माझी चादर कोनी चोरीयली

सतिश गावडे's picture
सतिश गावडे in जे न देखे रवी...
12 Nov 2015 - 2:36 pm

प्रेरणा : माझा कोंबरा कोनी मारीयला

माझी चादर कोनी चोरीयली
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

माझ्या चादरीच्या फुल्या
माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या

माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

माझ्या चादरीचा धागा
माझ्या चादरीचा धागा
नं आख्खा खादीचा तागा
नं आख्खा खादीचा तागा

माझ्या चादरीचा धागा
नं आख्खा खादीचा तागा
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

माझी चादर ती बसायची
माझी चादर ती बसायची
नं माझी साधना तिनी व्हायची
नं माझी साधना तिनी व्हायची

माझी चादर ती बसायची
नं माझी साधना तिनी व्हायची
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

माझ्या चादरीचा तो लळा
माझ्या चादरीचा तो लळा
नं मला करमेना जीवाला
नं मला करमेना जीवाला

माझ्या चादरीचा तो लळा
नं मला करमेना जीवाला
नं माझी चादर कोनी चोरीयली

माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २

फ्री स्टाइलराजकारण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 Nov 2015 - 2:45 pm | प्रचेतस

अगागागागा.
ऐन दिवाळीत वारलो रे =))

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2015 - 3:00 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

संदीप डांगे's picture

12 Nov 2015 - 3:41 pm | संदीप डांगे

चादर मिलतेही कृपा आनी सुरू हो जायेगी....

भंकस बाबा's picture

12 Nov 2015 - 3:55 pm | भंकस बाबा

आठवले, आठवले हो आम्हाला!
दचकुन् जागे झालो की हो राव

बाबा योगिराज's picture

12 Nov 2015 - 4:20 pm | बाबा योगिराज

आवड्यास. कोरस-२
भेष्टच ना.

अभ्या..'s picture

12 Nov 2015 - 5:17 pm | अभ्या..

सापडला का चादरचोर?
किती वेळा मागितलीस सोलापुरी चादरदे चादरदे म्हणून. अगदी हौसेने गिफ्ट म्हणून दिली. काय उपेग झाला रे?
चादरीवर बसून साधना केली तर असेच होणार. ;) (निदान हेमामालिनी तरी करायचीस)
आलिया भोगासी असावे सादर.
(ओ)रडत बसावे गमवूनी चादर.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Nov 2015 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या चादरीच्या फुल्या
.................http://www.sherv.net/cm/emo/happy/tears-of-joy-smiley-emoticon.gif
माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

नाखु's picture

16 Nov 2015 - 12:40 pm | नाखु

चादरीचं थोडीच असं आहे की उसपे "वापरणेवाले का नाम" हा अता काही ठळक खाणा खुणा असतील तर बघू शोधता येईल का?

चौकी हवालदार
नाखुस झोपाकाढे

वि. सू. काव्य आवडले आहे

माझ्या चादरीच्या फुल्या

ह्याच्या पुढल्या ओळीचं यमक वाचताना श्वास दोन मिनटं रोखून धरला होता. ;)

दिवाकर कुलकर्णी's picture

16 Nov 2015 - 11:02 pm | दिवाकर कुलकर्णी

डब्बल हुती का शिंगल ?
येक डब्बल गावल्याली हाये पर
तेच्यानर ******** असं खुना हाइती,
तर ती तुम्ची आसलं काय?

प्रसाद गोडबोले's picture

25 Nov 2015 - 3:10 pm | प्रसाद गोडबोले

इतकी अभिजात कविता फ्लॉप गेली हे पाहुन एक एक मिपाकर म्हणुन शरम वाटली

बॅटमॅन's picture

25 Nov 2015 - 3:17 pm | बॅटमॅन

असेच म्हणतो. किमान अत्ता तरी या पापाचे परिमार्जन करण्याची संधी मिपाकरांना मिळतेय हेही नसे थोडके.

प्रचेतस's picture

25 Nov 2015 - 3:30 pm | प्रचेतस

अगदी अगदी =))

नाखु's picture

25 Nov 2015 - 4:08 pm | नाखु

निरमा असल्याचा परिणाम असावा काय???. इथे रिकामी पातेली १००त पोहोचतात. आणी निरमा निव्वळ देशी ब्रँड असल्याने अन्याय..

स्व"देशी" जागरण मंच

जागरण

प्रभू-प्रसाद's picture

26 Nov 2015 - 12:58 pm | प्रभू-प्रसाद

एकट्याने की चारचौघानी साग्रसंगीत बसायची ?

अभ्या..'s picture

26 Nov 2015 - 1:02 pm | अभ्या..

एक चादर मैलीसी ;)

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 6:39 pm | सतिश गावडे

ही नुसती चौकशी आहे की सहभागी होण्याची ईच्छा आहे यावर उत्तर अवलंबून आहे. ;)

पगला गजोधर's picture

26 Nov 2015 - 1:04 pm | पगला गजोधर

चोरणार्याचे नाव : 'मान्जरचोर' असे असून, तो आपले नावं, 'मा*रचो*' अशे फ्याशनेबल लिहितो, असे ऐकिवात आहे.

सतिश गावडे's picture

26 Nov 2015 - 6:38 pm | सतिश गावडे

आम्ही तर ते *दरचो* असे वाचले होते. ;)

गावडे दक्ष चादरीवर लक्ष ;)

नाखु's picture

27 Nov 2015 - 9:14 am | नाखु

नजर हटी दुर्घटना * घटी

दुर्घटना=चादर पळवली गेली,

उगा नको त्या कल्पना लढवू नये,हेतुपुरस्सर गैरसमजास चादर मालक्,धागा चालक आणि प्रतीसादक जबाबदार नाहीत.

बेधुंद's picture

26 Nov 2015 - 6:49 pm | बेधुंद

मझ्या चादरी विना ,मला झोप भी येईना।

टवाळ कार्टा's picture

23 May 2018 - 6:53 pm | टवाळ कार्टा

आम्च्या सरांची एक सदाबहार रचना परत वर आणत आहे

मिपाइतिहासाचा अभ्यास नसेल तर हे काव्य इतरांना झेपणारे नाही. :)

गुरुजींनी चादरीच्या आतून थोडा प्रकाश टाकावा आशी ईनंती नवंमिपाणकारांकडूंन करतो.

रच्याकने, त्या निमित्ताने हे सुप्रसिद्ध गाणं आठवलं -
नार सूड भावनेने आज पेटली.. त्याच्या चादरीची घडी कुणी मोडली..

प्रचेतस's picture

26 May 2018 - 5:36 am | प्रचेतस

=))

अरेरे, हे चादरकाव्य वाचायचं राहून गेलं होतं.
बाकी चादर धूवुन वाळत घातली असल्यास, शेजारणीनी आपली समजून घेतली असण्याची शक्यता आहे. (वाळत घालण्याची जागा कॉमन असावी असा अंदाज)

सूड's picture

24 May 2018 - 2:34 pm | सूड

=))

जावई's picture

25 May 2018 - 6:27 am | जावई

गावडे वस्ताद!

चौकटराजा's picture

25 May 2018 - 12:47 pm | चौकटराजा

एकाला लागली घाई जिलबी टाकण्याची
उघड्यावर गेय्ततर पण्चाईत व्हायाची
तेनी युक्ती केली
अन आडोशासाठी
तुमची चादर पळविली ....

चौकटराजा's picture

25 May 2018 - 12:52 pm | चौकटराजा

* जिलबी म्हणजे " तसली " कविता
चादर कशासाठी म्हून - कवीला मूळ पेरना लपवायची हाय ! जमले तर टाक दिसला तरी चालेले पण शाईचा त्ताम्ब्या लपावायाचा हाय !

चादरमोद या शब्दाचा उगम इथुनच झाला काय ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanati

सतिश गावडे's picture

27 May 2018 - 12:53 pm | सतिश गावडे

हे एक प्रासंगिक लेखन होते. प्रासंगिक लेखन हे तत्कालिन घटनेवर भाष्य करणारे असते. जसा काळ पुढे सरकतो तशी ती घटना विस्मृतीत जाते आणि त्या घटनेवर भाष्य करणारे प्रासंगिक लेखनही असंबद्ध होते. या विडंबनाचेही तेच झाले असले तरीही विडंबनाचा बाज बघता कवी मूळ प्रेरणा लपवत आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आल्यावाचून राहाणार नाही.

मात्र हे विडंबन लिहून अडीच वर्ष झाली असून विडंबनाची मूळ प्रेरणा लिहीणे आता योग्य वाटत नाही. तरीही नवमिपाकरांनी या काव्याचा "माझा कोंबरा कोनी मारीयेला" या कोळीगीताचे विडंबन म्हणूनच आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. :)

नाखु's picture

27 May 2018 - 1:13 pm | नाखु

महावस्त्र काव्य

वाचकांची पत्रेवाला नाखु

सिरुसेरि's picture

28 May 2018 - 7:21 am | सिरुसेरि

भारी लिहिलय . या गाण्याचा इतिहास ठाउक नाही . पण वाचताना , कॉलेजच्या गॅदरींगला ४ ,५ इरसाल पोरं मिळुन स्टेजवर हे गाणं सादर करीत आहेत असं चित्र येत होतं .