२-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
21 Dec 2015 - 2:59 pm
गाभा: 

सध्या वेळ व्यवस्थापन विषयक धागा मालिका चालू केलेली आहे त्यातील पहिली चर्चा उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही) (दुवा: http://www.misalpav.com/node/34159) सध्या चालूच आहे त्या चालू चर्चेला अजून २-४ दिवस फारस डिस्टर्ब न करता ह्या विषयावरील चर्चाही समांतर चालू राहू शकेल या अदमासाने हा विषय हातात घेतो आहे.

काही जणांना काही विशीष्ट प्रसंगी तर बर्‍याच जणांना कोणत्याही प्रसंगी २-५-१०-१५ मिनीटे एकट्याने थांबण्याचा/ वेळ काढण्याचा प्रसंग -इथे एकटेच म्हणजे आपल्याशी वेव्हेलेंथ जुळणारी व्यक्ती सोबत नसणे एवढेच- आलातर कळत नकळत बरीच अस्वस्थता अँक्झायटी होत असावी.

मला व्यक्तीशः रेल्वे स्टेशनवर रेल्वेचे वाट पहाताना, आणि पुरेशा ओळखी पाळखी नसलेल्या (लग्नादी) समारंभात एकटे थांबावे लागण्याच्या कल्पनेने जरासे अस्वस्थ वाटत असे पण 'प्रसंगाचा मनात काल्पनिक सराव' करण्याची ट्रिक जेव्हा पासून कळाली आणि जमली तेव्हा पासून मला असे प्रसंग सोपे होऊन गेले, हे असे जमणे कदाचित मला सोपे गेले असेल कारण इतर कोणत्याही प्रसंगी २-५-१०-१५ मिनीटे गरजेनुसार थांबण्या एवढा धीर नेहमीच असे. नैसर्गीकपणे असा धीर बाळगणारी बरीच मंडळी एकतर अनोळखी ठिकाणी मिसळण्याचे कौशल्य बाळगतात, किंवा भोवताली काय चालू आहे याचे शांतपणे निरी़क्षण आणि अस्वाद घेत असतात, किवा माझ्यासारखे काही अ‍ॅनालिटीकल विषयावर वेळ मिळाला की एखाद्या विषयावर मनातल्या मनात निवांत रवंथ करु शकतात (नंतर एखाद्या व्यक्ती सोबत अपॉइंटमेंट असेल तर मी त्यांच्याशी काय आणि कशी चर्चा करणार आहे याची मनातल्या मनात जुळवा जुळव करण्यात हा वेळ उपयोगात आणतो), इतर काही मंडळी तेवढा वेळही काही सदुपयोगी कामात उपयोगात आणण्यात यशस्वी होतात, काही मंडळी कुणातरी ओळखीच्या जमेल त्या व्यक्तीस भरीस पाडून सोबत घेऊन जातात पण हि भरीस पाडून नेणारी मंडळी खर्‍या अर्थाने एकटे थांबण्याने अस्वस्थ होणार्‍या कॅटेगरीतील असावीत, अर्थात तेच नेमके ह्या बद्दल सांगू शकतील.

अस्वस्थ होणारी मंडळी अशी एकटे थांबण्याची वेळ आलीच आणि भरीला पाडून कुणाला सोबत नेणे शक्यही नसेल तर विवीध पद्धतीने रिस्पाँड होताना दिसतात त्यातील काही मंडळी मुद्दाम उशीराने पोहोचण्याचा विचार करत असावित, तर काही मंडळी पोहोचण्याच्या वेळा पाळतात पण जिथे जातील तेथे आपल्याकडेच आधी लक्ष द्यावे म्हणून बरेच आग्रही- बर्‍याचदा इतरांना अस्वस्थ वाटेल अशा प्रमाणात- राहताना दिसतात. अस्वस्थ होणारी काही मंडळी एखादे व्यसन बाळगून हा वेळ साजरा करतात अथवा आवश्यकता नसताना काही तरी खाऊनही हा वेळ बरेच जण साजरा करतात, हातातला केवळ वेळ घालवण्यासाठी मी सुद्धा सटर फटर चरण्याचा प्रकार करतो पण शरीरयष्टी सडसडीत असल्याने स्थुल माणसांपेक्षा प्रकृतीमानास असे सटरफटर चघळणे सहज झेपून जाते पण स्थुलतेची टेंडंसी असलेल्यांना त्यांचे अशा प्रसंगी चर्वण प्रकृती अस्वास्थ्यास कारणीभूतही होऊ शकत असेल.

वेल, तुम्ही ऑफीशीअल व्हिजीटवर आहात, रिसेप्शनवर तुम्हाला थांबवून ठेवले असेल तर मी माझ्या सिनीयर्सकडून जे बाळकडू घेतले त्यानुसार रिसेप्शनवर आपला परिचय आणि काम सांगितल्यानंतर रिसेप्शनीस्ट आत बोलून तुम्हाला पाच-दहा मिनीटे वाट पहाण्यास सांगत असेल तर ते पाच किंवा दहा मिनीट -सांगितले आहेत तेवढेच- अगदी इतर काहीही न करता म्हणजे की स्वतःची डायरी-मोबाईल अथवा तिथली वाचनीय मासिके असे काहीही न हाताळता शांतपणे बसून रहावे (अन्यथा रिसेप्शनीस्ट तुमच्याकडे अधिक वेळ आहे समजून तुम्हाला सांगितलेली ५-१० मिनीटांची वेळ कॅज्युअली घेऊ शकते) आणि सांगितलेली नेमकी मिनीटे झाल्या नंतर रिसेप्शनीस्टला स्मरण द्यावे म्हणजे तुम्ही तिथे तेवढ्याच कामासाठी आला आहात असे इम्प्रेशन तयार होण्यास मदत होते. अर्थात बरीच मंडळी या ५-१० मिनीटात अस्वस्थ होतात काहीतरी करावयास घेतात आणि रिसेप्शनवरची व्यक्ती त्यांना दिलेली वेळ अधिक कॅज्युअलपणे घेते. मग ही मंडळी अजून अस्वस्थ होतात.

रिसेप्शनवर रिसेप्शनीस्टने दिलेल्या वेळात आत सोडले नाही तर तुम्ही भेटावयास आलेली व्यक्ती सोबत त्यांचा स्टाफ आहे का बाहेरची व्यक्ती असे कुणी आहे का आणि त्यांना ती भेट चालु होऊन किती वेळ झाला आहे हे विचारून घेणे श्रेयस्कर असावे कारण त्यावरुन रिसेप्शनीस्टने ५-१० मिनीटे सांगितली तरी प्रत्यक्षात किती वेळ लागेल याचा बर्‍यापैकी अंदाज येतो. रिसेप्शनीस्टने १५ मिनीटांपेक्षा अधिक वेळ सांगितला असेल आणि तुमच्याकडे तसा वेळ असेल तरीही दहा मिनीटात आसपासचे काम करून येतो असे सांगून बरोबर दहा मिनीटांनी तेथे वापस जावे म्हणजे तुम्ही दिलेल्या वेळा आग्रहीपणे पाळता याचे स्वाभाविक दडपण निर्माण होण्यास मदत होउ शकते.

या धागा लेखातील सर्व माझे व्यक्तीगत अनुभव आणि ऑब्झर्वेशन ज्यातले काही चुकीचेही किंवा काही परिस्थितीत लागू पडणार नाही असेही असू शकेल.

या विषयावर सर्वांचे आपापले अनुभव अडचणी आणि त्यांनी आपापल्या अडचणींवर मात करण्यासाठी काढलेले मार्ग स्मजून घेणे हा या धागा लेख चर्चेचा उद्देश आहे. चर्चेत सक्रीय सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार

प्रतिक्रिया

आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.

आपल्याला थांबावे लागणार आहेच याची अपेक्षा असल्याने त्रास वगैरे होत नाही.किती वेळ थांबायचे हे ठरवतो आणि त्यानंतर चालू पडतो.ज्याबाजूस काम आहे तिकडची आणखी तीनचार कामे घेऊन जायची एकतरी नक्की होते.वाट पाहताना मोबाइल फार कामाशी येतो.त्यात छप्पन गोष्टी करता येतातच.नेट रेंज नसेलतरी गेम खेळता येतात.निघण्याअगोदर पाच दहा पेपरातले वेगवेगळे लेख,बातम्या सेव करतो त्या तिथे वाचत बसायच्या.प्रवासात फार उपयोगी कारण हल्ली रेंज नसली तरी चार्जर पॅाइंट्स असतात बॅटरी उतरत नाही.अगदी काहीच नसले तर एखादे सांपल शोधून बोलते करायचे.

संदीप डांगे's picture

21 Dec 2015 - 5:16 pm | संदीप डांगे

मस्त लेख, आवडला, और आने दो. आजकाल असं दैनंदीन व्यवहारात उपयोगी फार कमी वाचायला मिळतं बॉ!