फुलराणी...

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
22 Nov 2007 - 12:52 am

इवलिशी कळी
दवांत निजली..
चिंबचिंब भिजली
लाजेत थिजली...

पाहूनी तिजला
भ्रमर सावळा
आळवित जाई
राग आगळा....

प्रेम तिजवर
जडले तयाचे
नियम त्याने
मोडले जगाचे...

रूणझुण त्याची
वेड लावती
गंधित होई
वेडी कळी ती..

लाल गुलाबी
रंग कोठला
केशरी अबोली
अंतरी दाटला...

फुलविण्या तिला
झपाटला तो
सुंदर फूल हे
म्हणतो जो तो...

राजकुमारी..ती.
येई हासत
फुलांस त्या मग
नेई सोबत...

भ्रमराची त्या
मग प्रेमकहाणी
फुला विना त्या
झाली विराणी

बागेमधूनी
शोधित त्या फुला
फिरतो वेडा
भ्रमर एकला.. भ्रमर एकला....

- प्राजु.

कविताविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Nov 2007 - 1:26 am | विसोबा खेचर

प्राजू,

छानच कविता केली आहेस, आवडली.

पाहूनी तिजला
भ्रमर सावळा
आळवित जाई
राग आगळा....

क्या बात है! इवल्याश्या कळीला पाहून तो भ्रमर कोणता बरं राग आळवत असेल? :)

प्रेम तिजवर
जडले तयाचे
नियम त्याने
मोडले जगाचे...

ओहोहो, खल्लास! साला प्यार किया तो डरना क्या? :)

लाल गुलाबी
रंग कोठला
केशरी अबोली
अंतरी दाटला...

सुरेख!

फुलविण्या तिला
झपाटला तो
सुंदर फूल हे
म्हणतो जो तो...

हे कडवं आवडलं नाही. चालीत नीट बसणार नाही असं वाटतं. शिवाय 'झपाटला' हा शब्द खटकला बुवा!

भ्रमराची त्या
मग प्रेमकहाणी
फुला विना त्या
झाली विराणी

बागेमधूनी
शोधित त्या फुला
फिरतो वेडा
भ्रमर एकला.. भ्रमर एकला....

चला, म्हणजे भल्या सकाळच्या दवातल्या 'ललत'ने सुरू झालेली कहाणी शेवटी संध्याकाळच्या पुरीयाधनश्रीवर संपली म्हणायची! असं व्हायला नको होतं! :)

असो!

आपला,
(रागदारीतला) तात्या.

लबाड मुलगा's picture

20 Dec 2007 - 5:57 pm | लबाड मुलगा

छान वाटले

पक्या

सुधीर कांदळकर's picture

27 Dec 2007 - 7:18 pm | सुधीर कांदळकर

पुढील कवितेची वाट पहात आहे.

पुष्कर's picture

28 Dec 2007 - 9:57 am | पुष्कर

सुंदर कविता
आहे तुमची
उडती लय अन्
लघु-शब्दांची

वाचून सारे
शब्दांमधले
डोळ्यांपुढती
उभे राहिले

जाता जाता एक आगाऊ सल्ला- कविता करता करता ती ठेक्यावर म्हणून बघा. म्हणजे ती आपोआप छंदोबद्ध होईल. म्हणजे मग चाल लावायला/चालीवर म्हणायला सोपी!

असो, पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

-पुष्कर

स्वाती राजेश's picture

29 Dec 2007 - 11:48 pm | स्वाती राजेश

इवलिशी कळी
दवांत निजली..
चिंबचिंब भिजली
लाजेत थिजली...

सुंदर वर्णन केले आहेस...

या ओळी वरुन,
हिरवे हिरवे गार गालीचे.. ही कवीता आठवली.

प्राजु's picture

30 Dec 2007 - 7:55 am | प्राजु

तात्या, पक्या, सुधिर, पुष्कर आणि स्वाती.. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

पुष्कर,
आपला सल्ला लक्षात ठेवेन.
धन्यवाद.
- प्राजु.