रिकोटा लेमन केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Oct 2015 - 5:56 pm

मिपा वरती पाकृ विभागाचे उद्घाटन मी गुलखंडाच्या रेसिपीने केले आणि आता ही माझी शतकी पाकृही डेझर्टची च देते.
चीज केकच्या अनेकानेक रेसिप्या आहेत त्यातील ही एक तुम्हाला माहिती आहेच.
चीजकेक म्हणजे कॅलरीबाँब! पण सणासुदीच्या उत्सवी दिवसात एखादेवेळी चालतात असे पदार्थ..
तर हा केक करण्यासाठी-

साहित्य-
५०० ग्राम रिकोटा चीज
१ मध्यम लिंबू (ऑरगॅनिक) लिंबू आदल्या दिवशी फ्रिजरमध्ये ठवून द्या कारण आपल्याला त्याची किसलेली साल हवी आहे. म्हणून ऑरगॅनिक लिंबू घ्यावे.
१५० ग्राम साखर
२ टीस्पून वॅनिला इसेन्स
३ अंडी
४ ते ५ चमचे कॉर्न स्टार्च + १/२ चमचा बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ

कृती-
फ्रिजरमध्ये ठेवलेल्या लिंबाची साल चांगली किसली जाते म्हणून ते डीप फ्रिज मध्ये ठेवा. केक करायच्या वेळी बाहेर काढून किसा व त्यातील अर्ध्या लिंबाचा रस काढा.
रिकोटा चीज एका बाउल मध्ये काढून घ्या व चमच्याने फेटा किवा हँडमिक्सीने ब्लेंड करा.
त्यात साखर मिसळा. वॅनिला अर्क, लिंबाची साल व अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि बिट करा.
एक एक अंडे त्यात फोडून घाला आणि फेटत रहा.
कॉर्नस्टार्च मध्ये चिमूटभर मीठ व बेकिंग पावडर घालून मिक्स करा व हा स्टार्च चीजच्या मिश्रणात घालून बिट करा.
१७० अंश से वर अवन प्रिहिट करा. २५ ते ३० मिनिटे केक बेक करा.
नंतर केकच्या पोटात सुरी किवा विणायची सुई खुपसून पहा. सुरीला मिश्रण न चिकटता बाहेर आली म्हणजे केक झाला. मिश्रण चिकटल्यास अजून एखाद दोन मिनिटे ठेवा. केक झाल्यावर लगेचच अवन बाहेर काढू नका. ५ मि. अवन मध्येच राहू द्या.
नंतर केक बाहेर काढून जाळीवर टाका.

.

एअर फ्रायर वापरल्यास-
१६० अंश से वर प्रिहिट करा.
२५ मिनिटे ए एफ मध्ये ठेवा. बेल झाली की एक मि. नंतर उघडा.
बाहेर काढून जाळीवर टाका.
(मी हा केक ए एफ मध्ये केला आहे.)

.

..

जर्मन मंडळींना केक बरोबर कॉफी हवीच! ह्या केकचाही कॉफीबरोबर आस्वाद घ्या.

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

27 Oct 2015 - 6:16 pm | स्रुजा

वाह ! सुरेख अगदी.. सिट्रस फ्लेवर ची सगळी डीझर्ट्स मला फार आवडतात.. हा नक्की करुन बघेन :)

सानिकास्वप्निल's picture

27 Oct 2015 - 7:12 pm | सानिकास्वप्निल

सिट्रस फ्लेवर ची सगळी डीझर्ट्स मला फार आवडतात.

अगदी सेम हेच म्हणतेय.

अभिनंदन ताई :)

रिकोटा लेमन केक बघून तोंपासू.

रेवती's picture

27 Oct 2015 - 6:18 pm | रेवती

शतकी पाकृबद्दल अभिनंदन.
केक छान दिसतोय. ए फ्रा मधील असल्याने नवलाईचा आहे.

मधुरा देशपांडे's picture

27 Oct 2015 - 6:19 pm | मधुरा देशपांडे

वावा. आली का शंभरावी पाकृ. अभिनंदन स्वातीताई.
हा फोटोतला केक स्वतः खाल्ला असल्याने जळजळ अजिबात झाली नाही. फार फार भारी झाला होता केक :)

कविता१९७८'s picture

27 Oct 2015 - 7:25 pm | कविता१९७८

मस्त ग स्वाती ताई

सोपी आणि सुटसुटीत आहे रेसिपी. नक्की करून बघणार.

सूड's picture

27 Oct 2015 - 10:34 pm | सूड

सुंदर!!

शंभराव्या पाकृबद्दल हार्दिक अभिनंदन आणि साष्टांग दंडवत!

प्रचेतस's picture

27 Oct 2015 - 11:04 pm | प्रचेतस

भारी.

पैसा's picture

27 Oct 2015 - 11:12 pm | पैसा

मस्त आहे! आणि शतकासाठी अभिनंदन!

प्यारे१'s picture

27 Oct 2015 - 11:21 pm | प्यारे१

100 वी 'स्वादि'ष्ट पाककृती सादर केल्याबद्दल अभिनन्दन!

आणि आपला नेहमीचा आवडीचा प्रश्न.....
ओळखा पाहू?

नंदन's picture

28 Oct 2015 - 12:20 am | नंदन

शतकी पाककृतीबद्दल हार्दिक अभिनंदन! आंतरजालीय 'काफे उंड कुकन' आणि गप्पांचा हा सिलसिला असाच चालू राहो.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2015 - 1:31 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cake.gif

प्रीत-मोहर's picture

28 Oct 2015 - 7:49 am | प्रीत-मोहर

____/\____

प्रीत-मोहर's picture

28 Oct 2015 - 7:49 am | प्रीत-मोहर

____/\____

अमृत's picture

28 Oct 2015 - 8:42 am | अमृत

रिकोटा चीज मिळाल्यास करून बघणार.

स्नेहल महेश's picture

28 Oct 2015 - 2:31 pm | स्नेहल महेश

अभिनंदन ताई

पद्मावति's picture

28 Oct 2015 - 3:26 pm | पद्मावति

वॉव..मस्तं यम्मी केक.

मदनबाण's picture

28 Oct 2015 - 4:53 pm | मदनबाण

अभिनंदन ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राधा ना बोले ना बोले ना बोले रे... :- Azaad

स्मिता श्रीपाद's picture

28 Oct 2015 - 5:49 pm | स्मिता श्रीपाद

१०० ??????? अबब
ताई दंडवत स्वीकारा __/\__

ही रेसिपी पण मस्त

दिपक.कुवेत's picture

29 Oct 2015 - 6:51 pm | दिपक.कुवेत

फारच टेम्टींग दिसतोय. दे ईकडे पाठवून

अक्षया's picture

5 Nov 2015 - 4:07 pm | अक्षया

मस्तच दिसतोय !
शतकी पा़कॄ बद्दल अभिनंदन !!
:)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Nov 2015 - 7:54 pm | परिकथेतील राजकुमार

मी आधी रिकामटेकडा केक असे वाचले चुकून. =))

पाकृ जबर्‍यादस्तच.

मिपा वरती पाकृ विभागाचे उद्घाटन मी गुलखंडाच्या रेसिपीने केले आणि आता ही माझी शतकी पाकृही डेझर्टची च देते.

ही जाहिरात मात्र आवडली नाही. मिपाच्या व्यासपीठाचा असा गैरवापर णिषेधार्ह्य आहे! :P :P

चतुरंग's picture

5 Nov 2015 - 8:03 pm | चतुरंग

मनःपूर्वक अभिनंदन स्वातीतै! :)

(केकबघूनखंप्लीटखपलेला)केकरंग

नूतन सावंत's picture

15 Nov 2015 - 9:37 pm | नूतन सावंत

स्वाती,अभिनंदन.असेच द्विशतक होऊदे ही सदिच्छा.

तुमचा अभिषेक's picture

15 Nov 2015 - 10:41 pm | तुमचा अभिषेक

वॉव कसला यमी दिसतोय..
आणि पाकृचे शतक.. जबरी.. शतकाबद्दल अभिनंदन