अस्तित्व?

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
26 Nov 2015 - 9:22 pm

अस्तित्व :

भुंड टेकाड आज एकाकी पडलयं. अस्तित्व काय असतं हो? त्याचा वैरान माथा ऊन्हात तळपतो. ऊन्हाच्या झळयात डोळे दिपून जातात. मुसळधार पावसाचा एखादा थेंब त्याच्या वाट्याला येतो. पालवी फुटते आणि क्षणात कोमेजुन जाते. अस्तित्वाच्या पाऊलखुणा सांगत केवळ एक वाळलेलं पातं मागे ठेवते. टेकाडावर गवताच्या काड्यांचा खच पडलाय. वाऱ्याचा एखादा झोत त्यांना तितर बितर करतो. धुळदान पाती दगडा धोड्याखाली चिरडली जातात. कुण्या एकेकाळी फुललेलं जंगल असंच अशक्त होत मातीत गेलं. ही मातीच तेवढी अस्तित्व दाखवत शिल्लक राहिली. मातीलाही अस्तित्व असंतचं तर.
कुठुन एखादा कोंब या मातीत फुटतो. भुंडं टेकाड टवकारुन त्याच्याकडं बघतं. दबा धरुन त्याच्या भोवती सुख दु:खांचा फेर धरतं. त्याच्या ईवल्याश्या पानात अनादीकाळाचा पसारा बघतं. टेकाडावरचं एकमेव जिवंत अस्तित्व त्या कोंबाऱ्यात लपतं. मात्रं ते ही एके दिवशी मान टाकतं. भुंड टेकाड हळहळ करत मातीत जातं. ऊरली सुरली माती आपलं अस्तित्व दाखवते. 'माती' हेच 'अस्तित्व' आहे तर!

==============

पराभव :

संगीतही कधी कधी बेसुरं वाजतं. निरागस प्रेमाला कर्णमधुर वाटतं. आलापांचा रिवाज होत राहतो. घवसलेला सूर निसटून जातो. आणि तळाला शेवटी दु:ख उरतं.
दु:ख पचवायचं कशाला, लुटायचं आनंदासारखं! ही दु:खाची नशा काही औरचं असते. अलगद घेत गेल्यास चढत जाते. झिंग! झिंगच असते ती एक सुखासीन! जो या दु:खाच्या गर्तेत बुडाला नाही त्याला कसलं आलयं 'सुख'.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

26 Nov 2015 - 9:24 pm | मांत्रिक

क्लासच!

मांत्रिक's picture

26 Nov 2015 - 9:27 pm | मांत्रिक

दु:ख पचवायचं कशाला, लुटायचं आनंदासारखं! ही दु:खाची नशा काही औरचं असते. अलगद घेत गेल्यास चढत जाते. झिंग! झिंगच असते ती एक सुखासीन! जो या दु:खाच्या गर्तेत बुडाला नाही त्याला कसलं आलयं 'सुख'.

हे तर सुपरक्लासच्च!!! अतिशय आवडलं.

आनंद कांबीकर's picture

26 Nov 2015 - 9:39 pm | आनंद कांबीकर

मस्तच!

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:17 pm | DEADPOOL

एक नं.

बाबा योगिराज's picture

26 Nov 2015 - 11:23 pm | बाबा योगिराज

आपन तर इठला पयला पंखा भौ तुमचा.
मस्त वो जव्हेर भौ. लेखनाचा हां प्रकार पण फार आवडला.
भेष्ट. मस्त. सुपर.
पँखेवाला बाबा.

बोका-ए-आझम's picture

27 Nov 2015 - 12:08 am | बोका-ए-आझम

इंदिरा संतांची कविता आठवली -
रक्तामध्ये ओढ मातीची
मनात मातीचे ताजेपणा
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन!!

माता आणि माती हे शब्द खूप सारखे असणं हा योगायोग नक्कीच नाही!

शिव कन्या's picture

27 Nov 2015 - 5:31 pm | शिव कन्या

बरोबर निरीक्षण बोकोबा.....

वर्णनापेक्षा शेवटचा विचार आवडला.

एक एकटा एकटाच's picture

27 Nov 2015 - 12:13 am | एक एकटा एकटाच

निव्वळ अप्रतिम !!!!!!!!!!

जव्हेरगंज's picture

27 Nov 2015 - 12:56 pm | जव्हेरगंज

thank you

नाखु's picture

27 Nov 2015 - 2:48 pm | नाखु

काय लिहितो रे तू??

अफलातून जियो..

सुखःदु:ख वाला नाखु

नीलमोहर's picture

27 Nov 2015 - 3:00 pm | नीलमोहर

बेचारा कहाँ जानता है खलीश है ये क्या खला है..
शहर भर की खुशीसे ये दर्द मेरा भला है..

जश्न ये रास ना आए,
मजा तो बस गम में आया है.

मैने दिलसे कहा ढूंढ लाना खुशी..
नासमझ लाया गम तो ये गम ही सही.

(चित्रपटः रोग, गीतकारः नीलेश मिश्रा, गायकः केके)

नीलमोहर's picture

27 Nov 2015 - 3:21 pm | नीलमोहर

दु:खाची नशा निराळी.. उतरता उतरत नाही..
दु:खाची चटक बेक्कार.. सुटता सुटत नाही..
दु:खासवे वाट चालता.. सोबती कुणी लागत नाही..
दु:खाची संगत जडता.. सुखही आपलं वाटत नाही.

चांदणे संदीप's picture

27 Nov 2015 - 4:05 pm | चांदणे संदीप

'माती' हेच 'अस्तित्व' आहे तर!

यावरून अभिजित सावंतच्या "फरीदा" या अल्बममधील "झल्लिया" या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी आठवल्या!

टूटा जमीर वेचके खाया
चलो नलायक काम तो आया

बनके सयाना था जिया
अब जाके जाना साच है क्या
उडती खबर थी ये सुनी
मिट्टी से उगती जिंदडी
मिट्टी मी खुदको मी तो आ गया मिलाके
आ देखे उगता अब क्या!

राजीव पाल सिंह "राणा" गीतकार असावेत या गाण्याचे, नक्की माहित नाही. :(

धन्यवाद,
Sandy

चांदणे संदीप's picture

27 Nov 2015 - 4:07 pm | चांदणे संदीप

मिट्टी मी खुदको मी तो आ गया मिलाके

च्या ऐवजी...

मिट्टी मे खुदको मै तो आ गया मिलाके

असे वाचावे!