✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Sun, 01/31/2016 - 19:53  ·  लेख
लेख
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल(च्च!) तर(च्च!) क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे...(एतदर्थ:- स्पष्ट व्हावे.) स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना जाण्याची गरज नेमकी का भासली ? त्याज्ज्य्य नवर्‍याने यावर काय भुमीका घ्यावी ? आपल्याला याबद्दल काय वाटते ? मला असे वाटते की - मी जर गृहस्थ असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर गृहस्थ नसलो तर घरच्याच काय तर कुठल्याच स्वयंपाकचौथर्‍यावर जाण्याचे कारणंच काय ????????????????????????????? (असतील तर..) सुज्ञ नवर्‍यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.... ==================================================== स्वयंपाकघरात मदतीसाठी घुसणार्‍या..परंतू ("तुम्हाला या विषयातले काय कळते???" "व्हा तिकडे!!! ..चा प्या आनी गप पडा!" .. "मेलं मटार नै सोलता येत ..आणे चाल्ले पावभाजी करायला!" ) इत्यादी (दुत्त दुत्त !)बायकूचे तेव्हढेच दू दू दू बोल ऐकून वतागलेला :- ताजा नवरा:- आत्मू स्वयंबंद!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
पाकक्रिया
इतिहास
बालकथा
बालगीत
विडंबन
शुद्धलेखन
राहणी
औषधोपचार
भूगोल
देशांतर
राहती जागा
मौजमजा
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
शुभेच्छा
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
35717 वाचन

💬 प्रतिसाद (123)

प्रतिक्रिया

द्यावा द्यावा

अजया
Sun, 01/31/2016 - 20:01 नवीन
जिथे जिथे बायको जात असेल तिथे तिथे नव-यांना येऊ द्या. आमचा पुरुषांना फुल सपोर्ट आहे. आपलं एक निवेदन देऊन टाकू मिपाकरांच्या वतीने. हाय काय अन नाय काय ? -खाऊ(नव-याच्या हातचे)चिरोटे
  • Log in or register to post comments

झाड पकडून बसले आहे पॉपकॉर्न

पियुशा
Sun, 01/31/2016 - 20:13 नवीन
झाड पकडून बसले आहे पॉपकॉर्न बरोबर कुरकुरे प्लिज ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सरकून घे जरा तिकडे. मीपण आलेय

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 20:20 नवीन
सरकून घे जरा तिकडे. मीपण आलेय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

यावे यावे झाड आपलंच आसा :)

पियुशा
Sun, 01/31/2016 - 20:24 नवीन
यावे यावे झाड आपलंच आसा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मी पण आले गं मिपाबायकांनो. हे

स्रुजा
Sun, 01/31/2016 - 20:29 नवीन
मी पण आले गं मिपाबायकांनो. हे बघ मी एक कॅरॅमल पॉकॉ, एक चीझी पॉकॉ असं काय काय आणलंय. आणि बुवा, येऊ द्या की स्वैपाक चौथर्‍यावर पुरुषांना.. तिथेच राहिलेत तरी चालतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं?

अजया
Sun, 01/31/2016 - 20:34 नवीन
नुसतेच पाॅकाॅ आणलेस का गं? बाकी काय आणि किती आणायचं ते पण ज्ञान देणारा धागा आहे ना मिपावर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

लोल.. पण मिपाबायकांनी फक्त

स्रुजा
Sun, 01/31/2016 - 20:37 नवीन
लोल.. पण मिपाबायकांनी फक्त पॉकॉ आणायचे ना? संस्कृती बुडली बिडली म्हणजे मंग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

संस्कृती हुशार आहे! लाईफ

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 20:40 नवीन
संस्कृती हुशार आहे! लाईफ जॅकेट घालेल ती! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

नवर्याने स्वैपाक केला तरी

अजया
Sun, 01/31/2016 - 20:43 नवीन
नवर्याने स्वैपाक केला तरी बुडतेच ती मेली.मग एकदाच काय ते तिला उरकून टाकू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

पण मग ती बुडली याचा ठपका

इशा१२३
Sun, 01/31/2016 - 21:12 नवीन
पण मग ती बुडली याचा ठपका पुरषांवर येइल बरका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मस्त! आणारे पॉपकॉर्न ...

उगा काहितरीच
Sun, 01/31/2016 - 20:03 नवीन
मस्त! आणारे पॉपकॉर्न ...
  • Log in or register to post comments

पे रणा 'डब्बल' का झाली या

एस
Sun, 01/31/2016 - 20:07 नवीन
पे रणा 'डब्बल' का झाली या प्रश्नाच्या शोधात.
  • Log in or register to post comments

छ्या. पुर्वीचं मिपा आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 01/31/2016 - 20:23 नवीन
छ्या. पुर्वीचं मिपा आणि पुर्वीचे मिपा राहिले नाही.
  • Log in or register to post comments

जळजळीत आहे पण सत्य आहे.

प्रचेतस
Sun, 01/31/2016 - 20:32 नवीन
जळजळीत आहे पण सत्य आहे. नवऱ्याच्या हाती फ़क्त पिशव्या उचलून कांदे बटाटे आणण्याचे काम उरले आहे असे वाटते. आमच्या एका मित्रांचा मला परवा फोन आला होता. आमच्याशी बोलता बोलता ते भाजीवाल्याशी बटाट्यांबद्दल काहीतरी घासाघीस करत होते. बाकी आज पावभाजी दिसत्ये. :(
  • Log in or register to post comments

तुमाला पावभाजी खायला बोलावले

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 20:35 नवीन
तुमाला पावभाजी खायला बोलावले नाई का? मग तुम्ही मयूरची पावभाजी खाऊन या :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आम्ही नेमके हापिसात अडकलोय ना

प्रचेतस
Sun, 01/31/2016 - 20:43 नवीन
आम्ही नेमके हापिसात अडकलोय ना. नायतर पावभाजी काय सोडतो की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पावभाजी जबरा होती.

सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 22:51 नवीन
पावभाजी जबरा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/31/2016 - 23:09 नवीन
ढन्यवाद ढणाजी.. , उर्फ गावडे सर.. आपण आलात पण ते तुमच्या वरचे सर नै आले. :-/ ते कंदी येनार??? :-/ दुत्त दुत्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुमचेही धन्यवाद हो...

सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 23:17 नवीन
आज गंगा उलटी वाहीली. आपल्या पोथ्या-पुराणांमध्ये "घरी अमुक तमुक पुजा घालून त्या पुजा सांगणार्‍या पुरोहीतास साबुदाणा खिचडी खाऊ घालून तृप्त करावे" अशा टाईपचे उल्लेख असतात. आमच्या भाळी आज अलभ्य लाभ होता. चक्क एका पुरोहीताच्या घरी माझ्यासारखा देव-धर्माचं काही करत नसलेला माणूस स्वादिष्ट पाव-भाजी खाऊन तृप्त झाला. सामाजिक अभिसरण का काय म्हणतात ते हेच असावे काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

व्वाह व्वा!!! काय त्ये अभि

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/01/2016 - 08:00 नवीन
व्वाह व्वा!!! काय त्ये अभि-सरण! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अरे वाह !! पोथ्यापुराणात

सूड
Mon, 02/01/2016 - 14:19 नवीन
अरे वाह !! पोथ्यापुराणात कथेचा शेवट गोड असतो तसं झालं म्हणायचं!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तुम्हास काय म्हणावयाचे आहे ते

सतिश गावडे
Mon, 02/01/2016 - 15:17 नवीन
तुम्हास काय म्हणावयाचे आहे ते अस्मादिकांस नेमके कळले आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गावडे सर

नाखु
Tue, 02/02/2016 - 08:31 नवीन
भाग्यवान आहेत असे सांगुन मी माझे दोन शब्द संपवतो. नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय. सूडच्या बोलण्याचा नेमका

सतिश गावडे
Tue, 02/02/2016 - 08:46 नवीन
होय. सूडच्या बोलण्याचा नेमका मतितार्थ कळण्याईतपत मला आकलनक्षमता आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नाखुकाका, सगळंच सगळ्यांना

सूड
Tue, 02/02/2016 - 13:59 नवीन
नाखुकाका, सगळंच सगळ्यांना कळलं पाह्यजे असंच थोडं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

च्यामारी! आज माजघरात बळेच

एस
Sun, 01/31/2016 - 20:44 नवीन
च्यामारी! आज माजघरात बळेच घुसून कोशिंबिर बनवली तर कोणालाच आवडली नाही...! परत बनवू नका अशी ताकीद घेऊन दिवाणखान्यात माघार घ्यावी लागली!
  • Log in or register to post comments

हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती

त्रिवेणी
Sun, 01/31/2016 - 20:44 नवीन
हो द्यावा प्रवेश. नाहीतर ती असहिस्नुटा मानली जाते. मी तर अगदी भाजी aananya पासून चे swatrant दिलाय नावर्याला. भाजी आणणे,ऑफिस मधून येताना दलणाचा डा daba आणणे ही सर्व काम सोपवलीत त्याच्याकड़े म्हणजे उगा तो स्वयंपाक करतो तेव्हा तू भाजी खराबच आणलिस,पीठ जाड़च daley असे काही ऐकावे लागत नाही मला.
  • Log in or register to post comments

:)

अजया
Sun, 01/31/2016 - 20:46 नवीन
त्रिवेणीने त्रिवार सत्य सांगितले आहे.
  • Log in or register to post comments

'नवरी' चं अनेक् वचनही नवर्

खेडूत
Sun, 01/31/2016 - 20:48 नवीन
'नवरी' चं अनेक् वचनही नवर्‍यां होत असल्यानं गुर्जींना नक्की काय म्हणायचंय या विचारात पडलो पण वाचल्यावर खुलासा झाला! (म्हणजे प्रथम्दर्शनी शीर्षकात ''बायकांना प्रवेश द्यावा काय?'' असाही अर्थ निघाला)
  • Log in or register to post comments

झक्कास खुसखुशीत प्रतिसाद...

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 20:55 नवीन
झक्कास खुसखुशीत प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

गुर्जी, तुम्हांला साधं मटार

यशोधरा
Sun, 01/31/2016 - 20:55 नवीन
गुर्जी, तुम्हांला साधं मटार पण नै सोलता येत?
  • Log in or register to post comments

मुळीच देऊ नये....

साती
Sun, 01/31/2016 - 20:56 नवीन
काही पाककृती या अनुभवावर तयार झालेल्या असतात... त्यात बदल करणे पोटाला घातकच ठरते... मुळात अनेक पाककृती या अगदी अनप्रेडिक्टेबल आहेत व त्यांना चुकीच्या पद्धतीने अॅप्रोच झाल्यास हटकून पित्त, अपचनाचा त्रास होतोच... आपल्या धर्मात पुरुषांसाठी शय्यागृह, न्हाणीघर, दिवाणखान्यात टिव्हीसमोर कोचावर, मिनीबारसमोर वगैरे अनेक सौम्य हक्काची स्थाने आहेत. त्यांना सोडून या कडक स्थानाचा हट्ट धरणे अनावश्यक आहे... -- साती विवाहीत!
  • Log in or register to post comments

ऑ पेरणा आमचीच दिसते? ;)

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 20:57 नवीन
ऑ पेरणा आमचीच दिसते? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ!

साती
Sun, 01/31/2016 - 21:01 नवीन
आपल्या घरातील प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळ्या चवी, गुणधर्म, वैशिष्ट्ये, प्रादेशिकता यांचे प्रतिनिधित्व करतो आणि जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर पार्सल ऑर्डर करणेच शहाणपणाचे आहेत. मी स्वतः याबाबत अनेक अनुभवांतून गेले आहे (सेकंडहँड -म्हणजे नवरा स्वयंपाकघरात शिरल्याने) आणि त्यातूनच सांगते की वर उल्लेख केलेली सौम्य स्थाने या सर्वांसाठी अतिशय स्यूटेबल आहेत. कारण नसताना अवघड वाटेवर जाऊ नये हा कळकळीचा सल्ला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अगागागा...

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 21:02 नवीन
अगागागा... आम्ही ऑफलाईन होऊ का आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

:)

साती
Sun, 01/31/2016 - 21:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

मुळात इथले पाकशास्त्र हे

अजया
Sun, 01/31/2016 - 21:10 नवीन
मुळात इथले पाकशास्त्र हे मिपाशेफ लोकांच्या पाकसूत्रावर आधारीत आहे की ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे: "तुम्ही ज्या पदार्थाचे ध्यान करता तसे तुम्ही बनवत जाता." मग आता सांगा की एखाद्या संसारी पुरुषाने असा हट्ट धरण्याचे कारण काय? मुळात अनेक पुरुष स्वयंपाकघराच्या चौथर्यावर जातात ते पण चुकीच्या समजुती ठेवून जातात. स्वयंपाकाचा पाॅझिटिव्ह इफेक्ट मिळवायचा तर तो मनापासून आपल्या चुका मान्य करून पुढे स्वयंपाक करणे सुधारणे यातूनच होतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

आज काय मीच बिचारा सापडलो का

विजय पुरोहित
Sun, 01/31/2016 - 21:12 नवीन
आज काय मीच बिचारा सापडलो का तुम्हाला? द्या द्या द्या नवलेखकूचा बळी... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

मस्तं!

साती
Sun, 01/31/2016 - 21:14 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कुणीतरी ते ढकलपत्र टाका

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 20:58 नवीन
कुणीतरी ते ढकलपत्र टाका वॉट्सप वालं टणाटणी थेअरीत बुचकाळलेलं....
  • Log in or register to post comments

वहिणीनि तुम्हाला लग्न

त्रिवेणी
Sun, 01/31/2016 - 21:00 नवीन
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.
  • Log in or register to post comments

वहिणीनि तुम्हाला लग्न

त्रिवेणी
Sun, 01/31/2016 - 21:00 नवीन
वहिणीनि तुम्हाला लग्न thartana विचारले नाही का, तुम्हाला स्वयंपाक येतो की नाही असा? मला नावर्याने मी विचार्याच्या आधीच सांगितले होते, मला पोळी सोडून बऱ्यापैकी स्वयंपाक येतो असे.मी शिकवल्या आता त्याला पोळी karyala.
  • Log in or register to post comments

रांधा वाढा उष्टी काढा यांची असमानता!

साती
Sun, 01/31/2016 - 21:19 नवीन
रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आंदोलन! काय मिळणार हे करुन? असो.मी पाॅपकाॅर्न घेऊन वरच्या फांदीवर जाऊन बसते कशी! -- सातया!
  • Log in or register to post comments

=)))

अजया
Sun, 01/31/2016 - 21:30 नवीन
नियम आणि discrimination यात फरक आहे.. चप्पल न घालता जाणे ह नियम असु शकतो, ज्यात स्वच्छता राखणे हा हेतु दिसतो. पण नव-यांनी स्वयंपाकघराच्या चौथर्यावर येऊ नये हे discrimination आहे.. परंपरा एका गटासाठी अन्यायकारक असतील तरीही मोडण्याचे कारण दिसत नाही ?? -माळ जपरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

सध्या वादातीत असलेल्या,

संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 22:51 नवीन
सध्या वादातीत असलेल्या, पुरुषाने केलेल्या स्वयंपाकघर पदार्पणाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय.... सविस्तर माहिती अशी---- स्वयंपाकघर हे घर नसून प्रयोगशाळा आहे त्याला पाकगृह असे म्हणतात. पाकगृहातून बाहेर पडणारे व्यंजनं पुरुषांसाठी घातक असतात, कारण पाकविज्ञाना मध्ये काही सुगरणी विशिष्ट प्रकारची व्यंजने करपावर्तीत करत असतात, मुळात पुरुषांची शारीरिक ठेवण व्यंजने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, हॉटेलच्या भटारखान्या मध्ये स्त्रियांना ही प्रवेश नाही, अगदी साधं उदाहरण, गणपती ड्याण्स पुरुष करतात, कधी स्त्रीला गणपती ड्याण्स करतांना पाहिलंय कां? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे स्त्रियांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे. स्त्रियांच्या मनात गणपती ड्याण्सचा जन्म होत नाही, बेफिकिर नाचण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, म्हणून ते ड्याण्स करतात. आणि ह्या नृत्य शक्तिवरच पाकगृहच्या व्यंजनांचा प्रभाव पडतो. जसं गाईचं दुध चांगलच, पण दारूच्या नशेत ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शरिरातल्या दारूचा होय. दारू-मटन खाल्यावर आपण देवळात जात नाही, कारण आपले शरिर त्या वेळी तो आरती करायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला आरती घेऊ देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला आरती द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?) रच्याकने अजयातै, तुम्ही सुगरण की करपण? नाही काय आहे ना पुढील चर्चा त्याच अनुषंगाने पुढे नेता येईल. (अर्थात तुमची इच्छा असेल तरच!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

=)))) उगा काहीतरीच!!!

अजया
Mon, 02/01/2016 - 08:26 नवीन
=)))) उगा काहीतरीच!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

काय हे साती ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/31/2016 - 21:29 नवीन
>>>>>>रांधा, वाढा , उष्टी काढा यांतली असमानता दूर करण्याचे आन्दोलन काय हे डॉक्टर ! अजूनही ज्यांना अभिव्यक्त होण्यासाठी कोनाड्याची गरज भासते तेव्हा समानतेच्या गोष्टी अश्यक्य वाटतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

अय्यो!

साती
Sun, 01/31/2016 - 21:44 नवीन
स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश करण्यास आंदोलन करणार्‍या पुरूषांना अभिव्यव्यक्त व्हायला 'आटापिटा' नावाचा कोनाडा आला का शेवटी? दिसलाच नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग्गो बाई :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/31/2016 - 21:53 नवीन
आन्दोलन कोनाला करावं लागतं जे डॉमिनेट आहे ते आणि त्यांना ? आम्हीही आमचा कोनाडा करूच ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

संपले का नव्याचे नऊ दिवस ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/31/2016 - 21:22 नवीन
मला वाटलं काही हटके अनुभव सांगता की काय ? ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा