मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुरुषांसाठी वेगळा कोनाडा असावा का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, काल पासून आणि काही दिवसांपासून सतत एक चर्चा चाललेली आहे की पुरुषांनाही चर्चेसाठी मिपावर एक गोपनिय दालन असावं का ? माझं मत सांगुन टाकतो की मी अशा कोणत्याही कोनाड्याच्या विरोधात आहे. आणि माझा मित्र वल्ली उर्फ प्रचेतसच्या मते मिपाचं मुख्य बोर्ड म्हणजेच वेगळं दालन आहे. फक्त आपण इथे स्त्रीयांना प्रवेश दिलाय इतकेच. तर असा एखादा कोनाडा असावा काय ? आणि समजा असा एखादा कोनाडा तयार झाला तर तिथे स्त्रियांना प्रवेश असावा काय ? पुरुषांच्या अशा दालनात काय काय चर्चा होतील आणि अशा दालनाचा पुरुष सदस्यांना काही फायदा होऊ शकेल काय ? प्रश्न असे असतील की दुसरे काही - १) पुरुषांचे काही प्रश्न जे मुख्य बोर्डावर लिहायला संकोच वाटतो, आरोग्यविषयक ? २) पुरुष लिंगभेद, उत्तेजित करणारे आणि अश्लिल चर्चा करतील ? ३) पोषाख, देखणेपण आकर्षक व्यक्तिमत्व यावर चर्चा करतील ? ४) एकीकडे प्रेयसी आणि एकीकडे बायको दोघांशी समन्वय कसं राखु असे प्रश्न असतील ? ५) सासरे आणि सासु छळ करतात काही टीप्स प्लीज, असे म्हणतील ६) पत्नी दम देते, दमात घेत असते, काय करु ? ७) पत्नी पॉकेट मनी देत नाही, काय करु ? ८) पत्नीच्या माहेरचे लोक सारखे सारखे मुक्कामी असतात काय करावे ? ९) अन्य..... मंडळी, धागा मौजमजा आणि तसा थोडा गंभीरही आहे. एकच विनंती की मिपावरच्या 'क ख आणि ग' च्या दालनाची चर्चा इथे करु नका. नसता धागा जाईल आणि मालक माझ्या नावावर मायनस गुण टाकायला सुरुवात करतील. टीप : चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी अपेक्षा आहे. कोणत्याही दालनावर चर्चा न करता.

वाचने 45298 वाचनखूण प्रतिक्रिया 224

In reply to by अत्रुप्त आत्मा

जातवेद Fri, 12/04/2015 - 15:32
कोनाडा बिनाडा सोडा, सगळे धागे एकाच लिस्ट मधे दिसतील अशी व्यवस्था करता येईल की. फक्त अ‍ॅक्सेस ज्यांना आहे त्यांनाच 'ते' धागे लिस्ट मधे दिसतील. धाग्याच्या बाजूला एक फ्लॅग दिसला की झालं. अनाहिता मधे कसे काय दिसते माहित नाही. अवांतरः मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही. भावना पोचल्या तरच ईथे वेळ दिल्याचा उपयोग.

In reply to by जातवेद

मेन बोर्डावरचे धागे दिसतील आवागमनच्या खाली कोनाडाची लिंक असेल त्याला क्लिक केलं की तिथे प्रवेश करता येईल.तिथे नवे लेखन दिसेल. मिपा सारखच असेल फक्त ऑफिस, कुटंब, असे विभाग करु.... :) >>>>>>मालकांचा यात काही रोल नाही तर आपण का एवढ कुथतोय कळत नाही. मालकाचा काही रोल नाहीच. आपण का कुंथतो त्याचं कारण भावनेच्या विरेचनाचा सिद्धांत. -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

क ख ग आणि घ च्या दालनाचा उच्चार न करता आपली चर्चा पुढे न्यायची आहे. समजा आपला असा कोंडवाडा सॉरी कोनाडा झालाच तर आपला लोगो कसा असेल ? हिडर फूटर कसे सजवू ? घोषवाक्य काय असेल ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला लोगो कसा असेल ?हिडर फूटर कसे सजवू ? घोषवाक्य काय असेल ?
आधी नाव तरी कन्फर्म करा सर ! बाकी "वाडा " हे नाव कन्फर्म केल्यास घोषवाक्य " बाई , वाड्यावर या " हे होवु शकते आणि लोगो मधे आपले आवडते निळु फुले =)) a

In reply to by बॅटमॅन

मी अत्ता तेच गुगलुन पाहिले , कोरावर कोणीतरी हाच प्रश्न विचारला आहे , पण मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीये !

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु Fri, 12/04/2015 - 16:20
सुशीला का काय सिनेमा त्यात निळुभौ सरपंच आणि नायीका मास्तरीण तील उद्देशून आहे. सिनेमाबाबत साशंक आहे पण मास्तरणीला वाड्यावर सूचकपणे बोलले गेलेले वाक्य आहे हे नक्की.... मराठी सिनेमा प्रेक्षक नाखु

In reply to by बॅटमॅन

sagarpdy Fri, 12/04/2015 - 17:05
बाई वाड्यावर या चं नाही माहित. परवा 'सामना' बघताना पाटील : "मास्तर वाड्यावर या" असे म्हणाले मात्र - बेकार हसू आणि आसू एका वेळी आले होते. :):)

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला कोनाडा कसा उच्च अभिरुची असलेला असेल. नाव कसं दमदार असलं पाहिजे. निळु फुले आणि बाईनं वाड्यावर येणे हे असं नको. (लो क्वालिटीसाठी त्याचा उपयोग करायचा नाही) लग्न प्रसंगी म्हटल्या जाणारी पुरुषांची गाणी, आदिवासी, जनवादी, अभिजनवादी, गिरिजनवादी, स्रीवादी, दलित, शोषित पिडितांची गाणी पहिल्यांदा मिशा आल्या किंवा दिसायला लागल्या तेव्हा कसं वाटलं.....इ इ. -दिलीप बिरुटे

कंजूस Fri, 12/04/2015 - 16:46
कोनाडा उघडला की नवीन {ड्यु}आइडींचा पाउस पडेल.कसा आणि का त्याची श्टोरी "गुर्जींचा उत्साह फसफसून वहात आहे" यामागे आहे. @गुर्जी हे एक लाक्षणिक पात्र आहे याची गुर्जींसह सर्वांनीच नोंद घ्यावी.कारण प्रश्न अथवा उत्तर आले की @अमुक,@तमुक तुम्हीसुद्धा? वगैरे प्रतिक्रिया आणि मूळ पोस्टमधली गम्मत जाऊन @अमुकतमुक अस्सच करतो की काय वगैरे चालू होईल.शिवाय कट्ट्याला भेटल्यावर "******" लिहिणारा ह्हाच तो ही ओळख.

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. Fri, 12/04/2015 - 23:44
नाव आडनावसाहेब माफ करा पण लोगो कसा अर्थपूर्ण अन क्रियेटीव्ह पाहीजे. मी तर म्हणतो, मी असताना दुसरे कोण ह्या कोनाड्याचा लोगो बनवणारच कसा? तर तमाम सत्पुरुष मित्रानो हा घ्या आपल्या स्वतःच्या कोनाड्याचा लोगो. p

In reply to by तिमा

नाखु Mon, 12/07/2015 - 09:11

पटलेला पोपट...

तो बुवांकडे पाहून पंख फडफडवतोय असे मलाच वाटतयं का सर्वांना खुलासा व्हावा.. चार आणे सभासद कोणाच्या (?) नादात मिपावर डावल्रेला पुरुष वर्ग

तिमा Sat, 12/05/2015 - 10:21
कोनाड्यासारखाच एक 'गाभारा' पण असावा. म्हणजे धर्ममार्तंडांना त्यावर निवांत चर्चा करता येईल. त्या नतद्रष्ट विज्ञानवाल्यांची अशुभ सावलीही पडणार नाही. - नया वाला

चिनार Sat, 12/05/2015 - 16:37
पुरुषांना वेगळा कोनाडा द्यायचा की नाही ते नंतर बघू ... पण स्त्रियांच्या कोनाड्यात स्त्रीमुक्तीवर चर्चा होईल, किंवा स्त्रीयांना त्यांचं स्वत:च असं वेगळं व्यासपीठ मिळेल, स्त्रियांच्या भावनांची वादळे येतील वगैरे वगैरे ...आणि पुरुषांच्या कोनाड्यात फक्त "एकाच" गोष्टीवर चर्चा होईल असा सरळसोट निष्कर्ष काढू नका म्हणजे झालं...

In reply to by चिनार

संदीप डांगे Sat, 12/05/2015 - 18:14
इतरांना फाल्तू समजणार्‍या काही हुच्च्ब्रु स्वयंघोषीत फुडारलेल्या महान आत्म्यांना तसाच निष्कर्ष काढायचा आहे हे एकंदरित दिसतंय.

In reply to by चिनार

बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 18:02
छान लिहिले आहेस हो चिनार्‍या. पण काही कंपूबाज लोकांच्या खवमध्ये पाहिल्यास अशीच मुक्ताफळे उधळलेली दिसतात असे यांचे मत.

In reply to by बॅटमॅन

pacificready Mon, 12/07/2015 - 18:05
कुणाचा मोड़ ते पण लिहित जा रे ब्याटमना. उगीच आमच्या हिच्या नावावर काहीही खपवत जाऊ नकोस असं आमच्या ह्यांच्या त्यांचं मत. ;-)

In reply to by pacificready

बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 18:19
उगीच आमच्या हिच्या नावावर काहीही खपवत जाऊ नकोस असं आमच्या ह्यांच्या त्यांचं मत. ;-)
तुम्ही जर माईंचे हे असाल तर तुमच्या ह्यांचे ते कोण? बाकी रिलेशनशिप्स पाहून निर्वाण पावल्या गेले आहे. _/\_ =))

In reply to by बॅटमॅन

आता खरडवह्या चाळणं आलं. कोण कोणत्या पुरुषांच्या खरडवह्या चाळु ? (संपादकांना विनंती की हा धागा दखल मधे कायम स्वरूपी ठेवता येईल का ? ) -दिलीप बिरुटे

रातराणी Mon, 12/07/2015 - 13:32
असावाच कोनाडा. स्त्री पुरुष दोघांना व्यक्त होण्याच्या समान संधी मिळायलाच हव्यात. मुळात पुरुषांना त्यांचे प्रश्न असतील समस्या असतील हे मान्य करण इतकं का अवघड आहे? न बोलणारे, भावनिक न होणारे पुरुष भारी हा समज दूर व्हायला हवा. त्यासाठी जर त्यांना स्वतंत्र व्यासपीठाची गरज असेल तर तो त्यांना देण्यात यावा.

याॅर्कर Wed, 12/09/2015 - 14:35
बर्यापैकी धाडस दाखवलयं सर्वांनी प्रतिसादांमध्ये.

In reply to by अभ्या..

आपलं का्य ठरलंय :/ खासगी गोष्टी इथं जाहीर करायच्या नाहीत. पण, आपल्या आग्रहास्त्व संध्याकाळी चौथारा सॉरी कोनाडा दर्शनासाठी खुला करू ? :) कोण कोण आयडी सोडू आपण तिथे ? सुरुवातीला पाच पुरुष सोडु ? आपल्याला महिलाही सोडायच्या आहेत ? अदिती घोळपांडे येते म्हणाली ? --दिलीप बिरुटे -

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या.. Wed, 12/09/2015 - 15:32
ओके आणि सॉरी सर. आपण करुयात ते सारे मिळून. रिक्वेस्ट ऐक्सेस मस्त आयडिया आहे. अदितीबैसारखे खिलाडू लोक्स येताहेत ते बरेच आहे की.

In reply to by खटपट्या

रंगमंच तयार आहे. बस पडदा वर जाण्याची वाट पाहतोय. कोनाडा. बघुन या. :) -दिलीप बिरुटे

IMG_20151217_191748 आपल्या कोनाड्यासाठी 'पिडित पुरुषांच्या' व्यथा हाही विषय असू शकतो का ? मी या लोकांचं म्हणनं ऐकलं त्यात ते म्हणत होतं की आम्हाला चोवीस तास एक हेल्प लाईनची सुविधा हवी. (काय फायदा होईल बरं याचा ) अजून काही मुद्दे आहेत ते थोड्या वेळाने लिहितो. सध्या मिपा वाचून घेतो. मग पुन्हा हजर होतो. -दिलीप बिरुटे

In reply to by मोहनराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2016 - 17:37
नै नै कोनाड्याचा विषय अजिबात कोनाड्यात पडलेला नाही. अभ्या सध्या सुट्टीवर आहे. तो आला की पुन्हा आपला हा कोनाडा वर काढु. :) एक कोनाडा गीत तयार करायचा आहे. कवी शोधतोय आम्ही सध्या. -दिलीप बिरुटे

In reply to by मोहनराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2016 - 18:02
बाय द वे, काय काय विषय असतील आपल्या कोनाड्याचे ? काही अंतिम स्वरुप दिलं की नाही कोणी ? -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2016 - 20:59
गीत तयार करायचं आहे, असंही वाचता आलं असतं ना. आता तर तुमच्या जीद्दीवर कोनाडा सुरु केलं आहे. सदस्यत्व घेता का ? :) -दिलीप बिरुटे

एस गुरुवार, 01/21/2016 - 20:58
पुरुषांसाठी स्वतंत्र कोनाडा असावा म्हणजे काही गोष्टींबद्दल तिथे मनमोकळी चर्चा करता येईल असे मत असेल तर त्याविषयी पूर्ण आदर बाळगून एक सूचना मला करावाशी वाटते, की आधी अशा एखाद्या विषयावर मुख्य बोर्डावर एक धागा काढून पहा. माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो. जर असा एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील. समजा धाग्याचा विषय, मांडणी वा प्रतिसादांचे स्वरूप हे मिपाधोरणाविरुद्ध आहे असे संपादकमंडळाचे मत पडले तर त्यावर कात्री चालविण्याचा अधिकार त्यांना आहेच. आपण करतोय काय की, रिंगणाच्या बाहेरूनच चाचपणी करत बसलोय. एक धागा काढून पहा. मनातल्या रास्त शंका, प्रश्न खुलेपणाने पण संयमितपणे मांडून पहा. एक प्रयोग करून पाहूया. म्हणजे वेगळ्या कोनाड्याची गरज आहे का व कितपत आहे आणि असल्यास त्याचे स्वरूप काय असावे याचा अंदाज येऊ शकेल. काय म्हणता?

In reply to by एस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/21/2016 - 21:22
माझ्यामते आणि खुद्द प्रॉडाँनीही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादांवरून मिपावर आपण खुली आणि मनमोकळी चर्चा आणि तीही कुठल्याही विषयावर करू शकतो. मिपाच्या मुख्य बोर्डावर सर्वच विषय यावेत ही माझी एक कट्टर मिपाकर म्हणुन नेहमीच इच्छा आणि भूमिका राहीली आहे. मी कुठल्याही कोनाड्या-कानाड्याच्या विरोधात सुरुवातीपासून आहे. सर्व विषय मुख्य बोर्डावरच यावेत या मताचा आहे. एखादा धागा मुख्य बोर्डावरच काढल्यास याचा पडताळा घेता येईल, तिथे सर्व मिपासदस्य प्रतिसाद देऊ शकतील. अगदी सहमत. मिपा आता अधिक मोकळं होत आहे. आता ते का आणि कसं विचारु नये. नवनवीन सदस्य स्त्री आणि पुरुष यांचा मिपावर अजून वावर वाढला पाहिजे. सद्य मिपाकरांच्या विचारांना एक साचलेपण आलं आहे. नवनवीन सदस्य येतील आणि आपले विचार मांडतील. अबकडचा पुरुष कोनाडा आणि कखगघ यांचा अमुक धमुक कोनाडा यामुळे एक वैचारिक दुफळी आणि गट-तट निर्माण होण्याची शक्यता असते. विचारांचा, संवादाचा खेळकरपणाचा अभाव अशा कोनाड्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. एकमेव मुख्य बोर्ड हा त्यावरचा उपाय आहे, पण हा आपला विषय नाही. आपला विचार आहे आपण सर्व विषय मुख्य बोर्डावर घेत राहु. संपादक त्या धाग्याचं मुल्य ठरवित राहतीलच त्यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे