उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
19 Dec 2015 - 10:44 am
गाभा: 

हा धागा केवळ सातत्याने उशीरहोणार्‍यांना त्यांची भूमिका ज्येनुआईनली समजून घेण्यासाठी आहे, या धागा लेखाचा उद्देश मुळीच सर्कॅझम अथवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टिका नाही. वेळ व्यवस्थापना बद्दल मी वेगळा धागा काढणार आहे त्यामुळे तोपर्यंत टिका सर्कॅझम अथवा वेळ व्यवस्थापना बद्दल चर्चा करू इच्छिणार्‍यांनी येथूनच रजा घेतल्यास आभारी राहीन.

वेळ व्यवस्थापनाबद्दल मी व्यक्तीशहा आग्रही असलो तरीही युअ‍ॅप्टीट्यूड म्हणजे दुसर्‍यांची ज्येनूआईन भूमिका अडचण समजून घेणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बद्दलही मी तेवढाच आग्रही असतो.

आजच्या आर्थीक ताणतणावाच्या जगात मानवाला यंत्रवत जगावे लागते, पण म्हणून माणूस काही यंत्र नाही, वेळ ही कदाचित माणसांनी त्यांच्या सोईच जग तयार करण्यासाठी केलेली निव्वळ मिथ असेल, वेळेत उशीर करणार्‍या व्यक्तींना त्यांचा स्पेस हवा असू शकतो. जशी वेगवेगळ्या रंगरुपाची शरीरयष्टीची माणसे असतात तसच आपल्या आपल्या वेळेनुसार वागण हेही कदाचित नैसर्गीक असू शकेल. कदाचित एखादी न आवडणारी गोष्ट इतरांच्या मर्जीसाठी, किंवा कसल्यातरी अपरिहार्यतेने करावी लागते तेव्हा त्या गोष्टीचे निटसे पालन होत नाही. उशीर होणार्‍यांना मनातून गिल्टी वाटत नसतानाही जोर जबरदस्तीने आणि/अथवा अपरिहार्यतेने गिल्टी फिलींग झाल्याची बतावणी करावी लागणे त्यातुन होणारी कुचंबणा एक वस्तुनिष्ठ सत्य असू शकते.

तर उशीरहोणार्‍यांनो, हा धागा निव्वळ आणि निव्वळ तुमच्या ज्येनुआईन, अडचणी, भूमिका ज्या इतर कुणी समजून घेत नाही त्या आपापसात चर्चा करण्यासाठी समजून घेण्यासाठीच आहे. तुमची कारणे कितीही जेन्युआईन असली तरी इतर मंडळी समजून घेऊ शकतीलच असे नाही त्यामुळे मन मोकळे करताना गरजे नुसार टोपणनावे आणि डुआयडींचा जरुर उपयोग करावा.

वेळ व्यवस्थापनवादी मंडळींनी या धागा कोनाड्यापुरते उशीर होणार्‍या मंडळीना आणि असा चर्चा विषय मांडल्याबद्दल मला माफकरुन या धागा लेखातील चर्चेत मनमोकळे करणार्‍या मंडळींना मोठ्या मनाने आपल्या क्षमाशिलतेचा परिचय देऊन मौन बाळगावे झेपल्यास काढता पाय घ्यावा आणि अगदीच तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावयाचे असल्यास वेगळ्या धागा लेखातून आमच्या या धागा लेखाचे अगदी विडंबनही करावे परंतु कसेही करून या धागालेखचर्चेची कृपया सँक्टीटी जपण्यासाठी मदत करावी.

तर उशीरहोणार्‍यांनो, हि धागाचर्चा आपापल्या भूमिका मनमोकळेपणाने मांडण्यासाठी तुमचे मनमोकळेपणाने स्वागत करत आहे, चर्चेतील आपल्या मनमोकळ्या सक्रीय सहभागासाठी आभारी आहे. चर्चेस सुरवात सोपी जावी म्हणुन "मला आत्ता/आज/मागचा उशीर का कशात आणि कशामुळे झाला याचे माझे ज्येनुआईन कारण" हा विषय देतो आहे.

अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

फक्त पोच देतो,नायतर अवांतर टाळुन सविस्तर प्रतिसाद दिला असता पण गावाला जायला उशिर होईल;-)

माहितगार's picture

19 Dec 2015 - 11:55 am | माहितगार

जेपीदादा धागा वेळेवर जाणार्‍यांसाठी नै हो ! :)

अद्द्या's picture

19 Dec 2015 - 11:13 am | अद्द्या

उशिरा उठलो . त्यामुळे उशीर झाला .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2015 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं कॉलेज ९ वाजता असतं. बायोमेट्रीकला कार्ड ९ वाजताच दाखवायचं असतं. मी आवरतोही वेळेच्या आत पण मी गाडीत बसेपर्यंत दोन कारणांनी वेळ होतो एक तर पेपर हेडलाइन वाचता वाचता मी बातमीचा तपशील वाचण्यात गुंतुन जातो किंवा अशात ते वाट्सपची उत्तर लिहिण्यात वेळ जातो आणि मग मला उशीर होतो, अजून एक, कधी कधी मलाच जाऊ द्या वेळेवर कशाला जायचं असंही वाटतं त्यामुळे मी तयार असूनही महाविद्यालयात वेळेवर पोहोचत नाही. अशात जो पर्यंत प्राचार्य साहेब मला बोलत नाही, तो पर्यंत मी वेळेवर पोहोचत नाही. प्राचार्य साहेब बोलले की मी आठेक दिवस वेळेवर जातो. पण यापुढे मी वेळेवर महाविद्यालयात पोहचत जाईन किमान प्रयत्न करीन.

-दिलीप बिरुटे

अद्द्या's picture

19 Dec 2015 - 11:24 am | अद्द्या

हाहाहा
"पेपर हेडलाइन वाचता वाचता मी बातमीचा तपशील वाचण्यात गुंतुन जातो"
यापेक्षा जेन्युइन कारण असूच शकत नाही

कंजूस's picture

19 Dec 2015 - 11:43 am | कंजूस

"धागालेखचर्चेची कृपया सँक्टीटी जपण्यासाठी मदत करावी."

मिपाधोरणानुसार कोणताही जड विषय हलका करण्यासाठी दोनचार पौडफाटापोश्टाच्यापेटीतटाकण्यालायक प्रतिसाद खपवून घ्यावेत ही विनंती.कमीतकमी "काम्माला जाइला उश्शीर जायला वाट बगतो रिक्शावाला" हे गाणे तरी टाकावे.

माहितगार's picture

19 Dec 2015 - 11:52 am | माहितगार

कंजूसरावजी
"धागालेखचर्चेची कृपया सँक्टीटी जपण्यासाठी मदत करावी."
खरंच सांगायचतर हे वाक्य आणि हा लेख लिहिण्याच काम मलाही अंमळ जड अंत:करणाने करावे लागले हे कृपया समजून घ्यावे :) जड विषय हलका करण्यासाठी अनुषंगिक अवांतरांना मोकळीक आहेच की पण या विषयात आपल्याला काय गावलं ते आम्हाला समलं नाय बगा :)

माहितगार's picture

19 Dec 2015 - 11:53 am | माहितगार

पण या विषयात आपल्याला "जड" काय गावलं ते आम्हाला समलं नाय बगा :)

वेळेवर हजर होणे हेच जड जातं बहुतेकांना.काही गायकश्रेष्ठींना तर कार्यक्रम आपल्यामुळे खोळंबला आहे याची चाडही नसते,उशिर का झाला हे सांगणे दूरचीच गोष्ट.असो.एखादा किस्सा सांगेन.जिथे उशिरा जाण्याने आपलं नुकसान होऊ शकतं तिथे मात्र उशिरकर बरोब्बर पोहोचतात हे विशेष.
मला वाटतं माझं विषयालासोडून होतंय.

माहितगार's picture

19 Dec 2015 - 9:10 pm | माहितगार

चार-सहा दिवसांनी वेगळा धागा लेख काढेन तुर्तास उशीर होणार्‍यांना त्यांची बाजू मुक्तपणे मांडू द्यात.

मला क्लिनिकला जायला नेहमी उशीर होतो.बाहेर ताटकळत बसलेले पेशंट बघून ओशाळवाणं हसून मी कामाला सुरुवात करते.
आता कारणं! पर्समध्ये अनेक गोष्टीत गाडीची चावी असते. ती नेमकी निघतानाच काही काळ अदृश्य होणे!
चालत निघालं तर गाववाल्यांनी थांबवुन का निघाल्या चालत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दहावीत असताना ट्रीटमेंट केलेल्या बाल्याच्या बाल्याचे दात कसे किरले हे ऐकून घ्यावे लागतेच ;)मग उशीर होतो.
व्हाॅट्स अॅपवर काहीतरी खंग्री वाद सुरु होतो.नजर टाकते म्हणताना त्यात दोन चार काड्या साराव्याश्या वाटल्याने उशीर होतो!
क्लिनिकच्या बाहेरच गाडी लावता लावता माहेरपणाला आलेली जुनी पेशंट भेटते.मग तिचे सासरचे हालहवाल न ऐकता कसे जाणार? उशीर होतो!
निघायच्या वेळात आईचा इमोशनल ब्लॅकमेलिंगचा फोन येतो.तिला मी आज फोन का करु शकले नाही हे ऐकून घेताना तमाम नातेवाईकांच्या खबरा ऐकून घ्याव्या लागतात.नंतर बोलते म्हणून पळून जायची अजून बिशाद नाही! झाला उशीर!
मिपावर रेव्हरंडा गुरुद्येवा कोणालातरी चुका दाखवत आहेत.त्या नेमक्या निघण्याआधी वाचायला घेतल्या ! संपलाच मग विषय!
सारांश फोन,मिपा आणि गाडी यांच्यामुळे उशीर होतो.माझ्यामुळे नाही;)
वर दिलेली सर्व कारणे खरी आहेत.अवांतर नाही!!

वगिश's picture

19 Dec 2015 - 1:05 pm | वगिश

मला नेहमी उशीर तर hotoch ,शिवाय लवकर उठून avarale कि ajun खूप वेळ आहे निघायला म्हणून मी पापर वाचायला बसतो aani नेहमी पेक्षा jast उशीर होतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2015 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पापरं हेच उशीरा पोहचण्याचं मुख्य कारण आहे.

-दिलीप बिरुटे
(पापरांचा नाद असलेला)

जव्हेरगंज's picture

19 Dec 2015 - 7:18 pm | जव्हेरगंज

चुकून कधी लवकर निघालोच तर अॉकवर्ड वाटतं. म्हणजे एवढ्या लवकर जाऊन करायचं काय? मग वेळ घालवण्यासाठी साधनं कमी आहेत काय? निवांतपणे नाष्टा करणे हे एक कारण आहेच. मग होतो ऊशीर. रोजच.

चुकून कधी लवकर निघालोच तर अॉकवर्ड वाटतं.

निघताना ऑकवर्ड होत का आपण आधी पोहोचल्या नंतर इतर कुणी ओळखीचे येईपर्यंत एकटे असू म्हणू ऑकवर्ड होते, आपण आधी पोहोचल्या नंतर एकटे असू आणि हा एकटे थांबण्याचा वेळ घालवणे कठीण जाते का ? आपणच आधी पोहोचलो तर हातात उरलेला वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडतो ? या पैकी एखादी स्थिती उशीर करणार्‍यांमध्ये कुणा कुणाची असते ?

संदीप डांगे's picture

19 Dec 2015 - 8:18 pm | संदीप डांगे

पूर्वी मी अमिताभ बच्चन होतो आता राजेश खन्ना आहे. इसको जमानाच कारणीभूत आहे... मी नाही.

माहितगार's picture

19 Dec 2015 - 8:46 pm | माहितगार

अमिताभ बच्चन होतो आता राजेश खन्ना

डांगेसाहेब जरा इस्कटून सांगाकी - (हिंदी चित्रपट कमीत कमी पहाणारा माहितगार)

संदीप डांगे's picture

19 Dec 2015 - 9:40 pm | संदीप डांगे

दोघेही सेटवर येण्याची वेळ पाळण्याबद्दल प्रसिद्ध आहेत/होते. पैकी बिगबी वेळेआधी हजर असतात. आजही...

सुबोध खरे's picture

19 Dec 2015 - 8:38 pm | सुबोध खरे

पूर्वी माझा दवाखाना सकाळी ८ ला उघडत असे. उपाशी पोटी सोनोग्राफी करायला येणाऱ्या लोकांच्या सोयीपायी. परंतु ८ ला कोणीच उगवत नसे म्हणून वेळ साडे आठ ची केली आहे तरीही साडे आठ ला कोणी येत नाही. मी साडे बाराला दवाखाना बंद करतो हे माहित असल्याने लोक धावत पळत त्यागोदर येतात.
भेटीची वेळ(APPOINTMENT) ठरवून लोक वेळेत येत नाहीत आणी उशिरा आल्यावर मात्र आमची APPOINTMENT होती म्हणून इतरांच्या अगोदर त्यांना घेतले पाहिजे अशी अपेक्षा असे. यामुळे मी APPOINTMENT देणेच सोडून दिले.
लष्करात असल्याने दिलेली वेळ म्हणजे वेळ हि शिस्त आहे त्यामुळे एशियन हार्ट मध्ये BIOMETRIC यायच्या अगोदरहि मी आठ म्हणजे आठच्या ठोक्याला हजर होत असे त्यामुळे BIOMETRIC आल्याने लोकांची तारांबळ झाली मला काहीच फरक पडला नाही.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशीर करणारे बरेच लोक भोंगळ असतात. विमान किंवा गाडी पकडायची असेल तर झक्कत वेळेवर कसे पोहोचतात? मग हीच साधी शिस्त आपल्या रोजच्या जीवनात का बाणवता येत नाही? कधी तरी अपरिहार्य कारणासाठी उशीर होणे समजू शकतो.
IST हा INDIAN STRETCHABLE TIME का झाला आहे? इंग्रजांच्या नको त्या सवयी उचलल्या पण वक्तशीरपणा का उचलला नाही?

विमान किंवा गाडी पकडायची असेल तर झक्कत वेळेवर कसे पोहोचतात?

उशीर होणार्‍यांनो ह्या वाक्याच्या वस्तुनिष्ठते बद्दल दुजोरा देऊ इछिता का ?

बाकी विवादात सहभागी होणे तुर्तास टाळावे मी त्यासाठी चार सहा दिवसाम्नी वेगळा धागा काढणार आहे, हा धागा उशीर होणार्‍यांची बाजू ऐकण्यासाठी सॉर्ट ऑफ राखीव.

तुषार काळभोर's picture

19 Dec 2015 - 9:45 pm | तुषार काळभोर

वक्तशीरपणाबद्दल मीही खूप आग्रही असतो, विशेषतः औपचारिक/अधिकृत प्रसंगांसाठी (कामाच्या ठिकाणी पोहचणे इ.). अनौपचारिक प्रसंगातही एका हाताच्या बोटावर मोजणे शक्य होईल, याच्यापेक्षा जास्त (मला स्वतःला) उशीर होणे, मला मानवत नाही. कंपनीची बस माझ्या स्टॉपवर येण्याची अधिकॄत वेळ सकाळी ७.२८ आहे. मी नेहमीच त्याआधी हजर राहतो. बस ७.३० च्या आधी कधीही येत नाही, तरीही मी ७.२८ च्या आधी हजर राहतो. (जर कधी घरातून निघताना वाटले, की त्या वेळेत नाही पोचणार, तर मी सरळ स्वतःची गाडी घेऊन जातो). माझ्या स्टॉपवर अजून दोघे असतात. ते जर ७.३२-७.३३ ला आले व बस निघून गेलेली असेल तर, ते ड्रायवरशी हुज्जत घालतात की आज वेळेआधी कसा गेलास? रोज ७.३५ला येतो, आज ७.३० ला कसा आलास. (!!). ड्रायवर दुर्लक्ष करतो. मी एकदाच समजावण्याचा प्रयत्न केला पण ते अशकय असल्याचे (मास्तरांना भाजपच्या चुका पटवणं/नाना-हितेस-आदी मंडळींना भाजपची चांगली कामे पटवणं जस शक्य नाही तसं) लक्षात आल्यावर तो नाद कायमचा सोडला. पुढच्या स्टॉपवर एकजण आहे, तो आठवड्यात एकदा तरी (आधीच उशीरा येणार्‍या बससाठी सुद्धा) उशीरा येतो. मग १-२ मिनिटासाठी का होईना पण सर्वांचा खोळंबा होतो. जर कधी इतरांनी ड्रायवरला बस थांबवायला विरोध केला, तर तो सर्वांशी वाद घालतो- एखादा मिनिट थांबायला काय होत्ं?

अडचणी समजावून घेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण उशीर होणे ही बर्‍याचदा 'अडचण' नसून ती 'मनोवृत्ती' असते. ९ च्या ऑफीसला ५-१० मिनिटे उशीर करणारी माणसे ऑफीसची वेळ १० केली, तरी ५-१० मिनीटे उशीर करतील. (हे सरसकटीकरण वाटेल, पण बहुतेक हे असंच असतं. विदा मागणार्‍यांनी पौड फाट्यावर यावे. दुर्गाची कोल्डकॉफी पाजण्यात येईल.)

माहितगार's picture

19 Dec 2015 - 9:49 pm | माहितगार

अडचण' की 'मनोवृत्ती' जे असेल ते त्यांना त्यांची बाजू मांडण्यास चार-सहा मन-मोकळे दिवस द्या की मालक !

आनंदी गोपाळ's picture

20 Dec 2015 - 7:58 pm | आनंदी गोपाळ

इंग्रजांच्या नको त्या सवयी उचलल्या पण वक्तशीरपणा का उचलला नाही?

उत्तर : वक्तशीरपणा ही नको ती सवय नाही म्हणून.

वेल्लाभट's picture

21 Dec 2015 - 12:18 pm | वेल्लाभट

लोल !

चांदणे संदीप's picture

19 Dec 2015 - 9:20 pm | चांदणे संदीप

जरा डोक्याला ताण देऊन काल-परवापर्यंतच आठवून पाहिल की मला उशीर का झालेला...

लेटेस्टेस्टपासून पाठीमागच्या वारांकडे जायला सुरूवात करतो :

१) शुक्रवार = उशीरा उठलो.

२) गुरूवार = मोबल्यात अल्लाराम लावलेला व तो वाजलाही पण मीच पटकन बंद करून परत झोपल्याने पुन्हा लवकर जाग नाही आली.

३) बुधवार = झोपेतून उठल्यावर घड्याळात बघितले तर सव्वानऊ वाजलेले!! परत सगळी घाई आणि शेवटी उशीर!

४) मंगळवार = आदल्या दिवशी ऑफिसातन घरी यायला रात्रीचे दीड वाजलेले. मग सांगा, सकाळी कशी लवकर जाग येईल??

५) सोमवार = वेळेत उठलो, वेळेत आवरल, वेळेत ऑफिसला निघालो. दारातून बाहेर पडणार इतक्यात पाठीमागून आवाज आला, "ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको! तुला वाग खातो!" मग झाला उशीर! काय करणार?

क्रं. १ ते क्रं ४ टाळता येतीलही पण ५ नाही टाळता येणार मला!

Sandy

चांदणे संदीप's picture

19 Dec 2015 - 9:21 pm | चांदणे संदीप

जरा डोक्याला ताण देऊन काल-परवापर्यंतच आठवून पाहिल की मला उशीर का झालेला...

लेटेस्टेस्टपासून पाठीमागच्या वारांकडे जायला सुरूवात करतो :

१) शुक्रवार = उशीरा उठलो.

२) गुरूवार = मोबल्यात अल्लाराम लावलेला व तो वाजलाही पण मीच पटकन बंद करून परत झोपल्याने पुन्हा लवकर जाग नाही आली.

३) बुधवार = झोपेतून उठल्यावर घड्याळात बघितले तर सव्वानऊ वाजलेले!! परत सगळी घाई आणि शेवटी उशीर!

४) मंगळवार = आदल्या दिवशी ऑफिसातन घरी यायला रात्रीचे दीड वाजलेले. मग सांगा, सकाळी कशी लवकर जाग येईल??

५) सोमवार = वेळेत उठलो, वेळेत आवरल, वेळेत ऑफिसला निघालो. दारातून बाहेर पडणार इतक्यात पाठीमागून आवाज आला, "ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको! तुला वाग खातो!" मग झाला उशीर! काय करणार?

क्रं. १ ते क्रं ४ टाळता येतीलही पण ५ नाही टाळता येणार मला!

Sandy

"ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको! तुला वाग खातो!" >> कस्लं गोड! :)

"ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको! तुला वाग खातो!"

हेहेहेहे कसलं भारी. कसलं गोड.
बादवे आज एका मिपाकराशी फोनवर बोलत असताना त्याच्या लाडक्या पर्‍यांची इतकी मस्त किलबिल एकू येत होती की पूछो मत.
साला, ह्यासाठी तरी संसार हवाच. :)

तुषार काळभोर's picture

19 Dec 2015 - 10:27 pm | तुषार काळभोर

येग्झ्याक्टली!! हे अनुभवल्याशिवाय नाही कळत.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Dec 2015 - 10:12 pm | अनिरुद्ध.वैद्य

ए बाबा, तू ऑपिशला ज्यावू नको! तुला वाग खातो!
>>

फारच गोड!

क्र. ५ एकदम मस्त! होऊ दे उशीर..........

कंजूस's picture

19 Dec 2015 - 9:33 pm | कंजूस

खरा किस्सा:-
आपल्या प्रसिद्ध मिपाकराच्यावतीने लिहितो.मुक्तविहारि आणि मी कुठेतरी जाण्याचे ठरले.रेझर्वेशन माझ्याकडे .गाडी निघायची वेळ झाली तरी दिसले नाहीत.ऐनवेळी डब्यात आले अन गाडी सुटली.
"काय झालं?"
" थांबा,दम खाऊन सांगतो."
"?"
कुत्री आहे, तिला सकाळी फिरवून आणल्याशिवाय सकाळचा कार्यक्रम होत नाही आणि दुसरं घरात कोणी नाही.आज नेमका वेळ लावला तिनं."

माहितगार's picture

19 Dec 2015 - 9:45 pm | माहितगार

खिक =))

सौन्दर्य's picture

19 Dec 2015 - 10:40 pm | सौन्दर्य

१) "इतक्या लवकर ऑफिसला जाऊन काय कचरा काढायचा आहे का ?"

२) "अहो, तो काल लागलेला घरातून कधी दहाच्या आधी निघालेला पाहिला नाही, मग तुम्ही का ९.३० ला वेळेवर पोहोचायचा अट्टाहास करता ?"

३) "अहो साहेब ना तुम्ही, मग एक दिवस उशीर झाला तर काय कंपनी बुडणार आहे का ?"

४) "संध्याकाळी वेळेवर ऑफिसमधून निघता का कधी ? मग जाताना झाला मेला कधी थोडा उशीर तर काय फाशी होणार का ?"

५) "जास्त बसल्याचा ओव्हरटाईम मिळतो का ? मग थोडा उशीर झाला तर काय पगार कापणार का लगेच ?"

६) "मी सांगते तुम्हाला, लग्नाच्या हॉलवर अजून कोणीही पोहोचले नसणार, मग तुम्हीच का इतकी घाई करताहात ?"

ह्या व अश्या अनेक निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांना कंटाळून मुद्दाम उशिरा जातो.

माहितगार's picture

19 Dec 2015 - 10:48 pm | माहितगार

रोचक! उशीर होण्यात जोडीदार, कुटूंबीय, आणि मीत्रपरीवाराचा रोल या बद्द्ल अजूनही मोकळेपणाने येऊ द्यात मंडळी

अभ्या..'s picture

19 Dec 2015 - 10:48 pm | अभ्या..

म्या खरंखुरं सांगतो.
मला सकाळी घरातून निघूच वाटत नाही लौकर. एकदा बाहेर पडलो की घरी लौकर जाऊ सुध्दा वाटत नाही.
आंघोळ पांघोळ उरकायला उशीर लागतो हे खरे कारण.

संदीप डांगे's picture

19 Dec 2015 - 11:18 pm | संदीप डांगे

झेरॉक्क्ष.... आक्षी.

एस's picture

20 Dec 2015 - 4:17 pm | एस

उशीर ही एक भ्रामक कल्पना आहे. वेळ आणि स्थान ह्या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. तस्मात्, उशीर का झाला असे विचारणार्‍याच्या तोंडावर आम्ही 'कुठून आलास रे!'-छाप कटाक्ष फेकतो व चहा प्यायला जातो. विचारणार्‍याला तिथेच टाकून वा कधीकधी त्यालापण आमच्यात घेऊन. बिल हीदेखील आमच्या लेखी भ्रामक संकल्पना असल्याने ते चुकते करण्याचे सत्कार्यही त्याच्याच गळ्यात मारले जाते! ;-)

माहितगार's picture

20 Dec 2015 - 6:22 pm | माहितगार

!!..

माहितगार's picture

20 Dec 2015 - 6:23 pm | माहितगार

!!..

नाखु's picture

21 Dec 2015 - 9:59 am | नाखु

सहमती,

उशीर हा आपल्याकडून झाला तर ओळंबा* असतो !!
दुसर्याकडून झाला तर (अर्थातच)खोळंबा असतो !!

ओळंबा = माझेच बरोबर फेम.

ही चारोळी यमके गुर्जीं चरणी उशीराने टाकीत आहे.

नाखु's picture

21 Dec 2015 - 9:59 am | नाखु

सहमती,

उशीर हा आपल्याकडून झाला तर ओळंबा* असतो !!
दुसर्याकडून झाला तर (अर्थातच)खोळंबा असतो !!

ओळंबा = माझेच बरोबर फेम.

ही चारोळी यमके गुर्जीं चरणी उशीराने टाकीत आहे.

बरेचदा वक्तशीरपणाचे प्रदर्श केले जाते पण कधीकधी सॉलीड उशीर होतो आणि "मग आधी का बढाया मारल्यात?" अशा अर्थाने पहात असलेल्या चेहर्‍यांना काय उत्तर द्यायचं कळत नाही. मागे एकदा प्रचंड उशीर झाला होता ती शेवटची वेळ म्हणजे मिपाकरीण प्राजुकडे बोलावते असताना भयानक उशीर झाला होता. त्यानंतर व त्याआधी असा उशीर झाला नव्हता. कारण देत नाही पण चूक आमचीच होती.
मगाशीच संदर्भाचा एक कागद एका फायलीतून काढून नवर्‍याला देत होते. कागद घेणे व समोरच्याला देणे या कार्यात फोन जुन्या फोटूंनी दगा केला. मुलाच्या लहानपणीचे दोन वेगवेगळे फोटू फायलीत होते. मग "अय्य्याऽऽऽऽ हे फोटू हिते आहेत होय! आँ................" वगैरे बोलत बसले. दोन तीन मिटांनी नवर्‍याने वाट बघून कागद आधी देण्याबद्दल सुचवले. असा उशीर होतो. माझी चूक नव्हती. ;)

मला लग्नाला जायला नेहमी उशीर होतो.. नाहीतरी जाऊन करायचं काय म्हणा? समोरचा काय तुम्ही अक्षता टाकताय का हे बघायला नसतो. जेवताय की नाही हे मात्र जातीने बघतो. सबब जेवायला जावे. अक्षता काय कोणीही टाकेल :D

पिलीयन रायडर's picture

21 Dec 2015 - 12:44 pm | पिलीयन रायडर

मी निघण्याच्या आधी करायची कामे बघते. त्याला लागणारा वेळ बॅक कॅल्क्युलेट करते आणि तेवढाच वेळ हाताशी राहिला आहे अशी वेळ येईस्तोवर टाईमपास करते.. झोप काढते.. काहिही करते पण कामं करत नाही!!! मग अर्थात प्लानिंग चुकुन उशीर होतो.

नीलमोहर's picture

21 Dec 2015 - 1:40 pm | नीलमोहर

सेम टू सेम !
फक्त माझी निघण्याच्या आधी करायची कामे संपली तरी ऐनवेळी इतर वाढीव कामं आठवतात,
मग ती करेपर्यंत उशीर होतो ;)
बाकी सर्व ठिकाणी वेळेवर, वेळेआधी पोहोचते,
ऑफिसला मात्र मी उशीर अजिबात करत नाही, उशीर 'होतो'

माहितगार's picture

21 Dec 2015 - 1:57 pm | माहितगार

...तरी ऐनवेळी इतर वाढीव कामं आठवतात,

ऐन ऐत्यावेळी हातातली प्रिऑरिटी सोडून अचानक इतर वाढीव कामं करणारी मंडळी पाहिलीएत बर्‍याचदा त्यांच्या बाबतीत असं का होत ? जसे की ऑफीसला जाणे मनातून आवडत नसणे असे काही होते का ?

नीलमोहर's picture

21 Dec 2015 - 2:27 pm | नीलमोहर

मनाचं काहीतरी प्रोग्रॅमिंगच झालेलं असतं बहुधा तसं, निवांत बसलेले असतांना ही महत्वाची कामं आठवत नाहीत,
घाईच्या वेळी एकेक लक्षात येतं.

ऑफिसला जाणे मनातून आवडत असणारे खरे नशिबवान लोक,
मला माझं काम आवडतं, ऑफिसबद्दल आता काहीच वाटत नाही.. न्यूट्रल..

अगम्य's picture

21 Dec 2015 - 1:13 pm | अगम्य

आशावाद हे एक कारण असू शकते.
http://www.thescienceworld.com/science-says-if-you-are-an-optimist-youll...

माहितगार's picture

21 Dec 2015 - 1:53 pm | माहितगार

रोचक ! तुर्तास रुमाल अंथरुन ठेवतो ;)

अगम्य's picture

21 Dec 2015 - 1:14 pm | अगम्य

आशावाद हे एक कारण असू शकते.
http://www.thescienceworld.com/science-says-if-you-are-an-optimist-youll...

मी ऑफिस ला कायम वेळेवर पोचतो . .

९.३० चा 'इन' चा पंच कायम ९.४५ लाच करतो . . का माहिती नाही .. पण सकाळी ६ ला उठलो तरी तेवढा वेळ होतोच.
लवकर उठलोय म्हणून मग काही तरी वाचत बसतो , मांजराशी खेळत बसतो . कुठली तरी सिरियल राहिलेली असते रात्री झोपताना. तेव्हा एक एपिसोड संपवू म्हणत पुढचेहि एपिसोड लागत जातात ..
मग ९.२५ चा अलार्म वाजला कि लक्षात येतं . कि अरे. .आज पण उशीर झाला .

शाळा/कॉलेज/डब्बे नाश्त्यांना होणारे उशीर, रात्रीच्या जागरणांचे परिणाम इत्यादी वालेही लोक आहेत का कुणी ?

मराठी कथालेखक's picture

21 Dec 2015 - 4:55 pm | मराठी कथालेखक

मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे येण्या-जाण्याच्या लवचिक वेळा असतात त्यामूळे रोज उशीरा जातो किंवा वेळेवर जातो असं काहीच म्हणता येणार नाही. पण सकाळीच मिटींग वगैरे लागली असेल तर वेळेवर जातो, मिटींगला सहसा उशीर करत नाही.
त्यापुर्वी कधी काळी उत्पादन कंपनीत काम करत असताना धावत पळत कसेही करुन ८:३५ च्या आधी कार्ड स्वाईप करायचोच. पुढे त्याच ठिकाणी काम करताना आमच्या कंपनीसाठीची (मी दुसरर्‍या पेरोल वर होतो) काही नियम्/धोरणे बदलली, मग स्वाईपिंग ही फक्त औपचारिकता उरली हे लक्षात आल्यावर ९-९:१५...म्हणजे नियम असल्याशिवाय शिस्त नाही.

बाकी एरवी कुठे जायचे असेल तर उशीर होत राहतो. म्हणजे मी एक वेळ ठरवतो पण निघतो थोडा उशीरा. खास करुन स्वतःच्या गाडीने जात असल्याने हे होत असावे. विमानप्रवासासाठी तर वेळेच्या बर्‍यापैकी आधी पोचतोच, धोका पत्करत नाही.
बाकी अनौपचारिक भेटीत उशीर (मला किंवा अन्य कुणालाही ) होत असेल तर त्याचे एक कारण मोबाइल हे असावे. आपण गृहीत धरतो की "कॉल किंवा एस एम एस करुन सांगू उशीर होईल म्हणून किंवा समोरची व्यक्ती कॉल करेलच"

मला ओ हेन्री ची एक कथा आठवते, त्यात दोन मित्र बरोबर वीस वर्षानी एका ठिकाणी भेटायचं ठरवतात आणि भेटतातही म्हणजे दिवस , वेळ सगळं काही वीस वर्षांपुर्वी ठरवूनच..त्याकाळात मोबाईल नसल्याने हे झाले असावे. अन्यथा आजकाल "निघाला की कॉल कर/करेन, पोचलस की कॉल कर/करेन" मुळे अनौपचारिक भेटीत उशीर ठरलेला आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Dec 2015 - 4:55 pm | मराठी कथालेखक

मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे येण्या-जाण्याच्या लवचिक वेळा असतात त्यामूळे रोज उशीरा जातो किंवा वेळेवर जातो असं काहीच म्हणता येणार नाही. पण सकाळीच मिटींग वगैरे लागली असेल तर वेळेवर जातो, मिटींगला सहसा उशीर करत नाही.
त्यापुर्वी कधी काळी उत्पादन कंपनीत काम करत असताना धावत पळत कसेही करुन ८:३५ च्या आधी कार्ड स्वाईप करायचोच. पुढे त्याच ठिकाणी काम करताना आमच्या कंपनीसाठीची (मी दुसरर्‍या पेरोल वर होतो) काही नियम्/धोरणे बदलली, मग स्वाईपिंग ही फक्त औपचारिकता उरली हे लक्षात आल्यावर ९-९:१५...म्हणजे नियम असल्याशिवाय शिस्त नाही.

बाकी एरवी कुठे जायचे असेल तर उशीर होत राहतो. म्हणजे मी एक वेळ ठरवतो पण निघतो थोडा उशीरा. खास करुन स्वतःच्या गाडीने जात असल्याने हे होत असावे. विमानप्रवासासाठी तर वेळेच्या बर्‍यापैकी आधी पोचतोच, धोका पत्करत नाही.
बाकी अनौपचारिक भेटीत उशीर (मला किंवा अन्य कुणालाही ) होत असेल तर त्याचे एक कारण मोबाइल हे असावे. आपण गृहीत धरतो की "कॉल किंवा एस एम एस करुन सांगू उशीर होईल म्हणून किंवा समोरची व्यक्ती कॉल करेलच"

मला ओ हेन्री ची एक कथा आठवते, त्यात दोन मित्र बरोबर वीस वर्षानी एका ठिकाणी भेटायचं ठरवतात आणि भेटतातही म्हणजे दिवस , वेळ सगळं काही वीस वर्षांपुर्वी ठरवूनच..त्याकाळात मोबाईल नसल्याने हे झाले असावे. अन्यथा आजकाल "निघाला की कॉल कर/करेन, पोचलस की कॉल कर/करेन" मुळे अनौपचारिक भेटीत उशीर ठरलेला आहे.

मराठी कथालेखक's picture

21 Dec 2015 - 4:59 pm | मराठी कथालेखक

मी आय.टी कंपनीत काम करतो तिथे येण्या-जाण्याच्या लवचिक वेळा असतात त्यामूळे रोज उशीरा जातो किंवा वेळेवर जातो असं काहीच म्हणता येणार नाही. पण सकाळीच मिटींग वगैरे लागली असेल तर वेळेवर जातो, मिटींगला सहसा उशीर करत नाही.
त्यापुर्वी कधी काळी उत्पादन कंपनीत काम करत असताना धावत पळत कसेही करुन ८:३५ च्या आधी कार्ड स्वाईप करायचोच. पुढे त्याच ठिकाणी काम करताना आमच्या कंपनीसाठीची (मी दुसरर्‍या पेरोल वर होतो) काही नियम्/धोरणे बदलली, मग स्वाईपिंग ही फक्त औपचारिकता उरली हे लक्षात आल्यावर ९-९:१५...म्हणजे नियम असल्याशिवाय शिस्त नाही.

बाकी एरवी कुठे जायचे असेल तर उशीर होत राहतो. म्हणजे मी एक वेळ ठरवतो पण निघतो थोडा उशीरा. खास करुन स्वतःच्या गाडीने जात असल्याने हे होत असावे. विमानप्रवासासाठी तर वेळेच्या बर्‍यापैकी आधी पोचतोच, धोका पत्करत नाही.
बाकी अनौपचारिक भेटीत उशीर (मला किंवा अन्य कुणालाही ) होत असेल तर त्याचे एक कारण मोबाइल हे असावे. आपण गृहीत धरतो की "कॉल किंवा एस एम एस करुन सांगू उशीर होईल म्हणून किंवा समोरची व्यक्ती कॉल करेलच"

मला ओ हेन्री ची एक कथा आठवते, त्यात दोन मित्र बरोबर वीस वर्षानी एका ठिकाणी भेटायचं ठरवतात आणि भेटतातही म्हणजे दिवस , वेळ सगळं काही वीस वर्षांपुर्वी ठरवूनच..त्याकाळात मोबाईल नसल्याने हे झाले असावे. अन्यथा आजकाल "निघाला की कॉल कर/करेन, पोचलस की कॉल कर/करेन" मुळे अनौपचारिक भेटीत उशीर ठरलेला आहे.

आनन्दा's picture

21 Dec 2015 - 6:15 pm | आनन्दा

तुम्ही ३ -३ दा हा प्रतिसाद टाकल्यामुळे मला खाली य्=पोचायला उशीर झाला.

मराठी कथालेखक's picture

21 Dec 2015 - 6:50 pm | मराठी कथालेखक

मिपाच्या सर्वर मध्ये गडबड झाल्याने असे झाले. मी निष्पाप आहे.

पूर्वी शार्प ६.३० ला झोपेतून उठायचो, ऑफिस ला वेळेवर पोहचायचो.
आता ८ ला उठतो, ऑफिस ला उशीर होतो.

कारण: नुकतंच लग्न झाल आहे.

ट्रेड मार्क's picture

22 Dec 2015 - 2:57 am | ट्रेड मार्क

उशीर होण्याचं एक कारण म्हणजे आपण पोचण्याची वेळ लक्षात ठेवतो. ९ ला पोचायचं म्हणजे किती वाजता घरातून निघायला पाहिजे ती वेळ ठरवली पाहिजे आणि घरातून निघायच्या वेळेनुसार नियोजन केलं पाहिजे.

मी सगळीकडे वेळेवर जातो, औपचारिक भेट असो वा अनौपचारिक, ९९% ठिकाणी मला उशीर होत नाही. त्यामुळे इतरांना होणार्या उशिराची मी ऐकलेली काही कारणे -

१. गजर झालाच नाही
२. गजर झाला तरी परत बंद करून झोपलो
३. रात्री ****** कारणाने झोपायला उशीर झाला आणि त्यामुळे सकाळी जाग नाही आली
४. गाडीतलं पेट्रोल संपलं / गाडी चालू होत नव्हती
५. काहीतरी विसरल्यामुळे परत जायला लागलं
६. पोलिसांनी पकडलं
७. महत्वाचा कॉल आला
८. एवढ्या लवकर जाउन काय करायचंय, कोणीच आलेलं नसतं
आणि सगळ्यात सर्रास सांगितलं जाणारं
८. ट्राफिक खूप होतं….

इतरांसाठी सांगण्याची आणि खरी कारणे यात फरक असू शकतो, तुम्हाला सांगितलेल कारणच जर खोट असेल तर तुम्ही सांगितलेला अथवा योजलेला उपाय सुद्धा चुकण्याची शक्यता असते म्हणूनच खरी कारणे जी काही असतील ती मनमोकळेपणाने शेअर व्हावीत म्हणून केवळ आणि केवळ उशीर होणार्‍यांसाठी या धागाचर्चेचे प्रयोजन केले आहे.

पद्मावति's picture

22 Dec 2015 - 5:04 pm | पद्मावति

उशीर होण्याचं एक कारण म्हणजे आपण पोचण्याची वेळ लक्षात ठेवतो. ९ ला पोचायचं म्हणजे किती वाजता घरातून निघायला पाहिजे ती वेळ ठरवली पाहिजे आणि घरातून निघायच्या वेळेनुसार नियोजन केलं पाहिजे.

..प्रचंड सहमत!
मी स्वत: कधीच उशीर करत नाही. पण लोकांच्या उशीर होण्याचं मुख्य कारण म्हणजे वेळेचं नियोजन नाही/ वेळेचा अंदाज नाही.
कोणाकडे सात ला बोलावले तर खरं म्हणजे सहा पासून सर्वांनी तयार व्हायला सुरूवात करावी जेणे करून साडे सहा ला घरातून निघता येईल.
पण सहाला जर एखाद्याला वाटले आता अर्धा तासाचा प्रचंड वेळ हाताशी आहे तर जरा व्यायाम करून घ्यावा. मग आता मी पटकन जिम मधे जातो, चटकन वर्क आऊट करतो आणि झपकन घरी येतो (या सगळ्या गोष्टी अर्ध्या तासात?) की ऑन द डॉट साडे सहाला निघुच.....हे टाइम मॅनेज्मेंट असल्यावर उशीर होणारच.