विठ्ठल : शामल गरुड

दिवाळी अंक's picture
दिवाळी अंक in दिवाळी अंक
29 Oct 2015 - 8:34 pm

.
.
माझी गंजली मुळाक्षरं
साऱ्या उतान्याच ओळी
पाय दुमडून बसले
पाषाण देहात दडुनी
कोण ठोकतं दार
खुट्टा उघडेना माझा
नाभी मध्ये गुत्थी
आई सोडीना नाळ
कानी आले अफाट
चढला सादळल्या भिंतीवर
मोडला रेड्याचा पाय
कच्च्या जानव्याचं दोर
कसं ओढलं धूड
दात घुसले जीभाडात
कण्ह कण्हत बसला
मनचंद्या कुठल्या भोकातून
वेद पडला बाहेर
माझ्या अंगणात जत्था
चोख्या तुक्याचा गजर
जनी सोवळीच उभी
कोरे घेऊन अभंग
सारे आत्मीय सोंग
नाही समष्टीचं मूळ
विद्रोहाचं कूळ चन्द्रभागेखाली
सारा बंबाट खेळ
वीट सोडेना विठ्ठल
काळा निळा घोळ
विझली अंधारात शिळ
काय मागल्या दारी
आई व्यायली लपून

- शामल गरुड
ई-५, प्राध्यापक सहनिवास,
मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परीसर,
कलिना, सांताकृझ (पूर्व), मुंबई -९८
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मितान's picture

11 Nov 2015 - 7:24 am | मितान

समजली नाही:(
असो.

माझ्या अंगणात जत्था
चोख्या तुक्याचा गजर
जनी सोवळीच उभी
कोरे घेऊन अभंग
सारे आत्मीय सोंग
नाही समष्टीचं मूळ
विद्रोहाचं कूळ चन्द्रभागेखाली

हे कडवं आवडलं. एक वेगळीच भावना प्रतीत होतेय. कदाचित शोषित भक्तांची आर्त व्याकुळता असावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Nov 2015 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शोषित भक्तांची आर्त व्याकुळता आवडली.

-दिलीप बिरुटे

आतिवास's picture

20 Nov 2015 - 11:34 am | आतिवास

समजल्यासारखी वाटतेय,
पण ..
नीट पोचली नाही.

नाखु's picture

20 Nov 2015 - 11:57 am | नाखु

आर्त विनंती , रसग्रहण करा तर आम्हाला उमजेल

अखिल मिपा दुर्बोध विद्रोही कथा कवीता सर्वमान्य भाषेत सुलभ सादरीकरण विनंती संघा तर्फे निवेदन.