चीजकेक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
30 Aug 2009 - 3:17 pm

अनेकानेक प्रकारच्या चीजकेकच्या रेशिप्या उपलब्ध आहेत त्यातील ही एक पाकृ खास टार्‍याच्या बड्डे निमित्त!
टारोबाचा बड्डे असल्याने कॅलरींबिलरींचा विचार तात्पुरता बाजूला सारुन कॅलरीबाँब असणारी ही पाकृ देते आहे.
साहित्य- १किलो मागर(लो फॅट) क्वार्क/ चक्का/ केफिर लेबनी चीज. कमी फॅटवाला चक्का किवा लेबनी चिज घावे.
चक्का किवा लेबनी चीज किवा मागर क्वार्क यातील काहीही एक उपलब्धतेनुसार घेता येईल.
२०० ग्राम बटर/मार्गारिन
२५० ग्राम साखर
१०० ग्राम मैदा,१चिमूट मीठ
६ अंडी
२ चमचे वॅनिला अर्क
१चमचा बेकिंग पावडर
१चमचा लिंबाचा रस+ १/२ लिंबाची साल किसून
२चमचे रम मध्ये भिजवलेले मूठभर बेदाणे ( हे ऑप्शनला टाकू शकता)
१/२ चमचे ब्रेडक्रम्स किवा मैदा

कृती- रममध्ये बेदाणे भिजवून केक ची पुढची कृती करायला घेणे. रम नको असेल तर नुसते बेदाणेही घालता येतील. बेदाणेच नको असतील तर बिनाबेदाण्यांचाही केक करता येईल. टारुका बड्डे है भाई.. आपल्याला हवे तसे ऑप्शन्स घ्या.
बटर भरपूर फेटणे. साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे, वॅनिला अर्क घालून फेटणे. लिंबाचा रस व साल घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ घालून फेटणे. क्वार्क/चीज /चक्का घालून फेटणे. रममधील बेदाणे घालणे व सारखे करणे.
केकच्या मोल्डला बटर लावणे. त्यावर ब्रेडक्रम्स/मैदा भुरभुरणे. मोल्ड आपटून जास्तीचा मैदा/ब्रेडक्रम्स बाहेर काढून टाकणे.
अवन प्रिहिट करायचा नाही. १६५ ते १७० अंश सेल्शियस ला ७० ते ८० मिनिटे बेक करणे. केक झाला की अवन बंद करुन ५ ते ७ मिनिटे केक अवन मध्येच राहू देणे व नंतर बाहेर काढणे.
हॅपी बड्डे टारोबा म्हणून ताव मारणे,:)

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

30 Aug 2009 - 3:21 pm | पर्नल नेने मराठे

हेय काय्...फोटो काढेपर्यन्त पण टारुला धिर नाहि का ;) लगेच खाउन मो़क्ळा. मस्त्च केक ;)
चुचु

सुबक ठेंगणी's picture

30 Aug 2009 - 4:28 pm | सुबक ठेंगणी

सही आहे फोटो आणि पा.कृ. आता करायला सांगीन कुणालातरी माझ्या बड्डेला आणि मी तिथे हजर असताना :)
पर्नलताई...केक टारूने खाल्ला नसेल...स्वातीताईंनी त्याच्यासाठी काकबली काढून ठेवला असेल! :)

सहज's picture

30 Aug 2009 - 4:13 pm | सहज

लै भारी!

मी मधे उत्साहाने सगळे साहीत्य आणले होते पण करायला वेळ झाला नाही व सगळे साहीत्य इतर कशात तरी वापरले गेले. :P

चलो कॅलरीबाँब नसणारी ही पाकृ मी देईन टारुच्या पुढच्या बड्डे पर्यंत ;-)

सुनील's picture

30 Aug 2009 - 5:57 pm | सुनील

खरं म्हणजे चीझकेक माझा आवडता पण कॅलरीमुळे मुद्दामूनच चार हात लांब राहतो. पण आता एकदा तरी चव घ्यायला हरकत नाही, असे वाटते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Aug 2009 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते

जाऊ दे...

बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश's picture

30 Aug 2009 - 6:32 pm | ऋषिकेश

वा जबरी!!!!!
ओव्हन मायक्रोवेव्ह असल्यास किती वेळ ठेवावा? (तेव्हा ७०-८० मिनिटे खूप जास्त वाटतात)

टारोबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ३२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बडबडगीत "पॅट अ केक पॅट अ केक बेकर्स मॅन...."

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2009 - 12:21 pm | स्वाती दिनेश

मायक्रोवेव + कनव्हेक्शन असेल तर कन्वेक्शन मोड वर ठेवून साध्या अवन प्रमाणे वापरणे.म्हणजेच साध्या अवन मध्ये जितका वेळ लागतो साधारण तितकाच वेळ त्यातही लागतो आणि केक उत्तम होतो,
साध्या मायक्रोवेव (बिना कन्व्हेक्शनचा) मध्ये जर केक केला तर त्याला ब्राऊनिंग येत नाही आणि कधी कधी केक आतून होतो पण बाहेरुन सॉगी रहातो.(वाफ धरल्यामुळे)
स्वाती

टारझन's picture

30 Aug 2009 - 11:24 pm | टारझन

कोटि कोटि धन्यवाद स्वाती तै ... एक मागणी क्षणात पुर्ण :)
आज केक खाताना तुमची आठवण काढली होतीच !! :)
शोधतंच होतो कुठे आपल्या केकची पाकृ दिसते का ते .. आणी दिसली !!
चिझ केक के व ळ अ प्र ति म :)

- (केकप्रेमी) टारोबा बेकर

आशिष सुर्वे's picture

31 Aug 2009 - 1:05 am | आशिष सुर्वे

ह्या 'ना-चीज' ला 'चीज' आणि 'केक' ह्या दोन्ही गोष्टी आत्यंतिक प्रिय आहेतच.. त्यात 'चीजकेक' म्हणजे 'मोक्ष'च म्हणा ना!
आपले आभार!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्राजु's picture

31 Aug 2009 - 5:06 am | प्राजु

एक शंका... लेबनी चीज दिसतं कसं? चक्क्या सारखं का? ग्रोसरी स्टोअर्स मध्ये डेअरी प्रॉड्क्टस च्या फ्रिज मध्ये पहायचं का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

31 Aug 2009 - 11:20 am | स्वाती दिनेश

अमेरिकेत कोणत्या सेक्शन मध्ये मिळतं ठाउक नाही पण कदाचित डेअरी विभागात मिळावे, सुपरमार्केटात फ्रेश चीज ज्या सेक्शन मध्ये मिळतात तेथे पहा प्राजु,
स्वाती

प्राजु's picture

31 Aug 2009 - 9:34 pm | प्राजु

आणते आणि करून बघते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

31 Aug 2009 - 6:48 am | चतुरंग

के व ळ अप्रतीम! :)

(खुद के साथ बातां : इथून पुढं भारतात जातायेताना केवळ लुफ्तांसानेच जावे की काय, म्हणजे फ्राफुला एक टप्पा टाकून केक आणी तत्सम पाकृ पार्सलनेच नेता येतील! ;))

(धोरणी)चतुरंग

दिपाली पाटिल's picture

31 Aug 2009 - 6:59 am | दिपाली पाटिल

वा..सुरेख... ही वेगळी पाकृ आहे...छान दिसतोय केक आणि यावर फ्रॉस्टींग केली तर सर्वींग साईझ १ टेबलस्पून होइल बहुतेक :D (ह.घे.)

दिपाली :)

रेवती's picture

31 Aug 2009 - 7:47 am | रेवती

सुंदर केक! तोंडाला पाणी सुटले.
टार्‍याची मजा आहे. दणक्यात वाढदिवस साजरा झालेला आहे.

रेवती

दशानन's picture

31 Aug 2009 - 8:37 am | दशानन

हॅ हॅ हॅ !

आधी मोदकांची पाठी पडलो आहे... आता काय केक च्या पडू काय :?

कोणी तरी मीपावर कोर्स चालू करा रे.... :)

गुड न्युज.... काल मी किचन मध्ये गेलो होतो... मोदक करण्यासाठी :D

प्राजु's picture

31 Aug 2009 - 8:42 am | प्राजु

काल मी किचन मध्ये गेलो होतो... मोदक करण्यासाठी

हे राम!! #o
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

31 Aug 2009 - 10:00 am | चतुरंग

का 'मोडक' झाले?

(सूचना - कृपया श्रावण मोडक साहेबांनी मनाला लावून घेऊ नये! ;) )

(सूचक)चतुरंग

दिपाली पाटिल's picture

1 Sep 2009 - 1:01 pm | दिपाली पाटिल

>>कोणी तरी मीपावर कोर्स चालू करा रे.... :S :T

म्हणजे मिपावर दिलेल्या पाकृ नुसत्याच बघता की काय??? :/

दिपाली :)

सोनम's picture

19 Sep 2009 - 3:31 pm | सोनम

केक छान आहे. आणी फोटो तर त्याच्या पेक्षा उत्तम :) :)
कोणी तरी मीपावर कोर्स चालू करा रे....
तु केला तर काही हरकत आहे का.? :? :?
काल मी किचन मध्ये गेलो होतो...
किचनची अवस्था कशी आहे... :( :(
मोदक करण्यासाठी
=)) =))
तुला मोदक येतात राजे. माहित नव्हते आम्हाला

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:00 am | विसोबा खेचर

लै भारी...

तात्या.

मदनबाण's picture

31 Aug 2009 - 9:28 am | मदनबाण

केक मस्तच दिसतोय !!! :)

मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

कपिल काळे's picture

31 Aug 2009 - 10:20 am | कपिल काळे

मस्त केक.

रम मध्ये भिजवलेले बेदाणे- हे तर लैच भारी!!

माझ्या एक वर्षाच्या 'नायजेरीया'तील वास्तव्यात बर्‍याच लेबनीज पाककॄती खाण्याचा योग आला होता.
त्यात 'Hummus' (किंवा 'Hummus be Tahini'),
'Kushary', 'Tabbouleh', हे काही पदार्थ होते.

लेबनीज चीज हे एक प्रकारचे जाडसर क्रीमचे चीज असते.
त्याला 'Labneh Cheese' असे नाव आहे.
ह्यात थोडे मसाले असतात. आणि पारंपारिक लेबनीज जनतेत 'ति़खट' चवीचेच 'Labneh' चीज लोकप्रिय आहे.
मी खाल्लेले लेबनीज चीज हे थोडे पिवळसर होते आणि थोडेसे तिखट होते.

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

स्वाती दिनेश's picture

1 Sep 2009 - 12:09 pm | स्वाती दिनेश

तिखट चीज केकसाठी घेऊन उपयोग नाही. केफिर लेबनी चीज किवा क्रिम चीज (फिलाडेल्फिया क्रिम चीज) घ्या.
स्वाती

स्मिता श्रीपाद's picture

31 Aug 2009 - 12:04 pm | स्मिता श्रीपाद

सही ग स्वातीताई....
कसला भारी फोटु आहे..

(केकसाम्राज्ञी स्वातीताई की जय...) :-)

-स्मिता

शाल्मली's picture

31 Aug 2009 - 3:37 pm | शाल्मली

मस्त फोटो!!
चीज केक.. नाव आणि फोटो बघूनच वजन वाढल्यासारखं वाटतंय.. त्यामुळे प्रत्यक्ष करण्याची हिम्मत बहुधा होणारच नाही. ;)
दिसतोय मात्र खूपच छान!

--शाल्मली.

लिखाळ's picture

31 Aug 2009 - 5:18 pm | लिखाळ

वा .. मस्त चित्र आणि मस्त पाकृ !! :)

-- लिखाळ.

वैशाली हसमनीस's picture

1 Sep 2009 - 11:44 am | वैशाली हसमनीस

स्वाती,केक सुंदरच दिसतो आहे पण तो तुझ्यासाठी व दिनेशसाठी नाही
हे लक्षात ठेवावे बरे !

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2009 - 12:11 pm | स्वाती दिनेश

सर्व खवय्यांना धन्यवाद,
केक कॅलरीबाँब आहे खरा, पण मागरक्वार्क वापरुन त्यातल्या क्यालरी थोड्या कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ख्रिस आणि दिनेशचा फंडा तर सर्वांनाच वापरता येईल,.
(आइन स्ट्युक= आइन किलोमेटर )
म्हणजे केकचा एक मोठा तुकडा खाणे आणि १ किमी धावणे. क्यालरींचा हिशेब तिथल्यातिथेच पूर्ण,:)
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Sep 2009 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते

म्हणजे केकचा एक मोठा तुकडा खाणे आणि १ किमी धावणे. क्यालरींचा हिशेब तिथल्यातिथेच पूर्ण,

कायप्पण हां उग्गाच... रोज १०-१२ किलोमीटर धावायला कसे जमणार?

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

3 Sep 2009 - 8:40 pm | चतुरंग

अहो असला सॉल्लीड केक चोपल्यावर मला जेवणाच्या टेबलापासून उठताही येत नाही, धावतोय कुठला डोंबलाचा! धावणार स्वप्नात!!
आणी खरं सांगू का, हे असले केक जर खायचेच असतील ना तर साला त्या कॅलरीजचा विचार करुच नये. हे काय आपण रोज रोज खातो का? मग होऊन जाऊद्या हं, हाण रंग्या! ;)

(गठ्ठा)चतुरंग

स्वाती२'s picture

3 Sep 2009 - 6:51 pm | स्वाती२

मस्त पाकृ. मात्र सद्धया नुसता फोटोच बघणार.