नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही -
१) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ?
२) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ?
३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ?
४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ?
५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील
६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ?
७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ?
८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ?
९) अन्य.....
मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील.
टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.
प्रतिक्रिया
4 Dec 2015 - 2:56 pm | अत्रुप्त आत्मा
कचकुन हनुमोदन
4 Dec 2015 - 3:32 pm | जातवेद
कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे एकाच लिस्ट मधे दिसतील अशी व्यवस्था करता येईल की. फक्त अॅक्सेस ज्यांना आहे त्यांनाच 'ते' धागे लिस्ट मधे दिसतील. धाग्याच्या बाजूला एक फ्लॅग दिसला की झालं. अनाहिता मधे कसे काय दिसते माहित नाही.
अवांतरः मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही. भावना पोचल्या तरच ईथे वेळ दिल्याचा उपयोग.
4 Dec 2015 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेन बोर्डावरचे धागे दिसतील आवागमनच्या खाली कोनाडाची लिंक असेल त्याला क्लिक केलं की तिथे प्रवेश करता येईल.तिथे
नवे लेखन दिसेल. मिपा सारखच असेल फक्त ऑफिस, कुटंब, असे विभाग करु.... :)
>>>>>>मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही.
मालकाचा काही रोल नाहीच. आपण का कुंथतो त्याचं कारण भावनेच्या विरेचनाचा सिद्धांत.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2015 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क ख ग आणि घ च्या दालनाचा उच्चार न करता आपली चर्चा पुढे न्यायची आहे.
समजा आपला असा कोंडवाडा सॉरी कोनाडा झालाच तर आपला लोगो कसा असेल ?
हिडर फूटर कसे सजवू ? घोषवाक्य काय असेल ?
-दिलीप बिरुटे
4 Dec 2015 - 3:44 pm | संदीप डांगे
तेची जबाबदारी आपली.... नगं काय टेन्सन घ्येयचं.
4 Dec 2015 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले
आधी नाव तरी कन्फर्म करा सर !
बाकी "वाडा " हे नाव कन्फर्म केल्यास घोषवाक्य " बाई , वाड्यावर या " हे होवु शकते आणि लोगो मधे आपले आवडते निळु फुले =))
4 Dec 2015 - 4:07 pm | बॅटमॅन
मेलो मेलो मेलो =)) =)) =))
तदुपरि- हे अतिप्रसिद्ध, अजरामर वाक्य नेमक्या कोणत्या पिच्चरमधले आहे?
4 Dec 2015 - 4:09 pm | प्रसाद गोडबोले
मी अत्ता तेच गुगलुन पाहिले , कोरावर कोणीतरी हाच प्रश्न विचारला आहे , पण मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीये !
4 Dec 2015 - 4:20 pm | नाखु
सुशीला का काय सिनेमा त्यात निळुभौ सरपंच आणि नायीका मास्तरीण तील उद्देशून आहे.
सिनेमाबाबत साशंक आहे पण मास्तरणीला वाड्यावर सूचकपणे बोलले गेलेले वाक्य आहे हे नक्की....
मराठी सिनेमा प्रेक्षक नाखु
4 Dec 2015 - 4:27 pm | बॅटमॅन
धन्स नाखुनकाका.
4 Dec 2015 - 5:05 pm | sagarpdy
बाई वाड्यावर या चं नाही माहित. परवा 'सामना' बघताना पाटील : "मास्तर वाड्यावर या" असे म्हणाले मात्र - बेकार हसू आणि आसू एका वेळी आले होते. :):)
4 Dec 2015 - 4:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला कोनाडा कसा उच्च अभिरुची असलेला असेल.
नाव कसं दमदार असलं पाहिजे. निळु फुले आणि बाईनं वाड्यावर येणे हे असं नको.
(लो क्वालिटीसाठी त्याचा उपयोग करायचा नाही)
लग्न प्रसंगी म्हटल्या जाणारी पुरुषांची गाणी, आदिवासी, जनवादी, अभिजनवादी, गिरिजनवादी, स्रीवादी, दलित, शोषित पिडितांची गाणी
पहिल्यांदा मिशा आल्या किंवा दिसायला लागल्या तेव्हा कसं वाटलं.....इ इ.
-दिलीप बिरुटे
4 Dec 2015 - 5:12 pm | प्रसाद गोडबोले
हे नाव कसे वाटते आपल्या कंपुला ?
लोगो मधे तुमचाच फोटो लावुया सर ;)
4 Dec 2015 - 4:34 pm | जातवेद
मिपा वर Data URI scheme चा पण वापर करतात हे माहित नव्हते.
7 Dec 2015 - 2:32 pm | अनिरुद्ध.वैद्य
जबरी अफाट :D :D
4 Dec 2015 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा
कचकुन हनुमोदन
4 Dec 2015 - 3:16 pm | बॅटमॅन
कितीवेळा कचकणार? ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ =))
4 Dec 2015 - 3:20 pm | प्रचेतस
चालू द्या तुमचे निरर्थक अत्मकुंथन..
4 Dec 2015 - 3:20 pm | कपिलमुनी
या वेळेस गुर्जींचा पुरुष विभागाच्या चळवळीतला उत्साह फसफसून वहातो आहे !
काय कारण आहे ;) ;)
4 Dec 2015 - 3:21 pm | प्रचेतस
त्यांना समुपदेशन होणे गरजेचे वाटत असावे. =))
4 Dec 2015 - 3:25 pm | प्रसाद गोडबोले
हा हा हा
=))))
4 Dec 2015 - 3:59 pm | कपिलमुनी
खजुराहोवर एक लेख येउ द्या =))
गुर्जीना त्या ट्रिपवर न्या :)
4 Dec 2015 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा
हलकट आगोबा!
4 Dec 2015 - 3:41 pm | कैलासवासी सोन्याबापु
अवघे विश्वाची माझा कोनाडा!! (पृथ्वी गोल असूनही!)
(सरळवळणी) बाप्या
4 Dec 2015 - 4:20 pm | निनाव
Prof . माझे समर्थन आहे.
4 Dec 2015 - 4:22 pm | निनाव
Prof . माझे समर्थन आहे.
4 Dec 2015 - 4:46 pm | कंजूस
कोनाडा उघडला की नवीन {ड्यु}आइडींचा पाउस पडेल.कसा आणि का त्याची श्टोरी "गुर्जींचा उत्साह फसफसून वहात आहे" यामागे आहे.
@गुर्जी हे एक लाक्षणिक पात्र आहे याची गुर्जींसह सर्वांनीच नोंद घ्यावी.कारण प्रश्न अथवा उत्तर आले की @अमुक,@तमुक तुम्हीसुद्धा? वगैरे प्रतिक्रिया आणि मूळ पोस्टमधली गम्मत जाऊन @अमुकतमुक अस्सच करतो की काय वगैरे चालू होईल.शिवाय कट्ट्याला भेटल्यावर "******" लिहिणारा ह्हाच तो ही ओळख.
4 Dec 2015 - 9:29 pm | नाव आडनाव
एक लोगो:

4 Dec 2015 - 11:44 pm | अभ्या..
नाव आडनावसाहेब माफ करा पण लोगो कसा अर्थपूर्ण अन क्रियेटीव्ह पाहीजे.
मी तर म्हणतो, मी असताना दुसरे कोण ह्या कोनाड्याचा लोगो बनवणारच कसा?
तर तमाम सत्पुरुष मित्रानो हा घ्या आपल्या स्वतःच्या कोनाड्याचा लोगो.
4 Dec 2015 - 11:56 pm | प्रचेतस
=)) =)) =))
धन्य आहेस.
5 Dec 2015 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं ! :)
-दिलीप बिरुटे
5 Dec 2015 - 12:33 pm | नाव आडनाव
:) भारी.
मी तरी कुठे बनवलाय तो लोगो, गुगल देवा कडून उधारंच घेतला होता :)
5 Dec 2015 - 12:52 pm | अत्रुप्त आत्मा
@आपल्या स्वतःच्या
कोनाड्याचा लोगो.
म'हाण आहेस तू अब्याडब्या!
5 Dec 2015 - 1:27 pm | तिमा
पोपटधारी लंगोट ?
7 Dec 2015 - 9:11 am | नाखु
पटलेला पोपट...
तो बुवांकडे पाहून पंख फडफडवतोय असे मलाच वाटतयं का सर्वांना खुलासा व्हावा..
चार आणे सभासद
कोणाच्या (?)
नादात मिपावर
डावल्रेला
पुरुष वर्ग
5 Dec 2015 - 10:21 am | तिमा
कोनाड्यासारखाच एक 'गाभारा' पण असावा. म्हणजे धर्ममार्तंडांना त्यावर निवांत चर्चा करता येईल. त्या नतद्रष्ट विज्ञानवाल्यांची अशुभ सावलीही पडणार नाही.
- नया वाला
5 Dec 2015 - 4:37 pm | चिनार
पुरुषांना वेगळा कोनाडा द्यायचा की नाही ते नंतर बघू ...
पण स्त्रियांच्या कोनाड्यात स्त्रीमुक्तीवर चर्चा होईल, किंवा स्त्रीयांना त्यांचं स्वत:च असं वेगळं व्यासपीठ मिळेल, स्त्रियांच्या भावनांची वादळे येतील वगैरे वगैरे ...आणि पुरुषांच्या कोनाड्यात फक्त "एकाच" गोष्टीवर चर्चा होईल असा सरळसोट निष्कर्ष काढू नका म्हणजे झालं...
5 Dec 2015 - 6:14 pm | संदीप डांगे
इतरांना फाल्तू समजणार्या काही हुच्च्ब्रु स्वयंघोषीत फुडारलेल्या महान आत्म्यांना तसाच निष्कर्ष काढायचा आहे हे एकंदरित दिसतंय.
7 Dec 2015 - 6:02 pm | बॅटमॅन
छान लिहिले आहेस हो चिनार्या. पण काही कंपूबाज लोकांच्या खवमध्ये पाहिल्यास अशीच मुक्ताफळे उधळलेली दिसतात असे यांचे मत.
7 Dec 2015 - 6:05 pm | pacificready
कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे ब्याटमना. उगीच आमच्या हिच्या नावावर काहीही खपवत जाऊ नकोस असं आमच्या ह्यांच्या त्यांचं मत. ;-)
7 Dec 2015 - 6:19 pm | बॅटमॅन
तुम्ही जर माईंचे हे असाल तर तुमच्या ह्यांचे ते कोण?
बाकी रिलेशनशिप्स पाहून निर्वाण पावल्या गेले आहे. _/\_ =))
7 Dec 2015 - 6:31 pm | pacificready
ह्यांच्या त्यांचं म्हणजे ह्यांच्या मातोश्रींचं मत रे!
तूमच्या मनातच ते हे...
7 Dec 2015 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता खरडवह्या चाळणं आलं. कोण कोणत्या पुरुषांच्या खरडवह्या चाळु ?
(संपादकांना विनंती की हा धागा दखल मधे कायम स्वरूपी ठेवता येईल का ? )
-दिलीप बिरुटे
5 Dec 2015 - 5:56 pm | जेपी
जो जे वांछील ,ते तो पावो...
ही भावी संपादक पदी प्रार्थना
7 Dec 2015 - 1:32 pm | रातराणी
असावाच कोनाडा. स्त्री पुरुष दोघांना व्यक्त होण्याच्या समान संधी मिळायलाच हव्यात. मुळात पुरुषांना त्यांचे प्रश्न असतील समस्या असतील हे मान्य करण इतकं का अवघड आहे? न बोलणारे, भावनिक न होणारे पुरुष भारी हा समज दूर व्हायला हवा. त्यासाठी जर त्यांना स्वतंत्र व्यासपीठाची गरज असेल तर तो त्यांना देण्यात यावा.
7 Dec 2015 - 1:51 pm | बॅटमॅन
संतुलित प्रतिसाद!
7 Dec 2015 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाशी सहमत आहे, प्रतिसाद आवडला.
धन्स...... !
-दिलीप बिरुटे
7 Dec 2015 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा
+१ प्लस वण फ्रॉम मी टू!
7 Dec 2015 - 6:32 pm | प्रचेतस
पुन्हा हम्म... =))
8 Dec 2015 - 12:20 am | अत्रुप्त आत्मा
8 Dec 2015 - 4:16 pm | प्रसाद गोडबोले
१९९
8 Dec 2015 - 4:18 pm | pacificready
काय हे प्रगो? काही गरज आहे का असे प्रतिसाद टाकायची?
बघ झाले की नाही 200 ते!
8 Dec 2015 - 4:17 pm | बॅटमॅन
२००
9 Dec 2015 - 2:35 pm | याॅर्कर
बर्यापैकी धाडस दाखवलयं सर्वांनी प्रतिसादांमध्ये.
9 Dec 2015 - 2:37 pm | अभ्या..
प्रा. डॉ. सर, लोगो तर मिळाला, बॅक्ग्राऊंड्स पण पाठवल्यात.
लिंक कधी देताय?
9 Dec 2015 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं का्य ठरलंय :/ खासगी गोष्टी इथं जाहीर करायच्या नाहीत.
पण, आपल्या आग्रहास्त्व संध्याकाळी चौथारा सॉरी कोनाडा दर्शनासाठी खुला करू ? :)
कोण कोण आयडी सोडू आपण तिथे ? सुरुवातीला पाच पुरुष सोडु ?
आपल्याला महिलाही सोडायच्या आहेत ? अदिती घोळपांडे येते म्हणाली ?
--दिलीप बिरुटे
-
9 Dec 2015 - 3:32 pm | अभ्या..
ओके आणि सॉरी सर.
आपण करुयात ते सारे मिळून.
रिक्वेस्ट ऐक्सेस मस्त आयडिया आहे. अदितीबैसारखे खिलाडू लोक्स येताहेत ते बरेच आहे की.
9 Dec 2015 - 4:39 pm | खटपट्या
अरे कधी सूरू होणाराय हा कोनाडा??
19 Dec 2015 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रंगमंच तयार आहे. बस पडदा वर जाण्याची वाट पाहतोय.
कोनाडा. बघुन या. :)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2015 - 12:22 pm | अभ्या..
येस्स सरजी.
हो जायेंगा थोडी ही देरमे.
सर, आपका हुक्म सर आंखोपर. ;)
19 Dec 2015 - 12:23 pm | अभ्या..
सर ते मेंबरशिपचे तुम्हाला व्यनि करुन घेताय की अजून कसे?
19 Dec 2015 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या कोनाड्यासाठी 'पिडित पुरुषांच्या' व्यथा हाही विषय असू शकतो का ? मी या लोकांचं म्हणनं ऐकलं त्यात ते म्हणत होतं की आम्हाला चोवीस तास एक हेल्प लाईनची सुविधा हवी. (काय फायदा होईल बरं याचा )
अजून काही मुद्दे आहेत ते थोड्या वेळाने लिहितो. सध्या मिपा वाचून घेतो. मग पुन्हा हजर होतो.
-दिलीप बिरुटे
19 Dec 2015 - 12:46 pm | सस्नेह
उगवत्या कोनाड्याला शुभेच्छा ! :)
20 Jan 2016 - 8:33 pm | मोहनराव
कोनाड्याचा विषय कोनाड्यात पडला काय?
21 Jan 2016 - 5:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नै नै कोनाड्याचा विषय अजिबात कोनाड्यात पडलेला नाही.
अभ्या सध्या सुट्टीवर आहे. तो आला की पुन्हा आपला हा कोनाडा वर काढु. :)
एक कोनाडा गीत तयार करायचा आहे.
कवी शोधतोय आम्ही सध्या.
-दिलीप बिरुटे
21 Jan 2016 - 5:42 pm | मोहनराव
आत्मबंधु आहे की त्यासाठी... त्यांनापण आता कोनाड्याची गरज आहे.. ;)
21 Jan 2016 - 6:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाय द वे, काय काय विषय असतील आपल्या कोनाड्याचे ?
काही अंतिम स्वरुप दिलं की नाही कोणी ?
-दिलीप बिरुटे
21 Jan 2016 - 8:44 pm | यशोधरा
गीत तयार करायचा आहे >> पुर्षांचा कोनाडा म्हणून गीत ही करायचा का? भारीच ब्वॉ! =))
21 Jan 2016 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गीत तयार करायचं आहे, असंही वाचता आलं असतं ना.
आता तर तुमच्या जीद्दीवर कोनाडा सुरु केलं आहे.
सदस्यत्व घेता का ? :)
-दिलीप बिरुटे
21 Jan 2016 - 9:05 pm | यशोधरा
घेतलं समजा.
21 Jan 2016 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण मुख्य बोर्डावरच बर्या आहात.
-दिलीप बिरुटे
21 Jan 2016 - 9:26 pm | यशोधरा
:D
21 Jan 2016 - 8:58 pm | एस
पुरुषांसाठी स्वतंत्र कोनाडा असावा म्हणजे काही गोष्टींबद्दल तिथे मनमोकळी चर्चा करता येईल असे मत असेल तर त्याविषयी पूर्ण आदर बाळगून एक सूचना मला करावाशी वाटते, की आधी अशा एखाद्या विषयावर मुख्य बोर्डावर एक धागा काढून पहा. माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो. जर असा एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील. समजा धाग्याचा विषय, मांडणी वा प्रतिसादांचे स्वरूप हे मिपाधोरणाविरुद्ध आहे असे संपादकमंडळाचे मत पडले तर त्यावर कात्री चालविण्याचा अधिकार त्यांना आहेच.
आपण करतोय काय की, रिंगणाच्या बाहेरूनच चाचपणी करत बसलोय. एक धागा काढून पहा. मनातल्या रास्त शंका, प्रश्न खुलेपणाने पण संयमितपणे मांडून पहा. एक प्रयोग करून पाहूया. म्हणजे वेगळ्या कोनाड्याची गरज आहे का व कितपत आहे आणि असल्यास त्याचे स्वरूप काय असावे याचा अंदाज येऊ शकेल.
काय म्हणता?
21 Jan 2016 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो.
मिपाच्या मुख्य बोर्डावर सर्वच विषय यावेत ही माझी एक कट्टर मिपाकर म्हणुन नेहमीच इच्छा आणि भूमिका राहीली आहे. मी कुठल्याही कोनाड्या-कानाड्याच्या विरोधात सुरुवातीपासून आहे. सर्व विषय मुख्य बोर्डावरच यावेत या मताचा आहे.
एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील.
अगदी सहमत. मिपा आता अधिक मोकळं होत आहे. आता ते का आणि कसं विचारु नये. नवनवीन सदस्य स्त्री आणि पुरुष यांचा मिपावर अजून वावर वाढला पाहिजे. सद्य मिपाकरांच्या विचारांना एक साचलेपण आलं आहे. नवनवीन सदस्य येतील आणि आपले विचार मांडतील. अबकडचा पुरुष कोनाडा आणि कखगघ यांचा अमुक धमुक कोनाडा यामुळे एक वैचारिक दुफळी आणि गट-तट निर्माण होण्याची शक्यता असते. विचारांचा, संवादाचा खेळकरपणाचा अभाव अशा कोनाड्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. एकमेव मुख्य बोर्ड हा त्यावरचा उपाय आहे, पण हा आपला विषय नाही. आपला विचार आहे आपण सर्व विषय मुख्य बोर्डावर घेत राहु. संपादक त्या धाग्याचं मुल्य ठरवित राहतीलच त्यात काही वाद नाही.
-दिलीप बिरुटे