छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल
नमस्कार मंडळी,
छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.
तृतीय क्रमांक मिळाला आहे, पॉइंट ब्लँक यांच्या कर्नाटकातील मद्दूर येथे टिपलेल्या भातशेतीच्या छायाचित्राला.
द्वितीय क्रमांक मिळाला आहे बोका यांच्या मध्य प्रदेशातील एका खेड्यात सुरू असलेली शेतीची कामे या छायाचित्राला.
अन प्रथम क्रमांक मिळाला आहे मार्मिक गोडसे यांच्या तळपत्या उन्हात कांद्याला पाणी देणार्या शेतकर्याच्या छायाचित्राला.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन.
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की आगामी छायाचित्रण कला स्पर्धा मिपाकर सर्वसाक्षी आयोजित करणार आहेत.
In reply to अभिनंदन! नवीन फॉरमॅट आवडला. by एस
In reply to +१ हेच म्हणतो..आणि तो तसाच by अत्रुप्त आत्मा
जाहीरपणे मतदान करायचे नसल्यास साहित्य संपादक या आयडीला संदेशाद्वारे मत पाठवू शकता.अशा गुप्त मतदानाची गरज वाटत नाही.
ते ड्रोन प्रकरण काय आहे?Quadcopter (ड्रोन) हे रिमोटने हवेत उडवता येते व त्यातील बिल्टइन कॅमेराने विडीओ शूटिंग किंवा स्टील फोटोग्राफी करता येते. जेथे आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही तेथे ह्याचा उपयोग करता येतो. उदा: तळ्याचा टॉप व्ह्यू. मी वापरत असलेल्या Quadcopter बद्दल अधिक माहीती येथे मिळेल. मी काढलेल्या वरील फोटोविषयी माहीती. शेतात पाणी असल्याने व्यवस्थीत कोन मिळवायला शेतात उभे रहायला योग्य जागा मिळत नव्हती, माझ्याकडील DSLR कॅमेराने फोटो काढताना शेतकरी, शेत व सुर्य फ्रेममध्ये बसत नव्हते. Quadcopterमुळे मला हवा असलेला व्ह्यू. मिळाला. फिक्स लेन्स व फिक्स अपेर्चर असल्यामुळे Quadcopter ने फोटो काढताना मर्यादा येतात.
In reply to ते ड्रोन प्रकरण काय आहे? by मार्मिक गोडसे
In reply to अमेझॉनवर शोधले by पैसा
In reply to थोडेसे विषयांतर by स्वच्छंदी_मनोज
In reply to अमेझॉनवर शोधले by पैसा
पण यांना सर्रास परवानगी असते का?अधिकृत परवानगी सध्यातरी मिळत नाही. १५ जानेवरी २०१६ ला सरकारचे सुरक्षेच्या दॄष्टिने ड्रोन संबंधीत धोरण जाहीर होइल. गाडीच्या लायसन्स सारखे ड्रोनला लायसन्स मिळाले पाहीजे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भागात संबंधीत पोलिस स्टेशनची परवानगी घ्यावी लागली तर अडचणीचे ठरेल.
गुप्तहेरगिरीसाठी वगैरे फारच सोयोस्कर प्रकरण दिसते आहे.दुर्देवाने हे सहज शक्य आहे. ड्रोन उडवायला सरकारने बंदी घालायचे ठरवीले तरी हे तंत्रज्ञान आता इतके प्रगत झाले आहे की त्यावर देखरेख करणे सोपे नाही.
क्र.१ पहाटे चिपळूण रेल्वे स्थानकाबाहेरील हे द्रुश्य. - मिनियन
क्र. ३ रत्नागिरी मधील पारंपारीक शेती - नन्दादीप
क्र. ४ इंटरनॅशनल क्राॅप रीसर्च सेंटर, हैदराबाद, पाटणचेरु - कविता१९७८
क्र. ६ राजुरी येथील द्राक्षबाग - त्रिवेणी
क्र. ८ सावडव ता. मालवण येथे भात शेतीची लावण करताना - संजय पाटिल
क्र. ९ विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली भातशेती - श्रीरंग_जोशी 
क्र. १० भात-लावणी/ पेरणी - अजिंक्य विश्वास
क्र. ११ पुणे-कराड रस्त्यात मन मोहुन टाकणारी झेंडुच्या फुलांची शेती - मोहन
क्र. १२ डहाणू येथील एक आंब्याची बाग - माम्लेदारचा पन्खा
क्र. १३ कर्नाटकातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील उळवी जवळच्या एका खेड्यातील पिकुन कापणीला आलेली भातशेती - प्रीत-मोहर
क्र. १४ महाबळेश्वर नजिकच्या एका खेड्यातील शेत - सर्वसाक्षी
क्र. १५ श्रावणात कोकणात भटकंती करत असताना.. - मी_देव
स्पर्धेची नवी पद्धत आवडल्याचे कळविल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. या व इतर स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत असेल.
- साहित्य संपादक
अभिनंदन! नवीन फॉरमॅट आवडला.