लॉटरी

सायकलस्वार's picture
सायकलस्वार in जनातलं, मनातलं
27 Oct 2015 - 6:41 am

ब्रेकफास्ट आणि लंचच्या मधलीच वेळ असल्यामुळे कॅफेटेरिया तसा मोकळाच होता. एका कोपर्‍यात अमोल आणि प्रितेश समोर कॉफीचे रिकामे कप घेऊन टाईमपास करत बसले होते. दोघांनाही डेस्कवर परतायची घाई नव्हती. अमोल बेंचवर होता म्हणून आणि प्रितेशला तशीही काम करण्याची फारशी हौस नसे म्हणून.
तेवढ्यात दोघांना समीर कॉफी घेऊन त्यांच्याच दिशेने येताना दिसला.
'काय रे भाऊ. लई बिझी झाला आजकाल. दिसत नाही कुठे तो?' अमोलने काहीतरी बोलायचे म्हणून उगीचच विचारले. खरे तर दिवसातले अकरा तास सगळे एकाच फ्लोअरवर एकमेकांसमोर असत.
'नाही रे बिझी कसला! चाललंय नेहमीसारखंच' कॉफी टेबलावर ठेवून एक खुर्ची खेचत समीर म्हणाला. मात्र बोलताना तो गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता. आजकाल अमोलने हे एक नोट केलं होतं. समीर नेहमीपेक्षा खूपच खुशीत दिसत असे. सदैव हवेत चालत असल्यासारखा भाव आणि गालात हसू. कॉलेज संपून अगदी थोड्याच दिवसांनी आयटी कंपनीत बर्‍यापैकी पगारावर लागल्यावर कोणीही आनंदी असणारच. मात्र गेल्या काही दिवसांत समीरमध्ये झालेला बदल त्याने टिपला होता.
'क्युं बे? ये आजकल बहुत खुशीमें दिखता है ना! कोई लडकी-वडकी पटाया लगता है!' प्रितेशकडे वळून अमोलने त्याला संभाषणात खेचायचा प्रयत्न केला. उत्तरादाखल प्रितेशने समीरकडे मख्खपणे एक नजर टाकली आणि तो परत शून्यात डोळे लावून बसला. समीर मात्र आता अगदी खुलून आला. त्याच्याकडे काहीतरी जब्राट सांगण्यासारखी गोष्ट आहे हे अमोलच्या लक्षात आले. त्याने धूर्तपणे थोडी चाचपणी केली आणि अचानक समीरने भसकन बोलायला सुरवात केली. नाहीतरी त्यालाही कोणालातरी सांगायची उर्मी दाटली होतीच.
'एक जबर्‍या सीक्रेट सांगू का'
'बोल'
'कुणाला बोलू नका' त्याने उगाच आढेवेढे घेतले. उलट आपल्या कर्तबगारीचे डंके पिटले जावेत अशी त्याला आतून इच्छा होती.
'नाही बोलत. सांग तू'
'तुला माहितिये मी रोज ऑफिस सुटल्यावर 'खुषबू' हॉटेलजवळच्या स्टॉपवरून बस पकडतो.' कॉफीचा एक घुटका घेऊन त्याने सुरवात केली.
'दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट. मी पोहोचेपर्यंत एक बस नुकतीच सुटली होती म्हणून मी स्टॉपवर एकटाच उभा होतो. इतक्यात एक पोरगी येऊन माझ्याजवळ उभी राहिली.'
पोरगी शब्द ऐकल्यावर प्रितेशचेही कान टवकारले गेले.
'तर दोन-तीन मिन्टं झाल्यावर ती माझ्याजवळ सरकली. आणि अख्खा स्टॉप मोकळा असून पार खेटायलाच लागली रे! मी शिस्तीत थोडा बाजूला झालो तर तीपण सरकली. मी तिच्याकडे वळून पाहिलं तर हसली. मग मीपण थोडा हसलो. पोरगी दिसायला आयटम होती. बारीक पण एकदम शेपली. खूप नाही पण थोडी गोरी. मग आम्ही थोड्या गप्पा मारल्या. मागे थोडी गर्दी जमायला लागली होती. आता तर ती माझ्या अंगाला पार चिकटून उभी राहिली होती. तेवढ्यात बस आली. मी पुढे होणार तेवढ्यात तिने माझा हात धरला. 'ही बस जाऊ दे ना! आपण पुढच्या बसने जाऊ' असं म्हणाली. मग आम्ही मागच्या लोकांना जायला दिलं आणि परत दोघेच राहिलो. आता काळोखपण पडला होता. पुढच्या दोन बस पण आम्ही सोडल्या. इकडे ती मला अगदी फुल्टू लाईन द्यायला लागली होती. मग मी थोडं डेरिंग करून तिच्या पाठीमागून हात घेतला आणि स्टॉपच्या कट्ट्यावर ठेवला. ती पण हसली आणि मस्त माझ्या हातावर रेलली'
एव्हाना अमोल कानात प्राण आणून ऐकू लागला होता. प्रितेश मात्र 'फेकता है साला' असे म्हणून हातातल्या मोबाइलवर चाळे करण्यात गुंगला. पण त्याचा एक कान समीरकडे होताच.
समीरने मग घोळवून, तिखटमीठ लावत पुढचा किस्सा सांगितला. 'मी हळूहळू तिच्या कमरेवर हात नेला. तिने पण रिस्पॉन्स द्यायला सुरवात केली. जाणारे-येणारे लोक आमच्याकडे बघत होते. पण मी बिन्धास त्यांना इग्नॉर केलं. साला पोरगी एवढी लाईन देतेय तर मागे राहायला आपण काय हिजडा आहोत काय? असा बराच वेळ गेला. मग ती काय बोलली माहितीय?' समीरने एक नाट्यमय पॉज घेतला.
'?'
'तिकडे प्रिन्सेस बारच्या मागे एक लॉज आहे. तिथे तासावर रूम मिळते'
अमोल आणि प्रितेश दोघेही उडाले.
'चल बे फेकू. चुत्या बना रहेला है क्या'
'भडव्या उगाच खेचतोयस का आमची'
'खेचत नाही. पुढचं ऐक' असे म्हणून समीरने पुढचा सर्व प्रसंग डिटेलवार सांगितला.
क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

27 Oct 2015 - 8:34 am | योगी९००

खेचू नका ...लवकर पुढचा भाग टाका...!!

मस्त लिहीलेयं

अमृत's picture

27 Oct 2015 - 8:44 am | अमृत

फेकू :-).... बाकी हे शेपली म्हणजे काय?

अनुप ढेरे's picture

27 Oct 2015 - 10:19 am | अनुप ढेरे

आकर्षक आकाराची

नाखु's picture

27 Oct 2015 - 11:16 am | नाखु

तुम्ही दिवट्यांना भेटला नाहीत ते !!!!!!

कथा प्रतीसाद दुसरा भाग वाचल्यावर

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 12:55 pm | टवाळ कार्टा

वाचतोय....

लै ईंटरेस्ट घेऊन वाचला असशील ना टक्या?
बघु आता नवीन भागात काय दाखवताहेत.

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 2:31 pm | टवाळ कार्टा

हो....तू नै कै? =))

कपिलमुनी's picture

27 Oct 2015 - 2:46 pm | कपिलमुनी

टका काल बेस्टच्या ऑफिसमध्ये खुषबू' हॉटेलजवळच्या स्टॉपची चौकशी करताना आढळला असे सूत्रांकडून कळाले

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2015 - 3:54 pm | टवाळ कार्टा

हट बे...गरज नाय...घर बेश्ट असते ;)

नाखु's picture

28 Oct 2015 - 3:12 pm | नाखु

वाटल तू बेश्ट (मध्ये)च घर (पक्षी स्थळ) शोधतोय ते !!!!

मास्टरमाईन्ड's picture

27 Oct 2015 - 2:20 pm | मास्टरमाईन्ड

पुढचा भाग येऊ द्या लवकर.

जव्हेरगंज's picture

27 Oct 2015 - 6:40 pm | जव्हेरगंज

सायकलवर स्वार! येऊद्या!

यावरुन एक कविता आठवली.

ओ मेरे नीचे थी
और मै ऊसके ऊपर था.
हातोमे मेरे हात थे.
और पैरो मे पैर थे.
घबराव ना मेरे दोस्तों,
वो मेरी सायकल थी.
:)

शिव कन्या's picture

27 Oct 2015 - 6:50 pm | शिव कन्या

हे जमलेय.
पुभाप्र.