचौघडा

पम्याभाऊ, पेशवे तुमच्याकडून सल्ला घ्यायला विसरलेच बघा, एक डाव माफी द्या ना प्लीज! :P

अद्द्या नवीन

यशोतैचे वय साधारणपणे ४० च्या आसपास असावे आणि स्रुजातै , रेवतीआक्का , पिलीयन रायडर :- तीघीही गृहीणी साधारण ५० च्या पुढच्या >>>> मरेगा . भाई तू मरेगा . . =]]

स्पा नवीन

बर्याच लोकांना पाहिलेलं आहे तसे प्रत्यक्ष आणि फेबु वर, बाकी काही ID ग्यानोबाचे पैजार : ६० च्या पुढचे, धोतर , कापली टिळा, पांढरी बंडी, शांत व्यक्तिमत्व पिरा : दामिनी मधल्या प्रतीक्षा लोणकर टाईप लुक एस ओर्फ स्व्याप : ३५ शी दरम्यान कचकून स्थूल , टिपिकल आयटी पर्सन संक्षी / विठा : ४५-५० च्या दरम्यान , उंच व्यक्तिमत्व, बर्यापैकी केस गेलेले , धारदार नाक, कदाचित चष्मा, घारे डोळे आनंद मोरे : ४० च्या आसपास , मध्यम उंची, स्थूल , गौर वर्णीय :) अजून आठवतील तसे लिहितो

ज्ञानोबाचे पैजार नवीन

In reply to by स्पा

मी साठीच्या पुढचा का रे? धोतर आणि कपाळाला टिळा? थांब भेटलास की बघतोच तुला स्पांडुरंग स्पांडुरंग पैजारबुवा,

Anand More नवीन

In reply to by स्पा

"स्थूल" काय, "गीता पे हाथ रखकर कसम बिसम" खाऊन मगंच लिहा असा तुमचा आणि मिपाचा करार आहे की माझ्या राशोमोन सिरीजवरचा हा राग आहे?

सनईचौघडा नवीन

जाता ना तुला बरोबर घेवुन जातो गं पै तै. नाही तरी मला मस्तानी आणि तुला च्या वसुल करायचाय की. आणि गुरुजींकडून आपण शांती करवुन घेवु है कि नै. अवखळ पम्या

पैसा नवीन

In reply to by सनईचौघडा

मला चा मिळालाय. पुणेकरानी त्याचे फटु काढून ठेवलेत. तुझ्या मस्तानीचे काय ते तू बघ. आणि पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. मला कै एवढ्यात मरायचं नाय.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by पैसा

मग काय तर.. एक तर मह्त्प्रयासाने आपला कंपु बनवायचं चाल्लय आपलं.. एका मस्तानी पाइ फुट पाडुन घेउ काय???? आणि स्रुजा लांब कॅनडात आहे असं समजु नकोस.. येतेच आहे ती.. ठार मारेल ठार!

पिलीयन रायडर नवीन

In reply to by सनईचौघडा

अवखळ??????? मी पन्नशीची गृहीणी न तु अवखळ???? बाद्वे... पुण्यात आलास तर सांगुन ठेवते.. मला आईस्क्रीम फार आवडतं.

सनईचौघडा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

जय देवी जय देवी जय पिरातै आईस्क्रीम खायची तुला इतकी का घाई जय देवी जय देवी || १|| मेगाबायटी प्रतिसादाने तु करिशी बोळवण विठा , संक्षी,डांगे रोज काढती आठवण जय देवी जय देवी... ||२|| वाढवले वय असता करिशी तणतण दंबुक , तोफ उडवुन दे दणादण जय देवी जय देवी....||३|| बाकीची पुरी करा रे कोणी तरी च्यायला तो अभ्या कुठे उलथला नेमका आत्ताच...

पिलीयन रायडर नवीन

In reply to by सनईचौघडा

ये ये रे.. ये ये रे पम्या.. पुण्याला आणुन... दणके घालुन पुजा बांधिन रे सोन्या.... ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ध्रू || मेगा बायटी नसते बोळवण मिपा ट्यार्पीची ठेव आठवण अभ्यास वाढव चम्या ये ये रे.. ये ये रे पम्या.. || १ || एज म्ह्णे असे जस्ट नंबर तुक्का मारला तरी कमीचा मार खुश होतील रे तर्ण्या! ये ये रे.. ये ये रे पम्या.. || २ || रेवाक्का तरी आहे प्रेमळ मी आणि स्रुजा भारी लाथाळ सांभाळुन अस रे डोम्या ये ये रे.. ये ये रे पम्या.. || ३ || (चाल :- जय देवी मंगळागौरी)

स्रुजा नवीन

In reply to by पिलीयन रायडर

वात्रट मेली. एवढी छान देवीची आरती आहे त्याचं पार भजं केलंन हिने.. कसे संसार होणार यांचे अशाने? आमची कधी हिंमत नव्हती हो असली थेरं करायची ..

बबन ताम्बे नवीन

हे गृहस्थ साधारण पंचेचाळीशीचे, गोरे, घारे, नाकावर बायफोकल चष्मा आणि डाव्या बाजूचे केस उजव्या बाजूकडे चापून चोपून वळवून टक्कल झाकायचा प्रयत्न केलेला, "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात.

चौथा कोनाडा नवीन

In reply to by बबन ताम्बे

बबन ताम्बेसाहेब, लै भारी इम्याजिनेशन ! आईशप्पत, मी येवडा भारी असेल हे बगुन मला गहिवरुन आले. Taklya आता माझा हा फुटु मी आरश्यावर लावलाय अन त्यात भांग पाडल्या बिगर कामाला जात नाय. (आमची धाव म्हण्जे भिंतीतला कोनाडा ते फारतर ओसरी पर्यंत ! पण माझी रेंज "मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " ही बघुन कुठल्यातरी विद्यापिठाची डॉक्कटरेट मिळाल्या सारखं वाटलं!)

होबासराव नवीन

"मराठी कवितेची सौंदर्य मिमांसा" ते "मोकाट कुत्र्यांच्या केकाटण्याचे जागतीक परिणाम " अशा कुठल्याही विषयावर व्याख्यान ठोकतील असे वाटतात. माफ करा हा अधिकार आलरेडि आहे एका मिपा संता (कि सांता) कडे.

सनईचौघडा नवीन

दु दु पै तै. पिरा समोर आली की मी लगेच तिच्या बाजूला जाणार आहे. >>> चालेल मी इकडची मस्तानी तिकडे फिरवीन मग पिरातै शांत होईल. नाहीतर मी संक्शी / विठा यांच्या बरोबर जातो मग तिचं लक्षच जाणार नाही गरिब बिचार्या माझ्याकडे.

प्राची अश्विनी नवीन

"अजया - पन्नाशीच्या जवळपास आलेली, लांब केस, सावळा वर्ण, गृहीणी, मुलीच्या लग्नाचे टेन्शन असलेली --हहपुवा

अजया नवीन

In reply to by कविता१९७८

अगदी बरोब्रे.एखादा मुलगा असेल तर सुचव बाई .देशस्थच हवा.मुलीच्या लग्नाचं टेन्शन मुलीच्या आईलाच :'( त्यात ती माझ्यावर आहे.लांब केस आणि सावळी =)))

पिलीयन रायडर नवीन

In reply to by अजया

मुलगा आहे बै नजरेत एक... बाशिंग बाधुन तय्यार आहे!! तुझ्या ओळखीतलाही आहे.. आता त्याला तुझी मुलगी आवडते की विनोद.. हे एकदा ठरलं की झालं!!! =))

अजया नवीन

In reply to by कविता१९७८

मासे नको. डोकं बाय डिफाॅल्ट मुलगी खाईलच. पिरे,तू माझी अट नाही वाचलीस नीट.अभक्ष्यभक्षण अपेयपानवाला नक्को.देशस्थच हवा;)आणि गृकृद. इशे,मुलींनी हुंडा घ्यायचे दिवस आता.किती घेऊ अॅडव्हाइस द्या हं.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by कविता१९७८

घोड नवरा चालत असेल तर ते अभक्ष्यभक्षण.... वगैरे अटी शिथील करा की जरा.. एक मुलगा फिट्ट बसतोय बघा अपेक्षांमध्ये.. हुंडाही मिळेल बघ!

गॅरी ट्रुमन नवीन

सनईचौघडा, यावेळी भारतात दुपार आहे म्हणजे अमेरिका/कॅनडामध्ये रात्र. अजून रेवतीताई आणि स्रुजाताईंनी हा धागा बघितलेला दिसत नाही.त्या दोघी इथे येण्यासाठी अजून काही तास थांबा.आगे आगे देखो होता है क्या :)

स्रुजा नवीन

In reply to by इशा१२३

अगो, किती जोरात ओरडतेस? किती वेळा सांगायचं गं तुम्हाला, पोरीच्या जातीला एवढा दंगा शोभत नाही हो. सकाळी पोथी असते माझी, तुझे आजोबा जातात फिरायला. तेवढ्या वेळात देवाचं नाव घेते मी , एवढं माहिती असून तेंव्हाच मेलं हाका मारायच्या जोर जोरात. तुझ्या आजोबांना ऐकु येत नाही पण माझे कान शाबुत आहेत, काय समजलीस?

रेवती नवीन

In reply to by स्रुजा

तुझे आजोबा जातात फिरायला. आईशप्पथ! त्याला आजोबा काय काका तरी म्हणेल का कोणी पुढील २० वर्षात?

सूड नवीन

न पाहिलेल्या मिपाकरांविषयी प्रतिमा: १) वल्ली/प्रचेतसः सडसडीत बांधा, चेहर्‍यावर प्राध्यापकी हावभाव, गीतगोविंदातल्या राधेचं सौंदर्य अनुभवण्यापेक्षा ते प्रक्षिप्त पात्र आहे सांगणारं व्यक्तीमत्व. २) सतिश गावडे उर्फ धन्या: खुर्चीत पुरण भरल्यासारखी सुदृढ बालक स्पर्धेत पहिला नंबर आलेली शरीरयष्टी, मानसशास्त्राचा अभ्यास करणारा गूढ गंभीर चेहरा. ३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका ४) किसन शिंदे: आनंद दिघे छाप दाढी, झब्बा आणि घाटावरची लोकं घालतात तसा ढगळ, अघळ-पघळ लेंगा, प्राथमिक शिक्षक असावे अशी देहबोली. ५) बॅटमॅनः बॅटमॅनसारखा लूक ६)टवाळ कार्टा: यत्ता दुशली ब मध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळाला असल्यासारखा आदर्श स्वभाव, शांत, मितभाषी. ७) वपाडाव: तोंडात पानाची भक्कम पिंक, डोक्यावर प्रभाकर पणशीकर छाप टोपी, तोंडातून (नको तिथे देखील) गज़लांचा पाऊस पाडणारे व्यक्तीमत्व. तूर्तास इतकेच!! या लोकांनी जर जीव घेतला नाही, तर उरलेल्यांबद्दल लिहू =))

किसन शिंदे नवीन

In reply to by सूड

३) स्पा: हिरवे डोळे, मांजरासारखे डाफरणारे हावभाव, रात्री कायापालट होऊन हरणटोळ म्हणून फिरत असावा अशी शंका
=))

तुषार काळभोर नवीन

प्रतिसादावरूनः पिरा (यांनी स्वतः वरती सांगितलंय तरी, माझा अंदाज): ३०-३५ पुणे-आयटी-लेकुरवाळी प्रचेतसः सहा फूट, डॉ खरेंसारखा फिटनेस , कार्गो पँट, कदाचित चष्मा, ३५ वर्षे खेडूतः वय ५०, साडेपाचच्या आतबाहेर उंची, किरकोळ बांधा, शर्ट-ब्यागी पँट, बारीक मिशी व चष्मा बबन तांबे: सेम अ‍ॅज खेडूत (वय ३०) डॉ सुहास म्हात्रे: राजकारणात येण्याआधीचे विनामिशी डॉ अमोल कोल्हे संदीप डांगे:३०-३५, बारीक बांधा, ५'६"-५'८" उंची, टीशर्ट-पँट अभ्या: गोरा वर्ण, ६ फूट, किरकोळ बांधा, चष्मा

पिलीयन रायडर नवीन

In reply to by विशाखा राऊत

मी म्हणतेय ३० ला २ कमी तरी हे ३०-३५ लिहीतात... दुष्ट ग बै दुष्ट्ट मिपाकर... विशु.. मला सुखात बघवत नाही का ग तुला?? आयटीत नेतेस ओढुन!!!

विशाखा राऊत नवीन

In reply to by पिलीयन रायडर

मी नाही ग.. हेच ओढत आहेत तुला आय्टीत... अजिबात येवु नकोस.. या जन्मी मस्त सुखी रहा आयटीत नाहीस हा विचार करुन ;) बाकी तु २५ची आणि काय तुला आजी करत आहेत. बंदुक कहा है तुम्हारी...

स्पा नवीन

In reply to by विशाखा राऊत

आय टी सारखे सुख या भू तळावर नाही वर्षातले ६ महिने बेंच, पाच दिवस काम (जेमतेम ) भरपूर ओनसाईट , कचकून दाबून पगार घरपोच कुल क्याब. तरी स्वताला हमाल म्हणवून घेण्यात काय सुख वाटते देवच जाणे

विशाखा राऊत नवीन

In reply to by स्पा

जागो जागो. हे सुख कुठे असते म्हणे आयटिला. कायच्या काय अफवा पसरवतो का. रिलिझसाठी दिवसरात्र मेहनत, क्लायंटच्या शिव्या, लो बजेट, मॅनेजरची मनमानी हे भी होता है बर का हमाल नाही गधेमजुरी गधेमजुरी

विशाखा राऊत नवीन

In reply to by सतिश गावडे

आयटीवाले कुल कॅब ने जातात असे स्पाने म्हटले आहे :) उगा रिक्षा म्हणुन अवमान करु नये ;)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by विशाखा राऊत

तोफ डागुन आले त्या मेल्या पम्यावर.. सोडते की काय!! ;) षोडशाच म्हणायला पाहिजे खरं तर... नै का!!

तुषार काळभोर नवीन

In reply to by पिलीयन रायडर

ते वाचलं हो... ते वाचायच्या आधीचा अंदाज सांगितला. 'तीसलादोनकमी' वाली व्यक्ती मेगाबायटी प्रतिसादाला किलोबायटी उत्तर देते, असं वाटत नाही. म्हणून माझा अंदाज ३०-३५ होता. (खरंतर ४०, पण स्त्रीदाक्षिण्य म्हणून ३० म्हणालो ;) असो. हघ्याहेवेसांनल.

पिलीयन रायडर नवीन

In reply to by तुषार काळभोर

इथुन पुढे मी फक्त वन लायनर आणि लाईट मुड मधलेच प्रतिसाद देणार बै...!

पियुशा नवीन

In reply to by तुषार काळभोर

काय पण पैलवान तुमचा अंदाज सपशेल चुकलाय बर का ? धाग्या कर्त्याने अचुक बान्धलाय अंदाज ;) ( पिरा आइ भागो भागो ........)

पिलीयन रायडर नवीन

In reply to by पियुशा

गप ग.. मी ६१ चं कसं बस ३० वर आणलय.. आणि आता थोड्याच वेळात १६ पण पटवीन... ;) तू बाकी काही आठवणी काढु नकोस..!!

अभ्या.. नवीन

In reply to by तुषार काळभोर

चष्मा...???? नाय वो अजून. ६ फूटाला २ इंच कमी फक्त. किरकोळ बांधा....८२ किलोला किरकोळ म्हणतेत व्हय? जिमची बाडी हाय म्हाराजा. गोरा...............इल्ले. मिडलक्लास कलर बघा. आणि ते पेन पेन्शील खेळत नाही ब्वा कधी. कवातरी सही करायलालागतो तेव्हाच वापरतो. बाकी नाही. एका जागी बसत नाहीहे मात्र खरे . ;) कुणीतरी माझ्या ह्याण्डसमपणाचे कौतुक करा रे बघितलेल्यांनी. ;)