चित्रमहर्षी श्री. श्रीधर केळकर ह्यांच्या चित्रकला प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण कट्टा....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
18 Jan 2016 - 11:04 am

आम्ही तसे फिरस्ते.पायाला चक्रच आहे म्हणाना.तर असेच आम्ही बायकोच्या पदराला धरून कल्याण नामक तालुका गावांत फिरत असतांना, आम्हाला ह्या चित्रकला प्रदर्शनाची माहिती समजली.(आता आम्हाला चित्रकला, फोटोग्राफी इ.कलांत कितपत गम्य आहे हे मिपाकरांना नव्याने सांगायला नकोच.)

तसे केळकर गुरुजींचे नांव आम्ही ऐकून आहोत.(आमच्या सारख्या चित्रकलेतील "नर्मदेच्या गोट्यापर्यंत" केळकर गुरुजींच्या कले बाबत माहिती पोहोचली, ह्यातच काय ते ओळखण्यात मिपाकर समर्थ आहेत.)

तसे आम्ही नास्तिक, पण त्याचबरोबर बर्‍यापैकी आध्यात्मिक...त्यामुळे "जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी द्यावे", ह्या उक्तीप्रमाणे, ही बातमी आपल्या पर्यंत पोहोचवीत आहे.ह्या निमित्ताने एखादा जोरदार कट्टा पण होवून जाईल.ह्या कट्ट्याच्या निमित्ताने कल्याणला पण कट्टा होवू शकतो, हे पण मिपाकरांना समजेल.

आता नमनाला इतके टंकनश्रम पुरे झाले. आता कट्ट्याविषयी.

तारीख : २४ जानेवारी.

वार : रविवार

वेळ : संध्याकाळी बरोब्बर ६ वाजता.प्रदर्शनाची वेळ संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे.केळकर बहूदा वेळेच्या बाबतीत काटेकोर असावेत, असा अंदाज आहे.त्यामुळे आपल्याला पण वेळ पाळणे, अत्यंत आवश्यक आहे.

ठिकाण : केळकर कलादालन, केळकर सदन, नमस्कार मंडळाजवळ, आग्रा रोड कल्याण(प.)

हे प्रदर्शन जरी विनामुल्य असले तरी, कल्याण मधील मिपाकरांनी, आमच्यासारख्या अ-कल्याणवासीय मिपाकरांसाठी, कल्याणचा सुप्रसिद्ध "खिडकी वडा" आणलात तर फार उत्तम.

आम्ही डायरेक्ट प्रदर्शनाच्या ठिकाणीच भेटू.

मला मुलाखत घ्यायला जमत नाही, त्यामुळे आपल्यापैकी कुणी जर केळकर गुरुजींची मुलाखत घ्यायला तयार असेल तर, तशी व्यवस्था करण्यात येईल.

स्थिरचित्रबातमी

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Jan 2016 - 10:58 am | मुक्त विहारि

परवा श्री.केळकर ह्यांना भेटायला गेलो होतो.जवळपास १ तास मनसोक्त गप्पा झाल्या.त्यांनी सांगीतलेल्या माहितीनुसार....

१. प्रदर्शन आणि उद्घाटन वेळेवर सुरु होते.

२. प्रदर्शनातील, चित्रांचे फोटो काढायला बंदी आहे.

अगम्य's picture

20 Jan 2016 - 2:46 pm | अगम्य

हे केळकर गुरुजी छत्रपती शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक होते का?

खिडकी वडा कोल्लापुरात पण मिळू लागला होता. एवढा काय वेगळा नाय वाटला ...

मुक्त विहारि's picture

22 Jan 2016 - 11:01 am | मुक्त विहारि

हा नियमच आहे...

"कोल्लापुरी मिसळ" ह्या नावाने बर्‍याच गावी ती (ह्या पदार्थाला मिसळ तरी कसे म्हणावे? केवळ तिखटाचे प्रमाण वाढवल्याने, कुठलाही पदार्थ "कोल्लापुरी" होत नाही.) विकली जाते. पण ती खरोखरच तशी नसते.

कल्याण मधील खिडकी-वडा, तरी ह्या नियमाला अपवाद कसा असेल?

खिडकी-वड्याची चव घेण्यासाठी कल्याणलाच जावे लागते.

असंका's picture

23 Jan 2016 - 5:56 pm | असंका

-))

कट्टप्पा's picture

24 Jan 2016 - 8:57 pm | कट्टप्पा

झाला का कट्टा?

ते जाऊ देत, तुम्ही बाहुबलीला का मारलंत ते सांगा की!!

मुक्त विहारि's picture

25 Jan 2016 - 10:38 am | मुक्त विहारि

सगळीच चित्र अप्रतिम....

चित्रांचे फोटो काढण्यास मनाई असल्याने, चित्रांचे फोटो काढले नाहीत.(आमच्यासाठी, तसे बरेच झाआमच्यासाठी,आमच्या कॅमेराचा लेन्स (सेन्स) झाकला गेला.)

चित्रांची किंमत १५००/- ते ७०००/- रुपयांपर्यंत आहे.

(प्रदर्शन तर फक्त निमित्तमात्र होते.खिडकीवड्याची चव अद्याप जीभेवर आहे.)

कट्ट्याचा वृत्तांत पण येऊ द्या !!

चंबा मुतनाळ's picture

21 Feb 2016 - 10:55 am | चंबा मुतनाळ

आत्ता श्रीधरदादाच्या घरी आलो आहे, त्याची चिकाटीची दाद देण्यासारखी आहे, ह्या वयात पण पेंटींग्स काढायची धमक आहे

अगम्य's picture

22 Feb 2016 - 2:44 am | अगम्य

ते छत्रपति शिक्षण मंडळाच्या शाळेत (नूतन विद्यालय?) शिक्षक (बहुतेक मुख्याध्यापक) होते का?