मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विठ्ठल : शामल गरुड

दिवाळी अंक · · दिवाळी अंक
. . माझी गंजली मुळाक्षरं साऱ्या उतान्याच ओळी पाय दुमडून बसले पाषाण देहात दडुनी कोण ठोकतं दार खुट्टा उघडेना माझा नाभी मध्ये गुत्थी आई सोडीना नाळ कानी आले अफाट चढला सादळल्या भिंतीवर मोडला रेड्याचा पाय कच्च्या जानव्याचं दोर कसं ओढलं धूड दात घुसले जीभाडात कण्ह कण्हत बसला मनचंद्या कुठल्या भोकातून वेद पडला बाहेर माझ्या अंगणात जत्था चोख्या तुक्याचा गजर जनी सोवळीच उभी कोरे घेऊन अभंग सारे आत्मीय सोंग नाही समष्टीचं मूळ विद्रोहाचं कूळ चन्द्रभागेखाली सारा बंबाट खेळ वीट सोडेना विठ्ठल काळा निळा घोळ विझली अंधारात शिळ काय मागल्या दारी आई व्यायली लपून - शामल गरुड ई-५, प्राध्यापक सहनिवास, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी परीसर, कलिना, सांताकृझ (पूर्व), मुंबई -९८ .
दिवाळी अंक वर्ष

वाचने 6271 वाचनखूण प्रतिक्रिया 5

एस Fri, 11/13/2015 - 23:19
माझ्या अंगणात जत्था चोख्या तुक्याचा गजर जनी सोवळीच उभी कोरे घेऊन अभंग सारे आत्मीय सोंग नाही समष्टीचं मूळ विद्रोहाचं कूळ चन्द्रभागेखाली
हे कडवं आवडलं. एक वेगळीच भावना प्रतीत होतेय. कदाचित शोषित भक्तांची आर्त व्याकुळता असावी.

नाखु Fri, 11/20/2015 - 11:57
आर्त विनंती , रसग्रहण करा तर आम्हाला उमजेल अखिल मिपा दुर्बोध विद्रोही कथा कवीता सर्वमान्य भाषेत सुलभ सादरीकरण विनंती संघा तर्फे निवेदन.